Aanand Enterprises.

Call Directions Contact the business

Aanand Enterprises. Tours & Travels. Sedans, Hatchbacks & SUVs cars on Rental Basis. Ac & Non Ac Cars. professional Driv

II सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं II म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश...
17/08/2026

II सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं II
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे आराध्य दैवत व कुलदैवत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात माणगंगा नदीच्या तीरावर वसलेले हे १० व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर असून येथे दरवर्षी प्रसिद्ध रथोत्सव (यात्रा) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिद्धनाथ (शिव अवतार/काळभैरव रूप) आणि माता जोगेश्वरी ह्यांच्या फार सुंदर मूर्ती आहेत. १० व्या शतकातील प्राचीन हेमाडपंथी व चालुक्य कालीन वास्तुकला. मंदिराच्या भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू पिंड आहे. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा आणि त्यानंतर लाकडी व चंदनाच्या रथाची भव्य रथयात्रा काढली जाती.गुलालोत्सव: रथयात्रेदरम्यान हजारो भाविक गुलालाची उधळण करतात. संपूर्ण म्हसवड नगरी गुलालाने न्हाऊन निघते आणि 'सिद्धनाथांच्या नावाने चांगभलं…' असा गजर केला जातो.

Shri Siddhanth and Mata Jogeshwariof Mhaswad are the adored deities and ancestral deities of lakhs of devotees in Maharashtra, Karnataka and Andhra Pradesh. Situated on the banks of the Manganga river in Man taluka of Satara district, this 10th century Hemadpanthi grand stone temple is where the famous Rathotsav (Yatra) is celebrated with great enthusiasm every year.Idols of Shri Siddhanth (Shiva avatar/Kaalbhairav form) and Mata Jogeshwari are workshiped here. Ancient Hemadpanthi and Chalukya architecture of the 10th century. There is a self-contained idol of Kashi-Vishweshwar in the basement of the temple. he Yatra includes the marriage ceremony of Shri Siddhannath and Mata Jogeshwari, followed by a grand Rath Yatra of wooden and sandalwood chariots. Thousands of devotees light flowers during the Rath Yatra. The entire city of Mhaswad is bathed in flowers and chants like 'In the name of Siddhanatha, may there be peace...' are chanted.

हजरत पीर बाबुजमाल कलंदर दर्गाHajrat peer Babujamal qualandar dargahहजरत पीर बाबूजमाल कलंदर दर्गा हा महाराष्ट्रातील कोल्ह...
16/08/2026

हजरत पीर बाबुजमाल कलंदर दर्गा
Hajrat peer Babujamal qualandar dargah

हजरत पीर बाबूजमाल कलंदर दर्गा हा महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात स्थित एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सूफी संतांचा दर्गा आहे. हा दर्गा कोल्हापूरच्या धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे (हिंदू-मुस्लिम एकता) एक उत्तम प्रतीक मानला जातो. या दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. दर्ग्यात प्रवेश करणारा प्रत्येक भाविक आधी गणेशाचे दर्शन घेतो आणि नंतर दर्ग्यात प्रवेश करतो, जे दोन समाजांमधील एकोप्याची साक्ष देते. या दर्गा शरीफचा मुख्य घुमट श्रीमंत पेशवे यांनी आपली नवसपूर्ती झाल्यानंतर बांधला होता. कोल्हापूर संस्थानच्या काळात या दर्ग्याच्या उरुसाचा आणि इतर धार्मिक विधींचा खर्च संस्थानकडून केला जात असे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज देखील दरवर्षी मोहरम दरम्यान आपल्या पुत्रांसह या दर्ग्याला भेट देत असत. असे मानले जाते की, हजरत पीर शहाजमाल कलंदर नामक सूफी संतांच्या वास्तव्यादरम्यान 'बाबू' नावाच्या शिष्याने त्यांची आयुष्यभर सेवा केली. त्यांच्या याच निस्सीम सेवेमुळे गुरूंच्या नावाआधी शिष्याचे नाव जोडून या जागेला 'बाबूजमाल' असे नाव पडले.

Hazrat Peer Babujamal Kalandar Dargah is a highly famous and historic Sufi shrine located in Kolhapur city, Maharashtra. It stands as a profound symbol of religious and social harmony, reflecting deep Hindu-Muslim unity. The frame of the main entrance features a carved idol of Lord Ganesha. Every devotee first seeks the blessings of Lord Ganesha before entering the Dargah. The main dome of this holy shrine was built by the Shrimant Peshwas to fulfill a religious vow. The Kolhapur Princely State historically funded the annual Urs festival and other religious rituals. Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited this Dargah every year during Muharram alongside his sons. A devotee named 'Babu' served the Sufi saint Hazrat Peer Shahajamal Kalandar throughout his life. Due to this selfless service, the disciple's name was placed before the master's name, calling the place 'Babujamal'.

