Yogesh Travels

Yogesh Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Travels, Travel Agency, Kolhapur.

कोल्हापूर ➡️ राधानगरी➡️ मालवण➡️ तारकर्ली ➡️देवबाग ➡️कणकवली ➡️तळेरे ➡️गगनबावडा ➡️कोल्हापूर
20/11/2020

कोल्हापूर ➡️ राधानगरी➡️ मालवण➡️ तारकर्ली ➡️देवबाग
➡️कणकवली ➡️तळेरे ➡️गगनबावडा ➡️कोल्हापूर

 #हरिश्चंद्रगडमहाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दि...
21/05/2020

#हरिश्चंद्रगड
महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

 #समरभूमी उंबरखिंड🚩खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ...
01/02/2020

#समरभूमी उंबरखिंड🚩

खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला होता. पिरडा जिंकल्यावर शाहिस्तेखानाने कारतलब खानाला कोकणवर स्वारी करायला पाठवले. खान कोकण काबीज करण्यासाठी आंबेनाळ उंबरखिंड मार्गे उतरणार, हे महाराजांना समजताच त्यांनी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकरांना पुढे जाऊन छावणी टाकण्यास सांगितले. स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडीच्या मार्गात दबा धरून बसले होते. खानाने कुरवंडा घाटातून उतरून राजांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना ठरली. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलांवर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. म्हणजे एका वेळी एकच माणूस जाईल असा मार्ग. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धा-पाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.
खानाचे सैन्य उंबरखिंडीत उतरले ना उतरले तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला. एका बाजूने नेताजी पालकर, दुसऱ्या बाजूने स्वतः शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. खानास माघार घ्यावी लागली. त्यानंतर खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू, दागिने, घोडे, बैल महाराज्यांच्या सैन्याने मिळविले. या लढाईची वैशिष्ट्ये अशी की, कमी सैन्याने मोठ्या शत्रूचा गनिमी काव्याने पराभव केला. शिवाजी महाराजांनी स्वतः एकूण 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई आहे. दरवर्षी 2 फेब्रुवारीला येथे विजयदिन साजरा केला जातो.

सुधागड हा रायगड जिल्ह्य़ातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असंही म्हणत. दुर्गप्रेमींचा कायमच राबता असतो....
30/01/2020

सुधागड हा रायगड जिल्ह्य़ातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असंही म्हणत. दुर्गप्रेमींचा कायमच राबता असतो. अष्टविनायकातील पालीजवळून एकदा का सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांकडे जाऊ लागलो की, डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी हिरवाई पटकन जाणवू लागते. डोंगरउतारावरील आणि परिसरातील ही सारी वनराई म्हणूनच संरक्षित करण्यात आली आहे. सुधागड आणि सभोवतालचे ७६.८८ चौ. किलोमीटरचे क्षेत्र २७ ऑगस्ट २०१४ रोजी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे. सुधागड परिसरात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील ठाणाळे लेणी आहेत. गडावर अनेक तलाव आहेत. पंत सचिवांचा वाडा, भोराई देवी तसेच भोरेश्वराचे मंदिर आहे. पाच्छापूर दरवाजा, िदडी दरवाजा, धान्य कोठारे, भांडय़ाचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडावर टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगड, कोरीगड तेलबला दिसतो.

गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. सुधागड हा किल्ला हे भोर संस्थानचे वैभव. प्रचंड विस्तार असणाऱ्या या किल्ल्याला राजधानीचा किल्ला करायचा विचार शिवाजी महाराजांनी केला असल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. पुराणात भृगू ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात.

सुधागडावर चढून जायचे नसेल तर परिसरात एखाद्या मार्गदर्शकाच्या साहायाने भटकता येऊ शकेल. पावसाळ्यात तर येथील दृश्य केवळ नयनरम्य म्हणावे असे असते.

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्...
28/01/2020

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव बिवालकर यां...
28/01/2020

वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव बिवालकर यांनी हे १७२५ साली मंदिर बांधले (जीर्णोद्धार केला). या मंदिरामध्ये नवग्रह देवतांची, शिवलिंग आणि मूषकाची मूर्ती देखील आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना चार पहारेकरी हत्तीच्या मूर्ती आहेत. भक्त वरदविनायक मंदिर पवित्रस्थानी वर्षभर भेटी देतात. माघ-चतुर्थीसारख्या सणांमध्ये, या मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.

वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावा जवळ, खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे.

@जोतिबा
05/01/2020

@जोतिबा

01/01/2020

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yogesh Travels:

Share

Category