Travela Travel Concepts

Travela Travel Concepts Travela is tourism company which offer most best and cheapest packages to explore the finest destinations all over world. we provided all india package tour.

we best for "LONG DISTANCE, SHORT DURATION, LOW COST TOUR''
we started tour price is Rs.1000/- only

12/10/2024

दसरा सणात निसर्गाने सुंदर रंग आणि चेतना भरली आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनात सदैव असेच सौंदर्य, उत्साह आणि आनंद बहरत राहो ही शुभेच्छा.

Vijayanagar Empire has left  indelible heritage footprints. Hampi, Badami, Aihole , Pattadkall  and surroundings stand a...
10/10/2024

Vijayanagar Empire has left indelible heritage footprints. Hampi, Badami, Aihole , Pattadkall and surroundings stand a strong testimony to our rich cultural treasure.

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   ६     गोकर्णाची दुर्गाम्मा  गोकर्णला,  महाबलेश्वराचे दर्शन घ्यायला दूर दूरवरून ...
05/10/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग ६

गोकर्णाची दुर्गाम्मा

गोकर्णला, महाबलेश्वराचे दर्शन घ्यायला दूर दूरवरून लोक येतात. या छोट्याशा गावामध्ये पारंपारिक घरे आणि आता नव्याने झालेली अनेक दुकाने , छोटीशी हॉटेल यांची गजबज जाणवायला लागली आहे. या गावामध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रेलचेल येथे अनेकांसाठी रोजगार देत आहे . एका रुपयाचे दहा रुपये कसे करता येतील या वृत्तीची इथे मांदियाळी आहे. परंतु याला एक अपवाद आम्हाला पाहायला मिळाला . महाबलेश्वराला भाविकांनी अर्पण करायच्या फुलांची विक्री करणाऱ्या आसपासच्या गावातल्या महिला येथे दिवसभर टोपलीत आणलेली रंगीबेरंगी फुलं कर्दळीच्या पानांवरती पसरवून दहा वीस रुपयाला विक्री करतात, थोडासा आग्रहाचा भडीमारपण होतो. यातून त्या माऊलींना कुणासमोर हात न पसरता, अखंड रोजगार निर्माण झालेला आहे.

अशीच एक माऊली, दुर्गी आम्हाला भेटली. अंग झाकण्यासाठी गरजेपुरतीच लपेटलेली साडी, सबंध सुरकुतलेली अंगकाठी असलेली एकदम साधी दुर्गी तिच्या वर्तनाने दुर्गा अम्मा ठरली. वयाचा ठावठिकाणा माहित नसलेली हि दुर्गा अम्मा येणाऱ्या भाविकांना फुले विकण्याचा फिरता व्यवसाय करते. दुर्गा अम्मा भेटली तेव्हा आमचे महाबळेश्वराचे दर्शन झालं होतं आणि आम्ही परतीला लागलो होतो त्यामुळे आम्ही फुले घेणार नव्हतो, परंतु दुर्गा अम्माबरोबर एक फोटो घ्यायचा मोह मात्र थांबवू शकलो नाही. दुर्गा अम्माला ते आवडेल की नाही अशी मनात धास्ती ठेवूनच मी आणि आमच्यातल्या एका पर्यटक ताईंनी एक दोन म्हणता म्हणता चार-पाच फोटो काढले.

दुर्गा अम्माला आम्ही सांगितले की आमचं दर्शन झाले त्यामुळे आम्हाला फुले नको तरी पण आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून दुर्गा माउलीला वीस रुपये देऊ केले. परंतु अतिशय प्रांजळपणे , हसत लाजत दुर्गा माऊलीने ते नाकारले आणि ती आपली फुले कोणी घेतय का हे शोधायला थोडी बाजूला उभी राहिली. समोरून येणाऱ्यांना फुले घ्या म्हणणाऱ्या तिच्या बोलण्यामध्ये आर्जव होती परंतु लाचारी नव्हती.

