Paryatan Mitra

कोल्हापूरपासून 70 किमी…. निसर्गात लपलेले रत्न.. निसर्ग प्रेमी आणि साहस प्रेमींसाठी योग्य ठिकाण.भारी स्पॉट आहे खार जाताना...
18/07/2023

कोल्हापूरपासून 70 किमी…. निसर्गात लपलेले रत्न.. निसर्ग प्रेमी आणि साहस प्रेमींसाठी योग्य ठिकाण.
भारी स्पॉट आहे खार जाताना शनिवार रविवार सोडुन जावावे......
# धबधबा खूप मोठा आहे आणि त्याचे पाणी खूप थंड आहे
# गावापासून सुमारे 2-3 किमीचा प्रवास आहे.
# मार्गात जळू आहेत म्हणून मीठ सोबत ठेवा.
# डोंगरावर खूप पाऊस पडतोय, झाडं गरम होतात आणि नखे कापली जातात
# गावात तुम्हाला अस्सल घरगुती जेवण मिळेल
# एक अविस्मरणीय अनुभव






Lanja to Ratnagiri Road ... Nice view ...
20/01/2022

Lanja to Ratnagiri Road ... Nice view ...

05/06/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....व्हीसलिंग वूडस्… दांडेलीफिरायला जाणं तर सर्वचजणांना आवडत आसतं. त्यातही निसर...
17/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

व्हीसलिंग वूडस्… दांडेली

फिरायला जाणं तर सर्वचजणांना आवडत आसतं. त्यातही निसर्गसहल म्हंटली मनाला सुखद गारवाच मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात घेतला जाणारा मोकळा श्वास अगदी तनमनात नवं सामर्थ्य पेरत असतो. नव्या उमेदींना नवं जगणं शिकवत असतो. रोजच्या धकाधकीत गुरफटलेले पाय कधितरी असं स्वातंत्र्याचं दान मागतात. नव्या वाटा धुंडाळतात आणि वाळतात हिरव्यागार वनराईच्या वाटेवर. या वाटेची वहिवाट बनून जाते. आपल्या स्वागतासाठी पानाफुलांची दुलई अंथरूण सज्ज असते. रेड कारपेटच्या कृत्रिम हव्यासाला कंटाळलेली पावलं या हिरव्यागर्द सतरंजीवर अलगद रुळून जातात. किती चालावं, किती पाहावं गणतीच नसते. अशा निसर्गप्रेम पसंतीची ही दांडेलीची वाट आणि याच वाटेवर 'अतिथीदेवो भवं' चा महामंत्र जपणारं हे ' व्हीसलिंग वूडस् रिव्हर रिसॉर्ट…'
कर्नाटकच्या उत्तर प्रांतात, बेळगावपासून साधारण ऐंशी किलोमीटरवर वसलेलं दांडेली अभयारण्य म्हणजे निसर्गप्रेमींसाठी नंदनवनचं. इथेच काळी नदी म्हणजेच कालिंदीच्या काठी आपल्या स्वागतासाठी व्हीसलिंग वूडची सुबकता सज्ज आहे. दांडेली म्हणजे इथलं हदयस्थान. या हृदयात शिरण्याचा मार्ग आम्ही सजविला आहे. पर्यटकांच्या सेवेसाठी अनेक अत्याधुनिक सुविधांची मांदियाळी घेऊन व्हीसलिंग वूडस् इथं उभं आहे. इथे जवळच दांडेली अणशी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पशु-पक्षी प्रेमींसाठी ही वन्यजीवांची दौलत इथं जपली आहे.
काळी नदीचा विस्तीर्ण जलाशय, घनदाट जंगलाची विभोरता, उत्तुंग कडे आणि दऱ्या हे सारं स्वर्गीय सुखाहून कमी नाही. स्वच्छ आणि मुबलक हवा, पाना-फुलांशी लपंडाव खेळत पुथ्वीवर उतरणारा सूर्यप्रकाश या परिसराची संजीवक जाणीव आपल्याला नेहमीच देतात. अशा वातावरणात विस्तीर्ण अशा सात एकर परिसरात व्हीसलिंग वूडस् ची संपन्नता आपल्याला दिसते. पर्यटनासाठी इथं यावं, इथल्या थंड हवेला मनसोक्त झेलावं, इथल्या गडद रात्री ओघळणारं चांदणं अवघ्या डोळ्यांनी प्यावं आणि उबदार कॅम्प फायरच्या साक्षीनं इथल्या चविष्ट पदार्थांचा आनंद घेत जीवनही तृप्त करावं. सुखाचा यापेक्षा वेगळा अर्थ तो काय असू शकेल? इथली स्पेस, स्टाईल, आधुनिकता चितारताना परंपरागत राहणीमानाशी जोडलेली नाळ, अतिथ्यशील सेवा, अशा सहवासात आपण आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अगदी आनंदसोहळा बनवू शकता.. आपल्या प्रायव्हेट पार्टीज, बिझनेस मिटिंग्जसाठी सर्व सोयींची अनुकूलता इथं आहे. फॅमिली पॅकेजमध्ये प्रीमिअर कॉटेजीस, समोर एक हजार स्क्वेअर फुटाचे भव्य लॉन, सुंदर पाथ वे, आकर्षक लिव्हिंग रूम्स, देखणे एक्सटेन्शन, शाही सीट आऊटस् , इथले बेडरूम्स, इंटेरिअर सारं काही आपल्या घराच्यासारखं सौख्य देतात. शाही जीवनाची लज्जत देतात. प्रीमियमसोबत स्विमिंग पूल व्ह्यू कॉटेज, ट्री हाऊस, स्टँडर्ड कॉटेज, डॉनटरी किंवा टेंटसची जीवनशैलीही आपण इथं अनुभवू शकता. चोवीस तास गरम पाणी, चविष्ट भोजन आणि नाष्टा अशा सर्वतोपरी सेवांचे रेलचेल इथं आहे. इथल्या सेवेला आपुलकीचा गंध आहे. दांडेलीच्या अँडव्हेंचर सेवा देण्यासाठीही आमचे सहकारी, मार्गदर्शक तत्पर असतात. इथून आपणास थेट जंगल सफारीची मार्गक्रमणा करता यावी, यासाठी आम्ही नेहमीच आपल्यासोबत. नेचर वॉकचा उल्हास इथं आहे. अँडव्हेंचर ट्रेंक, व्हाईट वॉटर थरारही आहे. सुपा धरणातुन वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या पाण्याच्या उसळत्या प्रवाहात आठजनांच्या राफ्टमधून राफ्टिंग करण्याचा आनंद अगदी रोमांचित करणारा. दहा वर्षांपुढील कुणीही व्यक्ती, अगदी पोहायला न येणारी व्यक्तीही या राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊ शकते. कायाकिंग, बोटिंग, नॅचरल झकुझी आहे… यासोबतच बर्मा ब्रीज, डंबेल वॉक, पाईपलाईन, व्हर्टिकल आणि हॉरिझंटल स्विंग, मल्टीव्हेन स्विंग, जंगल कॅम्पेनिंग इनडोअर-आऊटडोअर्स गेम्स, स्पा बर्ड वॉचिंग आणि असं खूप काही… प्रत्येक पर्यटकास सफारीचा आनंद मिळावा, निवांत जीवनशैली आणि घरच्याप्रमाणे आपुलकीचे क्षण लाभावेत हाच आमचा प्रयास… इथली वनचरे आपल्याशी हितगुज करतील. मलाबार व्हीसलिंग, थ्रश, ट्रोगन, हॉर्नबिल, मिनिव्हेंट्स, पॅराडाईझ, फ्लायकेचर, श्रीलंकन फ्रॉगमाऊथ असे असंख्य पक्षी आपल्या जादुई रूपाने आपली नजर संमोहित करतील. फक्त आपली ही नजर निसर्गाच्या साजूक सौन्दर्याचा अचूक वेध घेण्याइतपत तीक्ष्ण मात्र असायलाच हवी. ब्लॉक पँथर, सांबर, हत्ती, हरीण, गवे, माकड आणि विविध जातींचे प्राणी आपल्याशी निर्मळ नांत जोडतील. खऱ्या सुखाचं दर्शन घडवतील. भौतिकतेच्या जंजाळात अडकलेल्या आणि हरविलेल्या आपल्या आयुष्याला खेचून बाहेर काढतील. आत्मीयतेचे नाते जोडतील आणि पुन्हा नव्या उमेदीने भविष्याला सामोरे जायला सामर्थ्य देतील. इथल्या नदीपात्रातील सिंथेरी रॉक पाहा… साधारण 380 फुटांचा हा भव्य ग्रेनाईटचा खडक आपलं खुजेपण दाखवेल… कॉरेकल बोट्रायडिंगमधून नदीपात्रातील मगरी पाहा… प्रवाहातून पुढे सरकताना जैवविविधता निर्मण आनंद घ्या. अशा काळात प्रत्येक क्षणी निसर्गाने साकारलेल्या या संपन्न जीवनाच्या वाटेवर प्रकाशयात्री बनून चालावे यासाठी आपल्यपूढे प्रकाश ज्योत बनून राहील व्हीसलिंग वूडस्…

