Ratnagiri Tourism Festival

Ratnagiri Tourism Festival २ ते ४ मे या कालावधीत रत्नागिरी मध्ये '?

https://youtu.be/clr0EQwWDtc🔴 *साहसी जल पर्यटनाचा थरार | गणपतीपुळे बोट क्लब | चला कोकणात फिरायला !*
26/09/2021

https://youtu.be/clr0EQwWDtc

🔴 *साहसी जल पर्यटनाचा थरार | गणपतीपुळे बोट क्लब | चला कोकणात फिरायला !*

गणपतीपुळे. सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा, तसेच आंबा, काजू, नारळ, पोफ.....

07/05/2016
06/05/2016
27/04/2016

चिपळूणमध्ये मे महिन्यात तीन दिवस

भव्य ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव-२०१६’ ची रेलचेल

- ७ ते ९ मे दरम्यान पवन तलाव मैदान येथे महोत्सवाचे आयोजन

- महिलांसाठी पाककला स्पर्धा, कलादालन, आमराई सङ्गारी, विविध विषयांवर व्याख्याने, ऍडव्हेंचर गेमचा समावेश

- तीन दिवस विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती

- महिला बचत गटांसाठी २५ गाळे विनामुल्य

- १९ रोगांची मोङ्गत वैद्यकीय तपासणी व औषधांचा पुरवठा

मुंबई :

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गवैभव, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे पर्यटकांना पाहता यावेत, जिल्ह्‌यातीलगड, किल्ले, मंदिरांचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना कळावा, इथल्या सण, उत्सव, परंपरा, कला, संस्कृती, खाद्यपदार्थांच्या माध्यमातून समृद्ध कोकणी लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी यंदा चिपळूण येथे तीन दिवस ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव -२०१६’चे आयोजन करण्यात आले आहेत. ७ ते ९ मे या कालावधीत चिपळूण येथील पवन तलाव मैदान हा महोत्सव पार पडणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, महिला व पुरूष वर्ग मोठ्याप्रमाणात या महोत्सवाच्या जय्यत तयारीला लागले आहेत. चिपळूण येथील रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आमदार संदानंद चव्हाण यांची वायकर यांनी नेमणुक केली आहे. मागच्यावर्षी हा महोत्सव रत्नागिरी येथील भाटे समुद्र किनारा येथे आयोजित करण्यात आला होता. या

महोत्सवाला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. यंदाही रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच साहसी खेळांचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

ऍडव्हेंचर गेम्सचा थरार :

महोत्सवात प्राचीन कोकणचा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले असून त्यामध्ये १२ बलुतेदार आपआपली कला व वस्तु बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. त्याचबरोबर समुद्रामध्ये आढळणार्‍या विविध माशांच्या जातींचे प्रदर्शनही दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्ठ्ये म्हणजे एरो मॉडेलिंग, ऍडव्हेंचर गेम्समध्ये कयाकिंग, रिव्हर क्रॉसिंग, जेट स्की, बनाना राईड, स्कूबा ड्रायव्हींग, रॉक क्लायमिंग व आर्चरी

पर्यटकांना विविध सङ्गारींचा आनंद लुटण्याची संधी :

या महोत्सवाला महाराष्ट्राबरोबर अन्य राज्य तसेच देशांतून येणार्‍या पर्यटकांसाठी येणार्‍यांना आमराई सङ्गारी, क्रोकोडाईल सङ्गारीचा आनंद लुटता येणार आहे. आमराई सङ्गारीमध्ये बैलगाडी सङ्गर, हॉर्स रायडींग, ओपन जीप सङ्गर, बर्ड वॉचींग, नेचर ट्रेल, ऍग्रो टुरिझमची माहती तसेच पर्यटकांना पोटभर आंबे तसेच स्थानिक कोकण मेवा खाण्याचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी जेवणाची व राहण्यासाठी टेंटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

कलादालन :

हवाई ङ्गोटोग्राङ्गर स्व. गोपाळ बोधे यांचे ‘व्हिव ङ्ग्रॉम हेव’ हे प्रदर्शन स्थानिक कलाकारांचे चित्र, शिल्प प्रदर्शन कोकणच्या निसर्ग सौदर्यांचे ङ्गोटो प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

पाणी वाचवा मोहिम :

महोत्सवामध्ये नाविन्यपूर्ण योजना म्हणून जलसंवर्धनावर आधारीत पाणी वाचवा मोहिम, जंगल संवर्धनावर आधारीत जंगल वाचवा मोहिम, स्वच्छता मोहिम नदीतील गाळ काढण्याची मोहिम या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

महिलांसाठी स्पर्धा :

महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात महिला बचत गटांकरिता २५ गाळे विनामुल्य देण्यात येणार आहे. कृषी विभागकरीता २५ गाळे देण्यात येणार असून यात कृषी विषयी संबंधीत उत्पादने, अवजारे, बि-बीयाणे, खते व कृषी प्रदर्शन व आंबा प्रदर्शन, आंबा प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे.

