14/03/2022
When you organize first ever trek...and when you get positive feedback...that's your your true achievement...
Here is one of best feedback...
वासोटा,
मौंट्रेकर्स कोल्हापूर,
जवळ जवळ 1 महिना झाला असेल शिवतेज ची वासोटा ट्रेक ची पोस्ट स्टेटस ला पहिली आणि लगेच त्याला कॉल करून कन्फर्म केल. खूप आतुरता होती या ट्रेक ची यादरम्यान अमित दादा ची ओळख झाली ते पण फक्त कॉल वर अमित दादा बद्दल फक्त एवढच सांगतो त्यांनी आपलं 100% दिल आपल्या साठी thanks अमित दादा आणि त्यांना पूर्ण सपोर्ट करणाऱ्या आमच्या पल्लवी वहिनी साहेब तुम्हा दोघांच मनापासून कौतुक आणि आभार
या ग्रुप वर कॅम्प च्या updates सतत अमित दादा देत होते त्या नुसार 12मार्च ला 12चा टाईम होता पण सांगितलेल्या वेळेत सगळे आले तर मग काय मज्जा 😂😂 झाल 2 वाजता गाडी कराड मध्ये जाणार होती ती अजुन कोल्हापूर मध्येच. पण कोणाला त्याच काही वाईट वाटल नाही हि आनंदाची गोष्ट आणि वाटेल पण कस कोणाच्या डोक्यात विचारच न्हवता वेळेचा सगळ्यांना फक्त आपण वसोट्याला निघालोय येवढच लक्षात होत. आणि सगळे आपल्या रोजच्या दगदगितून स्वत्ताला बाहेर काडून या प्रवासातला प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेत होता. संध्याकाळी गाडी शेंद्रे फाट्यावर थांबली तेथे काही मित्र आम्हाला join झाले. हॉटेल प्रतीक्षा मध्ये फ्रेश होऊन चहा घेतला आणि आमची गाडी वासोट्याच्या दिशेने निघाली. खूप दंगा, मस्ती, गाणी आणि डान्स सुरू होता त्यातच आम्हाला काही छोटे उस्ताद भेटले जाता येता त्यांनी आम्हाला येवढे प्रश्न विचारले त्यांच्या मूळ माझा आणि शिवतेज चा उजळणी वजा सारावच झाला. 😂😂 पुढे सोनू च्या पप्पांनी आम्हाला रस्त्यावरच्या अनेक ठिकाणांची ओळख करून दिली. तेवढ्यात काही गाढ झोपी गेलेले 😂😂. रात्री आम्ही बामणोली मध्ये पोहचलो तेथे मातोश्री हॉटेल मध्ये आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. जेवना नंतर प्रवासाच्या थकाव्या मुळे आणि दुसऱ्या दिवशी वासोटा सर करायचा असल्या मुळे सगळे लवकर झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सकाळी 5 ला उठवल सगळी आवरा आवरी झाली. नाष्टा झाला आणि बोटी यायला थोडा वेळ होता तेवढ्यात आमचा फोटो शूट पण झाला. थोड्या वेळाने boats आल्या आमचे 4ग्रुप केले होते त्या प्रमाणे आम्ही बोटीत बसून वासोट्याच्या दिशेने निघालो. अंतरातम्याला तृप्त करणार ते निसर्गरम्य वातावरण पाहून सगळेच खुश झाले होते. कमीत कमी दीड तासात आम्ही वासोट्याच्या check post जवळ पोहोचलो. बॅग चेकिंग नंतर म्हणजे सुमारे 10:15 ला गड चाडायला सुरुवात केली. अत्यंत खडतर आणि जिकडे पाहावे तिकडे सगळे जंगल असणारा तो वासोटा प्रत्येक पावलाला आपल्या भयानकतेची
प्रचिती देत होता. आमच्या पैकी काही दीड तासातच वर पोहोचले आणि बाकीचे म्हणजे आमचा सगळा ग्रुप वर यायला 2-2:30 तास लागले. सगळे वर आल्यावर जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली त्या नंतर शिवतेज ने गडा बद्दल आणि गडाच्या आस पास असणाऱ्या काही ठिकाणांच्या बद्दल अत्यंत महत्वाची माहिती अतिशय सुंदर रित्या आम्हाला सांगितली. गडावर फिरून झाल्यावर काही ग्रुप फोटो काढून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. खूपच मनमोहक आणि अविस्मरणीय अनुभव होता सुरुवाती पासून शेवट पर्यंत
अगदी लहान मुलां पासून मोठ्या माणसानं पर्यंत प्रत्येकाच्या मुखातून महाराजांबद्दल आणि त्या वासोट्या बद्दल कौतुकाचे शब्द ऐकायला मिळत होते.
हा अनुभव अनुभवायची संधी आम्हाला दिल्या बद्दल अमित दादांचे आणि या अनुभवला अविस्मरणीय बनवणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.🙏🙏🙏
-Vaibhavraj...