15/01/2020
चला ग सखीनो सखीच्या सहलीला !!
महिला म्हटलं कि आई ,आजी ,बहिण ,बायको ,मैत्रीण अश्या समोर येतात ,अश्या ह्या महिला म्हणजे " #सखी " आज ह्याच सखी त्यांच्या त्यांच्या रामरगाड्यात एवढ्या अडकल्या आहेत ,अभ्यास पासून घराच्या जिम्मेदारी पर्यंत ..त्यांना त्यांचा आनंद हा फक्त आणि फक्त हक्काने घेता येतो तो " #माहेरी " आता माहेर जर का घरा जवळ अथवा लांब असेल तरीही त्यांना त्या हक्काच्या ठिकाणी सहजा सहजी जाता येत नाही ..कारण परत येते "जबाबदारी " मग अश्याच होम मेकर सखीन साठी आमची खास सहल ..
तुमच्या हक्काच्या ,तुमच्या आवडीच्या ,तुमच्या पसंतीच्या गोष्टी ह्या सहलीत असतील ,नुसती #मजा आणि #मस्ती नसून त्यात एक असेल जिव्हाळा ,एक आपलेपण ,एक आपुलकी ,खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या सहलीमध्ये सर्व महिलांना म्हणजेच अगदी लहान मुलींपासून ते अगदी आजीपर्यंतच्या महिलांना या सहलीची मजा घेता येणार आहे...
काही वेळ का होईना एक वेगळेपणा ,आपलेपणा मिळाला कि आपल्यातील ताजेपणा परत मोबाईलच्या सारखा चार्ज होतो ..मग तो आपल्याला हवा असेल तर भेट द्या ,आमच्या sakhi (सखी ) सहलीत सामील व्हा !!
दिनांक - 19 जानेवारी 2020 ला
ठिकाण - विष्णुबाग बदलापूर
संपर्क : श्री.सुनील आव्हाड (पिकनिक मॅन )
9869 368656 / 9819 891772