महा आरोग्य शिबीर :

महोत्सवाच्या तिनही दिवशी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये एकूण वेगवेगळ्या १९ रोगांची मोङ्गत वैद्यकीय तपासणी व औषधांचा मोङ्गत पुरवठा करण्यात येणार आहे.

पर्यटनाशी निगडीत विविध विषयांवर व्याख्याने :

सुरक्षित सागरी पर्यटन, कोकणातील पर्यटनाचे बदलते स्वरूप, कृषी पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, शिवचरित्र व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम :

७ मे २०१६ : चला हवा येऊ द्या

८ म २०१६ : स्थानिक लोककला

महाराष्ट्र महोत्सव

९ मे २०१६ : सुदेश भोसले संगीत गौरव

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी माननीय राधाकृष्णन बी यांना शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
18/04/2016

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी माननीय राधाकृष्णन बी यांना शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
राज्यातील 35 जिल्हाधिकाऱयांपैकी 6 जणांना मिळाला हा बहुमान

रत्नागिरी खबरदार

07/05/2015

पर्यटन महोत्सव २०१५
खबरदारच्या नजरेतून...


रत्नागिरीचे पालकमंत्री मा. ना. रवींद्र वायकर यांना यापूर्वी रत्नागिरीत झालेला आंबा महोत्सव पुन्हा सुरु करावा अशी कल्पना सुचली आणि याला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी दुजोरा दिला. पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरीचा विकास व्हावा हि त्यामागची प्रमुख कल्पना होती. सर्व आमदारांनी आणि प्रशासनाने निधी देण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात झाली.

मार्च महिन्यातील धावपळीमुळे प्रशासनाला या पर्यटन महोत्सवाच्या नियोजनाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. कामाला खरी गती एक एप्रिल नंतरच येईल अशी आशा प्रत्येकाला होती. नियोजनाबाबत फारशी माहिती जनतेपर्यंत जात नव्हती. यामध्ये स्थानिकांना प्राधान्य किती ? या प्रश्नावर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आक्रमक झाले आणि हा मुद्दा रेटून धरल्यामुळे स्थानिकांना न्याय मिळाला. याच दरम्यान संपूर्ण प्रशासन कामाला लागले. निरनिराळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. रत्नागिरीकरांच्या सुदैवाने रत्नागिरीच्या अभिजित गोडबोले या सुपुत्रालाच इव्हेंट मॅनेजर म्हणून नेमण्यात आले.

जास्तीत जास्त कामे स्थानिकांना कशी मिळतील ? या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना कशी मिळेल याकडे आ. उदय सामंत यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी साहेब मा. राधाकृष्णन बी. यांनी या सर्व संकल्पनेचे नियोजन करण्यास प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण प्रशासन कामाला लागले. पोलीस यंत्रणेने सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केले आणि एक मे रोजी खऱ्या अर्थाने या महोत्सवाला सुरुवात झाली.

रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या पूर्वसंध्येला १ मे रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात ‘महाराष्ट्र महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत न पोहचल्याने या कार्यक्रमाला गर्दी जमवताना प्रशासनाला घाम फुटला. लोककलेचा रांगडा बाज या कार्यक्रमात पहायला मिळाला. महाराष्ट्राची लोकधारा किती समृद्ध आहे याचे दर्शन यातील नामवंत कलाकारांनी दिले. कार्यक्रम उशिरा सुरु झाल्याने व या कार्यक्रमानंतर एक व्यवसायिक कार्यक्रम याच रंगमंचावर असल्याने रंग भरत असलेला हा कार्यक्रम ‘एडीट’ करून रसिकांसमोर सादर करावा लागला.