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित सिद्धाच्या प्राचीन गुहाभुदरगड तालुक्याच्य...
13/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित
सिद्धाच्या प्राचीन गुहा

भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील भटवाडीच्या शेजारील सिद्धाच्या डोंगरांमध्ये असणाऱ्या प्राचीन गुहा पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिल्या आहेत. या गुहेमध्ये असणाऱ्या शिवलिंग मंदिराचा(सिद्धनाथ) विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
पाटगावपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर ताब्यांची वाडी उर्फ भटवाडी गावाच्या उजवीकडे दूरवर आकाशात घुसलेल्या गर्द अरण्याने लपेटलेल्या डोंगरास सिद्धास डोंगर म्हणून ओळखले जातो. पाटगाव धरणक्षेत्रातील पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांचा हा सिध्ददेव असून या डोंगरावर एकमेकाला लागून तीन गुहा आहेत. घनदाट जंगल, गर्द वनराई आणि सपाट मैदान पाहून मन भारावून जाते. कडक उन्हाळ्यातदेखील येथील हवामान थंडगार असते. रांगणा किल्ल्याकडे जाणारे कवचितच पर्यटक या गुहेकडे भेट देतात.
गुहेच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी पंधरा ते वीस फूट खाली पायऱ्या उतरून जावे लागते. मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड व अनेक त्रिशूल आहेत. या गाभाऱ्याची उंची बारा फूट इतकी आहे. लांबी वीस, तर रुंदी बारा फूट इतकी आहे. यामध्ये आणखी लहान-मोठया आकाराच्या पाच गुहा आहेत. यांपैकी पहिली गुहा तीस फुटांपर्यंतच आहे. दुसरी 55 फूट लांब आहे. तिसऱ्या गुहेला डाव्या-उजव्या बाजूला अनेक मार्ग फुटलेले आहेत. त्यातूनच हा मुख्य मार्ग नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. हा मार्ग वेडीवाकडी वळणे घेत गेलेल्या आहे. गुहेमध्ये आत सरकेल तसा मार्ग चिंचोळा होत गेला आहे. गुहा वेडीवाकडी असल्यामुळे हवाही कमी प्रमाणात आत येते. गुहेच्या मुख्यावर महादेवाची पिंडी आणि त्रिशूल आहे; त्यामुळे याला सिद्धनाथ असे नाव देण्यात आले. या देवाची वर्षातून दोन वेळा यात्रा होतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री दिवशी पाटगाव, भटवाडी, शिवडाव येथील भाविक या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात हा सण दोन दिवस साजरा करतात. त्यानंतर एरवी हा भाग निर्जन राहतो. या परिसरात रानागवा, अस्वल, बिबट्या, साळीदर, विषारी साप यांचा वावर असतो. गुहेत वटवाघूळ आणि वन्यप्राण्यांचा वावर असल्याने उग्र वास येतो. या तीन गुहांतील मार्गांची माहिती घेतली असता या गुहा शिवकालीन असून, यातील एक मार्ग रांगणा किल्ल्याकडे जात असल्याचे सांगाण्यात आले. या गुहेमध्ये पडझड झाल्याने 50 फूट अंतर गेल्यानंतर मार्ग बंद झाला आहे; त्यामुळे या गुहांचे जतन करावे अशी मागणी जीत फौंडेशनचे अध्यक्ष सुनील धोंड यांनी केले आहे.
सिद्ध गुहा ह्या बुद्धकालीन गूढ रम्य, निसर्गसौंदर्याने रमणीय अशा आहेत. मुळात ह्या दक्षिणाभिमुख. महादेवाचे दैवी अधिष्ठान असल्याने येथील जंगलसंपदा सुरक्षित आहे. व्यसनी विक्रुतीला इथं थारा नाही. अशा पावित्र्यामुळे जंगल आणि पिढी सुरक्षित राहील.
-दत्ता मोरसे,
जंगल संशोधन.

ग्रुप ट्रेकिंग .. वन डे ट्रेक साठी खूप छान असे पर्यटन स्थळ आहे.

अधिकमहिती साठी संपर्क साधा

अभिजीत लोखंडे, कोल्हापूर.
9011234999

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....महाबळेश्वरातलं स्वर्गतुल्य मिनी काश्मीरराधेय ऍग्रो रिसॉर्ट.....'चलते रहेना ...
11/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

महाबळेश्वरातलं स्वर्गतुल्य मिनी काश्मीर
राधेय ऍग्रो रिसॉर्ट.....

'चलते रहेना ही जिंदगी का नूर हे..
पर क्या करे, वक्त की पाबंदी से मजबूर है…
युरोप रशिया तो क्या
अपने लिए कश्मीर भी बहोत दूर है..'
वेळेची बांधीलकी पावलांमध्ये बेड्या बनून राहते आणि मग ती पावलं अडखळतात अर्ध्या वाटेवरच. जायचं असतं खूप दूर; पण… केवळ स्वप्नंच उरता… अशा स्वप्नाळू जीवांसाठी आपल्या मातीत अवतरलेय साक्षात काश्मीर. अहो म्हणजे अगदी आपल्या महाबळेश्वरच्याच सावलीत.. म्हणजे फक्त सोळा किलोमीटर.. ते आहे राधेय ऍग्रो टुरिझम वाटंबे.
राधेय ऍग्रो रिसॉर्ट पार्क. कॉटेज, वूड हाऊस, टेंट हाऊस, गार्डन रेस्टोचे परिपूर्ण विणलेले नंदनवन म्हणावे. कँप फायर, व्हॉलीबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, कबड्डी, क्रिकेट ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, स्ट्रॉबेरी फार्म, डी.जे., कराओके, रिव्हर कँप, ट्री ब्रीज अशा भरगच्च ओयी आणि ट्रेकिंग, हँगिंग ब्रीजचा थरार.. स्टे इन इग्लु टेंट, आर्मी टेंट, रूम्स, व्हेज नॉनव्हेज फुडस.. बाजूला महाबळेश्वरचा मनमोहन देखावा व लिंगमळा वॉटर फॉल म्हणजे 'आनंदाचे डोही आनंद तरंग'.
महाबळेश्वरला मेढामार्ग जाताना सातारा-मेढा मार्गावरच लागतो केळघर घाट. या घाटात काळ्या कड्याच्या पायथ्याशी पंधरा किलोमीटरवर वसले आहे वाटंबे गाव. म्हणजे वरोशीपासून डाव्या बाजूला वळले की, दोन किलोमीटरवरच आपण पोहोचतो थेट या गावामध्ये. महाबळेश्वरची सावली इथं आहेच; त्यामुळं झाडीही ताहीच दाट, किर्रर्र.. तशीच नागमोडी वळणे आपल्याला मोहित करतात. आंबा, फणसाची आणि मेसाची दाट झाडी कोकणात उतरल्याचा आभास देतात. गावात आले की पुन्हा डाव्या बाजूला एका मिनिटात काश्मीर चढल्यासारखं हे स्वर्गतुल्य ठिकाण येतं. इथली केळीची गर्द बाग पहिली की वसईची आठवण व्हावी. आंबा, फणसाने कोकणाचा सुगंध उतरावा आणि सुरू, सिल्व्हर, अशोकाची झाडे पाहताना आपण जणू काश्मीरच्या भूमीवरच दाखल झालो आहोत, असा आनंद मनातून पाझरावा. आजूबाजूला हिरव्याकंच डोंगरांची वर्दळच उभी जणू. सह्याद्रीचं हे विलक्षण देखणं रूप पाहताना भान हरपून जायला होतं अगदी. पश्चिमेकडे लिंगमळा धबधबा कोसळतोय. पायाखालून वेण्या नदी वाहतोय. यासारखी श्रीमंती काय असेल अजून…? अहो, विधाता सहस्त्र हस्ते हे वैभव उधळतोय. फक्त तो आस्वाद घेण्यासाठी आपण तत्पर असायला हवं. इथले वुडन हाऊस नाजूक कलाबुत्तीचा सर्वोत्तम आविष्कार आहेत. कोकणचं सुख आपल्या पदरात ओतणारी जांभ्या दगडाची घरंही इथं आहेत.
इथल्या टेंटमध्ये राहण्याचा आनंदही वेगळा आणि हो, याहीपेक्षा पाहुणे म्हणून येणार असाल, तर राधेय ऍग्रो त्यासाठीही तत्पर आहे. चक्क यजमानांच्या घरातच राहा, कसलाही त्रास नाही.
अंघोळ करायची असेल तर विहीर शेजारी आहेच. मस्त गार पाण्याचा आनंद इथं घेता येईल. अंगावर शिरशिरी फुलते. इथं मस्त पोहू शकता आपण. गरमागरम हवे असेल तर टेंटमध्ये सोय आहेच. गरम पाणी आणि सुंदर बाथरूम. इथून बाहेर पडलात तर गार वाऱ्याचे झोत आपल्या स्वर्गतास सज्ज. जणू जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा मखमली स्पर्श या वाऱ्यातूनही जाणवतो. तनामनाला शांत करून जातो. जेवण झाल्यानंतर मुलांना इथे खेळू द्या मस्त. इथं क्रीडांगण आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन हवं ते खेळावं सायंकाळी झुलत्या पुलावर चालण्याचा आनंद घ्यावा. हे चालणं म्हणजेसुद्धा एक थ्रील असतं. रात्रीचा गारवा अलवार उतरताना इथं शेकोटीची आनंद लुटावा. या कँप फायरसोबत डी.जे. नाईट किंवा खास आपल्यासाठी कराओके सिंगिंग. मनोरंजनाची ही झिंग चढत्या रात्रीची रंगत वाढविते. बेधुंद होऊन इथं नाचावं, गावं, त्यासाठी फणसाच्या झाडांखाली सुंदर स्टेज आहे. अहं.. स्टेज म्हणावं की आपल्यातील सुप्तकलागुणांना मिळालेलं व्यासपीठ? ते आपणच ठरवावं. स्वर्गसुखाची महाद्वार इथं आपल्यासाठी खोलली जातात म्हणा ना.
अंगाला न झोंबणारी काळ्या कड्याची उबदार थंडी आपल्याला जणू मायेच्या दुलईत लपेटून घेते. अशावेळी सकाळच्या गर्द थंडी6इथला गवती चहा अमृतासारखा लागतो. इथे आपणच आपले जेवण बनविणार असाल तर साहित्य घेऊन या चुलीची व्यवस्था करून दिली जाईल. फक्त रस्सा बनविणार असाल तर भाकरी-भाताची सोय आहेच आणि सर्वच हवे असेल, तर तेही मिळतं इथं अगदी रुचकर.. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला जेवण करायचे असेल तर इथं तुम्ही अगोदर कल्पना द्यावी लागते.. तुम्हाला बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ यांची चक्क लाकूड फाट्याच्या चुलीवर भाजलेली आणि विस्तवावर शेकवलेली, टर्र फुगलेली पापडी ओली भाकरी मिळते. ही भाकरी खायची कशासोबत? इथल्या झऱ्यावरच्या पाण्यात शिजवलेली, भरडलेल्या काळ्या घेवड्याची आमटी, चटकदार उडदाचे घुटे, वाळलेला वाटाणा, मुरमावर उगविलेला हिरवा कोवळा पावटा याच्या कालवणाबरोबर ही भाकरी खाल्लीत तर, याची चव जिभेवर कायमच रेंगाळत राहील. आणि याहीपेक्षा वेगळं खायचं असल्यास पुरणपोळी, सोबतीला मराठमोळी गुळवणी खायची स्पर्धा लावायला भाग पाडले. तुम्ही मांसाहारी असाल, तर पिकलेल्या तवशाचे (काकडीचे) भोपळ्याचे किंवा कोहळ्याचे वडे, सोबत तांदळापासून बनविलेले केळीच्या पानावरचे घावने व सोबत गावरान कोंबडी किंवा कोंबड्याचा रस्सा.. कसा वाटतो बेत? अंगातली थंडी कुठल्या कुठे पळून जाईल. घाटावरची, घरी बनवलेली चटणी म्हणजे एकदम कडक माल. जिभेवरून भेट काळजात चर्र उतरेल. आणखी मेनू आहेच. तळलेला कांद्यातील बोंबील, सकी सुकटवा खारा मासा मागवा. जिभेला गुदगुदल्या करतच हे मनाच्या तळाशी जाऊन घट्ट रुतून बसेल. साधा बेत आखायचा असेल तर पिठलं-भाकरी व कांदा घेऊन विहिरीकाठी जा आणि जेवणाचा आनंद लुटा. आयुष्यात स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं?
मग येताय ना मिनी काश्मीरमध्ये, आनंदाचे सोहळे लुटायला…?
-मोहन भणगे, वाटंबे(सातारा)

