Jai Khanderai Travels Kalyan

Jai Khanderai Travels Kalyan Tours and travels

तसेच पैसे घेऊन श्रीमंत लोकांसाठी वाद्य वादन नेहमीच सर्व वाद्यपथके करतात तसेच प्रसिद्धी मिळविण्यासाठी नामांकित प्रसिद्ध  ...
17/08/2016

तसेच पैसे घेऊन श्रीमंत लोकांसाठी वाद्य वादन नेहमीच सर्व वाद्यपथके करतात तसेच प्रसिद्धी मिळविण्यासाठी नामांकित प्रसिद्ध ठिकाणी ही वाद्यपथके वादन करतात पण अशाच प्रसिद्धी व पैश्यासाठी चढाओढीचा काळात देखील कल्याण मधील रामबाग येथील " शिव मल्हार पारंपारिक ढोल ताशा व ध्वज पथक "
या पथकाने खुप आवडीने या मुलांच्या स्वागतासाठी आणि या मुलांना मान सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या सुमारे 100 वादकांसह या मुलांसाठी कोणतेही मानधन न घेता वादन करणार आहे.

त्या बद्दल शिव मल्हार पथकाचे मन पुर्वक आभार.

तरी ही वर्षासहल आयोजन करण्यासाठी आम्ही कल्याण शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील अत्यंत गरजु व सहल ही फक्त आणि फक्त स्वप्ना...
17/08/2016

तरी ही वर्षासहल आयोजन करण्यासाठी आम्ही कल्याण शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील अत्यंत गरजु व सहल ही फक्त आणि फक्त स्वप्नातच बघणाऱ्या सुमारे 300 लहान मुलांची निवड केली आहे.
त्यात कचारा वेचून उदरनिर्वाह करण्यांची मुले,अनाथ मुले,रेल्वे प्लॅटफॉर्म वर भटकणारी मुले , आश्रमशाळेतील मुले तसेच काही शाळांमधील आर्थिक दृष्ट्या अतिशय कमकुवत असणाऱ्या मुलांचा समावेश आहे.

17/08/2016

आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तींच्या वाढदिवसाला त्या व्यक्तीला खुष करण्यासाठी त्यांचे शुभचिंतक किंवा ते स्वतः लाखो रुपयांचे मोठ मोठे होर्डिंग्ज शहरात अनेक ठिकाणी लावतात त्या मुळे परिसर देखील विद्रूप दिसतो.
त्या होर्डिंग्ज मुळे ती व्यक्ति काही क्षणासाठी खुष असते आणि ती व्यक्ति स्वताच्या वाढदिवसा निमित्त आपल्या मित्र परिवारांला डीजे लावुन दारू मटनाच्या पार्ट्या देतात.
त्यातुन गरज नसताना देखील लाखो रुपयांची प्रतिष्ठेचा नावाखाली उधळण होते.आणि त्या लावलेल्या लाखो रुपयांच्या होर्डिंग्ज ची दुसर्‍यादिवशी किम्मत शुन्य असते. या लाखो रुपयांच्या उधळपट्टीतील थोडा तरी खर्च जर अश्या खरोखर गरजु आणि आपल्या नशिबी दारिद्रय़ आणि अंधारच आहे असे मनाशी ठरवून आपणही कधीतरी ईतरांप्रमाणे सन्मानाने एखाद्या लक्झरी बस ने प्रवास करुन एखाद्या सहलीला जाऊन मौजमजा करु शकतो असे फक्त स्वप्नच बघणाऱ्या मुलांच्या मनातील स्वप्न पुर्ण करुन.त्यांच्या आयुष्यातील अंधार थोडा फार कमी करून दाखवु शकतो.
तरी आपण आमच्या मताशी सहमत असल्यास आम्ही आयोजित केलेल्या सहलीसाठी येणाऱ्या मुलांचे स्वगत करण्यासाठी उपस्थित रहावे ही नम्र विनंती

Address

Kala Talao
Kalyan
421301

Telephone

9920735050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Khanderai Travels Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share