Dapoli Tourism दापोली पर्यटन

Dapoli Tourism दापोली पर्यटन Dapoli Tourism
Dapoli Unlimited

दापोलीतील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा !  #रमजानईद  #रमजान  #ईद  #ईदमुबारक  #दापोली  #रत्नागिरी ...
06/07/2016

दापोलीतील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा ! #रमजानईद #रमजान #ईद #ईदमुबारक #दापोली #रत्नागिरी

हर्णे समुद्र किनारा, दापोली, रत्नागिरी
01/07/2016

हर्णे समुद्र किनारा, दापोली, रत्नागिरी

केशवराज मंदिर (आसुद, दापोली)दोपोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच गाव आहे. दापोली जवळ असलेल्या आसुद गावी व्याघ्रेश्वरा...
13/01/2016

केशवराज मंदिर (आसुद, दापोली)
दोपोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच गाव आहे. दापोली जवळ असलेल्या आसुद गावी व्याघ्रेश्वराचे आणि केशवराजचे प्राचिन मंदिर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीत्तील डोंगरात आणि घनदाट वृक्षराजीत केशवराजाचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोरच दगडी बांधणीच्या पाटातून आणलेल्या पाण्याची गोमुखातून संततधार पडत असते. निसर्गरम्य वातवरणात असलेल्या या साध्याश्या विष्णु मंदिराच्या गाभार्‍याच्या दरवाजावर वरच्या बाजूस गणपती आणि उजव्या व डाव्या बाजूस अनुक्रमे हनुमान व गरूड कोरलेले आहेत. विष्णूच्या मुर्तीचे त्याच्या हातातील शंख, चक्र , गदा, पद्म आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन २४ प्रकार पुराणात (अग्नि,पद्म,स्कंद) सांगितलेले आहेत. केशवराज मंदिरातील विष्णू मुर्तीच्या हातात डावी कडून उजवीकडे अनुक्रमे पद्म, शंख, चक्र, गदा आहेत. त्यामुळे ही केशव मुर्ती आहे, म्हणून हा "केशवराज".
जाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीला पोहोचावे. दापोलीहुन ८ किमी वरील मुरुड हर्णे गाव आहे. दापोली हर्णे रस्त्यावर दापोली पासून साधारणपणे ५ किमीवर आसुद गावातील दाबकेवाडीत जाणारा फ़ाटा आहे. आसुद गावातील दाबकेवाडी पर्यंत गाडीने जाता येते. दाबकेवाडीतून केशवराज मंदिराकडे जाणारा मार्ग नयनरम्य आणि सुंदर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीतून व्यवस्थित बांधलेली पायवाट नारळी पोफ़ळीच्या बागेतून उतरत ओढ्यापाशी (ओहळापाशी) येते. या ओढ्यावरचा पुल ओलांडल्यावर पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर आपण केशवराज मंदिरापाशी पोहोचतो.

दापोलीचा राजा 2015pic Bappa Majha बाप्पा माझा
11/01/2016

दापोलीचा राजा 2015
pic Bappa Majha बाप्पा माझा

दापोलीचा राजा आगमन सोहळा २०१५ LIVE
www.fb.com/bappamajhaofficial । instagram.com/bappa_majha_official ।

सुवर्णदुर्ग, हर्णे१) भौगोलिक स्थानहर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐ...
03/01/2016

सुवर्णदुर्ग, हर्णे
१) भौगोलिक स्थान
हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड .
२) कसे जाल?
मुंबई गोवा महामार्गावर असणार्‍या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.
बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.
३) पाहण्यासारखे
दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती त्या मानाने अर्वाचीन असावी. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात.
दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ.स. १६६० मध्ये शिवाजीने हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे

03/01/2016

नमस्कार, तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार, तुमच्याकडेही दापोलीतील पर्यटन स्थळांबद्दल माहिती, फोटो, व्हिडिओ या पेजला Inbox मध्ये पाठवा किंवा Email करा [email protected] वर. धन्यवाद!!!

कडयावरील श्री गणपती मंदीर, आंजर्लेआंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश 17फ्-42' वर आणि पूर्व रेखांश 7...
02/12/2015

कडयावरील श्री गणपती मंदीर, आंजर्ले
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश 17फ्-42' वर आणि पूर्व रेखांश 73फ्-8' वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन 1 जानेवारी 2006 पासून हा रेवस-आंजर्ले-दापोली-रेड्डी सागरी महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Address

Dapoli Tourism
Dapoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dapoli Tourism दापोली पर्यटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share