Vasundhara nisarga vachan shibir

Vasundhara nisarga vachan shibir We are organize Nisarga Vachan Shibir In Gautala Wild Life Sanctuary in summers

*रंगरंगुल्या, सानसानुल्या,**गवतफुला रे   गवतफुला* *असा कसा रे मला लागला,**सांग तुझा रे तुझा लळा.*आज साधारण 5 वर्षांनी मन...
15/09/2024

*रंगरंगुल्या, सानसानुल्या,*
*गवतफुला रे गवतफुला*
*असा कसा रे मला लागला,*
*सांग तुझा रे तुझा लळा.*

आज साधारण 5 वर्षांनी मनीषा सोबत लळिंग किल्ल्यावर फिरण्याचा योग आला.

एरवी मी एकटाच किंवा मित्रांसोबत जंगलात भटकंती करत असतो. मात्र बायको सोबत फिरण्याची परवणी अशी अनुभवता आली.

कसं असतं ना!
मी जंगलात फिरताना माझ्या आवडी नुसार पक्षी व त्यांचे आवाज ओळखणे, पाली, झाडे, सरडे, कीटक, फुलपाखरं, साप, प्राणी व त्यांचे पायांचे ठसे पाहणे ते ओळखण्याचा प्रयत्न करणेअश्या गोष्टी बघत गवत तुडवत चालत असतो.
तर मनिषाचं तिच्यातील कलाकाराच्या नजरेने आणि आवडीनुसार त्याच गवतातील अगदी सगळ्यांकडून तुडवल्या जाणाऱ्या आणि दुर्लक्षित अश्या गवत फुलांवर लक्ष गेलं.

*तुझी गोजिरी, शिकून भाषा,*
*गोष्टी तुजला सांगाव्या;*
*तुझे शिकावे खेळ आणखी,*
*जादू तुजला शिकवाव्या.*

एकाचं ठिकाणी काही वेळ भटकल्या नंतर तिच्या लक्षात आलं की, यंदा खूप वेगवेगळी गवत फुलं दिसत असून त्यांचे एक आठवणीतले छायाचित्रं तर झालच पाहिजे..!

असं म्हणून तेवढ्या भागातील मोजकी पण थोडीच फुलं गोळा करून त्याचं हे शब्दात न मांडता येणारं असं छायाचित्रं मनिषाने टिपलं.

मनिषाचा ती खाली पडलेली फुलं गोळा करण्याचा आणि त्यांना तिच्या नजरेत टिपण्याचा उत्साह इतका अफाट होता की,
लहान पणी शाळेत बालभारतीच्या पुस्तकात शिकवलेली बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
यांची वरील कविता स्मरणात आली.

*आभाळाशी हट्ट करावा*
*खाऊ खावा तुझ्यासवे*
*तुझे घालुनी रंगीत कपडे,*
*फुलपाखरां फसवावे.*

आज हे सगळं मांडण्याचा खटाटोप या साठीच आहे की, मान्य आहे आजची जीवनशैली खुप जलद आणि अश्या गोष्टीं साठी वेळ न काढता येणारी आहे. मात्र सुट्टीच्या दिवशी देखील रोज सारखे नेहमीच्या वेळेत उठून आपण स्वतःला व आपल्या कुटुंबासोबत अशा वातावरणात थोडा वेळ जरी घालवला, तरी मिळणारा जो आनंद आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
मात्र या सर्वात ती फुलं तोडून किंवा जंगल ओरबाडून एन्जॉय...! का काय म्हणता ते न करता, हे नष्ट होणारं सुख डोळ्यात साठवून घ्या, आणि यातच खरा आनंद आहे हे मुलांना अनुभवू द्या.

*मलाही वाटे लहान व्हावे*
*तुझ्याहूनही लहान रे*
*तुझ्या संगती सदा रहावे,*
*विसरुनी शाळा घर सारे...*

रोहित कुलकर्णी.