२ मे रोजी साहसी उपक्रमांतर्गत झरी विनायक मंदिराजवळ रॅप्लिंग कँपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या या आयोजनामुळे रत्नागिरीकरांना आणि आलेल्या पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळाला. याच वेळी भाट्ये बीच येथील वाळू शिल्प प्रदर्शनाचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे दोन दिवस उन्हातान्हात राबून या कलाकारांनी या वाळूला आकार दिला होता. याच चौपाटीवर बचत गटांसाठी पदार्थ विक्रीसाठी मोफत स्टॉल देण्यात आले होते.

सायंकाळी ५ च्या सुमारास मारुती मंदिर येथून छत्रपतींच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार घातल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत ‘शोभा’ होऊ नये याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतली आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ‘आदेश’ काढले. जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आमदार, खासदार या शोभायात्रेचे नेतृत्व करणार म्हणून त्यांच्या प्रेमापोटी अनेक रत्नागिरीकर या शोभायात्रेत सहभागी झाले. वाटेतच सह्याद्री आर्ट स्कूलचे विद्यार्थी आणि राजेशिर्के सर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अप्रतिम म्युरल्सचे उद्घाटन करून शोभायात्रा गोगटे जोगळेकर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

मैदानावर एक अप्रतिम रंगमंच पुढील कार्यक्रमाच्या भव्यतेची कल्पना देत होता. अत्याधुनिक प्रकाशयोजना, आकर्षक रंगमंच, एल. ई. डी. वॉल सर्वकाही रत्नागिरीसाठी नवीन होतं. कुठे कशाचीच कमतरता नव्हती. परंपरागत पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मान्यवरांची भाषणे झाली आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. कोकणातील पारंपारीक ‘चामडी’ ढोलावर काठी पडली आणि हृदयाचे ठोकेसुद्धा त्या अप्रतिम नादात मिसळून गेले. कोकणी कलेचा सुंदर अविष्कार या झगमगत्या रंगमंचावर पहायला मिळाला. अत्याधुनिक रंगमंचावर हे कलाकार कुठेही मागे पडत नव्हते.

लेझर शोच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मेजवानीच मिळाली. रत्नागिरी पर्यटनाच्या विषयावरील लघुपट हा नेत्रदीपक होताच पण त्यासोबतच आयुष्यभरासाठी डोळ्यात साठवलेली ती एक आठवण होती.

यानंतर झालेल्या शाल्मली खोलगडे हिच्या कार्यक्रमाने तर रसिकांना बेधुंद करून टाकलं. अप्रतिम आवाज आणि त्याहून सुंदर सादरीकरण जे रसिकांना घेऊन स्वरलहरींवर तरंगायला लावत होतं. खरचं शाल्मलीचे कौतुक करावे तितके थोडे ! सोबतीला अप्रतिम बँड आणि सिमरन कौरचे दिलखेच नृत्य खरचं वेड लावत होतं. जे कोण चार दोन पर्यटक या कार्यक्रमाला आले असतील ते नक्कीच सुखावले असतील. दिवसभराचा थकवा एका गाण्यात निघून गेला असेल. जाणकारांच्या कानाला काही गोष्टी मात्र खटकत होत्या. ध्वनीव्यवस्था जरी उदयराजची असली तरी ऑपरेटर दुसराच होता. तशी अटच होती. पण शाल्मलीच्या अप्रतिम सादरीकरणाने हे सर्व लपवून टाकले.

३ मे च्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा साहसी उपक्रमांतर्गत झाली. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी देखील वेळात वेळ काढून या साहसी उपक्रमाचा आनंद लुटला. याच वेळी नौकानयन स्पर्धेच्या आयोजनामुळे मच्छिमार समाजाला सुद्धा या महोत्सवात आपला सहभाग नोंदवता आला. कर्ला येथून सुरु झालेली हि स्पर्धा पहाण्यासाठी राजीवड्यातील खाडीकिनारी प्रचंड गर्दी होती. या कष्टकरी समाजाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जोश पाहून मनाला आनंद मिळत होता.

या महोत्सवात बच्चे कंपनीच्या आनंदाचे देखील भान राखण्यात आले होते. ३ मे रोजी दुपारी ४ वाजता मॅजिक शो आणि पपेट शो पहाण्यासाठी बच्चेकंपनीने बऱ्यापैकी गर्दी केली होती. महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रम दर्जेदारच होता याचा प्रत्यय या कार्यक्रमात देखील आला. मॅजिक शोचा पुरेपूर आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानीच लुटला.

