Badlapur City

Badlapur City Badlapur City (Natural City of Mumbai-Thane Sub Urban) http://www.badlapur.co.in/ Badlapur was a travel route from Konkan to Gujarat, via Surat.

(643)

The town was famous for its rich horse breeds. Warriors of "Shivaji Maharaj" used to change their horses here in anticipation of the difficult climbing through the Konkan area. The word ‘Badla’ (Marathi word for “to change”) was linked to the town. For the first time in 1971, Badlapur was recognised as a municipal town in the Ulhasnagar Tehasil. City has seen a massive growth since 80s and since t

hen the population has increased rapidly. Taluka: Ambernath

Dist: Thane

State: Maharashtra

Latitude. 19.15°, Longitude. 73.2666667°

Badlpaur is surrounded by the natural beauty of hills and mountains. Railway line divides the city into two parts, East and West. The town is built on many hills, on the banks of Ulhas river. Due to the population growth in the nearby cities, many people working in Mumbai suburbs have moved to Badlapur because of the affordable real estate prices, pleasant weather, beautiful location and quiet neighborhoods along with a proximity to Mumbai by local trains. Now Badlapur city encompasses the Old Badlapur Village, Kulgaon, Manjarli, Belavali, Katrap and many other surrounding small villages.

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असुन, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

इतिहास:
शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर हा सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा मार्ग होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली उल्हासनगर तालुक्यातील या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

आकर्षणे:
बदलापु्र परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानका पा्सून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्त्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. ब्यारेज आणि कुन्देश्वर ह्या धरणां व्यतिरीक्त बदलापूर स्थानकापासुन सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखळोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.

02/08/2025

RAW Footage

29/07/2025

राज्य सरकार चा महावितरण द्वारे गजब कारभार, बदलापुरातील पश्चिम विभागात वीज ग्राहकाला बंद मीटर.चे १८ हजार बिल, ग्राहकाने दुरूस्ती किंवा नवे मीटर लावण्यास विनंती करून देखिल त्यास दुर्लक्षित केले आणि अन्यायकारक बिल पाठवून मानसिक आणि आर्थिक संकटात टाकले.
CMOMaharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Waman Mhatre Badlapur City

ह्या सर्व भोंगळ कारभार वर आपण सुद्धा व्यक्त व्हा.

22/07/2025

Follow the Badlapur City channel on WhatsApp:

21/07/2025

💡 महावितरणकडून अन्यायकारक वागणूक!

भोन्गळ कारभार

घरातील वीज मीटर पूर्णपणे बिघडलेला आहे आणि त्यातील रीडिंग दिसतच नाही. मीटरची स्थिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये स्वतः पाहू शकता.

याची अनेक वेळा तक्रार करूनही महावितरणचे कर्मचारी मीटर बदलायला तयार नाहीत. उलटपक्षी, चुकीचे बिल पाठवून ते भरायला भाग पाडले जात आहे.

ग्राहकाच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चुकीचे बिल लावणे, ही अन्यायकारक पद्धत आहे. आम्ही वेळेवर बिले भरतो, पण जबाबदारी महावितरणची असताना आम्हालाच दोषी धरले जात आहे.

PERFECT TIME TO JOIN WITH US…..Wake up 🆙 it’s time to take the ACTION Start Your fitness journey With U-VA Fitness 💪🏻BIG...
15/07/2025

PERFECT TIME TO JOIN WITH US…..
Wake up 🆙 it’s time to take the
ACTION Start Your fitness journey With

U-VA Fitness 💪🏻BIGGEST MANSOON OFFER

🔛7️⃣9️⃣9️⃣9️⃣

🔧 फ्रिज, डीप फ्रीझर, एसी, वॉटर कूलर दुरुस्ती व स्पेअर पार्ट्स सेवा – आता बदलापूर मध्ये!✅ फ्रिज | रेफ्रिजरेटर | डीप फ्रीझ...
08/07/2025

🔧 फ्रिज, डीप फ्रीझर, एसी, वॉटर कूलर दुरुस्ती व स्पेअर पार्ट्स सेवा – आता बदलापूर मध्ये!

✅ फ्रिज | रेफ्रिजरेटर | डीप फ्रीझर | एअर कंडिशनर | वॉटर कूलर

सर्व प्रकारचे व सर्व ब्रँडचे घरगुती व औद्योगिक उपकरणे – दुरुस्ती, देखभाल आणि स्पेअर पार्ट्ससह

💯 विश्वासार्ह सेवा • त्वरित प्रतिसाद • वाजवी दरात काम

📞 आजच संपर्क करा: 8879672737
🛠️ सेवा क्षेत्र: बदलापूर शहर

---

Expert Repair & Spare Parts Services in Badlapur!
✅ Fridges | Refrigerators | Deep Freezers | Air Conditioners | Water Coolers
We specialize in repairing and servicing all types & brands – domestic or commercial.
Reliable, fast, and affordable solutions with genuine spare parts.

📞 Call Now: 8879672737
🏠 Serving Badlapur City & Nearby Areas
status.