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....इतिहासाची तेजोमयता जपणारीशिवतेज शिवसृष्टी आणि वॉटर पार्कमहाराष्ट्र, समरधुरं...
10/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

इतिहासाची तेजोमयता जपणारी
शिवतेज शिवसृष्टी आणि वॉटर पार्क

महाराष्ट्र, समरधुरंधर वीरांच्या यशोगाथा आपल्या अंगाखांद्यावर मिरावनांर महान राष्ट्र… मावळच्या मुशीत आणि सह्याद्रीच्या कणखर कुशीत लपलेला तो इतिहास आजही आपल्या वर्तमानाला बुलंद बनवतो. हेच शिवतेज आपल्या प्रेरणा देण्यासाठी आज सज्ज आहे. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी, शिवतेज शिवसृष्टि आणि वॉटर पार्क म्हणजे पर्यटकांसाठी इतिहासाची चैतन्यदायी मशाल आहे. जो समाज इतिहास विसरतो तो वर्तमान घडवू शकत नाही. अशा समाजाला त्याच दिव्य पाऊलखुणा शोधण्यासाठी प्रवृत्त करते आहे ही शिवसृष्टि. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने इथल्या पन्हाळगडावर मराठ्यांचा हा तेजोभास्कर आदिलशाही कोंडाळ्यात अडकला. सिद्दी जोहरने सहा महिने पन्हाळगडास वेढा दिला.
शिवरायांनी शरण यावे, यासाठी शर्थीची झुंज दिली. भर पावसाळ्यातही हा वेढा कडक होता. सहा महिने वेढ्याशी तोंड देताना पन्हाळगडाच्या तटबंदीचा तवकाही निघू शकला नाही. मात्र जसा धान्याचा साठा संपू लागला तशी शिवरायांना चिंता सतावू लागली. हा वेढा फोडून इथून निघालं पाहिजे. योजना बनवली गेली, त्यानुसार विशाळगडाकडं कूच करताना शिवा काशीद, बाजीप्रभू अशा अनेक वीरांनी इथं बलिदान दिलं आणि मराठ्यांचा भावी छत्रपती सुखरूप विशाळगडी पोहचवला. हा याच मातीत घडलेल्या इतिहास, हा इतिहास अनुभवायला इथं असंख्य इतिहास प्रेमी आणि पर्यटक दररोज येतात. इथल्या मातीत त्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतात. तेंव्हा त्याच इतिहासाचे प्रतिबिंब या शिवसृष्टि वॉटर पार्कमध्ये आपल्याला भेटते. सह्याद्रीच्या कुशीत वनराईच्या सान्निध्यात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ही शिवसृष्टी सज्ज आहे. ऐतिहासिक किल्ले पन्हाळ्यापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आणि महाराष्ट्राचा कुलस्वामी जोतीबारायाच्या पायाशी फक्त चार किलोमीटर अंतरावर ही शिवसृष्टि विनटली आहे. इथं सुट्ट्यांचा आनंद अनुभवण्यासाठी यावे.. इतिहासाची तेजोमयता नसानसात भिनवण्यासाठीही यावे.. ज्यांना मनःशांती अनुभवायची आहे. त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरेल.. पुण्यापासून अडीचशे किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हा सौंदर्याचा ठेवा सर्वांसाठी खुला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकमधील पर्यटकांसाठी पन्हाळगड प्रेरणास्थान आहे.. कोल्हापूरपासून इथं येण्यासाठी सहज बसेस तशा खाजगी गाड्याही उपलब्ध आहेत. इथं आपल्याला दिसेल शिवकालीन इतिहासाचा अनमोल खजिना. फायबर म्युरलच्या एकवीस भित्तिचित्रांमधून हा खजिना आपल्यासाठी सजला आहे. शिवराज्याभिषेकाचे 12X36 फुटी भव्य चित्र ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी फ्रेम आहे. याचबरोबर छत्रपती शिवरायांचा तेवीस फुटी भव्य पुतळा आपणांस निश्चितच अभिमानाने मान उंचवयास भाग पाडले. इथं रहाण्यासाठी हॉटेल्स बुकिंगही सहज उपलब्ध आहे. सोबत कोल्हापूरी झणझणीत भोजनाचा आस्वाद आणि कोल्हापूरी सेवाभावनांची अतिथ्याशीलता आपल्या पाहूनचारास सज्ज आहे. उंच पठारी भागावर वसलेलं हे वॉटर पार्क जवळपास आठ एकर विस्तीर्ण परिसरात वसलेलं आहे इथला सुंदर देखावा मनाला भुरळ पाडतो. चिमुकल्या जीवांना शहरणारी मिनी ट्रेन आणि खेळ मन रिझवतात. आपल्या पूर्व विंतरनुसार इथं मर्दानी खेळाचा इतिहासकालीन शस्त्रे कशी चालवली जात असत, युद्धे कशी खेळली जात असत यांचे प्रत्यक्षित या युद्धकलेतून मिळतं. इथला अप्रतिम डि. जे. रेन डांन्स बॉलिवूड गीतांच्या तालावर आपल्या मनाला तणावमुक्त ठेवतो. इथला मॅजिक शो हास्याचे कारंजे आपल्या मनात फुलवतो. जगाला विसरून आणि चिंता काळजी यांची ओझी बाजूला ठेवून घडीभर असा आनंद इथं वेचावाच वाटतो.. पूर्व विनंतीनुसार इथं शाहीर पोवाड्याचं आयोजन ही होतं. शाहिरी ही महाराष्ट्राची रांगडी लोककला. वीररसाचा हा चैतन्यदायी अविष्कार. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या अमोघ शैलीने जणू इतिहासात घेऊन जातात. याचबरोबर रक्त सळसळायला लावणाऱ्या शब्दांतुन चेतनेचा जागर घडवतात. या परिसरात बसून या विररसाचा आनंद घेणं एक वेगळीच अनुभूती ठरू शकते. अशीच गोंधळ गीतातून लोकशिक्षणाची अनुभूती आपण इथं घेऊ शकता. गोंधळ समाजातील रूढी-परंपरांवर केलेला व्यंगात्मक प्रहार. लग्नानंतर आपल्या संस्कृतीत गोंधळ घालनेची परंपरा आहे. यामुळे संसारात अराजक उतरत नाही अशी लोकमानाची श्रद्धा. अशा कलाविष्कारांची अनुभूती देणारे शिवसृष्टि वॉटर पार्क म्हणूनच आपल्या सहलीला तृप्तीची अनुभती देऊन जाते. या अनवट वाटा शोधाव्या, या वाटांची वहिवाट बनावी आणि आपल्या आयुष्यात चैतन्याचे रंग भरून जावी हा आहे शिवसृष्टीचा अट्टाहास. शालेय सहल, गट कार्यक्रम, वाढदिवस यासाठी इथं विशेष सवलत आहे. इथं या इतिहासाची ती तेजोमय मशाल घेऊन आपल्या आयुष्यातील अंधार नष्ट करा. खऱ्या अर्थाने इथे प्रकाशयात्री व्हा.

