05/07/2023
सर्व भटक्यांना नमस्कार.
सध्या सगळीकडे मस्त पाऊस सुरू झाला आहे. पावसासोबतच सह्याद्रीमधील विविध ठिकाणे ही पर्यटकांनी आणि गिर्यारोहणाला आलेल्या गिर्यारोहकांनी भरून गेलेली दिसता आहेत.
पावसाळ्यातील गिर्यारोहणामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा अपातकालीन स्थितीला सामोरे जावं लागण्याची शक्यता असते. या काळातील सुरक्षित गिर्यारोहणासाठी 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.
पावसाळ्यात गिर्यारोहण करताना सदर नियम पाळल्यास गिर्यारोहण आनंददायी होईल यात शंकाच नाही..
■ पावसाळ्यातील ट्रेक करताना घ्यावयची काळजी ■
1. ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे
2. ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी
3. ग्रुप कडे First Aid चे साहित्य असावे,
4. ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ ग्रुप यांची माहिती घटी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
5. ट्रेक मध्ये First man - last man यांच्या मध्येच चालावे.
6. एक दिवसाचा ट्रेक असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी.
7 आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
8. पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.
9. पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.
10. किल्ल्यावरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.
1. walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे चढणे, उतरणे व चालणे सोपे होते.
12. शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.
13. आपतकालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा.
14. अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
15. जंगलात शहरी गोंगाट ठिकाणी करू नये
16. किल्ल्यावर, जंगलात, धबधब्याजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा.
17. पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये.
18. धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
19. डोहात, घरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
20. गर्दीची ठिकाणे टाळावी.
21. आयत्यावेळी ट्रेकमध्ये बदल केला तर त्याबद्दल संबंधितांना कळवावे.
22. ट्रेक संपल्यावर सगळे घरी पोहचले आहेत याची खात्री करा.
23. सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे. आपत्कालीन स्तिथीत त्याचा उपयोग होतो.
24. सोबत असणारे सर्व साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये टाकून चांगले पॅक करून सॅक मधे टाकावे. ते ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.
25. दुर्देवाने काही दुर्घटना घडल्यास 7620230231 या 24x7 हेल्पलाईन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा
जनहितार्थ प्रसारणाकरिता
द्वारा - अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ.