26/06/2024
आपले जुन्नर मध्ये स्वागत आहे.
या पावसाळ्यातील पहिली सहल कुकडेश्वर मंदिर,नाणेघाट व धबधबा.
आय.टी. क्षेत्रात काम करत असताना थोडा विसावा मिळावा म्हणुन आमचे मित्र निसर्गप्रेमी संस्थेचे समीर शेख यांनी त्यांच्या ऑफिस मधील सहकाऱ्यांची नाणेघाट येथे सहलीचे आयोजन केले होते.मी बाहेर असल्याने तुम्ही जुन्नरला आल्यावर आम्ही येतो असे समीर दादाने मला सांगितले तुम्ही जी ठिकाण दाखवाल ते आम्ही पाहु असे ते म्हणाले.ठरल्याप्रमाणे रविवारी ते व त्यांचे सहकारी हे जुन्नरला आले.
मी त्यांना नारायणगाव येथे जॉईन झालो.पुढे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला शिवसृष्टी समोर गाडी थांबवून त्यांना किल्ले शिवनेरी व जुन्नर परिसराची माहिती दिली.
त्यानंतर आम्ही कुकडेश्वर व नाणेघाटला गेलो.नाणेघाटात पावसाचे वातावरण झालेले होते.तेथील माहिती त्यांना सांगितल्या नंतर तेथेच मस्त व रुचकर घरगुती जेवणावर सर्वांनी ताव मारला.जेवण झाल्यावर पावसाला सुरुवात झाली.निघताना गाडी एका धबधब्यावर थांबवली.तेथे सर्वांनी मनसोक्त फोटोशूट केले,अगोदरही सुरूच होते.
त्यानंतर त्या थंडगार हवेत चहाचा आस्वाद घेतला व परतीच्या वाटेला निघालो.
समीर दादा हा भटकंतीतला नावाजलेला माणुस. सह्याद्री व निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा.
आमच्या ऑफिस मधील सदस्यांना देखील या सह्याद्रीचा परिसर पाहता यावा हि त्याची मनोमन इच्छा.पण तो निसर्ग पाहताना फक्त बाकीचे जसे फिरून येतात तशी सहल त्याला नको होती त्यामुळे त्याने मला सोबत यायला सांगितलं होतं.निसर्गासोबतच आपला इतिहास,वारसा याची माहिती देखील त्यांना व्हायला हवी हा त्याचा प्रामाणिक हेतु होता आणि त्याचा तो हेतु साध्य झाल्याचे सर्व सदस्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून समजुन येत होत.आज पर्यंत अनेक ठिकाणी भटकंती आम्ही केली परंतु आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरल्याचे सर्व सदस्यांनी सांगितले.आपल्या इतिहासा विषयी अधिक माहिती जाणुन घेण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली.
जुन्नर पर्यटन चळवळीत कार्यरत असताना माझा देखील हाच हेतु आहे की जुन्नरच्या निसर्गसोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांनी जुन्नरच्या उज्वल अशा ऐतिहासिक वारशाची माहिती देखील घेतली पाहिजे.
तुम्हाला देखील तुमच्या धकाधकीच्या जीवनातून जुन्नरचा निसर्ग अनुभवायचा असेल तर मला नक्की संपर्क करा.
सिद्धार्थ कसबे 7757891409
पर्यटकांच्या प्रतिक्रिया.
@Siddharth Sir,
"It was great we had you with us that day. Your knowledge towards the history over there and the way you explained the Brahmhi lipi is much appreciated and very impressive.Looking forward for more such outings .Thanks for your time."
"Thank you, Sidharth sir, for taking the time to explain the history of Naneghat to us. Your passion for our history and heritage is evident, and we appreciated your insights into the evolution of Devnagari script. Meeting you was a valuable learning experience, and we look forward to more opportunities to learn from your guidance. Your profound knowledge is truly inspiring, and we are fortunate to have met you. Thank you once again for your efforts in raising awareness about the importance of preserving our historical sites."
"Yes it was quite informative and interesting to hear from Siddharth ji. Otherwise it would have been just an another outing."
"Thank you Siddharth Sir.
We are grateful that you shared your expertise with us.I feel motivated to learn more about our historical places. Once again, thank you for your time and efforts."
"@Siddharth Thank you for accompanying us. Your passion towards historical society, motivated us to learn more about our culture and our tradition. We would like more such opportunities"