Joyful Journeys

Joyful Journeys Joyful Journeys To Delightful Destinations ! We are specialised in arranging Family tours to Kashmir, Ladakh, Sikkim, Rajsthan & Andaman.

Evening sky at Pipalkoti, Uttrakhand
15/12/2023

Evening sky at Pipalkoti, Uttrakhand

Mesmerising Meghalaya with Joyful Journeys !
30/11/2023

Mesmerising Meghalaya with Joyful Journeys !

Book your seat now ! Best holiday season at Best Price !
17/11/2023

Book your seat now !
Best holiday season at Best Price !

Hurry ! Book your seat now !
16/11/2023

Hurry ! Book your seat now !

Hurry ! Book your seat at the earliest !
16/11/2023

Hurry ! Book your seat at the earliest !

चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण .यावर्षी श्री केदारनाथ बद्रीनाथ दर्शन घ्यावे अशी खूप प्रबळ इच्छा मनात आली त्यामुळे काही मोजक्...
14/10/2023

चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण .
यावर्षी श्री केदारनाथ बद्रीनाथ दर्शन घ्यावे अशी खूप प्रबळ इच्छा मनात आली त्यामुळे काही मोजक्याच मित्रमंडळींसह २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर हि ट्रिप चालू केली.
यामध्ये आम्ही ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री,गंगोत्री, श्री केदारनाथ, श्री बद्रीनाथ, यांसह गुप्त काशी, उत्तरकाशी, जिथे श्री महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला ते ठिकाण म्हणजे श्री त्रियुगी नारायण मंदिर , गंगनानी हि सर्व यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.
सर्व ठिकाणी दर्शन फार उत्तम रितीने पार पडले.
श्री केदारनाथ येथे तर स्वहस्ते देवाला अभिषेक व विशेष पूजा करता आली.. स्वयंभू महादेवांना स्पर्श करुन चंदन विलेपन पूजा केली, डोकं टेकून नमस्कार केला तेव्हाची मनातील भावना ही सांगण्यापलिकडील आहे..
श्री महादेवांनी आम्हाला एवढे छान दर्शन घेऊ दिले हि परमेश्वर कृपाच !!
श्री बद्रीनाथ येथेही खूप छान दर्शन झाले, सोबत बोनस म्हणून दुरुन का होईना योगी श्री आदित्यनाथ यांना सुद्धा बघायला मिळाले.. विशेष कौतुक म्हणजे त्यादिवशी त्यांची उपस्थिती तिथे असूनही त्यांनी भक्तांचे दर्शन थांबवले नव्हते..
हे झाले यात्रेबद्दल पण उत्तराखंडला निसर्गानेही भरभरून बरंच काही दिलं आहे त्यात आम्ही गरतांग गली हा भगीरथी नदीकाठचा एक खूप सुंदर ट्रेक ही केला, औली हे हिलस्टेशन रोपवेने बघितले, हर्सिल व्हॅली बघितली ,जगप्रसिद्ध असे ऋषिकेश येथील रिव्हर राफ्टिंग केले-- यात मध्यावर गंगा नदीत दोरी धरुन मारलेल्या उड्या तर निव्वळ अविस्मरणीय !
भगीरथी, अलकनंदा, या नद्यांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात थांबून केलेलं फोटो शूट...सगळं काही एकदम भारी होतं.
विष्णूप्रयाग, नंदप्रयाग‌, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग या पंचप्रयागांनी गंगा नदीच्या स्थापनेत घेतलेला पुढाकार बघितला..
आज एवढ्या सोई, बरेपैकी रस्ते असूनही ही यात्रा एवढी चॅलेंजिंग आहे तर जेव्हा या सोई नव्हत्या तेव्हा काय परिस्थिती असेल ही कल्पनाही अवघड आहे.
चारधाम बद्दल जाणवलेले काही तथ्यं आणि मुद्दे
१) हि यात्रा फक्त यात्रा म्हणून न करता सोबत निसर्ग भेटीसाठी ही निवांत वेळ प्लॅन करावा.
२) शक्यतो हि टूर कुठल्याही यात्रा कंपनीतर्फे न करता कस्टमाईज टूर अरेंज करुन घ्यावी
३) रस्ते आणि प्रवास तसेच ट्रॅफिक जाम साठी लागणारा वेळ हा टूर प्लॅन करताना गृहीत धरावा, त्यानुसारच प्लॅन करावा.
४) रोज १५०- १८० किमी पेक्षा जास्त प्रवास ठेऊ नये
५) प्रवासापूर्वी एक महिना रोज किमान ८ किमी चालण्याची सवय करावी.
६) योग्य वयात आणि जनरल फिटनेस चांगला आहे तोवरच ही यात्रा करावी.
७)हि यात्रा दरवर्षी अक्षयतृतीयेला चालू होते व नरक चतुर्दशी पर्यंत चालू असते.
मे व जून, जुलै महिन्यात प्रचंड गर्दी असते,
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गर्दी खूप कमी असते पण तिथे प्रचंड पाऊस ही असतो जो बरेचदा धोकादायक आणि विध्वंसक असू शकतो
ऑक्टोबर नोव्हेंबर ( निम्मा ) हे दिवस जरा त्यातल्या त्यात कमी गर्दीचे व योग्य असतात.

