19/08/2019
॥ श्री वृध्देश्वर मंदिर घाटशिरस (पाथर्डी) ॥
[ श्रावणी तिसरा सोमवार याञोत्सव २०१९ ]
अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुक्यातील
गर्भागिरीच्या कुशीत असलेले हे स्वयंभु श्री वृद्धेश्वर मंदिर. या स्थानाचे महात्म्य असे कि हे जागृत शिवलिंग असुन ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढे वाढते म्हणजेच वृध्दींगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते .
आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा l
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥
वृध्देश्वर हे नाथ सांप्रदायाचे आद्यपिठ म्हणुन ओळख आहे. तसेच नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक २३ मध्ये या स्थानाचे वर्णन केले आहे.
या गर्भागिरीत नवनाथांनी यज्ञ व भंडारा केला आहे. त्यासाठी ३३ कोटी देव, अनेक ऋषीमुनी, जपी तपी सन्यासी आले होते. गोरक्षनाथांनी सुवर्ण विटे साठी सर्व गर्भागिरी डोंगर सोन्याच्या केला होता. याच ठिकाणी शंकर भगवान व पार्वती मातेने म्हातारयाचे रुप घेऊन पंगतीला वाढण्याचे काम केले म्हणुन त्यांना “म्हातारदेव” नावाने देखील ओळखले जाते. श्री शंकर भगवान यांनी मी येथेच स्वयंभु परिपुर्ण राहील असे सांगीतले.या शिवलिंगामधुन कायम गंगा वहाते.. असे हे पुण्यपावन स्थान आहे. येथे श्रावणी तिसर्या सोमवारी भव्ययाञोत्सव असतो तरी सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.धन्यवाद.
स्थळ - श्री क्षेञ वृद्धेश्वर मंदिर घाटशिरस ता. पाथर्डी जि. अहमदनगर