संत बाळूमामा हे एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन संत, योगी व मेंढपाळ होते. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी कर्नाटक राज्यातील अ...
16/08/2026

संत बाळूमामा हे एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन संत, योगी व मेंढपाळ होते. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी कर्नाटक राज्यातील अकोल गावात झाला. त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे ४ सप्टेंबर १९६६ रोजी समाधी घेतली. बाळूमामांनी आपले जीवन जनसेवा, भक्ती आणि मेंढ्या राखण्यात घालवले.ते भगवान खंडोबाचे भक्त म्हणून ओळखले जातात.त्यांचे मुख्य ठिकाण व समाधी स्थळ महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे.

Sant Balumama was a famous Maharashtrian saint, yogi and shepherd. He was born on 3 October 1892 in Akol village in Karnataka state. He took Samadhi on 4 September 1966 in Adamapur. Balumama spent his life in public service, devotion, and herding sheep.They are known as devotees of Lord Khandoba.His main residence and burial place is in Adamapur, Kolhapur district, Maharashtra.

मेतके हे बाळूमामांचे आदमापूरप्रमाणेच एक महत्त्वाचे आणि मूळ श्रद्धास्थान आहे. १९३२ मध्ये भक्तांनी केलेल् या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाची आठवण म्हणून बाळूमामांनी रणखांब (दिव्यखांब) हा १४ फूट उंच खांब स्वतः रोवला. या खांबाला स्पर्श केल्याने शरीरातील व मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि संकटे दूर होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात या खांबावरील पंचधातूचे आवरण काढून मूळ खांब दर्शनासाठी खुला केला जातो.

Metke is an important and original place of worship for Balu mama, just like Adamapur. Balumama himself planted Rankhamb (Divya Khamb), 14-foot tall pillar as a reminder of the Bhandara program performed by devotees in 1932. Devotees have a deep belief that touching this pillar destroys negative energy in the body and mind and removes troubles. In the month of Shravan, the five-metal covering on this pillar is removed and the original pillar is opened for darshan.

II श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न II कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर हे आदिशक्तीचे मू...
15/08/2026

II श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न II
कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर हे आदिशक्तीचे मूळ स्थान व साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.
काळ्या पाषाणाची किंवा रत्नशिलेची सुमारे ३ फूट उंचीची व ४० किलो वजनाची ही मूर्ती चतुर्हस्त (चार हातांची) आहे. देवीच्या हातात म्हाळुंग फळ, गदा, ढाल आणि पानपात्र आहे. बहुतांश मंदिरांतील मूर्ती पूर्व किंवा उत्तर मुखी असतात, परंतु या देवीचे मुख पश्चिमेकडे आहे. मुख्य गाभाऱ्यात महालक्ष्मीसोबत महाकाळी आणि महासरस्वती यांच्याही मूर्ती पूजल्या जातात.

The Shri Karveer Niwasini Mahalaxmi (Ambabai) Temple of Kolhapur is considered to be the original place of Adi Shakti and one of the three and a half Peeths. This idol is made of black stone or gemstone, is about 3 feet tall and weighs 40 kg. It is four-handed. The goddess holds a mahlung fruit, a mace, a shield and a paanpatra in her hands. Most of the idols in temples face east or north, but this goddess faces west. Along with Mahalakshmi, idols of Mahakali and Mahasaraswati are also worshipped in the main temple.

09/08/2026
रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील चौल येथील श्री रामेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन आणि ऐतिहासिक ग्रामदैवत आ...
05/08/2026

रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील चौल येथील श्री रामेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन आणि ऐतिहासिक ग्रामदैवत आहे. कोकणी पद्धतीची वास्तुकला, समोर असलेली भव्य दगडी पुष्करणी (तळे) आणि नारळी-पोफळीच्या बागांनी वेढलेला शांत परिसर हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.
Shri Rameshwar Templeat Chaul near Alibaug in Raigad district is an ancient and historic village deity dedicated to Lord Shiva. The main attraction of this temple is its Konkani style architecture, grand stone pushkarani (pond) in front and peaceful surroundings surrounded by coconut and palm groves.

Address

Dombivli East
Dombivli
421201

Telephone

+919172300200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aanand Enterprises. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aanand Enterprises.:

Shortcuts

Share

Category