🟠 #संविधान_संकेतस्थळ_प्रकाशन_सोहळा_संपन्न,(Study of Constitution) अभ्यास संविधानाचा www.theconstitutionstudy.com या संके...
07/07/2025

🟠 #संविधान_संकेतस्थळ_प्रकाशन_सोहळा_संपन्न,
(Study of Constitution) अभ्यास संविधानाचा
www.theconstitutionstudy.com या संकेत स्थळाचे
प्रकाशन संविधान वाचक प्रेमी
मा.श्रीधर पाटील (मा.उपनगराध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते,
डॉ,नंदकुमार लक्ष्मण कांबळे (मुक्त लेखक साहित्यिक)
कार्यक्रमाचे अध्यक्ष,
मा.चंद्रकांत जगताप (अध्यक्ष, नेशनल आंबेडकर
राईट्स & बुद्धिस्ट फाउंडेशन)
डॉ. रवींद्र जाधव (अध्यक्ष संविधान सैनिक)
प्रा.स्वप्नील सोनवणे सर (लेखक/संविधान अभ्यासक)
श्री, एम बी डोखे (मा.पोलीस निरीक्षक रेल्वे,अध्यक्ष -सम्राट जेष्ठ नागरिक संस्था बदलापूर
श्री,राजन कांबळे (निरीक्षक मुबंई.मं पा.अतिक्रमन से.नि)
श्री, अरुण केदारे (असि.जनरल मॅनेजर माझगाव डॉक मु.)
श्री. महेंद्र मिसळे(अधीकारी,नेवलं डोकयार्ड, इंडियन नेव्ही)
श्रीमती मधु बिरमोळे जेष्ठ समाज सेविका (अध्यक्ष -घरेलू महिला कामगार संघटना महाराष्ट्र मुंबई प्रदेश)
डॉ,सुरेश गवई (समाज सेवक) गौतम बचूटे (समाज सेवक)
श्री, उमेश गोटे (आंबेडकरी साहित्य मुद्रक)
श्री, विलास पवार (संविधान प्रचारक, प्रीयदर्शनी पब्लि.)
श्री, राहुल सचवानी (डायरेकटर रुद्रा टेक आय टी सर्व्हिस) सदर कार्यक्रमाचे आयोजक सम्राट जेष्ठ नागरिक संस्था बदलापूर.होते तर छान सूत्रसंच्यालन सीमा शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमातील संकेतस्थळ प्रकाशन सोहळा आणि उत्तम व सुनियोजन,निमंत्रक अश्वझेप ट्रेनींग अँड कन्सलन्टसी सर्व्हिसेस प्रा.ली. प्रमुख ऍड- अल्पेश शिर्के यांनी मोठ्या जबाबदारीने पार पाडले त्यांचे सहकारी आदेश् चव्हाण आदिनी मोलाचे सहकार्य केले...
सर्वच पाहुण्यांनी संविधान,उद्धेशिका अभ्यासू वृतीतून सखोल मांडणी करून या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले,उपस्थित सर्व सन्मानीय निमंत्रित पाहुणे जेष्ठ नागरिक आणि संविधान प्रेमि्यांचे मनःपूर्वक आभार...

🟠 गर्दीमुळे आसन व्यवस्था कमी पडली त्या बद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, या,येत रहा,व्यक्त व्हा..
(या निमित्त काही क्षण चित्रे.)

--------------------------------------------------
डॉ, नंदकुमार लक्ष्मण कांबळे.
(मुक्त लेखक/पत्रकार/साहित्यिक...✍️)

बदलापूरचा अभिमान – रोहन राजे!क्रिकेट विश्वात बदलापूरच नाव ज्याने गाजवलं असा क्रिकेटर म्हणजे रोहन राजे. आयपीएलमध्ये मुंबई...
07/07/2025

बदलापूरचा अभिमान – रोहन राजे!

क्रिकेट विश्वात बदलापूरच नाव ज्याने गाजवलं असा क्रिकेटर म्हणजे रोहन राजे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आणि मुंबईसाठी रणजी ट्रॉफीत आपली छाप पाडलेला हा खेळाडू सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे — त्याच्या अलीकडील मुंबई प्रीमियर लीग (MPL) मधील दमदार कामगिरीमुळे!

ही स्पर्धा संपूर्ण भारतात “मिनी IPL” म्हणून ओळखली जाते आणि अशा मोठ्या मंचावर रोहनने मराठा रॉयल्स संघातून खेळताना अष्टपैलू कामगिरी करत एकहाती संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. तसेच संपूर्ण MPL स्पर्धेत 5 विकेट घेणारा रोहन एकमेव गोलंदाज ठरला. नेटमध्ये प्रचंड मेहनत, मैदानात जबरदस्त आत्मविश्वास आणि सामन्यांमध्ये निर्णायक खेळी — हाच रोहनचा आत्मा!