चारधाम अधिक उत्तराखंड अशी टूर कोणाला पाहिजे असल्यास, जॉयफुल जर्नीज तर्फे फर्स्ट हॅंड मॅनेजमेंटसह कस्टमाईज आयोजित करुन देण्यात येईल

Joyful Journeys
Contact
9637210130
9158750500
6006295770

At Delhi Airport
27/09/2023

At Delhi Airport

31/08/2023
A Joyful Journey to Rajasthan23 Feb to 4 March 2023पधारो सा म्हारे देस हि साद ऐकून आम्ही  जॉयफुल मित्र मैत्रिणी राजस्थान...
18/03/2023

A Joyful Journey to Rajasthan
23 Feb to 4 March 2023

पधारो सा म्हारे देस
हि साद ऐकून आम्ही जॉयफुल मित्र मैत्रिणी राजस्थान जाऊन आलो .
सततच्या युद्धांनी ध्वस्त उध्वस्त पण महाराणा प्रताप यांचा पावनस्पर्श लाभलेला मेवाडही अनुभवला आणि
विलासी, आत्मकेंद्रित राजांचा, सतत मांडलिकत्व पत्करुन सुरक्षित अजूनही उत्तम राहिलेला मारवाडही बघितला..

मारवाडचे वैभव आज वादातीत आहे पण मनाला भावला तो उध्वस्त असूनही पराक्रमाच्या खुणा अंगावर मिरवणारा मेवाड !.
जैसलमेर वॉर मेमोरियल तर अफलातून!

राजस्थान हे विस्ताराच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे त्यामुळे एकाच फेरीत हे संपूर्ण बघणे शक्य होत नाही.
यासाठी थोड्या थोड्या कालावधीने दोन किंवा तीन वेळा जाणेच योग्य..
खाद्यपदार्थांची मात्र तेथे रेलचेल होती, एकंदरीत खूप चांगली खाद्यसंस्कृती आहे राजस्थान ची

बिश्नोई समाजाचे राहणीमान आणि पारंपारिकता पण अनुभवता आली जवळून पण हे लोक आता खूपच कमर्शियल झाले आहेत असेही जाणवले

मेहरानगड, चित्तोडगढ हे अवाढव्य किल्ले
सिटीपॅलेस, उम्मेद भवन हे राजनिवासस्थाने आणि पॅलेस हॉटेल्स
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ( दोनवेळा) मारलेली पिचोला लेकची बोटफेरी तर विसरणे अशक्य..
शॉपिंग साठी तर प्रचंड वाव आहे, फक्त जरा सावध पणे खरेदी करावी.
चला मंडळी तयारीला लागा पुढील राजस्थान टूर साठी 😀