धन्य वाटले दुर्गा अम्माला भेटून. वंदन त्या स्वाभिमानाला , स्वावलंबी मातेला.

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / 9822063370 Whatsap

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   ४   माले ची ललिता आक्काकुदरेमुख अरण्यातून प्रवास करून आम्ही बाहेर आलो . साधारण ...
03/10/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग ४

माले ची ललिता आक्का

कुदरेमुख अरण्यातून प्रवास करून आम्ही बाहेर आलो . साधारण साडेनऊ ची वेळ झाली असावी आणि सकाळच्या न्याहारीसाठी आम्ही काही सोय होते का पाहत होतो. पोट काव काव करत होतंच.

समोरच एक टपरी वजा उपहारगृह दृष्टीस पडलं. सावध पावले टाकत तिथल्या आक्काला काय काय मिळेल म्हणून विचारणा केली. पण तिने काही सांगण्याआधी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून मनोमन ठरवलेलं या आक्काकडेच आज न्याहारी करायची आणि तिने त्याला पुरेपूर न्यायही दिला. ही होती ललिता आक्का. आम्हाला ललिता आक्काच्या रूपाने एक हसतमुख, उत्साही अन्नपूर्णाच भेटली. इडली सांबार चटणी लगेच उपलब्ध होतं आणि मागणी नुसार मिरची भजी , बटाटा भजी , डोसा सुद्धा तयार करून मिळणार होता. एकदम गावठी आणि साधं असं तिचं हे उपहारगृह. सर्वप्रथम आक्काने इडली चटणी सांबार ज्यांना हवं होतं त्यांना ते वाढले . मग एका बाजूला बटाटा भजी आणि मिरची भजी तळायला सोडली , सोबतच डोसे सुद्धा बनवायला घेतले . गरम डोसे , गरम भजी ...... आहाहा काय तो स्वाद , काय ती स्थानिक रुची. आमच्यातील प्रत्येकाने आवडीप्रमाणे इडली डोसा तर घेतलाच पण प्रत्येकाने बटाटा भजी आणि मिरची भजी चवीने खाल्ली. निरोपाला गरमागरम चहा आणि कॉफी होतीच. षड्रिपु प्रसन्न.

फारशा साधन सुविधा नसताना सुद्धा पर्यटकांना स्थानिक खाद्य संस्कृतीचा अतिशय रुचकर थाट अनुभवाला आला. रस्त्याच्या कडेला उपहारगृह चालवून उपजीविका करणारी ही ललिता आक्का गावाकडची अशिक्षित महिला असली तरी स्वभावाने आणि व्यवहाराने खूपच सुसंस्कृत, आपुलकीने वागणारी होती. नऊ जणांच्या गरगरीत नाश्त्याचे जेमतेम ५७० रुपये झाले . आक्काला सहाशे रुपये देऊ केले आणि वरचे ३० रुपये खुशी म्हणून ठेव असे सांगितल्यावर पहिल्यांदा तिला त्यावर विश्वास बसला नाही , तिने सविनय त्याला नकार दिला. परंतु खूपच आग्रह केल्यावर तिने ते ठेवले आणि ताटामध्ये शिल्लक असलेल्या भज्या किती खायच्या त्या खा, असा निर्मळ प्रेमळ पर्याय समोर ठेवला.

कुठे ते माले , कोण ती ललिता आक्का , कोण कुठले आम्ही , सगळे मिळून तीस मिनिटे भेटलो, तरी पण आक्काने , बहिणीच्या हक्काने आम्हा सर्वांना जिंकले. वंदन अन्नपूर्णेला , वंदन भारत मातेला .

न्याहरी नंतर चहा कॉफी घेऊन आम्ही उडपीकडे रवाना झालो.