पर्यटन मित्र …. आपल्या पर्यटनाचा सोबती…...आंबा येथे निसर्गाच्या सहवासात बहरलेले स्नेहल अतिथ्याने परिपूर्ण…..सह्याद्री व्...
09/05/2020

पर्यटन मित्र …. आपल्या पर्यटनाचा सोबती…...

आंबा येथे निसर्गाच्या सहवासात बहरलेले
स्नेहल अतिथ्याने परिपूर्ण…..

सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट …..

कोल्हापूर शहरापासून अवघ्या ८० ते ८५ की. मी. अंतरावर असणारे , निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आंबा …
हिरवीगार झाडे, कसलाही गोंधळ नाही, कोणताही त्रास नाही, त्यामुळे पर्यटकांना इथे मनमुराद आनंद लुटता येतो. निसर्गाची मुक्त उधळण , मन उल्हासित करणारे वातावरण त्यामुळे हे ठिकाण म्हणजे लहान महाबळेश्वरच म्हणावे लागेल. लोणावळा खंडाळा पेक्षा ही येथील जंगल सदाहरित , निसर्गरम्य असे आहे.
हा संपूर्ण परिसर प्रदूषणमुक्त आहे. संपूर्ण आंबा परिसरात पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो, त्यामुळे या परिसरात ठिकठिकाणी बारमाही जलसाठे आहेत. त्यामुळे येथील ५० की. मी. परिसरात औद्योगिक विभाग नाही. कोणतीही मोठी इंडस्ट्री नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यातील निवांत ठिकाण म्हणून असंख्य पर्यटक येथे भेट देतात. महाबळेश्वर, लोणावळा खंडाळा , उटी यांच्या तुलनेत खूप कमी खर्चात येथे निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो.
आंबा परिसरात मनाला आनंद देणारी, मनाला सुख देणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. मानोली (आंबा) येथील सह्याद्री व्हॅली या कृषी पर्यटन केंद्रापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मानोली धरण आहे. तिन्ही बाजूंनी घनदाट जंगल असून अथांग अशा बॅक वॉटर ने पसरलेले , स्वर्गीय आनंद देणारे गेळवडे धरण आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण अविस्मरणीय असे आहे. येथून जवळच श्री मार्लेश्वर , स्वामी स्वरूपानंद यांचे पवित्र पावन ठिकाण पावस, डोळ्यांत न मानणारे , नितांत सुंदर अशा सागर किनाऱ्या वर वसलेले गणपतीपुळे चे गणेश मंदिर तसेच विलोभनीय अशा समुद्राच्या पाण्याने वेढलेला एतिहासिक असे रत्नागिरी हे शहर आहे. अशा या निसर्गसंपन्न , निरव शांतता असलेल्या भागात स्नेहल आतिथ्याने परिपूर्ण , निसर्गाच्या सहवासात बहरलेले सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अप्रतिम सुखसोयींनी परिपूर्ण असून, पर्यटकांचा निवास सुखकर करणाऱ्या अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. या रिसॉर्ट मधील सुमधुर स्वादिष्ट भोजन तर पर्यटकांना तृप्त करेल असे अवीट आहे. पर्यटकांनी आगाऊ सूचना केल्यास येथे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाज्यांसोबत भाकरी, वांग्याचे भरीत असे अस्सल ग्रामीण शाकाहारी भोजन सुद्धा भेटू शकते. ताज्या , धारोष्ण दूधापासून बनवलेली बासुंदी तसेच पुरी, श्रीखंड अगदी पुरणपोळीचे जेवण ही तेथे उपलब्ध आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार अस्सल कोल्हापुरी झणझणीत मांसाहारी जेवणाची ही सोय रिसॉर्ट मध्ये केली जाते. रिसॉर्ट मध्येच संगोपन केलेल्या कोंबड्यांचे गावरान चिकन बरोबरच तांबडा पांढरा रस्सा या सर्वाची लज्जत ही येथे चाखायला मिळते. त्यामुळे निसर्गाच्या गहिऱ्या सानिध्यात सह्याद्री व्हॅली रिसॉर्टमध्ये आलेले पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून अगदी तृप्त होतो. सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट मध्ये एसी , नॉन एसी रूम्स ची सोय असून स्पेशल सेपरेट कॉटेज ची सुविधा ही येथे उपलब्ध आहे. भव्य असा लॉन ही आहे. शिवाय मीटिंग, सेमिनार आणि इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा येथे आहे. या रिसॉर्ट मध्ये राहण्याचे शुल्क ही सर्वसामान्यांना परवडणारे आणि त्यांचा आवाक्यातील आहे. प्रौढांसाठी प्रत्येक दिवसासाठी ७०० रुपये आकारले जातात. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी प्रती दिवस ६०० रुपये आकारले जातात. याच पॅकेज मध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व रात्रीचे शुध्द शाकाहारी जेवण , दिवसातून ३ वेळा चहा , कॉफी दिली जाते . रिसॉर्ट तर्फे पावनखिंड पायी , विशाळगड, नाईट जंगल सफारी , मॉर्निंग सफारी नाईट सीन बर्ड साईड सीन चे आयोजन ही करण्यात येते. स्वर्ग सुखाचा आनंद काय आणि कसा असतो हे अनुभवायचे तर आंबा येथील सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट ला भेट द्यायलाच हवी…...

