Orchid Holidays PUNE

Orchid Holidays PUNE Orchid Holidays is a travel company dedicated to providing travelers with unique tour experiences i

13/09/2024

उत्तराखंड मध्ये सतत पाऊस चालू असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे, व केदारनाथ यात्रा काल पासून बंद केली आहे , तसेच पूर्ण उत्तराखंड मध्ये मौसम विभागाने रेड अलर्ट दिला आहे, आज आमचे यात्रेकरू दर्शनासाठी जाऊ शकले नाही ,
सध्या पूर्ण यात्रा बंद आहे,

2 ते 3 दिवसात सुरू होईल, असे सांगितले जात आहे,
पण नक्की काही वर्तवले जात नाही

मंगेश कपोते
पर्यटन व्यावसायिक
चार धाम सहल आयोजक
छत्रपती संभाजीनगर

https://www.facebook.com/100063736098799/posts/1000064442128083/
07/09/2024

https://www.facebook.com/100063736098799/posts/1000064442128083/

बेंगळुरू-बेळगाव अवघ्या 99 रुपयात बस प्रवास

बेंगलोर - फ्लिक्सबसने कोईम्बतूर, मदुराई, तिरुपती, विजयवाडा आणि बेलगाव येथे सेवा देण्याची योजना आखली आहे. कंपनीने बेंगळुरू शहरातून 99 रुपये विशेष प्रमोशनल भाडे जाहीर केले आहे. याअंतर्गत 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत 99 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल आणि हे बुकिंग 10 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीतील प्रवासासाठी असेल. फ्लिक्सबसने आतापर्यंत सहा बस ऑपरेटर्ससोबत भागीदारी केली आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील 33 शहरे आणि दक्षिण भारतातील 200 हून अधिक ठिकाणे जोडण्याची योजना आहे. कंपनीची संपूर्ण देशात आपले जाळे सुरु करण्याची योजना अखात आहे. ती 101 शहरे आणि 215 थांबे जोडणार आहे. उत्तर भारतात यश मिळवल्यानंतर फ्लिक्सबसने दक्षिण भारतात प्रवेशाची घोषणा केली तेव्हा फ्लिक्सबसचे सह-संस्थापक डॅनियल क्रॉस आणि सीओओ मॅक्स झ्यूमर यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी कंपनीने सांगितले की, फ्लिक्सबस स्थानिक बस ऑपरेटर्ससोबत आपली धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवेल. कंपनीने सांगितले की त्यांच्या ताफ्यातील बसेसमध्ये बीएस 6 इंजिन आहेत, याचा अर्थ प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ताफ्यातील प्रत्येक बसमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि सर्व आसनांवर 2-पॉइंट सीट बेल्ट आहेत, जे प्रवाशांना उच्च स्तरीय सुरक्षा आणि आराम प्रदान करतील.
दरम्यान, फ्लिक्सबस देशात आल्यानंतर हजारो भारतीयांना अनेक सोयीस्कर, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. नवी दिल्ली, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील शहरे आणि मार्ग सेवेमध्ये जोडले गेले आहेत. आता दक्षिण भारतामधील शहरे या बससेवेद्वारे जोडली जातील.

19/03/2024
10/11/2023

कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर VIP कॅब शेअरिंग सर्विस - आजच आपले बुकिंग करा. 👉 https://flexidrive.in/

26/10/2023

महाराष्ट्र हे निसर्गसौंदर्याने समृद्ध राज्य आहे. पर्यटन करताना धाडसी अनुभव घेण्यास तुम्ही उत्सुक असलात तर तुम.....

26/10/2023

Posted on September 27, 2023October 2, 2023 बारामती – तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये लवकरच पशुपक्षी निरिक्षण सफारी होणार आहे. बारामती तालुक्....

"Are you ready to unlock a world of possibilities? At our passport service, we're your passport to adventure, culture, a...
30/09/2023

"Are you ready to unlock a world of possibilities? At our passport service, we're your passport to adventure, culture, and exploration. Whether you're a seasoned traveler or a first-time globetrotter, we're here to make the passport application process a breeze.

With our streamlined services, you'll get your passport faster and with less stress. Our team of experts will guide you through the application, ensuring all your documents are in order. We're committed to delivering your passport on time, so you can start planning your next international adventure.

Don't miss out on the incredible experiences waiting for you around the world. Let us be your passport to a lifetime of memories. Visit us today and take the first step towards a world of adventure!"