३ मे च्या सायंकाळच्या कार्यक्रमांची सुरुवात पुन्हा एकदा कोकणी लोककलेने झाली. यानंतर रत्नागिरीची ‘कोकण कन्या’ शमिका भिडे आणि उकडीचा मोदक ‘प्रथमेश लघाटे’ या कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांच्या या दोघांना मिळणाऱ्या प्रचंड टाळ्यातून देखील ‘माया’ जाणवत होती. कोकणातून तयार झालेली हि पुढची पिढी नव्या युगाशी स्पर्धा करण्यास कमी नाही हे प्रथमेश आणि शमिकाने दाखवून दिले. या दोघांना साथीला आणखी एक कीबोर्ड आणि तालवाद्य मिळाले असते तर कार्यक्रम अधिक खुलला असता. या वाद्यवृंदाचे नियोजन ‘हास्यरंग’ या कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार करण्यात आल असल्याने याची उणीव भासली. याच कार्यक्रमात ‘हास्यरंग’ या नामवंत मराठी विनोदी कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने मायबाप रसिकांना पोट धरून हसवले. यामधील मास्तर आणि विद्यार्थ्याच्या स्कीटने तर विनोदाची ‘कमाल’ मर्यादा गाठली.

४ मे रोजी साहसी उपक्रमांतर्गत गुंफा सफर कँप चे आयोजन करण्यात आले होते. एक साहसी अनुभव घेण्याची सुवर्णसंधी या आयोजनामुळे पर्यटकांना उपलब्ध होती. अनेक रत्नागिरीकरांनी देखील या गुंफा सफरीचे साहस केले. मा. जिल्हाधिकारी साहेब यांसोबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याचा अनुभव घेतला. याच दरम्यान नौकानयन व वाळू शिल्प स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा. ना. श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते भाट्ये बीच येथे पार पडला.

दुपारी स्वा. सावरकर नाट्यगृहात पार पडलेला ‘जुनून’ या कार्यक्रमाचा कार्यक्रम पत्रिकेत ‘स्वर संगम’ अशा नावाने उल्लेख करून एका अप्रतिम मैफिलीचा ‘फज्जा’ उडवला. ‘निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी, सांगतो इतरांस बाबा वाचा सुखे ज्ञानेश्वरी’ बहुधा अशाच ज्ञानेश्वरीच्या वाचकाने हि पत्रिका तयार केली असावी. असो पण या कव्वालीच्या कार्यक्रमाची माहिती रसिकांपर्यंत व्यवस्थित पोहचली असती तर स्वा. सावरकर नाट्यगृह गर्दीने तुडुंब भरले असते. यामुळे एका अप्रतिम मैफिलीला रसिकांना मुकावे लागले.

सायंकाळी सातच्या सुमारास सांगता समारंभाला सुरुवात झाली. यामध्ये बक्षीस वितरण, आभार प्रदर्शन आणि मान्यवरांच्या भाषणांचा समावेश होता. यानंतर या महोत्सवाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात कळस चढवला तो स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, सावनी रवींद्र, रोहित राउत यांनी. ‘मला वेड लागले बेलाचे’ हे रसिकांच्या मनातील उद्गार स्वप्नील बांदोडकर यांच्या मुखातून बाहेर पडले. मान्यवरांच्या या स्वरांमध्ये आपल्या सुंदर निवेदनाने मेघना एरंडे यांनी रंग भरला. स्थानिक कलाकारांची तोडीस तोड वाद्यवृंदाची साथ देखील उल्लेखनीय होती. रत्नागिरीतील गायक अभिजित भट, अभिजित नांदगावकर, दीप्ती आगाशे, पूजा देसाई यांना या नामवंत कलाकारांच्या मैफिलीचा मिळालेला सहवास खूप काही शिकवून गेला. या मान्यवरांच्या गीतांवर नाचतांना तरुणाई बेधुंद झाली होती. यामुळे कलाकारांचा देखील जोश वाढत होता. स्वप्नील बांदोडकर यांच्या शेवटच्या ‘विठ्ठल’ नामाने अवघे रसिक भारावून गेले आणि संपू नये असा वाटणारा कार्यक्रम ‘वाजले कि बारा’ म्हणत संपला.

