Trekkers

Trekkers Gateway To Adventure.
● Trekking
● Hiking
● Camping
● Nature Explorer

02/12/2018

*ट्रेकिंगचे महत्वाचे फायदे*

*Why Trekking??*

*महिन्यातुन एका गड-*किल्ले-दुर्गावारी करा,*
*रोग आणि आजारांतुन बाहेर पडा*.

*दुर्ग सर करणाऱ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत.*
*आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा.*

*मग तुम्ही स्वतःच या गोष्टीचा प्रचार कराल.*

*● श्वसन* - गडावर खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते,
त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.

● *रक्तप्रवाह* - श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते.
शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात.
महिन्याला दुर्गाची वारी
ब्लड-प्रेशरचा आजार दुर करी..!

● *गुडघे -* पायांवर ताण येतो,
सर्व स्नायु उत्तेजित होतात.

● *छाती -* वर चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात.

● *पोट* - गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,
दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो.
शरीरावरील चरबी कमी होते.

● *मानसिक आजार* - रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.
गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही.
मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते.
⛳⛳⛳🚶🏻‍♂

🇮🇳।। जय हिंद ।। वंदे मातरम।।🇮🇳
15/08/2018

🇮🇳।। जय हिंद ।। वंदे मातरम।।🇮🇳

◆TREKMATES MUMBAI◆Invites you all for a great exprience to trekKALAVANTIN DURG TrekPrabalmachi COST- Rs. 400/-PPDate-19 ...
14/08/2018

◆TREKMATES MUMBAI◆
Invites you all for a great exprience to trek
KALAVANTIN DURG Trek
Prabalmachi

COST- Rs. 400/-PP

Date-19 Aug ,Sunday

Kalavantin Fort built at the peak of a rocky plateau is situated between Matheran and Panvel in Maharashtra, at a height of 2,300 feet in the Western Ghats. The fort top commands an excellent view of the surroundings with Prabal in the front. Kalavantin Fort is an adjoining hill (pinnacle) to prabalgad

Difficulty: Medium|| Endurance: Medium || Type: One day Trek
Height: 2300ft

Major Attractions:
▪Steep mountain with rock-cut steps
▪Thrilling rock patch to reach the peak
▪Mesmerizing landscapes *ITINERARY:* 08:00 AM : We meet at Panvel Railway Station.

08.10 AM : Have some light breakfast to gain some energy for the 2-3 hrs long trek

08.20 AM : We move towards the kalavantin base village by private vehicle

9:30 AM : reach thakurwadi (base village) & Its time to begin the adventurous climb and get your adrenaline rush.

1.00 PM : We reach the Summit, Explore the Mountain and enjoy the rewarding view after an tough climb. Rest to accumulate some energy for descend.

02.00 PM : We start our descend

04.00 PM : Reach the fort base, have some refreshments and move towards Panvel Railway station in a private vehicle.

06:00 PM : We disperse, with a bunch of memories to cherish for life.

INCLUSIONS:
●Travelling Panvel Railway Station- Thakurwadi base village - Panvel Railway Station
●Morning Breakfast + Tea
●Evening Refreshments

EXCLUSIONS:
●Lunch
●Mineral Water
●Any personal expenses
●Any extra activity
Anything other than mentioned above

THINGS TO CARRY:
1.Photocopy of ID proof
2.mineral Water 2-3 liters must
3.Good grip quality trekking shoes Must (Please check soles of your shoes and get them stitched if necessary).
4. Zip Lock Plastics to keep wallet , Cash, Mobile phone etc.
5. Extra pair of Clothes ,Windcheaters,sunglasses , towel, Cap, Camera (Optional) etc.
6. Normal Lunch / Snacks, Plum cakes, Biscuits etc.
7. Personal Medication

Feel free to call/whatsapp us :
Yogesh-9405417648
Shankar-9619407378
Santosh-8087547188

 🤗
11/08/2018

🤗

      height   😘  😍
09/08/2018

height 😘 😍

  trek   aug.   pic of the day  mumbai
09/08/2018

trek aug. pic of the day mumbai

07/07/2018
26/06/2018

प्लास्टिक बंद केल्यामुळे एक फायदा झाला
आमचे गडकोट आता थोडे स्वच्छ राहतील...😊

Forts Maharashtra191 forts on Google map in one click...
02/06/2018

Forts Maharashtra

191 forts on Google map in one click...

