17/08/2026
Trekker लोकांना इतर वन्य जीवांप्रमाणेच साप ह्या प्राण्याचे आकर्षण आणि दर्शन मुबलक प्रमाणात होत असते. खरेतर इतर सर्व प्राण्याप्रमाणेच साप ही अभ्यासाचा आणि respect देण्याचा किंवा जिओ और जीने दो चा विषय आहे. पण एक अनामिक भीती किंवा / Thrill seeking प्रवृत्ती बरेचदा सापाच्या आणि तुमच्या जीवावर बेतू शकतात. म्हणून हा छोटासा लेखन प्रपंच. विषय प्रचंड क्लिष्ट आणि technical आहे तरी सुरक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे इथे मांडलेत.
मुळात तुम्ही खरेखरे सर्प अभ्यासक किंवा सर्पमित्र नसाल तर परिस्थितीनुसार सापाला त्याच्या वाटेने जाऊ द्यावे. वाट चुकलेल्या बिचार्या जीवाला हाताळून तुमचे फेसबुक /Insta likes करता अडचणीच्या ठिकाणी फोटो आणि अभ्यासाचा अट्टाहास ठेऊ नये. गृपमध्ये पोर-पोरी बाळा बाळींना impress करण्यासाठी तर मुळीच नाही. अगदीच प्रसंग बाका असेल तर गृपमधील जवाबदार व्यक्तीने गुपचुप योग्य पद्धतीने हाताळून rescue करून गाजावाजा न करता त्वरीत लांब सोडावे. हल्ली गावातली ल