Khed Taluka Tourism Development Group

Khed Taluka Tourism Development Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Khed Taluka Tourism Development Group, Tour Agency, Chakan.

*साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन*    मुंबई, दि. १९ : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism polic...
19/09/2020

*साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन*

मुंबई, दि. १९ : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism policy) मसुदा पर्यटन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागिवण्यात येत आहेत. धोरणाचा मसुदा संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती [email protected][email protected] या ईमेल आयडीवर दि. 07 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहसी उपक्रम धोरण महाराष्ट्रात कोकण किनारा, पश्चिम घाटातील पर्वतराजी, विदर्भ या वैविध्यपूर्ण प्रदेशात पाणी, जमीन व हवेतील साहसी पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. साहसी पर्यटन हे क्षेत्र पर्यटनाचे लोकप्रिय अंग असून पर्यटकांचा साहसी पर्यटनाकडे कल वाढत आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत साहसी पर्यटनाला चालना देणे तसेच साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था, अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स, साहसी क्रीडा संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, संघटना, क्लब यांची नोंदणी, विनियमन, सनियंत्रण, नियोजन, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश करुन साहसी उपक्रम धोरण तयार करण्यात आले आहे.

MTDC | Official Website of Maharashtra Tourism

19/08/2019

#खेडच्या #पश्चिम #पट्ट्यातील #निसर्ग #पर्यटन
#भोरगीरी - खेड तालुक्यातील महाबळेश्वर.
#भीमाशंकर - प्राचीन महादेव मंदिर, बारावे ज्योतिर्लिंग.

निसर्ग सौंदर्याची मूक्त उधळण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक हखेड तालुक्याच्या पश्चिम भागात फिरताना दिसतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांतून भौगोलिक, धार्मिक, कृषि तसेच नैसर्गिक पर्यटनाचा पुरेपूर आनंद पर्यटक सध्या घेतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजगुरुनगर - भिमाशंकर मार्गावर डेहणे - भोरगिरी, आदी ठिकाणाहून पर्यटन स्थळाकडे जाताना प्रथमतः चास गाव लागते. गावाच्या बाजूने भीमा नदी वाहते आहे. या भीमा नदीच्या प्रवाह मार्गात बेसाल्ट खडकापासून तयार झालेले मोठमोठे रांजणखळगे पहावयास मिळतात. तसेच याच गावात थोरले बाजीराव पेशवे यांची धर्म पत्नी काशीबाई यांनी भिमा नदी काठी बांधलेले सोमेश्वर मंदिर, त्या पुढे असलेली सुप्रसिद्ध दिपमाळ, पुरातन काळातील लक्ष्मी विष्णू मंदिर, कुंडमाऊली मंदिर, पहावयास मिळते.

चास गावापासून पुढे गेल्या नंतर कडधे गाव आहे. या ठिकाणी श्री. खंडेरायाचे भव्य मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यानंतर चासकमान धरणाची मातीची भिंत दिसू लागते. चासकमान धरणाचा विशाल व दूरपर्यंत पसरलेला पाणी साठा पर्यटकांची मने जिकून घेतो. पर्यटक या ठिकाणी थांबून थंड-गार वारा, धरणाच्या उसळणा-या लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी धरणाच्या काठावर फेरफटका मारताना दिसतात.

धरणापासून सह्याद्री डोंगर रांगांच्या नागमोडी रस्त्याने डोंगर कुशीत वसलेल्या वाड्या, वस्त्या मागे टाकत - टाकत प्रवास पुढे - पुढे जात राहतो. बुरसेवाडी नंतर डोंगर पायथ्याशी ठाकरवाडी लागते. याच पायथ्यापासून शंभो महादेव मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पायथ्यापासून साधारणपणे पाचशे-सहाशे मीटर उंचीवर शंभो महादेव मंदिर आहे. शंभो महादेव परिसरातील शांतता विलोभनीय आहे. या उंच ठिकाणाहून डोंगररांगांच्या आजूबाजूचा विलोभनीय परिसर, धरणातील पाणीसाठा अधिकच आकर्षक दिसतो.