21/05/2019

*🌿निसर्गवाचन शिबिर पाटणादेवी*🌿🌳
गौताळा अभयारण्य
⛰🐆🐚🦀🐜🐛🐝🐯
*दिनांक* :- *२४ ते ३o मे २०१९
*
*वयोगट* :- ६ ते १६ 💁🏼‍♀💁🏼‍♂

*exploring ourselves* 🚀

शहरातील आयुष्य जगलो....🏢 खेड्यातील ही जगलो. 🐂
एकदा तरी जंगलात राहून वन्यप्राण्यांचे मुक्त जग अनुभवायलाच हवे.🐒
रात्रीच्या वेळी आकाशाचे पांघरूण घेऊन ताऱ्यांशी संवाद साधायचा?👀
रोजच्या कंटाळवाण्या🏭 जगण्यापलीकडे देखील 🛏
खूप मोठे जग आहे .🏕
या जगाचा अनुभव आपल्या जीवनाला नवी समृद्धी देतो.🌞
*Life beyond books*
निसर्गाच्या सानिध्यात🐾
आणि डोंगराच्या कुशीत
मनमुराद भटकंती.🚶
पक्षीनिरीक्षण ;🐦
आकाश निरीक्षण ;🔭
औषधी वनस्पतींची ओळख🍀 ; प्रथमोपचार🌡 ;
आपत्ती व्यवस्थापन ;🚑
कलाकुसर 🎀
आणि
बरंच काहीतरी....🏊
*शिबिर स्थळांची वैशिष्टय़े*☝
गणित व खगोल शास्त्रज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी☸ इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील पितळखोरा लेणी ;✡
नवव्या शतकातील हेमाडपंती मंदिरं ;🚩
नानावीविध वनस्पती जीवन🌳
तीन उत्तुंग धबधबे 🏞
बहुसंख्य सरिसृप ;🐍
सस्तनप्राणी 🐆
किटक ;🐜
पक्षी🐤

यांनी समृद्ध असे
गौताळा अभयारण्य...🐯

*संपर्क*
अौरंगाबाद
सौ.त्रिवेणी रामेश्वर दुसाने
8275218582
7588318763

धुळे
सौ.मनिषा रोहित कुलकर्णी 72761 57215
9921646659

मुंबई
सौ.प्रणिता हिवराळे
9820026656

पुणे
श्री.कपिल देशपांडे
9404477331

14/05/2017
25/04/2017
22/07/2016
08/10/2014

छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची अस्मिता जपली
जवळपास ३०० लहान मोठे गड किल्ले त्यांनी त्यावेळी जिंकले ते देखील एकट्याने श्रेय न घेता....!

या ३०० गड किल्ल्यान पैकी त्यांनी एका देखील गड किल्ल्याला त्यांचे नाव दिले नाही....
आणि आज आपण त्याच शिवाजी महाराजांच्या नावा वरून किंवा ते कोणाचे या वादावरून आपापसात भांडतोय, राजकारण करतोय....
किती केविलवाणी गोष्ट आहे हि....

09/01/2014
03/06/2013

धुळे येथील नकाणे तलाव जवळ असलेले केवड्याचे वन उजाड दिसायला लागले आहे
कदाचित आपल्या जिल्ह्यात ते एकमात्र केवड्याचा वन शिल्लक असावं
केवडा हे भारतीय वंशांचे झाड असून जमिनीचा धूप थांबवण्यात अतिशय उपयुक्त आहे त्याच बरोबर ते इतके घनदाट असते कि त्याच्या आत पक्षी प्राणी सरीसृप अतिशय आनंदाने राहू शकतात त्याच बरोबर केवड्याच्या पानाचा वास हा बराच काल टिकून राहतो व दूर वर पसरतो
केवड्याच्या पानांना असलेल्या काट्यान मुळे इतर प्राण्यांना किंवा माणसाना आत जाने सहसा सोपे नसते
त्यामुळे ते प्राण्यान साठी उत्तम निवास स्थान होऊ शकते

पण सध्याची आपल्या केवड्याच्या वनाची परिस्थिती पाहता ते लवकरच नष्ट होईल असे दिसते आहे

कृपया उपाय सुचवा ......?
आणि
जास्तीत जास्त प्रमाणात इतर ठिकाणी देखील केवड्याची कंद लावण्याचा प्रयत्न करू

Address

Gautala Sanctuary, Patna Divi Temple Chalisgaon
Chalisgaon
424101

Telephone

00917588733759

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasundhara nisarga vachan shibir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category