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / ९८२२०६३३७० whatsapp

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   ३  कुद्रेमुखची तोंड ओळख आणि जळवांचा जलवा  सकाळी उडुपी कडे निघालो.  हा मार्ग सुर...
02/10/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग ३

कुद्रेमुखची तोंड ओळख आणि जळवांचा जलवा

सकाळी उडुपी कडे निघालो. हा मार्ग सुरुवातीला चहा , कॉफी चे मळे , त्यातील मासाल्याच्या वेली नी आणि जळवांचा जलवा
होर्नाडूचा निरोप घेऊन आम्ही झुडुपांच्या प्रदेशातून आम्हाला घेऊन गेला. वाटेमध्ये कॉफीची लगडलेली छोटी छोटी फळ पाहण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो, जवळ छान पैकी चहाचा मळा सुद्धा आमच्याकडे टवकारुन पाहत होता. एक निर्झर पायातून वाहत होता. ठिकठिकाणी थांबून छायाचित्र काढण्यामध्ये आम्ही रममान झालो. समोरच्या डोंगरावर सुपारीच्या बागा आणि लांब वर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहण्यात मश्गुल झालो.

आमचा हा गाफील पणा परिसरातील ओलसरपणावर बागडणाऱ्या जळवांनी हेरला. त्यांनी आमच्यासोबत उडूपीला यायचे ठरवून आम्हाला कधी जवळ केलं हे समजलच नाही. परंतु गाडी सुरू व्हायच्या आधी आमच्यातल्या एका पर्यटकांना हे आगंतुक प्रवासी दिसले आणि मग सर्वांचा जो काही तांडव सुरू झाला, तो पाहून आणि ऐकून बिचाऱ्या जळवांना पश्चाताप झाला असावा. या पंचवीस तीस जळवाना गाडीतून बाहेर फेकणे कर्म कठीण काम होतं. एका दोघांना त्यांनी प्रेमाने लोंबकळायला सुरु केले होते. पण यथातथा त्यांच्यापासून सुटकारा मिळाला.

पुढे लगेचच कुदरेमुख अभयारण्याचा प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो . येथून साधारणपणे चाळीस किलोमीटरचा प्रवास या राखीव अरण्यामधून करताना कुदरेमुख अभयारण्य काय नायाब चीज आहे हे लक्षात आले. त्यातील वनविविधता , उंच डोंगरराजी , त्यातून वाहणाऱ्या नद्या , ओढे पहात पहात आम्ही माले नावाच्या दुसऱ्या द्वारापाशी कधी येऊन पोहोचलो समजलेच नाही. गाडीतील या प्रवासात वन्य प्राणी, पक्षी काही नजरेस पडले नाहीत .

भविष्यात कुद्रेमुख ची सहल आयोजित करणेचा बेत नक्की .

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / ९८२२०६३३७० whatsaap

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   २ सी गोडू कॅफे शृंगेरीचा निरोप घेऊन आम्ही होर्नाडूकडे  रवाना झालो.  सर्वदूर चहा...
28/09/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग २

सी गोडू कॅफे

शृंगेरीचा निरोप घेऊन आम्ही होर्नाडूकडे रवाना झालो. सर्वदूर चहाचे आणि कॉफीचे मळे , त्यामध्ये विसावलेल्या मसाल्यांच्या झाडांना, झुडूपांना न्याहाळत , वळणा वळणाच्या डोंगरांमधून जाताना वाटेत बाळेहुन्नूर गावाच्या अलीकडे बगीच्या मध्ये वसलेले एक उपहारगृह आमचे आवडीचे ठिकाण झाले आहे.