पुढे गेल्यानंतर चासकमान धरणात बुडालेले पुनर्वसित वाडा गाव आहे. वाडा ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी गावाचा आठवडी बाजार भरतो. भाजीपाला, किराणा बाजार, कपडे, इलेक्ट्रोनिक साहित्य, दवाखाना, औषधे, शेती बी-बियाणे, खते, भांडी, माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण सुविधा, शालेय साहित्य, बांधकाम साहित्य, शेती अवजारे, पेट्रोल पंप, बँक, पोस्ट सुविधा, ई-सुविधा, लग्न बस्ता, इत्यादी अनेक बाबींसाठी पश्चिम भागातील लोकांसाठी वाडा बाजारपेठ महत्वाची आहे. गणपती, बैलपोळा, दिवाळी, या सारख्या सणा - वारांना ही बाजारपेठ विक्रेते व ग्राहकांनी फुललेली असते.

वाडा या गावच्या उत्तर बाजूस उंच डोंगरावर गडदुदेवीचे भव्य जागृत देवस्थान आहे. देवीचे संपूर्ण मंदिर कातळाच्या भव्य गडदात आहे. मंदिरावरील उंच डोगरावरून मंदिराच्या समोर कोसळणारा नयनरम्य धबधबा येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची मने जिंकून घेतो. देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणच्या शांततामय, सात्विक व नयनरम्य वातावरणात आपला वेळ व्यतीत करतात. सह-कुटुंब वन भोजनाचा आनंदही पर्यटक घेतात.

वाडा गावापासून वळणा-वळणाच्या रस्त्याने आव्हाट, शिरगाव, मंदोशी, डेहेणे, भोरगिरी, आदी ठिकाणी गेल्या नंतर धबधब्याची खरी जणू मालीकाच सुरु होते. याच परिसरात उंच - उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगावरुन कोसळणारे छोटे - मोठे धबधबे पर्यटकांना पहावयास मिळतात. भोरगिरी परिसरातील शिरगाव येथील उंच नेकलेस धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो आहे.

गुप्त भीमाशंकर कडे जाणारे भाविक भोरागिरी गावाहून पायी प्रवास करताना दिसतात. येथील मनमोहक धबधबे, काटेश्वर मंदिर, भोरगड पर्यटकांचे आकर्षण आहे. भोरगीरी ते भीमाशंकर ट्रॅकींगसाठी तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात येतात. काही भाविक पर्यटक भोरगीरी ते भिंमाशंकर पायी जाऊन दर्शन घेतात.

वाडा - डेहणे या मार्गावरील मंदोशी घाट मार्गे प्रवास करून तळेघर व पुढे भीमाशंकर या तीर्थ क्षेत्रावर लवकर पोहोचता येते.

चासकमान धरण, वाडा, डेहेणे, भोरगिरी, भिमाशंकर, परिसरातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी व्यापलेला रम्य निसर्ग, दाट वृक्षाची वर्दळ, उंच उंच डोंगरावरुन कोसळणारे धबधबे, अशी निसर्ग सौंदर्याची उधळण या परिसरामध्ये पहावयास मिळते. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांत कोळी महादेव, ठाकर, कातकरी या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे.

निसर्गरम्य असे कळमोडी धरण पाहण्यासारखे आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात पहिले धरण म्हणून कळमोडीची ख्याती आहे. कळमोडी धरणाचा ओव्हरफ्लो चासकमान धरणात येतो. अर्नाळा नदी आणि भीमा नदीचा संगम या ठिकाणी आहे. परिसरातील भामा-आसखेड धरण सुद्धा पाहण्या सारखे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत रानमेव्याचा (करवंदे, तोरणे, आंभेळी, जांभळे, आवळे, गावरान आंबे इ.) आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या भागात आवर्जून येतात. त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसातही या भागातील निसर्ग सौंदर्याच्या मनोहारी आठवणी जपण्यासाठी पर्यटक भ्रमंती करताना दिसतात.....