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....दि स्टॅच्यू ऑफ युनिटी......भव्यतेची ओढ मानवी मनाला नेहमीच असते… जे जे उदात्...
08/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

दि स्टॅच्यू ऑफ युनिटी......

भव्यतेची ओढ मानवी मनाला नेहमीच असते… जे जे उदात्त, उत्तुंग ते ते दिव्यत्वाचा साक्षात्कार भासतं… अनंत अवकाश, विस्तीर्ण समुद्र म्हणूनच आपल्याला नेहमी भुरळ पाडतात… काही व्यक्तींचं कर्तुत्वही अभाळासारखं विशालकाय… आणि म्हणूनच अशा व्यक्तिसुद्धा मनामनांवर अधिराज्य गाजवतात… सरदार वल्लभभाई पटेल… भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय कर्तृत्वाचा इतिहास निर्माण करणारं अतुलनीय व्यक्तिमत्त्व… खरं तर सरदार वल्लभभाई पटेल हे नाव म्हणजेच एक तेजोमय इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं मात्र अनेक संस्थानांच्या तुकड्यांमध्ये हा देश विखुरला होता. प्रत्येक संस्थान विचार करीत होते… स्वतःला राजे-महाराजे म्हणविणाऱ्या संस्थानिकांच्या शाही रुबाबापुढे सर्वसामान्य होरपळ नित्याचीच होती. आणि मग अशा परस्थितीमध्ये जरी देशाला स्वातंत्र्य मिळालं, तरी देश ही संकल्पनाच इथे अस्तित्वात येऊ शकत नव्हती. प्रत्येकाने फक्त आपल्या सीमित तुकड्याचाच विचार केला, तर ऐक्यभावना निर्माण होणार तरी कशी? आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल नावाच्या लोहपुरुषाने ही सारी संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन करण्यात प्रस्ताव पुढे आणला… पिढ्यानपिढ्यांचं हे वर्चस्व संपविणं ही सोपी गोष्ट होती का? निश्चितच नाही… तरीही या सत्ताधिशांच्या मुजोरीला न जुमानता पटेलांनी भरतभरातील साधारण साडेपाचशे संस्थानं विलीन केलीत. प्रत्येकाने आपल्या डबक्यापुरता विचार न करता 'माझा भारत' ही ऐक्यभावना जपली पाहिजे हाच अट्टाहास… या इतिहासातून सर्वसामान्यांच्या ऐक्याची मोट बांधली गेली… मराठी, बंगाली, गुजराती,पंजाबी असा प्रांतवाद बाजुला ठेवून 'आम्ही भारतीय' या छत्राखाली संपूर्ण भारतवर्ष एक झाला.. हाच तेजोमय इतिहास आठवताना आज जपला गेला पाहिजे.. पुन्हा इथे ऐक्याच्या गाठी मनामनांतून साधताना सरदार पटेलांची भव्य प्रतिमा जनमानसात कायमस्वरूपी ठसली पाहिजे, याच हेतूने गुजरात सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचललं.. अशा कर्तबगार महापुरुषाचातितकाच उंच म्हणजे ही त्या इतिहासाला दिलेली कृतज्ञतेची मानवंदना म्हणावी लागेल. त्या दिव्यत्वाचीच ही साठवण आहे.. गुजरातच्या सरदार सरोवरपासून साधारण 3.2 की.मी. अंतरावर केवडिया गावी साधू बेट, गरुडेश्वर बांध इथं हा जगातील सर्वात भव्य-दिव्य पुतळा उभा आहे. पोलादी साच्यांमध्ये प्रवलील लोह-काँक्रीटमध्ये बनविला गेलेला आणि कास्यलेपधारी असा हा पुतळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींची संजीवक साठवण म्हणावी.. 7 ऑक्टोबर, 2010 रोजी गुजरात सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री मा.नरेंद्र मोदींनी या पुतळा उभारणी प्रायोजनेची उदघोषणा केली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा इथं उभारला जावा, या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे विलोभनीय स्वप्न प्रत्यक्षात उतरवीनं सोंप काम नव्हतं.. अशा उत्तुंग पुतळ्याच्या उभारणीसाठी हजारो मेट्रिक टन लोह आवश्यक होतं. हे मिळवावं कसं? याचा विचार करून पुढील नियोजन आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टची इथे स्थापना झाली. संपूर्ण देशभरात या ट्रस्टची सुमारे छत्तीस कार्यालये उघडली गेली.. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपल्याजवळील जुने, निरुपयोगी, भंगारसदृश लोह या पुतळा उभारणीसाठी दान करावं.. विशेष म्हणजे शेतकरीबांधवांनीही या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळपास पाच लाख शेतकऱ्यांकडून तब्बल पाच हजार मेट्रिक टन लोह जमा झाले. हे लोह ट्रस्टतर्फे संकलित करण्यात आले. मात्र पुढे ही गोष्ट निदर्शनास आली की हे लोह पुतळा उभारणी उपयोगात येऊ शकत नाही. मग याच परियोजनेतील अन्य निर्मितीमध्ये ते उपयोगात आणलं जावं असा निर्णय झाला.