मायबाप रसिकांचे सुदैव म्हणावे कि अभिजित गोडबोले सारखा अनुभवी आणि कलेची जाण असलेला इव्हेंट मॅनेजर लाभला. प्रत्येक कार्यक्रमाला ‘अभिचा’ ‘टच’ दिसत होता. आईने केलेले जेवण घास तोंडात जाताच ओळखता येतं तसचं अभिचे अस्तित्व जाणवत होते. अजून जरा ‘सैल’ सोडले असते तर अनेक ‘हरकती’ पहायला मिळाल्या असत्या. कार्यक्रमाची रंगत अजून वाढली असती. पण तरीही अप्रतिमच !

महोत्सवाची सर्व कामे स्थानिकांना मिळावीत हा आग्रह आमदार उदय सामंत यांचा होता. उदयराज सावंत, अमरेश सावंत, निलेश नांदगावकर, अस्लम वस्ता यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासास हि मंडळी पात्र ठरली. अमरेश सावंतने उभारलेली रंगमंच व्यवस्था हि अप्रतिम होती. इतक्या उच्च दर्जाचे काम करणारे कलाकार आपल्या रत्नागिरीत आहेत याचा अभिमान वाटला.

महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या हेतूने त्यांना उत्पादने विक्रीसाठी मोफत स्टॉल मिळावेत हि संकल्पना रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांची. यापूर्वी झालेल्या आंबा महोत्सवात देखील असा प्रयोग त्यांनी केला होता. या महोत्सवातील सर्वच स्टॉलधारक समाधानी होते. या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात विक्री त्यांनी केली. या स्टॉलमुळे अनेकांना आत्मविश्वास मिळाला हेच या महोत्सवाचे फलीत आहे.

संपूर्ण पर्यटनमहोत्सवासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागले होते. काही जण मन लाऊन तर काहीजण जबाबदारी म्हणून काम करत होते. या कालावधीत संपूर्ण प्रशासन कारण नसताना वेठीस धरलं गेलं. रत्नागिरीतील अनेक स्थानिक मंडळी कोणताही मोबदला न घेता हौशीने या कार्यक्रमाच्या आयोजनात भाग घेण्यासाठी उत्सुक होती. या सर्वांमध्ये या मंडळीना सहभागी करून घेतलं असतं तर कार्यक्रमासाठी गर्दीची चिंता कधी करावी लागली नसती.

पर्यटन महोत्सवातील कोणत्याही कार्यक्रमाला नाव ठेवण्यासारखे काहीच नाही. सर्वकाही अप्रतिम होतं. उणीव भासली ती हि कि ज्यांच्यासाठी हे केले तेच आले नव्हते. यासाठी सुमारे दोन महिने अगोदर या महोत्सवा संदर्भात सगळीकडे जाहिराती झळकणे आवश्यक आहे. गाड्यांची बुकिंग एक महिना अगोदरच फुल होतात. यामुळे पर्यटकांना या महोत्सवासाठी रत्नागिरीत येण्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

रत्नागिरीपासून जवळच असलेल्या गणपतीपुळे येथे वर्षभरात लाखो पर्यटक येतात. यांना रत्नागिरीकडे वळवण्याची आयती संधी आपल्याजवळ आहे. यासाठी वर्षभर रत्नागिरी परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती देणारा व पर्यटकांना मार्गदर्शन करणारा एक स्टॉल गणपतीपुळे येथे सुरु करणे आवश्यक आहे. रत्नागिरी परिसरातील पर्यटनस्थळांची होर्डिंग्ज गणपतीपुळे येथे लावल्यास पर्यटकांचे पाय आपोआप रत्नागिरीकडे वळतील.

आजही रत्नागिरीतील अनेक पर्यटनस्थळांच्या तिथे पर्यटकांसाठी सुविधा नाहीत याकडे आता प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अंधार पडल्यावर भाट्ये बीचवर लाईटची व्यवस्था नाही. यांसारख्या अनेक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून आपण महाबळेश्वरला जातो. येथून जवळच ‘माचाळ’ नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे तिथे आपण जात नाही कारण तिथे सुविधा नाहीत. सुविधा निर्माण झाल्या कि आपोआप पर्यटनस्थळांचा विकास होईल.

सर्वकाही छान केलं पण ज्यांच्यासाठी केलं तेच आले नाहीत अशीच काहीशी परिस्थिती या महोत्सवाची झाली. असो पण सुरुवात तरी झाली. या अनुभवातून शिकून पुढील वर्षी यापेक्षाही उत्तम आयोजन रत्नागिरीकर करतील यात शंका नाही.

हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार

05/05/2015

रत्नागिरी पर्यटन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर मेहनत घेण्यात आली. संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. या सर्व धावपळीत रत्नागिरी पोलीस प्रशासनाने सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेली मेहनत विशेष उल्लेखनीय होती. आपण या महोत्सवाचा आनंद लुटत असताना हा महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा झटत होती. या कालावधीत महोत्सवाच्या ठिकाणाच्या वाहतुकीचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे या ठिकाणच्या अरुंद रस्त्यात सुद्धा वाहतुकीची कोंडी झाली नाही. खरोखरच या सर्व पोलीस यंत्रणेला धन्यवाद ! यांनी 'सुव्यवस्था' राखल्याने आम्हा रत्नागिरीकरांना आणि पर्यटकांना या महोत्सवाचा आनंद लुटता आला.

रत्नागिरी खबरदार

रत्नागिरी पर्यटन महोत्सवात साहसी क्रीडा प्रकारांतर्गत रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी नर्मदा जेट्टीजवळ  आयोजित गुंफा सफ...
04/05/2015

रत्नागिरी पर्यटन महोत्सवात साहसी क्रीडा प्रकारांतर्गत रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी नर्मदा जेट्टीजवळ आयोजित गुंफा सफर कॅम्पची क्षणचित्रे.

रत्नागिरी खबरदार

रत्नागिरी पर्यटन महोत्सव इतरांसाठी अनुकरणीय  – शिक्षणमंत्री विनोद तावडेपर्यटन महोत्सवातील वाळूशिल्प आणि नौकानयन स्पर्धेत...
04/05/2015

रत्नागिरी पर्यटन महोत्सव इतरांसाठी अनुकरणीय – शिक्षणमंत्री विनोद तावडे

पर्यटन महोत्सवातील वाळूशिल्प आणि नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

रत्नागिरी दि.4 :- रत्नगिरी पर्यटन महोत्सव हा कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी अनुकरुनीय आहे. कोकणाच्या विकासात बलस्थान ठरणाऱ्या पर्यटन व्यवसायाच्या समृद्धीसाठी अशा प्रकारचे महोत्सव फायदेशीर ठरणारे असून त्यामुळेच पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले. रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित नौकानयन आणि वाळू शिल्प स्पर्धांच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. भाट्ये किनाऱ्यावर आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री रविंद्र वायकर, आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जि.प.उपाध्यक्ष सतीश शेवडे, भाट्येच्या सरपंच श्रद्धा सुर्वे, माजी आमदार सर्वश्री विनय नातू, बापूसाहेब खेडेकर, बाळ माने, मधुकर चव्हाण, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले आदि मान्यवर उपस्थित होते. पर्यटन महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करुन श्री.तावडे म्हणाले, रत्नागिरीसह कोकणाचा नितळ समुद्रकिनारा हा पर्यटकांना आवडणारा आहे. जास्तीत जास्त पर्यटकांची पावले कोकणाकडे वळविण्यासाठी महोत्सवाच्या धर्तीवर इतर आवश्यक प्रयत्न करायला हवेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना आवडेल अशी खाद्यव्यवस्था, निवासव्यवस्था निर्माण करायला हवी. क्रयशक्ती असणारे पर्यटकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर पर्यटन वाढीस त्याचा निश्चित फायदा होऊ शकेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रत्नागिरी पर्यटन महोत्सवाला पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजानामुळे पर्यटक आणि नागरिकांमध्ये उत्साह आहे. महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्टॉल्समुळे हापूस आंबा आणि बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या प्रयत्नाप्रमाणेच जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यास जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी मंत्री महोदयांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी भाट्ये किनाराऱ्यावरील वाळू शिल्पांची पाहणी केली. त्यानंतर वाळूशिल्प स्पर्धा आणि नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच नौकानयन स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या फणसोपच्या तलाठी मिनाक्षी कदम यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार

स्वर संगीताचा सुंदर मिलाफ !🎤🎻🎺🎷🎸🎹🎵🎼स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, सावनी रविंद्र, रोहित राउत या नामवंत कालाकारांना संगीत ...
04/05/2015

स्वर संगीताचा सुंदर मिलाफ !
🎤🎻🎺🎷🎸🎹🎵🎼

स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, सावनी रविंद्र, रोहित राउत या नामवंत कालाकारांना संगीत साथ देणार रत्ननगरीतिल कलाकार

रत्नागिरी खबरदार

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Tourism Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share