अशीच एक भटकंती

अशीच एक भटकंती All products are first copy not original. Products are checked before dispatching... Damage in couri

पवना लेक नमस्कार मित्रांनो आज मी निसर्गाच्या कुशीत एक दिवसीय घेतलेल्या विसाव्या बद्दल थोडक्यात सांगेन,      आपण आज सर्वच...
19/12/2021

पवना लेक

नमस्कार मित्रांनो आज मी निसर्गाच्या कुशीत एक दिवसीय घेतलेल्या विसाव्या बद्दल थोडक्यात सांगेन,
आपण आज सर्वच ह्यांना त्या कारणाने व्यस्त असतो, कुटुंबासोबत अथवा मित्र मैत्रिणी सोबत आपण सवड काढुन भिरभिरत्या पाखरासारखं फिरणं पसंत करतो.
बऱ्याच वर्षांनी करोनाच्या विळख्यातून थोडं बाहेर पडल्यानंतर आम्ही ऑफिस सहकार्यासोबत सहलीच नियोजन केले, लोणावळा मावळ येथील पवना लेक कॅम्पिंगचं नियोजन केलं.
थंड अश्या नदीच्या किनारी टेंट मध्ये एक रात्र, शेकोटीच्या उबेत, गाण्याच्या तालावर थिरकत मज्जा मस्तीत घालवली, कोळश्याच्या आचेवर शिजणार आजच्या आपल्या बार्बीक्यूच्या व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेतला.
एकमेकांचे विचार भर रिंगणात बसुन ऐकले, खरंच खुप अविस्मरणीय मनाला भावणारे असे क्षण अशाच एका भटकंतीत मी आणि माझ्या सहकर्यांनी घालवले.

श्री.सी.एस.कदम

अशीच एक भटकंती......आमच्या महामंडळाचा गल्लानुसताच भरतोय रावकारण लालपरी एक दिवस जरी थांबली तरी कोट्यवधींचा तोटा होतोअसं स...
29/10/2021

अशीच एक भटकंती......

आमच्या महामंडळाचा गल्ला
नुसताच भरतोय राव
कारण लालपरी एक दिवस जरी
थांबली तरी कोट्यवधींचा तोटा होतो
असं स्वतः सरकारचं म्हणतय बघताय ना राव...

आमचा बंद कुणाला आवडत नाही
आमचे प्रश्न कुणाला कळत नाहीत
तुटपुंज्या पगारात नोकरी
करून देखील आम्ही दिवाळीच्या
बोनसचे अधिकारी नाहीत.

खरंच चालक असो वा तिकीट कंडकटर
आम्हाला सलग फेऱ्या
लागल्या की घर असुन देखील
घराची वाट कळत नाही.

आमचे प्रश्न अनेक आहेत,
आमचं बेस्ट सारख नाही राव
कारण आमच्यावर पालिकेच
वरद हस्त नाही.

सरकार नुसत रडतय
तोट्याचे बहाणे सांगुन
नवनवे बहाणे करते.
आम्हाला नोकरीची भीती
दावून सरकार मस्त राजकारण खेळतय

राज्याराज्यातला प्रवास
सुखकर करणाऱ्या खाकीतल्या
नायकाला वेळ आली की
पाठ दाखवणी करणारी आपली
राष्ट्रीय परिवहन महामंडळाची
तुकडी सरकारला सडेतोड उत्तर देत नाही

सरकार तुम्ही करोनाच्या
महामारीतही एसटी पळवलीच की,
राज्याच्या विस्ताराचा भाग असणाऱ्या
आम्हा चालक कंडकटरची
जी काही कोंडी का केली जात आहे
त्याचं गणित अजूनही कळत नाही.

आमचा कोणी विचार करेल का?

हा एकच आपुलकीचा प्रश्न?
आपल्या रा.प.म. चे सेवा भावी कार्यरत सेवेकरी🙏

श्री. सी. एस. कदम

24/10/2021

अशीच एक भटकंती.....