रस्त्याच्या कडेला, कॉफीचा मळ्यात असलेले , सर्व सुविधांनी युक्त छानशा व्यवस्था, असे हे “सी गोडू कॅफे “ नावाचे हे उपहारगृह. येथे दक्षिणात्य थाळी, दक्षिणात्य पदार्थ आणि सोबतच उत्तर भारतीय थाळी भोजनासाठी मिळते. पोटोबाचा फोटोबा व्हावा इतके खावून येथील बागेत झोपाळ्यावर झुलायला आणि पारांवरती गप्पा मारत बसायला कितीही वेळ कमीच पडावा असे इथले सहज सुंदर निवांत वातावरण आहे

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१ / 9822063370 whatsaap

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक  :  मलनाड भाग   १  सहस्त्रलिंग दर्शन सुपारीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकमधील उत्तर ...
26/09/2024

निसर्गरम्य उत्तर कर्नाटक : मलनाड भाग १

सहस्त्रलिंग दर्शन

सुपारीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील , शिरसी हे गाव अतिशय साफसुतरे आणि शिस्तबद्ध दिसले. गजबजलेली बाजारपेठ , भाजी बाजार पाहताना येथील लोकांच्या आवडी निवडी लक्षात येतात. या गावापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर शाल्मला नदीचे पात्र एक वेगळेपण घेऊन शतकानु शतक वाहत आहे. घनदाट अरण्यात , नदीच्या पात्रामध्ये जे खडक विसावलेले आहेत त्यावर अतिशय देखणी शिवलिंग कोरलेली पाहायला मिळतात. त्याचसोबत दगडात कोरकेले एक दोन नंदी आपल्याकडे पाहताना आढळतात. नदीचा नितळ प्रवाह या शिवलिंगांना सदोदितपणे अभिषेक करत असतो. या ठिकाणाला सहस्त्रलिंग म्हणून संबोधले जाते.

जवळच नदीचे पात्र ओलांडून जायला येथे एक लांबच्या लांब झुलता पूल आपली वाट पाहत असतो. साधारण १५० मीटर लांबीचा हा पूल पलीकडच्या बाजूला अरण्यात वसलेल्या गावांना पायी अथवा दुचाकीवरून मुख्य भागाशी जोडतो.

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत
भ्रमण : ७९७२०५०७५१

मलनाड , अर्थात निसर्गरम्य कर्नाटकचा सह्याद्री व्याप्त प्रदेश . यातील रम्य सहल , ज्यामध्ये   शूर वीरांच्या  गाथा,  उत्तम ...
25/09/2024

मलनाड , अर्थात निसर्गरम्य कर्नाटकचा सह्याद्री व्याप्त प्रदेश .

यातील रम्य सहल , ज्यामध्ये शूर वीरांच्या गाथा, उत्तम स्थापत्याची शिल्पे आणि मंदिरे, नारळी, पोफळी, चहा ,कॉफी , मिरी , वेलदोडा , दालचिनी , जायफळ यांच्या डोंगर उतारा वरती केलेल्या लागवडी पहात पहात सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा न्याहाळत, कधी घनदाट तर कधी विरळ अरण्याच्या छायेतून , समुद्र किनारे , खाड्या , त्यात डोलणाऱ्या होड्या, या सर्वांच्या अवतीभोवती गुंफलेले जन जीवन नजरेने टिपत प्रवास करताना भारत नावाच्या या नायाब ठेव्याचा प्रवास कधी संपूच नये असे मनोमन वाटते.

मलनाडच्या नुकत्याच केलेल्या सहलीतील काही निरीक्षणे आणि अनुभव क्रमशः सादर करत आहे .

ट्रॅव्हेला ट्रॅव्हल कॉन्सेप्टस् ....................पर्यटनातून जोडो भारत

भ्रमण : ७९७२०५०७५१

तीर्थाटण, एक सुंदर अनुभूती!!!"श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी पिठापूरम तीर्थयात्रा: आस्थेची अनुभूती घ्या! आजच सहल बुक करा!"
08/09/2024

तीर्थाटण, एक सुंदर अनुभूती!!!

"श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी पिठापूरम तीर्थयात्रा: आस्थेची अनुभूती घ्या! आजच सहल बुक करा!"

Address

Travela Travel Concepts, F1, Tara Terraces, Near Ram Mangal Karayalay, Ingle Nagar
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912312522404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travela Travel Concepts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Travela Travel Concepts:

Share

Category