07/11/2020
स्वप्न प्रगतीचे, जव्हारच्या विकासाचे
जव्हार पर्यटन स्थळाला महाबळेश्वर, पाचगणी नंतर राज्यस्तरीय "ब" वर्ग दर्जा प्राप्त
जव्हार शहर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असून येथे दाभोसा धबधबा ,शिरपामाळ,हनुमान पॉइंट,सनसेट पॉइंट,जयसागर धरण,सूर्य तलाव अशा प्रकारे अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.तरीदेखील गेले कित्येक वर्षे जव्हार पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले नव्हते. निसर्गाने नटलेला भूभाग असून देखील जव्हार पर्यटन स्थळापासून उपेक्षित होते
पर्यटन स्थळास आवश्यक असलेले सर्व निकष जव्हार तालुका पूर्ण करत होता
मात्र शासन दरबारी उदासीनता व तोकडे प्रयत्न यामुळे जव्हार पर्यटन स्थळ म्हणून घोषित होत नव्हते.
आजी माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक तसेच विविध लोकप्रतिनिधी , प्रशासनाने सतत पाठपुरावा करून जव्हार शहर हे 'क' वर्गातुन 'ब' वर्गातील पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करण्यात यश मिळवले आहे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जव्हार भेटीत जव्हारला ब दर्जा देण्यात येईल असे सांगितले होते.
महाबळेश्वर व पाचगणीच्या नंतर जव्हार हे 'ब' दर्जाचे पर्यटन स्थळ असेल. महाबळेश्वर व पाचगणी सारख्या उपाययोजना जव्हार येथे ही होतील.
आपण गेले कित्येक वर्षे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आलो आहोत,
सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन जव्हार पर्यटन विकासासाठी हातभार लावला पाहिजे.
सर्व जव्हारकरांचे अभिनंदन.
पारस सहाणे, जव्हार
Jawhar Tribal Tourism