LonavalaGuide.com

LonavalaGuide.com Lets know everything about Lonavala! This site contain all possible information about tourist spots and religious places in Lonavala and around Lonavala.

24/06/2016
वटपौर्णिमा - (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत...
19/06/2016

वटपौर्णिमा - (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची(Banyan Tree) पूजा करतात. हळद-कुंकू हे सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पुजन करतात. ह्या व्रताशी संबंधीत अशा सावित्रींचे स्मरण पूजन करतात. सावित्री हिने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले. ह्या बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी.

सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याची कन्या. आपल्या सत्वगुणी समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा-राणीला मोठा आभिमान होता.

खरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थवान आणि आपले नांव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची.

सत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकित ठाऊक असून ही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला.

सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली. पतीसेवा करू लागली. पतीला त्याच्या कामांत मदत करू लागली.

होता होता एक वर्षाचा काळ होत आला.. आणि तो दिवस उगवला. पहाटे पासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिनं एक वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलांत लाकडं तोडण्यासाठी गेली.

झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती.. आणि एका-एकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली.

तशी सावित्री ही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ! मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो. त्याचा कुणी सोबती नसतो. तू परत जा.. यमराज म्हणाले.

तेव्हा पतीवाचून पत्नीने जगावे का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां? अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले.

तिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले,"सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल काय हवे तुला".

मग सावित्रीने चतुराईन यमाकडे सासऱ्याचं गेलेल राज्य मागितले. यम हो म्हणाले, सासू-सासऱ्यांना दृष्टी मागितली, यमराजाने ती दिली. असं एक-एक मागता-मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्यांप्रमाणे हो म्हणाले आणि..

दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.

ही पौराणिक कथा खरंच श्रवणीय आणि बरंच काही शिकवून जाणारी आहे. त्या कथेच स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस.

Happy Republic Day!!! Be a proud Indian and celebrate the Republic Day!!!
25/01/2015

Happy Republic Day!!! Be a proud Indian and celebrate the Republic Day!!!

पावसाळा म्हणजे रंगांची उधळण.. या उधळणीत फ़ुल कशी मागे राहतील.. अशीच उधळण करणारे एक फुल..
15/07/2014

पावसाळा म्हणजे रंगांची उधळण.. या उधळणीत फ़ुल कशी मागे राहतील.. अशीच उधळण करणारे एक फुल..

पावसाचे मोती की मोत्यांचा पाऊस!!!
07/07/2014

पावसाचे मोती की मोत्यांचा पाऊस!!!

Every new morning brings new opportunities. Get ready to grab them..Good Morning!!!
12/05/2014

Every new morning brings new opportunities. Get ready to grab them..
Good Morning!!!

02/05/2014

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे:
१. या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
२. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
३. ब्राह्मण भोजन घालावे.
४. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
५. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
६. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया:
१. या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
२. या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
३. नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
४. श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
५. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य:
१. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
२. या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
३. शुभ कार्ये या दिवशी होतात.
४. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!दिनविशेष:ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीय...
02/05/2014

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दिनविशेष:
ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.

गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!उद्या गणेश चतुर्दशी,आपल्या लाडक्या गणपतीचा निरोप घेऊन त्याला पुढच्या  वर्षी लव...
17/09/2013

गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!
उद्या गणेश चतुर्दशी,आपल्या लाडक्या गणपतीचा निरोप घेऊन त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती प्रत्येकजण करेल. आणि खरेच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर म्हणजे २९ ऑगस्टला येणार आहेत.

तोपर्यंत, गणपतीबाप्पा मोरया!!!

10/03/2012

check out new look of www.lonavalaguide.com

This is a site dedicated to Lonavala! Our mission is to provide every possible information about Lonavala and its surrounding!

08/08/2011

Information about "Shivdurga mitra Trekking & Adventure club" updated. They rescue people at dams, valley in Lonavala without any Charge!
We Salute them.

Shivdurga Mitra mandal/ Trekking & adventure club is not just a ‘Adventure Club’, they are people truly serving the society. They rescue people from valley, dams, dense forest without any charge. It was shear passion and feeling to help, keeps them going. By 2005 Shivdurga Mitra became a reliable an...

Address

Lonavala

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LonavalaGuide.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LonavalaGuide.com:

Share

Category