Archis International Pune

Archis International Pune यात्रा गिरनार

14/03/2024

***************
*अभिप्राय*

श्रीमान रेळेकर साहेब,
स न वि वि
आपल्या द्वारे नियोजित आमची *केरळ सहल* अतिशय सुखद, लाभदायक, नाविन्यपूर्ण झाली त्याबद्दल आपले प्रथम आभार !!!🙏
दुसरे असे की,माझे सर्व (१७) सदस्य निसर्गप्रेमी असल्याने सोने पे सुहागा....मुनार, ठेकडी explore करतांना प्रत्येक view पॉइंटवर शुद्ध ऑक्सिजन (प्राणवायुने) सर्वांची तबेत सुधारली. खर तर अशा प्रकारच्या सहलीला माझ्या मते फार महत्व आहे, कारण त्यातून केवळ आपला दृष्टिकोनच बदलत नाही, तर ज्ञानात देखील मोठ्या प्रमाणात भर पडते हे पुरते अनुभवास आले.
आपण दिलेल्या वेळोवेळी सूचना, आणि घेतलेले अपडेट्स वाखाणण्याजोगे राहिले. म्हणून सर्व सदस्य खुश ठेवण्यास मदत झाली.
बाकी मुलांनी ट्रेन, आराम लक्झरीबसमध्ये तसेच हाउस बोट, लेक आणि विव्ह पॉईंट फोटोग्राफी, डान्स, रील बनवण्याचे कुठेही संधी सोडली नाही.
एकूणच आमचा टूर खूपच आल्हाददायक आनंददायी किफायतशीर आणि चिरकाल समरणात राहील. त्याचे सर्व *श्रेय* आपल्याला जातात.
पुन्हा एकदा आपले

*आभार !!!*
श्री. पीएन बहिराम
वरिष्ठ लोको पायलट
मध्य रेल्वे मुंबईविभाग
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

13/03/2024

नमस्कार,
श्री व सौ रेळेकर आयोजित
द्वारकाधीश, नागेश्वर, सोमनाथ, गिरनारी तसेच स्टँच्यू आँफ युनिटी याञा अतिशय आनंदी,खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
यामध्ये सर्व वयोगटातील सदस्य एक परिवारातील सदस्याप्रमाणे आनंदाने एकरुप झाले
सहलीमध्ये आध्यात्मिक आवड,देवदर्शन खुप छान पध्दतीने पार पडले
श्री व सौ रेळेकर यांनी खुप आत्मीयतेने,नियोजितबध्द पध्दतीने सर्व प्रसंग खुप छान हाताळले
विशेष म्हणजे जेष्ठ सदस्यांची व्यक्तिगत काळजी घेणे खुप ऊल्लेखनीय होते
आर्चीस कंपनी अशीच लोकांना आनंदी तसेच देवदर्शन घडवीत राहो अशी आपल्या सर्वाच्या वतीने शुभकामना
पुन्हा भेटूया
🙏🏻

धन्यवाद. श्री व सौ. दिनेश इगावे मोटरमन पुणे विभाग
अर्चिस इंटरनॅशनल आपले सदैव ऋणी आहे.

13/03/2024

मी वैयक्तिकरित्या तसेच सर्व यात्रेकरुंतर्फे श्री सुबोध व सौ योगिनी रेळेकर यांस गुजरात सहल संस्मरणीय केल्याबद्दल शतश: धन्यवाद देवू इच्छितो.

तसे बघायला गेले तर व्यवसाय करताना सुद्धा सदसद विवेकाला जागून सर्व वयोगटातील यात्रेकरूंची काळजी घेणे , जेवण असो , नाश्ता असो , दुखले खुपले असो किंवा अवचित आलेल्या प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे कसे जावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

कुठल्याही प्रकारची लाज व तमा न बाळगता तसेच टूर एडमीनचा तोरा न बाळगता प्रसंगाणुरूप योग्य निर्णय घेवून टूर शेड्यूल काटेकोरपणे पाळणे हेही दाद देण्यासारखे.

आहेत बहु , होतील बहू पण यासम नाही ही उक्ती चपलखपणे दोघांनाही लागू पडते .

आमची ही सुबोध बरोबरची पांचवी यात्रा पण अनुभव वरील प्रमाणे.

सर्वात महत्त्वाचे काय धरायचे नी काय सोडायच यामध्ये कधीही व्यावहारिकपणाचा लवलेश व शिरकाव नाही.

एकंदरीत वेळेचे बंधन पाळून प्रसंगी लवकर निघून उशिरा येवून सुद्धा वेळापत्रकात क्वचित बदल करीत एक सर्वांगसुंदर , रोमहर्षक , सर्वसमावेशक , हर्षोल्हासित, आनंदमय सहलीचा आम्हास अनुभव दिल्याबद्दल आर्चीस इंटरनेशनल , सुबोध व योगिनी यांचे आभार मानावे तितके थोडेच.
धन्यवाद🙏🙏🙏

28/10/2020

यात्रा गिरनार
द्वारका- सोमनाथ सह
2 जानेवारी 2020
9923622264

14/10/2020

यात्रा गिरनार
9923622264

03/01/2020

अमरनाथ यात्रा
२८ जून २०२०
पुणे ते पुणे ९९२३६२२२६४

30/10/2019

*Nepal*
16 May to 28 May 20
Archis INTERNATIONAL
9923622264

ARCHIS INTERNATIONAL PUNE
17/12/2017

ARCHIS INTERNATIONAL PUNE

Address

Rail Vihar
Chinchwad
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Archis International Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category