Ancient Maharashtra

Ancient Maharashtra Incredible Maharashtra,
The Official page of Ancient Maharashtra.

सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध..😡😡हे गडकिल्ले म्हणजे आमचे पवित्र ठिकाण. *"संपूर्ण स्वराज्याचे सार हे दुर्ग"* या शब्दात ...
13/06/2021

सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध..😡😡

हे गडकिल्ले म्हणजे आमचे पवित्र ठिकाण. *"संपूर्ण स्वराज्याचे सार हे दुर्ग"* या शब्दात महाराजांनी गडकिल्ल्यांची महती सांगितली. पण आज गडकिल्ल्यांच्या विकासाच्या नावाखाली त्यांचे पावित्र्याच संपवले जात आहे. उद्या गडांवर जर रोपवेने जो पर्यटक जाईल त्याला त्याचं महत्त्व कळणारच नाही. मग त्याचे पावित्र्य काय राखील तो? आज हे थांबवलं नाही तर उद्या हे दुर्ग शौर्याच, अस्मितेचे प्रतीक न राहता पर्यटनाच ठिकाण होईल...😡😡

हे थांबवलं पाहिजे, आणि थांबवलचं पाहिजे😡😡

*जय शिवराय🚩🚩*

अमृत पाटील
(९९२३५७१११६)

कुमारी गायत्री अजित काकडे हिने आपल्या शब्दात मांडलेला शिवराज्याभिषेक सोहळा #शिवराज्याभिषेकसोहळा
07/06/2021

कुमारी गायत्री अजित काकडे हिने आपल्या शब्दात मांडलेला शिवराज्याभिषेक सोहळा

#शिवराज्याभिषेकसोहळा

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सआयोजितशिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान महाराजांनी अवघे स्वराज्य स्थापन केले ते गड...
06/06/2021

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स
आयोजित
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान

महाराजांनी अवघे स्वराज्य स्थापन केले ते गडकिल्ल्यांच्या बळावरच. "स्वराज्याचे सर ते दुर्ग" या शब्दात महाराज दुर्गांचे महत्त्व सांगतात. हेच गडकिल्ल्यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाला मार्फत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास आपला सहभाग नोंदवावा.

विषय :
"महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि त्यांचा ऐतिहासिक अभ्यास"

वक्ते : सहा. प्रा. अमृत पाटील (दुर्ग अभ्यासक)

दिनांक : ०७/०६/२०२१ (रविवार
वेळ : स. ठीक १०:०० वा.

जॉईन होण्यासाठी लिंक :
https://meet.google.com/qdj-awpp-moq

अवघ्या मराठी माय भूमीच्या आयुष्याचं पारणं फेडणारा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा..अवघा रायगड आनंद अश्रूंनी नाहून निघाल...
06/06/2021

अवघ्या मराठी माय भूमीच्या आयुष्याचं पारणं फेडणारा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा..
अवघा रायगड आनंद अश्रूंनी नाहून निघाला...

"मेघडंबरी सजली फुलांच्या कळ्यांनी..
रायगड नगरी गजबजली शिवबांच्या मावळ्यांनी...

क्षात्र भास्कर अभिषेका सज्ज गोदा- गंगा...
डोही आस्मानी भगवा लेवून सजल्या सह्य रांगा...

त्रिभुवन भूमीचा राणा धनी होणार "छत्रपती"...
आम्हा अभाग्याचा धन्या चरणी मुजरा सांगा...

"शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिवमय शुभेच्छा"

#राज्याभिषेक

04/06/2021

राष्ट्रवादी युवती काँग्रेस आयोजित
०६ जून २०२१ शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त मोफत ऑनलाइन
वेबिनार माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले आहे.