05/07/2019
https://infomarathi.in/the-great-maratha-warrior-firangoji-narsala/
21/05/2019

https://infomarathi.in/the-great-maratha-warrior-firangoji-narsala/

फिरंगोजी नरसाळा: माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही ले...

https://infomarathi.in/information-of-great-shivram-hari-rajguru/
24/03/2019

https://infomarathi.in/information-of-great-shivram-hari-rajguru/

राजगुरु: माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील .....

 ्योतिर्लिंग_मंदिर_जोड_प्रकल्प_खेड_तालुकाशेलगाव (शैलेश्वर), संगमवाडी (संगमेश्वर), चास (सोमेश्वर) या 3 मंदिरांना पर्यटन व...
07/03/2019

्योतिर्लिंग_मंदिर_जोड_प्रकल्प_खेड_तालुका
शेलगाव (शैलेश्वर), संगमवाडी (संगमेश्वर), चास (सोमेश्वर)
या 3 मंदिरांना पर्यटन विभागाकडून मान्यता प्राप्त होऊन पहिल्या टप्प्यात 35 लाख रुपये मंजूर...
पाईट (कुंडेश्वर) ला वन विभागाकडून पाहिल्या टप्प्यात 23.14 लाख मंजूर..
बीबी(शंभू महादेव) ला वन विभागाकडून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 80 मंजूर ...
भोरगिरी (कोटेश्वर) आणि भोरगड ला वन विभागाकडून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 76 लाख मंजूर...

"बारा मावळ"सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एक छोटी...
23/12/2018