अश्विनी राजगोळकर दंडगे
*Joyful Journeys*
9637210130, 6006295770, 9158750500

Please forward this post without making any changes to it 🙏🏼

जॉयफुल जर्नीज२१ ऑगस्ट २०२२मेघालयईशान्य भारतातील हे एक छोटेसे राज्य म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाकाच म्हणावे लागेल.सेव्हन सिस...
22/08/2022

जॉयफुल जर्नीज
२१ ऑगस्ट २०२२

मेघालय
ईशान्य भारतातील हे एक छोटेसे राज्य म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाकाच म्हणावे लागेल.
सेव्हन सिस्टर्स चा एक भाग असलेले हे राज्य आधी आसाम राज्यात होते.
२१ जानेवारी १९७२ ला मेघालय ला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला.
या राज्यात काय आहे बरं बघायला, अनुभवायला??
राज्याचा ७० टक्के भाग हा घनदाट जंगलच आहे
प्रचंड बायोडायव्हर्सिटी आहे इथे !
ब्ल्यू लगून असलेले असंख्य धबधबे आहेत.( पैकी नोहकलीकाई धबधब्याशी एक अतिशय करुण कथा जोडलेली आहे.😞)
खांसी,जैन्तिया आणि गारो आदिवासी संस्कृती, रबर प्लांटच्या नैसर्गिक मुळांना एकमेकांत गुंफून तयार केलेले लिव्हिंग रुट ब्रिजेस हि तर मेघालय ची खासियत!! ,
असंख्य प्रकारचे ऑर्किड आणि फुलपाखरे!!
निसर्गाने असं भरभरून दान दिलंय मेघालयला.
तिथं गेल्यावर या ओळी आपसूकच आठवतात
नभ उतरू आलं...
चिंब थरथरवलं...

माऊंलींगनोंग हे आशिया तील सर्वात स्वच्छ गावाचे पारितोषिक पटकावलेले गाव आपल्या मेघालयात आहे हे विशेष..
अलिकडे सोशल मीडिया वर गाजलेली पारदर्शक नदी उम्नगोत जी आशियातील सर्वात स्वच्छ नदी असल्याचा मुकुट मिरवते !

कोंगथोंग नावाचे ६०० लोकसंख्या असलेल्या गावात कुणाचेही नाव ठेवले जात नाही, तर बारश्याला बाळाची आई त्याच्यासाठी एक शीळ वाजवते.. ती शीळ म्हणजेच त्यांचे आयुष्यभराची ओळख असते.
एकमेकांना शीळ वाजवूनच बोलावले जाते हीपण एक गंमत आहे ना ?
मेघालयात मातृसत्ताक पद्धती चालते, लग्नानंतर नवरा सासरी जातो हे ऐकून तर समस्त भारतीय महिलांना विशेष आनंद होईल. कुटुंबाची संपत्ती आणि वारसा हा सर्वात लहान मुलीकडे जातो व तिलाच पालकांना सांभाळायची जबाबदारी ही पार पाडावी लागते.

अशा या आगळ्यावेगळ्या
मेघालयला कधी जावे ?
बेस्ट सिझन -- ऑक्टोबर ते डिसेंबर
मध्यम सिझन -- मार्च एप्रिल
झिम्माड पाऊस अनुभवायला -- मे, जून, जुलै, ऑगस्ट.
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रचंड थंडी असते

मेघालय साठी कस्टमाईज टूर अरेंज करुन देण्यात येईल, काझिरंगा अभयारण्याच्या टॉपिंग सह !