31 ऑक्टोबर, 2013 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शिलावरण समारंभ पार पडला आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. 3001 करोड रुपयांचा हा अंदाजित संकल्प होता. लार्सन अँड टूब्रो कंपनीने 2989 करोडच्या कमीत कमी टेंडरमध्ये या संकल्पाच्या पूर्तीसाठी निवेदन दिले. साधारण पाच वर्षे हे काम सुरू राहिले आणि 182 मीटर म्हणजेच साधारण 597 फूट उंच असा हा पुतळा आकाराला आला. आधारशिलेसहित या पुतळ्याची उंची साधारण 240 मीटर म्हणजेच 790 फूट आहे. 2013 साली जेव्हा शिलावरण सोहळा पार पडला, त्या वेळी भारतभरात 'रन फॉर युनिटी' स्पर्धांचं भव्य आयोजन करण्यात आले होते. या रनिंग स्पर्धांमध्ये भारतातून हजारो क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इथं भव्य असं सुराज्य प्रार्थना पत्र बनविलं गेलं. ज्या पत्रावर भारतभरातील नागरिकांना सुशासनाविषयी आपली मतं नोंदविता येतील, त्या पत्राची भव्यताच एवढी की, जवळपास दोन करोड लोकांनी इथे आपली स्वाक्षरी नोंदविली. हाही एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल.
आज हे भव्य-दिव्य शिल्प करोडो भारतीयांची मान उंचावण्यासाठी इथे उभे आहे. हे आहे ऐक्याचे प्रतिष्ठान. 31 ऑक्टोबर, 2018 रोजी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या हस्ते हे शिल्प उदघाटन करून देशास अर्पण करण्यात आले. जगभरातून हजारो पर्यटकांची मांदियाळी या भव्य-दिव्य स्वप्नाचा अविष्कार पाहण्यासाठी इथे जमते आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' खरंच हे ऐक्याचे मूर्तरूप स्मारक आहे. भारतात एकसंघ घडविणारी महान विभूती सरदार वल्लभभाई पटेल यांना या स्मारकरूपाने देशात आदरांजली वाहिली आहे. जगभरातील अशाच दिव्य स्मारकांचा इतिहास पहिला तर काय दिसून येतं? चीनमधील 'स्प्रिंग टेंपल बुद्ध' हा पुतळा153 मीटर उंच, म्यानमरचा लायक्रुन स्टेकयार 116 मीटर उंच, जपानचा युशुक दायबुत्सु 110 मीटर उंच, अमेरिका स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 97 मीटर उंच, थायलंडचा ग्रेट बुद्ध 91 मीटर उंच, रशियाचा मदरलँड कॉल्स 87 मीटर उंच, अशा जागतिक स्मारकांच्या तुलनेत भारतीय परंपरांची भव्यता उतुंग ठरली आहे. 182 मीटर उंचीचे हे भव्य स्मारक आज जगातील सर्वात उंच स्मारक ठरले आहे.
स्मारकापर्यंत पोहचण्यासाठी इथे खास लिफ्ट आहे. मूर्तीला त्रिस्तरीय आधार दिलेला आहे. ज्यात प्रदर्शन फ्लोअर, बाल्कनी व छताचा समावेश आहे. छतावर स्मारक उपवन, विशाल संग्रहालय, प्रदर्शन हॉल आहे. नर्मदा नदीतीरावर पाचशे फूट उंचीचा ऑब्झर्व्ह डेक उभारला आहे. जिथून दोनशे लोक एकचवेळी हे शिल्प नजरेत भरु शकतात. इथूनच नावेतून पाच मिनिटांत शिल्पाजवल जाता येतं. पटेलजी यांचे जीवनसंग्रहालय, भारतभवन प्रदर्शन हॉल, 3डी प्रोजेक्शन मॅपिंग, 153 मीटर उंचीवरून पर्यटकांसाठी नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्याची सोय, संग्रहालय, हस्तशिल्प बझार, फुलांची दरी, राज्यांचे स्वतःचे अतिथीगृह हे इथले खास आकर्षण, पर्यटकांच्या मनात ऐक्याची भावना पुनरुज्जीवित करताना 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा सांस्कृतिक वसा वारसा जगासमोर रुजविण्यासाठी ही शिल्पाकृती उभी आहे. हे महन्मंगल दृश्य पाहताना उंचावलेली मान अभिमानाने अधिक ताठच होईल, यात शंका ती काय?...
-संकलन

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....भारतातील पाहिले राष्ट्रीय सागरी उद्यानजामनरचं मरीन नॅशनल पार्क......वन्यजीव...
07/05/2020

पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....

भारतातील पाहिले राष्ट्रीय सागरी उद्यान
जामनरचं मरीन नॅशनल पार्क......