काल रातीला
पेट्रोल पंपावर
माऊली भेटले
खिशात दमडी नव्हती
जरा थांब म्हंटले

पेट्रोलभर म प्रवासकर म्हंटले
पैशांची सोय त्यांनी करून दिली,
गाडी पेट्रोल भरून हळुवार हसले
या माऊली मी इथेच भेटेन म्हंटले

इतक्या थंडी वाऱ्याचे माऊली
पेंट्रोल पंपावर निजले

कुठल्याही कामात कमीपणा नसावा
माऊली न बोलताच बोले
मदत करत जा सर्वांची
वेळ सर्वांची येईल म्हंटले.

निघताना येतो माऊली म्हंटल
तर सारे माऊली एका दमात म्हंटले
हो या माऊली हसुन सारेच बोलले

"मुखी वसावे मधुर शब्द
त्यांसी दैव मानावे
गलावरती स्मित हास्य
तोचि माऊली असावा
वर्ण कोणता ही असो
संकटात धावून येतो
तोचि एकमेव
माऊली मानावा"

श्री.सी.एस.कदम

अशीच एक भटकंती.....बांबु हाऊस शिवाजीनगर पुणे.....थोडं समोरच्या टेबलावर हळूच पाहिलं ६५ च्या पुढल गणित जवळुन पाहिलंआंनद हो...
22/10/2021

अशीच एक भटकंती.....
बांबु हाऊस शिवाजीनगर पुणे.....

थोडं समोरच्या टेबलावर हळूच पाहिलं
६५ च्या पुढल गणित जवळुन पाहिलं
आंनद होता त्यांच्या चेहऱ्यावर
त्या आनंदाला निरखुन पाहिलं

गप्पा गोष्टीत अडकलेली त्यांची संध्या रात्र
त्यात त्यांचं एकमेकांना चिडवन पाहिलं
आम्ही आजही आनंदात जगतो हया
त्याच्या जिद्दीला पाहुन लई भारी वाटलं

तु इथे समोरासमोर बस हया
आपुलकीच्या शब्दाने मैत्रीतल्या त्यांच्या
हक्काच्या बाजुला जवळुन पाहिलं.

सारेच सम भाषिक नव्हते
तरीही त्यांच्यातल ट्युनिंग अजब वाटलं
तरुणाईला लाजवेल अश्या त्यांच्यात रंगलेल्या
मौज मस्तीला आम्ही पाहतच राहिलो

टेबल एक पण मैत्रीतले पैलु अनेक
आज समोरासमोर पाहिलं
हक्काची मैत्री आणि त्या मैत्रीतले
ओल्ड इज गोल्ड हिऱ्यांना मी हसताना पाहिलं.

श्री.सी.एस.कदम

अशीच एक भटकंती मध्ये भाजी विक्रेत्याशी थेट गप्पा....वाढत्या डिझेल पेट्रोलच्या भावांची झळ तसेच अवकाळी येणाऱ्या पावसामुळे ...
18/10/2021

अशीच एक भटकंती मध्ये भाजी विक्रेत्याशी थेट गप्पा....

वाढत्या डिझेल पेट्रोलच्या भावांची झळ तसेच अवकाळी येणाऱ्या पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. कोथंबीर १०० जुडी तसेच प्रत्येक भाजी ८० ते १०० रुपयेच्या रेंज मध्येच आहेत. विकणाऱ्या बरोबरच ग्राहक वर्गालाही हया गोष्टीमुळे वाढत्या महागाईला सामोर जावं लागतं आहे.

श्री. सी. एस. कदम

अशीच एक भटकंती.....नमस्कार मी चेतन कदम आपल्या सोबत अशीच एक भटकंती मध्ये काही खास आणि जास्त विशेष घेऊन आलो आहे, आयुर्वेद ...
16/10/2021

अशीच एक भटकंती.....