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना खेळण्यासाठी दिग्गज क्रिकेटर उत्सुक असतात त्याच मैदानावर MPL चा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा व तणावपूर्ण होता. समोर भारताचे आणि IPL चे प्रतिनिधित्व करणारे स्टार श्रेयस अय्यर, अंगक्रिश रघुवंशी सारखे खेळाडू असताना— शेवटच्या षटकात केवळ ६ चेंडूत ७ धावा हव्या असताना, रोहनने डोकं शांत ठेवून, थेट विजयावर शिक्कामोर्तब केलं!
त्याच्या त्या खेळीने संपूर्ण मुंबईचं हृदय जिंकलं.

आज संपूर्ण बदलापूरकरांना तुझ्या या यशाचा अभिमान वाटतोय, रोहन!
तू अशाच प्रकारे अजून क्रिकेट खेळत राहशील, आणि बदलापूरचं नाव अशा मोठ्या व्यासपीठांवर झळकत ठेवशील यात शंकाच नाही!

“तुझ्या या यशाबद्दल संपूर्ण बदलापूरकरांना अभिमान आहे!”
– सलाम, बदलापूरचा सुपुत्र रोहन राजे! 🏏🔥

06/07/2025

मोहन ग्रीन वूड्स फेज 2 मांजर्ली बदलापूर प.

05/07/2025

Special Video by English Medium
By
Students of Primary and Secondary Section
-
Hon. Mrs. Namrata Munagekar - Principal and Teaching Staff

04/07/2025

*शैक्षणिक क्षेत्रभेट* दिनांक 28 जून 2025 रोजी कर्जत येथील पदरगडच्या पायथ्याशी वसलेल्या जांबरुंग गावात विजय भूमी येथे आदर...
03/07/2025

*शैक्षणिक क्षेत्रभेट*
दिनांक 28 जून 2025 रोजी कर्जत येथील पदरगडच्या पायथ्याशी वसलेल्या जांबरुंग गावात विजय भूमी येथे आदरणीय मुख्याध्यापक श्री. रमेश बुटेरे सर आणि शिक्षक (सौ. गीता जोशी , सौ. अस्मिता महाडिक , श्री. श्रीकांत जाधव , कु. अविनाश म्हात्रे ) यांसमवेत 12वीच्या प्रत्येक वर्गातील वर्ग प्रमुख आणि उपवर्ग प्रमुख असे 31 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी क्षेत्रभेटीला गेले होते. ही एक अनोखी क्षेत्रभेट होती. निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेल्या या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकमेव लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ आहे. उंच कड्याच्या पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ जणू काही सांगत आहे की येथे शिकल्यानंतर तुम्हाला हा उंच कडा गाठायचा आहे.
या विद्यापीठात स्कूल ऑफ डिझाइन, कायदा , व्यवस्थापन , संगीत, अभियांत्रिकी असे पाच विभाग आहेत. विद्यार्थी शिक्षणासोबतच विविध कलेचा आस्वाद आणि वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात. म्हणजेच एखादा विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करत असेल तर तो संगीत देखील शिकू शकतो.
विद्यापीठातील सादरकर्ते प्रवीण मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्टीव्ह जॉब्स यांचे उदाहरण देताना त्यांनी सांगितलेल्या "Design is not just what it looks like and feels like. Design is how it works." या ओळीचा अर्थ पटवून दिला. स्पर्धात्मक दबावापेक्षा सांघिक कार्य आणि कामाची विभागणी शिकण्याला महत्त्व देणारा अनुभव आणि वातावरण या ठिकाणी विद्यार्थांनी आत्मसात केला.
तसेच कौस्तुभ कीर्तने सर यांनी दिलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षणिक यशाचा विचार न करता दीर्घकालीन यशासाठी समीक्षात्मक विश्लेषण आणि प्रभावी समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्याचे ज्ञान विकसित झालेले दिसून आले. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली.
तसेच त्यांनी स्वच्छता आणि शिवी मुक्त शाळेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयात तो उपक्रम कसा राबवू शकतो यासंबंधी मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांकडून अहवाल तयार करून घेतला. अशा प्रकारे याविषयी आपल्या कॉलेजमध्ये नक्कीच उपक्रम राबवू याची विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्ट्या जबाबदारी स्वीकारली.
"जिथे स्वच्छता असते तिथे चोरी होत नाही कारण चोर घाबरतात की येथे स्वच्छता आहे म्हणजेच लोकांचे लक्ष असेल त्यामुळे ते चोरी करत नाहीत" असे स्वच्छतेबद्दल मानसशास्त्राचे एक उत्कृष्ठ उदाहरण कीर्तने सर यांनी दिले.
अनुभव सांगताना कु. शीतल गांगुर्डे आणि कु. सुयोग राऊत या दोघांनी क्षेत्रभेटीची संधी उपलब्ध करून दिली या बद्दल विजय भूमी व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक श्री. बुटेरे सर यांचे आभार व्यक्त केले. सरते शेवटी क्षेत्रभेटीची सांगता करताना सौ. गीता जोशी मॅडम यांनी थोडक्यात अहवाल सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले.

Address

Badlapur Railway Station
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Badlapur City:

Share