अश्विनी राजगोळकर
Joyful Journeys
Contact - 9637210130 , 6006295770 , 9158750500
Website - www.joyfuljourneys.co.in

लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती

*जॉयफुल जर्नीज**३१ जुलै २०२२**सिक्कीम राज्य*हे छोटुसे राज्य म्हणजे संपूर्ण पहाडी प्रदेशच आहेगंगटोक ही राजधानी आहेया राज्...
31/07/2022

*जॉयफुल जर्नीज*
*३१ जुलै २०२२*

*सिक्कीम राज्य*

हे छोटुसे राज्य म्हणजे संपूर्ण पहाडी प्रदेशच आहे
गंगटोक ही राजधानी आहे
या राज्यात अजून स्वतः चे असे एअरपोर्ट पूर्ण विकसित झालेले नाही. त्यामुळे इथे जाण्यासाठी आपल्याला पश्चिम बंगाल च्या बागडोग्रा एअरपोर्ट किंवा एनजेपी रेल्वे स्थानक पर्यंत जाऊन मग तिथून पुढे गाडीत बसून गंगटोक गाठावे लागते, प्रवास अर्थातच सुंदर घाटांचा आहे
सिक्कीमचे वैशिष्ट्य आहे- रानफुले, ऑर्किड, धबधबे, असंख्य प्रकारचे पक्षी, बौद्ध संस्कृती मॉनेस्ट्रीज, चारधाम बारा ज्योतिर्लिंग यांची रिप्लिकेट मंदिरे एकाच जागी असलेलै सिद्धेश्वर धाम, काचेचा स्काय वॉक ब्रिज, भारतचीन बॉर्डर, लाचुंग सारखे अतिशय शांत सुरेख पहाडी गाव आणि तिथे पर्यंत पोचण्याचा अप्रतिम निसर्गसौंदर्य असलेला रस्ता, हिरवीगार झाडी आणि धबधबे !!! रोहडेंड्रॉन फुलांची घाटी, बर्फाच्छादित झिरो पॉईंट, त्सोग्मो लेक, कांचनजंगा ,पेलिंग ,बिक्सथांग.... बरीच यादी आहे

कधी जावे -
ऑक्टोबर, नोव्हेंबर-- थंडी कमी
मार्च, एप्रिल - जरा थंडी जास्त असते पण बर्फ जास्त मिळतो
मे , जून पहिल्या आठवड्यापर्यंत-- सगळ्यात उत्तम दिवस

कधी जाऊ नये -
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर - पाऊस खूपच असतो
डिसेंबर जानेवारी -- थंडी खूपच असते, पण ज्यांना थंडी सहन होते आणि बर्फ वृष्टी पाहिजे असेल त्यांनी जावे

गंगटोक हे शहर वगळता अतिशय विरळ लोकवस्ती असलेले सिक्कीम हे खूप सुंदर राज्य आहे.
अतिशय समंजस आणि शिस्तबद्ध नागरिक आणि सेंद्रिय शेती हे सिक्कीम चे वैशिष्ट्य आहे...
येथे तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही.
कमालीची स्वच्छता दिसेल सगळीकडे !!
कितीही छोटे घर असले तरी दारात व सभोवताली सुंदर फुलझाडे असतीलच .
कोणीही ट्रॅफिक किंवा इतर कुठलेही नियम मोडत नाहीत, विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करत नाहीत...
कधी कधी शंका येते की नक्की आपण आपल्याच देशात आहोत का ते..😃
खंतही वाटते की हे शहाणपण संपूर्ण भारतात का नाही 😟
असो...
तर मंडळी अश्या या सुंदर राज्याचं पर्यटन हे एकदा केलंच पाहिजे... विचार करायला चालू करा..

डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
जॉयफुल जर्नीज
फोन नंबर - 9637210130, 6006295770, 9158750500
Website - www.joyfuljorneys.co.in

लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती

Address

176, Sanchit, R. K. Nagar, Mool Society, Morewadi
Kolhapur
416013

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+916006295770

Alerts

Be the first to know and let us send you an email when Joyful Journeys posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Joyful Journeys:

Share

Category