नमस्कार मी चेतन कदम आपल्या सोबत अशीच एक भटकंती मध्ये काही खास आणि जास्त विशेष घेऊन आलो आहे, आयुर्वेद हे आपल्या भविष्याशी निगडित आहे. आणि ते आयुष्य बदलण्याचं ध्येय बाळगणारे ओम आयुर्वेदिक (वेदातील आर्युवेदा संबंधित असलेलं तथ्य) च्या संथापकाशी संवाद साधला.
ओम आयुर्वेदाचार्य एक उत्तम नाडी परीक्षक आहेत. त्यांच्या नजरेत एक वेगळीच चमक आहे. आणि त्यांचं बोलणं सकारात्मक तेशी एकरूप आहे जाणवलं, त्याच्या मुखातून आलेल ते एक वाक्य मला नेहमी आठवतं माझ्या कडे भरमसाठ औषध आहेत पण मला प्रत्येक रुग्णाला सकारात्मक तेशी जोडायच आहे आणि त्यासाठी मेडिटेशन आणि प्रातःकाळी ब्रह्म मुहूर्ताशी एकरूप करायचं आहे, कारण जोवर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, ब्रह्माड रचणार्यावर विश्वास ठेवणार आणि तोवर तुम्ही बरे होऊ शकत नाही.
मी साधस वाक्य बोलुन गेलो मी इतकी पुजा अर्चा करतो म माझ्याच बाबतीत हे सर्व का तेव्हा ते हसले ते म्हटले तु देवाला प्रश्न करतोस म्हणजे तु देवावर मनापासुन विश्वास ठेवत नाही. कुठल्याही गोष्टीशी एकरूप होण्यासाठी विश्वास महत्वाचा असतो.
आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे रोज पहाटे ५:३० ला उठुन गायत्रीमंत्र स्मरण करून अंतर गाभाऱ्यातली चक्र सक्रिय करणं गरजेचं असतं. कारण आयुर्वेदाला सकारात्मक तेचि जोड असणं गरजेचं असतं.

श्री. सी. एस. कदम

19/04/2021

माईंड फ्रेश करण्यासाठी जुन्या खेळांची लिस्ट बनवुयात...

सापसीडी तर थोडं लुडो खेळूयात,
जमिनीत छिद्र तर कधी हातावर
गरागरा फिरणारा भवरा खेळूयात,
बैठ्या खेळाची आठवण म्हणून कॅरम खेळूयात,
चिडीचा डाव झाला की नवा व्यापार खेळूयात,
जमिनीवर रेघोट्या मारून आठचल्स खेळूयात,
कंटाळा आलाकी टिपचर घेऊन लंगडी खेळूयात,
रात्रीच्या अंधारात कपड्यांची अदलाबदल
करून लपंडाव खेळूयात,
शारीरिक हालचाली साठी पकडापकडी
तर कधी लघोरी खेळूयात,
जमिनीत गळ करून गोट्या खेळूयात,
इतकंच काय खोखो चा डाव जमलाच तर त्या नंतर आईच पत्र हरवलं खेळण्यात रमुयात,
चोर पोलीस शिपाई राजाचा च्या चिठयांचा खेळ खेळून झालाच की, नाव गाव फळ फुलचे
रखाने आखून शब्दांचा जम बसवूयात,
रशी उडीच्या डावात साथीदाराला साथ देवुयात,
बॅडमिंटन च्या खेळात फुलाला मस्त जुलवूयात,
डोंगर का पाणी खेळताना एकावरच राज्य काढुयात,
दमलो की लगेच शून्य फुलीचा खेळ जमुयात,
गाण्याच्या भेंड्या मनसोक्त खेळूयात,
विरंगुळा म्हणुन तीन पत्ते खेळूयात,
आठवतंय का बघा लहानपणापासून चे खेळ पुन्हा खेळूयात
क्रिकेटच्या बॅटला दरवाज्या आड ठेवुयात
लॉक डाऊन उठुदे म क्रिकेटचा हैदोस मांडुयात.

श्री.सी.एस.कदम

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अशीच एक भटकंती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share