वन्यजीव, पशुपक्षी यांचं संरक्षण होणं ही मानवी जीवनचक्राची पायाभरणी ठरू शकते. एखादा जीव लुप्त होणं म्हणजे ही जीवनसाखळी कमकुवत होणं. सूक्ष्म किंवा क्षुल्लक वाटणारा कृमी, किटकही निसर्गचक्राचा मजबूत धागा असतो. निसर्गातील मानवी हस्तक्षेप आणि यांत्रिकीकरणामुळे सध्या अनेक जीवांच्या अस्तित्वावरच कुऱ्हाड कोसळली आहे. ही संरक्षण व्यवस्था अभयारण्य उभारणीतून पुन्हा मजबूत केली जाऊ शकते. अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातीचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत(उदा. डायनासौर किंवा भीमसरट, स्मयलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वुली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडा पक्षी, वगैरे) यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते; पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज 20 प्राण्यांच्या, 8 पक्षांच्या तसेच 33 झाडांच्या जाती, तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांच्या माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे.
अगदी याच धर्तीवर सागरी जीवांचं संरक्षण व्हावं या हेतूने भारतात अनेक सागरी उद्यानांची निर्मिती केली गेली. इथल्या समृद्ध जैवविविधते मधून अतिशय दुर्मिळ अशा समुद्रजीवांचं जतन आणि संवर्धन शक्य झाले आहे. ऑलिव्ह कासव, समुद्री मगर आणि अशा अनेक सस्तन जीवांचे पोषण या सागरी अभयरण्यांतून होत असते. निसर्गचक्राचे संतुलन राखण्यासाठी या जीवांचे मोल तसे अनमोल आहे. पर्यटनाचेस्तोत्र या अभयारण्यांनी खुले केले आहेत. सोबत सागरी ज्ञानाचा अमूल्य खजिना या अभयारण्यांच्या रुपानं आपल्यासमोर आहे भारतातील अशा अनेक अभयारण्यांना जगभरातील पर्यटक भेटी देत असतात. यापैकीच एक म्हणजे गुजरातच्या जामनगर भागातील मरीन राष्ट्रीय उद्यान.
भारतातील हे पाहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. 1982 साली स्थापन हे सागरी उद्यान सुमारे 162.89 चौरस किलोमीटरचे आहे या शिवाय 458.92 चौरस वर्ग करण्यात आले आहे. ज्यांना नाविन्याची ओढ आहे, सतत वेगळं काही पाहण्याचे वेढ आहे अशा सफारींना साद घालते आहे हे जामनगरचे मरीन राष्ट्रीय सागरी उद्यान. समुद्रिय जीवांचा अभ्यास करणारे तसेच मायक्रो फोटोग्राफीची आवड असणारे अनेक लोक इथं भेटी देत असतात. जामनगरच्या किनाऱ्यावरील जवळपास बेचाळीस बेटांमध्ये सर्वांत प्रसिद्ध द्विप म्हणजे पिरोटन बेट. पिरोटनला भेट द्यायची असेल तर जामनगरहूनरोझी पोर्टला जावे लागते. तिथून बोटीने सात नॉटिकल मैल अंतरावर पिरोटन बेट आहे. इथे केवळ वनविभाग आणि लाईट हाऊसचे लोक असतात. पर्यटकांनी इथं जायचं तर वनभिभाग तसेच कस्टम विभागाची परवानगी घेणं आवश्यक असतं. पर्यटकांना नरारा येथील सागरी किनाराही खुणावत असतो. जामनगरपासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर जामनगर-द्वारका महामार्गावर नरारा शहर आहे. समुद्रिय ओहोटीच्या वेळी पाणी आत गेले की इथल्या किनाऱ्यावरचा खडकाळ भाग उघडा पडतो. अशावेळी या भागांत फिरणारे अनेक सागरी जीव पाहणं ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. या काळात नरारा येथील स्थानिक समुद्रजीव संस्थांतर्फे कोरल वॉकचे आयोजन केले जाते. इथे सहभागी होताना या सागरी जीवांविषयी जिव्हाळा, त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ मनात हवीच. अशा दुर्मिळ जीवांविषयी आपल्याला माहिती असेल, अभ्यास असेल तर आपल्याला गाईडची गरज भासत नाही.
जामनगरच्या मरीन नॅशनल पार्कमध्ये सुमारे सत्तर प्रकारचे स्पॉन्ज, सदतीस प्रकारचे कोरल, झिंग्यांच्या सत्तावीस प्रजाती, खेकड्यांच्या तीस प्रजाती, 108 प्रकारचे तपकिरी, हिरव्या आणि लाल रंगाचे शेवाळ, याचबरोबर ग्रीन सी, ओलीव रिडले आणि लेदरबॅकसारख्या अतिशय दुर्मिळ कासवांच्या प्रजाती इथं आढळून येतात. डॉल्फिन्सच्या विविध प्रजातींमध्ये कॉमन डॉल्फिन्स, इंडो पॅसिफिक बोटलनोज डॉल्फिन्स आणि इंडो पॅसिफिक हंप बॅक्ड डॉल्फिन्सही इथं आढळतात.
या सर्व जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धण होणे ही काळीची गरज आहे. संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे; पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत.
पर्यावरण संवर्धन, जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) यांसारखे शब्द सध्या खूपच पखालीचे झाले आहेत. एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उधोग एकूण अर्थव्यवहाराच्या 40 टक्के उलाढाल घडवतील, असा अंदाज आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यासच कळून येईल. उदा. अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेळींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले, तर फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी तर वाढतीलच; पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील. असेही आढळून आले आहे, की परिसरातल्या टेकड्या, डोंगरांवर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे डोह, विहिरी लवकर आटत नाहीत.
अलीकडील काळात मात्र इतरत्र आढळणाऱ्या मानवी हस्तक्षेपाप्रमाणेच जामनगर सागरी पार्कमधील जैवविविधताही धोक्यात आली आहे. सिमेंट उद्योगांद्वारे कोरल आणि रेती काढणं. पाण्याची वाढ होणं. निसर्गाचा हरवत चाललेला समतोल, तेलनिर्मिती, रासायनिक उद्योग, मशीनकृत मासेमारीच्या बोटी अशा अनेकविध कारणांनी ही जैवविविधतता धोक्यात येते आहे.
जैवविविधतेच्या ऱ्हासाचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, आर्थिक फायदा. नुकसानीच्या हिशेबातूनच या जीवांकडे पाहण्याची मानवी वृत्ती. ही वृत्ती व्यवहारवाद सोडून जबाबदारीचे भान ठेवून जागृत व्हायला हवी.
भारतातील सर्व जीवसंपदा काही थोड्या राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातच फक्त सागरी भागातच नव्हे तर देवराया, शेती, नद्यांतील डोह, पाणवठे एवढेच नव्हे, तर शहारांमधूनही (टेकड्या, शैक्षणिक संस्थांचे परिसर) जीवसंपदा आहे आणि त्याच्याही संरक्षणाची आवश्यकता आहे. खासगी हितसंबंधाची जपणूक, लोकांपर्यंत चळवळ नेणे यांसारख्या गोष्टींमधून जीवसंपदेचे रक्षण शक्य होणार आहे…

Address

D2/905, Padamavati Colony , Devkar Panand
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paryatan Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Paryatan Mitra:

Share