"बारा मावळ"
सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एक छोटीशी नदी उगम पावते अशा नद्यांच्या खोऱ्यांना मावळे किंवा खोरे म्हणतात.
उदाहरणार्थ: नाणे मावळ, पवन मावळ, मोसे खोरे, वेळवंड खोरे इत्यादी
जुन्या कागदपत्रांमध्ये बारा मावळे असा वाक्यप्रयोग कधी कधी येतो. परंतु ज्यांना मावळे किंवा खोरी म्हणतात असे प्रदेश बाराहून अधिक आहेत. तेव्हा बारा मावळ एक वाक्यप्रयोग असून विशिष्ट बारा मावळे असे अर्थ त्यात अभिप्रेत नाही अशी एक शक्यता आहे आणि विशिष्ट बारा मावळांना,अनुलक्षून बारा मावळे वाक्यप्रयोग वापरला जाई अशी दुसरी शक्यता आहे.
यापैकी दुसरी शक्यता गृहीत धरली तर ही बारा मावळे कोणती असा प्रश्न उदभवतो. अशा बारा मावळांची एखादी जुनी यादी अद्याप तरी उजेडात आलेली नाही. पण इतिहास संशोधकांनी ही बारा मावळे कोणती ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ४ च्या प्रस्तावनेत (पृ. ७८-७९) या बारा मावळांची जी यादी दिली आहे ती अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)पौड खोरे (६)मोसे मावळ (७)मुठे मावळ (८)गुंजण मावळ (९)वेळवंड मावळ (१०)भोर खोरे (११)शिवतर खोरे (१२)हिरडस मावळ
बारा मावळ या वाक्यप्रयोगात हीच बारा मावळे अपेक्षित होती असा पुरावा काही राजवाडेंनी दिला नाही आणि आपण ही बारा मावळ का निवडली याचे काही कारण सांगितलेले नाही त्यांनी दिलेल्या यादीत कानद खोरे नाही. कानद खोरे गुंजण मावळ आणि मोसे खोरे या दोन मावळांच्या मध्ये आहे आणि हे मधलेच मावळ यादीतून का वगळले हे सांगितले नाही. भोर खोरे हे त्यांनी स्वतंत्र मावळ गणले आहे. वास्तविक भोर आणि उतरोली या रोहिडखोऱ्याच्या दोन तरफा आहेत, तु स्वतंत्र मावळे किंवा खोरी नाहीत. शिवथर नावाचे खोरे होते पण ते कोकणात होते. बाकीची खोरी किंवा मावळे देशावरची घेतली असताना एकच खोरे कोकणातले का घेतले ते राजवाड्यांनी सांगितलेले नाही.
रियासतकार सरदेसायांनी रोहिडखोरे, वेलवंड, मुसे, मुठे, जोर, कानद, शिवथर, मुरुम, पौड, गुंजण, भोर व पवन ही पुण्याखालची मावळे समजतात असे म्हटले आहे. त्यांच्या विधानाला काही आधार दिलेला नाही. जोर खोरे वाई परगण्याच्या मुऱ्हे समतेत मोडत असे. जर जोर खोरे या यादीत घेतले तर जांभुळ खोरे का घेतले नाही याचे कारण सरदेसायांनी दिलेले नाही. भोर वेगळे मावळ नव्हते ती रोहिडखोऱ्याचीच एक तरफ होती. पवन मावळाला लागून असलेले नाणे मावळ आणि रोहिडखोऱ्याला लागून असलेले हिरडस मावळ ही मावळे ह्या यादीतून वगळली ते सरदेसायांनी सांगितलेले नाही. गुंजण मावळालाच मुरूम खोरे असेही म्हणत. सरदेसायांनी ती दोन वेगळी गणली आहेत.
श्री विजय देशमुख यांनी त्यांच्या शककर्ते शिवराय (पूर्वार्ध) या ग्रंथात (पृ. २००-२०१) दिलेली बारा मावळांची यादी अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)मोसे मावळ (६)मुठे मावळ (७)गुंजण मावळ (८)वेळवंड मावळ (९)कर्यात मावळ (१०)जुने मावळ (११)हिरडस मावळ (१२)शिरवळ मावळ.
या यादीला त्यांनी काही आधार दिलेला नाही. जुने मावळ व शिरवळ मावळ या नावांची मावळे कधीही नव्हती. मुठे खोरे व पवन मावळ यांच्यामध्ये असलेले पौड खोरे, मोसे खोरे व गुंजण मावळ यांच्यामध्ये असलेले कानद खोरं, आणि हिरडस मावळाला लागून असलेले रोहिड खोरे ही मावळे किंवा खोरी यादीत का घेतली नाहीत ते श्री. देशमुख सांगिलेले नाही.
मावळे जरी अनेक असली तरी शिवकालाच्या पूर्वी थोडासा काळ वगळता त्यासर्वांचा किंवा त्यांपैकी काहींचा परगण्यासारख्या एखाद्या मोठ्या प्रशासकीय विभागात समावेश केलेला नसे, कारभाराच्या दृष्टीने बहुतेक मावळांचि वेगवेगळे विभाग म्हणून विचार केला जाई, असे दिसते. निजाम शाही अमलात इ.स. १६०८ पासून किंवा त्याच्याही आधीपासून राईर नावाचा मामला होता. त्यात कोकणातील मुलखाचा काही समावेश असेल. इ.स. १६१७ मध्ये किंवा तत्पूर्वी सहा मावळांचाही समावेश राईर मामल्यात करण्यात आला. हिरडस मावळ, कानद खोरे व गुंजण मावळ ही तीन मावळे त्यात होती.व असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाही कायमची बुडाली आणि तिचा मुलूख मुघल साम्राज्य आणि आदिलशाही सल्तनत यांनी आपआपसांत वाटून घेतला. त्यानंतर राईर मामला अस्तित्वात होता, पण त्यात मावळांचा समावेश नव्हता.
यानंतर कारभाराच्या दृष्टीने अनेक मावळे प्रशासकीय विभागात समाविष्ट करण्याचा उपक्रम शिवाजीच्या कारकीर्दीत झाला. शिवाजीच्या राज्यात 'प्रांत मावळे' नावाचा वेगळा प्रशासकीय विभाग असल्याचे काही कागदपत्रांवरून दिसून येते. त्या विभागाचा उल्लेख असलेले जुन्यातले जुने पत्र २७ अॉक्टोबर १६६७ या तारखेचे आहे. अर्थात तत्पूर्वी केव्हातरी हा विभाग निर्माण केला गेला असला पाहिजे. त्यात किती व कोणती मावळे समाविष्ट केली होती हे ज्यांतून समजेल अशी शिवकालीन कागदपत्रे मिळालेली नाहीत. पण शिरवळ परगणा आणि रोहिडखोरे, गुंजण मावळ, मोसे खोरे, मुठे खोरे, व पुणे परगण्यातील कर्यात मावळ ही पाच मावळे असे निदान सहा उपविभाग तरी शिवकालीन मावळे प्रांतात होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. पवन मावळ व नाणे मावळ ही दोन मावळे त्या सुभ्यात नसून जुन्नर सुभ्यात होती असेही एका शिवकालीन पत्रावरून उपलब्ध आहे. तिच्यात पुढील तेरा नावे मावळे सुभ्याचे उपविभाग म्हणून आली आहेत- (१)कर्यात मावळ (२)खेडेबारे (३)हिरडस मावळ (४)रोहिडखोरे (५)वेळवंड खोरे (६)कानद खोरे (७)गुंजण मावळ (८)मोसे खोरे (९)मुठे खोरे (१०)पौड खोरे (११)पवन मावळ (१२)नाणे मावळ (१३)शिरवळ
यांपैकी शिरवळ परगणा हे मावळ नव्हे. तरीही त्याचा समावेश मावळ सुभ्यात का केला गेला ते समजण्यास काही साधन नाही. कदाचित, शिरवळ हा फार लहान परगणा असल्यामुळे तो वेगळा ठेवणे अव्यवहार्य वाटून शिवाजीने तो शेजारच्याच मावळे सुभ्याला जोडून टाकला असेल. खेडेबाऱ्याला मावळ किंवा खोरे अशी उपाधी लावल्याचे आढळत नसले तरी खेडेबाऱ्याचा मुलूख मावळसदृश आहे. म्हणून त्याचाही समावेश मावळांमध्ये करता येईल, म्हणजे मावळे सुभ्याच्या तेरा उपविभागांपैकी शिरवळ वगळून बाकीचे बारा उपविभाग मावळांमध्ये मोडतात.