29/09/2023

*रानभाजी महोत्सव नाणेघाट २०२३*
-जुन्नरची आदिवासी जीवन पद्धती अनुभवण्याची सुवर्णसंधी..!
*ठिकाण* - नाणेघाट ब्रिटिशकालीन फडके बंधारा घाटघर.
https://maps.google.com/?q=Naneghat%2C+Ghatghar%2C+Maharashtra+421401&ftid=0x3bdd68cd2369eccf:0x8667a13893e246be&entry=gps
*दिनांक*- ३० सप्टेंबर व १ आक्टोबर (शनिवार व रविवार)
*आयोजक*- ऋषिकेश परिवार व घाटघर ग्रामपंचायत
*संयोजक*- पराशर कृषी व संस्कृती पर्यटन
*डिजिटल सहकार्य*- सोमनाथ नागवडे सोशल मीडिया
*रानभाजी महोत्सवाची वैशिष्ट्ये*
☘️ रानभाज्यांची ओळख करून देणारे आणि महत्त्वपूर्ण माहिती देणारे स्टॉल्स.
☘️ रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यासाठी औषधी मूल्य, रानभाज्यांच्या चवदार रेसिपीज कशा बनवायच्या याविषयी माहिती देणाऱ्या अनुभवी आदिवासी आजी
☘️ रानभाजी पाककला स्पर्धा
☘️ रानभाजी व आदिवासी खाद्यसंस्कृतीचे स्टॉल्स जिथे रानभाजी थाळी, खेकडा व गावठी चिकन थाळी, नाचणीचं सूप अशी खमंग जेवणाची मेजवानी
☘️ आदिवासी जीवन पद्धतीचं संग्रहालय जिथे विविध प्रात्यक्षिके आपल्याला बघायला मिळू शकतात
☘️आदिवासी जीवन पद्धतीतील मनोरंजनाचे खेळ आणि लोककलांचे सादरीकरण या निमित्ताने असणार आहे.
☘️ रानभाजी टूर व रानभाजी वॉक या निमित्ताने होईल जिथे आपल्याला रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख करून घेता येईल.
☘️ आणि परिसरातील पर्यटन जसे की नाणेघाट, जीवधन किल्ला, रिव्हर्स वॉटर फॉल आपल्यासाठी असणारच आहे.
... *एकंदरच अनुभव सिद्ध पर्यटनाची जबरदस्त मेजवानी आपल्याला या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे*


*रानभाजी महोत्सवातील निशुल्क गोष्टी*
१. रानभाजी माहितीचे स्टॉल्स २. रानभाजी पाककला स्पर्धा ३.रानभाजी पोषणमूल्य माहिती ४. आदिवासी जीवनपद्धती मनोरंजनाचे खेळ व सहभाग
५. आदिवासी जीवनपद्धती लोककला सादरीकरण
६.परिसरातील पर्यटन (नाणेघाट, जीवधन)

*रानभाजी महोत्सवातील शुल्क देऊन करायच्या गोष्टी*
१. आदिवासी खाद्य संस्कृती अनुभव
२. आदिवासी जीवन पद्धती संग्रहालय
३. आदिवासी जीवनपद्धती प्रात्यक्षिके
४. रानभाजी वॉक/ रानभाजी टूर

*शुल्क*
१. आदिवासी जीवनपद्धती संग्रहालय भेट व प्रात्यक्षिके अनुभव- ₹१००/प्रत्येकी
२. रानभाजी टूर/ वॉक- ₹१००/प्रत्येकी
३. बैलगाडी राईड- ₹२०/प्रत्येकी

*खाद्यसंस्कृती शुल्क*
१. रानभाजी थाळी - ₹१५०
२. खेकडा थाळी - ₹२००
३. फिश थाळी/ गावठी चिकन थाळी- ₹२००
४. मटन थाळी- ₹३००
५. भाजी भाकरी- ₹५०
६. सेंद्रिय नाष्टा- ₹३०
७. नाचणी सूप- ₹30
८. सेंद्रिय चहा- ₹२०

*१ दिवसीय सहल-रानभाजी महोत्सव*
ऍक्टिव्हिटीज
१. सकाळचा चहा नाष्टा
२. रानभाजी महोत्सवातील विविध स्टाल्स भेटी.
३. मनोरंजनाच्या खेळांमध्ये सहभाग
४. लोककला सादरीकरण आस्वाद
५. आदिवासी बांधवांच्या घरी, आदिवासी खाद्य संस्कृती चा आस्वाद (व्हेज, नॉन व्हेज)
६.आदिवासी जीवनपद्धती संग्रहायलय भेट व जीवनपद्धती प्रात्यक्षिके सहभाग
७. गाईडसोबत, नाणे घाट परिसर पर्यटन अनुभव
८. संध्याकाळचा नाष्टा व चहा

*शुल्क*
१. शाकाहारी जेवणासोबत -₹५०० रुपये/व्यक्ती
२. मांसाहारी जेवणासोबत - ₹६०० रुपये/व्यक्ती
5 वर्षाच्या मुलांपर्यंत काही शुल्क नाही, १० वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्धे शुल्क असेल.

*अधिक माहितीसाठी*
श्री. तुकाराम रावते - 9860257160
श्री. सुरेश जोशी- 9307547628

*विशेष विनंती* - रानभाज्या या दुर्मिळ असतात आपल्याला जर रानभाजी महोत्सवाचा व्यवस्थित अनुभव घ्यायचा असेल तर कृपया आपले नाव नोंदणी आवश्यक आहे जेणेकरून किती पर्यटन येणार आहे त्यानुसार रानभाज्यांची तजवीज करून ठेवता येईल.

*नाव नोंदणीसाठी-*
पराशर कृषी व संस्कृती पर्यटन
7038890500
7020092221
#नाणेघाट #रानभाजी

Address

Pune
411029

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919503018031

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orchid Holidays PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Orchid Holidays PUNE:

Shortcuts

Share

Category