वक्ते: अमृत संभाजी पाटील -
असिस्टंट प्रोफेसर - एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, पुणे
अध्यक्ष - गडझुंजार मावळे प्रतिष्ठान
संस्थापक - Ancient Maharashtra दुर्ग अभ्यासक

विषय: महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्यांचा ऐतिहासिक अभ्यास

दिनांक :- ०६ जून २०२१
वेळ :- सायंकाळी ६ वाजता

आयोजक :
नम्रता बाळासाहेब पाटील
(जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर)

व्याख्यानाला खालील लिंक वर जॉईन व्हावे :

Sunday 06 June • 6:00pm
Google Meet joining info
Video call link: meet.google.com/huk-hpvv-esi

Incredible Maharashtra,
The Official page of Ancient Maharashtra.

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा संभाजी महाराज”सर्व श...
14/05/2021

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती तो फक्त
“राजा संभाजी महाराज”

सर्व शिवभक्तांना,
संभाजी महाराज जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा…!!

#

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
14/05/2021

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,त्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढी,साजरा करूया हा गुढीपाडवा…नूतन वर्षाच्या ह...
13/04/2021

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजयांना स्मृतिदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩
03/04/2021

🙏🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य
दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना स्मृतिदिनानिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩

प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मु...
19/02/2021

प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक,
भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक,
श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत,
नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर,
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय,

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...

महाभारती जैसा कर्ण योद्धा तैसा पराक्रम सूर्याजी काकडे यांचा 🚩🚩सूर्याजी हे शिवरायांचे बालपणीचे सवंगडी होते. ज्यावेळेस सर्...
09/01/2021

महाभारती जैसा कर्ण योद्धा तैसा पराक्रम सूर्याजी काकडे यांचा 🚩🚩

सूर्याजी हे शिवरायांचे बालपणीचे सवंगडी होते. ज्यावेळेस सर्वप्रथम रोहिडा स्वराज्यात सामील झाला त्यात सुर्याजींचा सिंहाचा वाटा होता. अफजलखानाच्या वधा च्या वेळेस महाराजांसोबत हे १० अंगरक्षक होते त्यात देखील सूर्याजी असावे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सुर्याजींना महाराजांनी २००० सैन्य देऊन जावळीवर रवाना केले आणि सुर्याजींनी जावळी सर केली असा उल्लेख मोऱ्यांच्या बखरी मध्ये आहे.

१६७१ च्या बागलान मोहिमेत महाराजांनी साल्हेर जिंकला ही वार्ता औरंगजेबाला मिळाली. औरंगजेबने २०००० स्वारानिशी इकलासखान व बेहलोलखान यांना साल्हेरवर रवाना केले. ही गोष्ट महाराजांना समजली. महाराजांनी हेरांमार्फत सरनौबत प्रतापराव गुजर व मोरोपंत पेशव्यांना साल्हेरला रवाना होण्याचे हुकूम पाठवले.

त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव व त्यांच्या सोबत असणारे सूर्याजी काकडे तर दुसरीकडे पेशवे हे सालेरीस आले. मोठे युद्ध झाले. सभासद बखरीत त्याचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो " ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडालाकी, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले, पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोडे, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे. महाभारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ आपल्या बालसवंगड्याच्या जाण्याने राजे कष्टी झाले. साल्हेरच्या या युध्दात सूर्याजी काकडे यांनी आपले शौर्य इतिहासाच्या पानावर अजरामर केले.
अशा या रणधुरंधरास मानाचा मुजरा 🙏🏻

🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

स्वराज्याची पहिली आहुती |वंदू तव मूर्तीछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगाच्या इतिहासात एक तेजस्व...
08/01/2021

स्वराज्याची पहिली आहुती |
वंदू तव मूर्ती

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते या पराक्रमी पुरुषांचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.

बाजी पासलकर लढताना त्यांचा पाठीमागुन एक घाव त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला. वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गणीमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली. पासष्ट वर्षाचे योध्ये वीर बाजी पडले. फत्तेखान आपल्या सैन्यासह परत पळून गेला.

प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शुर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामर झाले. त्यांच्या या बलिदानामुळे स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. वीर बाजी पासलकर यांच्या पराक्रमी स्मुर्तीस आपण विनम्र अभिवादन करू.

🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

Address

Pune
411046

Telephone

+919923571116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ancient Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ancient Maharashtra:

Share

Category