(टीप- खालील बारा मावळांचा नकाशा 'श्री राजा शिवछत्रपती' खंड-२ मधील नाही बारा मावळांचा नकाशा पहिल्या खंडात आहे, हा खंड सध्या माझ्याकडे नाही. बारा मावळांचा भौगोलिक प्रदेश कळावा म्हणून हा दुसरा नकाशा दिला आहे.)

02/12/2018

*Nisargramya khed taluka*
*Presents - 1 fort _ 2 Temples*

*⛳Trek to Harihar fort ⛳*

*🕉️Trimbakeshvar jyotirling temple 🕉️*

*🕉️ Gondeshwar ancient temple🕉️*

*22- 23 Dec 2018 SUNDAY*
(1night & 1 day)

*Details*

*22 Dec. SATURDAY*
08:00 pm : Nashik phata
08:20 pm : Bhosari
08:45 pm : Chakan
09:00 pm : Leave from last pickup point ( Rajguru nagar)

*23 Dec. SUNDAY*
06:00 am : reach base village
06:30 am : Breakfast
07:30 pm : start Journey towards..Harihar Fort
09:30 am : reach on top
11:30 am : start descending
01:00 pm : Local veg.lunch
03:00 pm : Trimbakeshwar Darshan
05:00 pm : Gondeshwar Temple
06:00 pm : Start return journey
08:00 pm : veg dinner

*Cost - 1800*

*Cost include:*
*Transportation
*Breakfast
*Lunch
*Dinner
*Guide
*First Aid kit

*Contact no:*
7057974673

*Rules :*
Booking will confirm after partly payment (500 Rs.)

*🚩🚩🚩*

 #खेड_तालुका_पर्यटन_विकास आमदार सुरेश गोरे यांचे सर्व तालुक्याच्या वतीने आभार
30/11/2018

#खेड_तालुका_पर्यटन_विकास
आमदार सुरेश गोरे यांचे सर्व तालुक्याच्या वतीने आभार

चास येथे आज दीपोत्सव
22/11/2018

चास येथे आज दीपोत्सव

Address

Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khed Taluka Tourism Development Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category