Fort Maharashtra

08/04/2018

"गड भेट पूर्वतयारी व पाठीवरती कुठल्या गोष्टी पॅक कराव्यात'

गडभ्रमंती करत असाल त्यासाठी काही टिप्स :-

१) शक्य असल्यास काही दिवस आधी पासून दररोज किमान बॉडी स्ट्रेचिंग आणि पायांचे इतर व्यायाम ३० मिनिटे करा

२) चांगली ग्रीप असलेले ट्रेकिंगचे बूट घालून १० दिवस आधी पासून दररोज किमान १ तास चालण्याचा सराव करा

३) ट्रेकला जाण्याची दिवशी पायाची नखं कापा. कारण नखं आणि बूट घर्षणामुळे बोटे दुखायला लागतात.

४) ट्रेकिंगचे बूट पायाला घट्ट होणार नाही असे घ्या. शक्यतो १ नंबर जास्त. व 2-3 जोड मोजे व बुटाच्या lace चांगल्या प्रतीचे घ्यावेत

५) बूट असले तरी चप्पल / फ़्लोटर पिट्टूमध्ये (छोटी सॅक) घ्यायला विसरू नका. बुटांनी दगा दिला तर ट्रेक चपलेवर करता येईल. मेडिकल गॉज टेप किंवा cello tape बरोबर बाळगा. बुटांचे उघडलेले तोंड टेपने बंद करून वेळ निभावता येते.

६) वाटेत जेवण किंवा विश्रांती वेळी अनवाणी फिरू नका.

७) चढण चढताना एकमेकांशी बोलू नये त्याने धाप लागते. जास्त धाप लागल्यास काही सेकंद थांबून खोलवर श्वास घ्या.

८) ट्रेक करताना एकाच वेळेला घटा घट पाणी पिणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने घसा ओला होईल इतपतच पाणी प्या. याने पोटात दुखत नाही आणि चालण्याचा वेग उत्तम राहतो.

९) चॉकलेट पेक्षा गोळ्या चघळल्यास चांगले. घसा कोरडा पडत नाही.

१०) प्रत्येकाची स्वतःची एक विशिष्ट गती असते ती कायम ठेवा. मित्र मैत्रीण पुढे गेलेत म्हणून पुढे धावत जाऊ नका तसेच मित्र मैत्रीण पाठी राहिलेत म्हणून पाठीमागे रेंगाळू नका. त्याने तुमची चालण्याची लय जाईल आणि चालणे त्रास दायक वाटत राहील.

११) आधी पासूनच असलेल्या मित्र मैत्रिणी बरोबर राहण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्यांशी मैत्री करा. महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीची ओळख करून घेण्याचा आनंद वेगळाच असेल.

१२) उतारावर पाऊले तिरपी टाका त्याने घुडघ्यांवर जोर येणार नाही. तसेच चढावावर दोन पाऊलातील अंतर कमी असावे. चढण उतरण करताना काठीचा आधार कधीही उत्तम

१३) आयोजकांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा.

१४) जसे बाहेर फिरायला जाताना आपण mobile चार्जिंग, बॅलन्स, powerbank बरोबर घेतो तसेच आपल्या सॅक मध्ये मध्यम आकाराच्या प्लास्टिक पीशव्या पण घ्याव्यात. त्याचा उपयोग गड भ्रमंती करतांना, आपण खाल्लेले बिस्कीट, चॉकलेट, फळांची आवरणे, त्यात ठेवता येतील त्याचबरोबर जाण्या येण्याच्या वाटेवर पडलेला प्लास्टिक चा कचरा उचलून भरता येईल.

१५) गडाच्या वाटेवर असणाऱ्या ताक, वडापाव, लिंबू सरबत इत्यादी विकणाऱ्या लोकांशी पैश्यांवरून हुज्जत घालू नये. थोडे पैसे जास्त दिले तरी आपलं काही नुकसान होत नाही पण त्यांचे 2 वेळचे अन्न मिळते आणि दुसरा स्वार्थी विचार केला तर काही अडचण निर्माण झाल्यास म्हणजे अपघात, आजार, पाऊस इ तर हेच लोक उपयोगी येतात.

१६) स्वतःच्या तब्येतेची स्वतः ला चांगली माहिती असते, allergy व इतर आजार इ, त्या प्रमाणे औषधें घेणे, तसेच ग्रुप leader व मित्राला त्या बाबत सांगणे, बॅग मध्ये उलटी, ताप, सर्दी, electrol, ors, bandaid, zole-f मलम ( पावसाळ्यात जांग व पायाची बोटे यांची त्वचा ओली होऊन जो त्रास होतो त्या साठी), iodex, कापूस, bandage, या प्रकारची first aid ठेवावी.

१७) जर कोणाला vertigo, height fobia, hydro fobia, इन्सुलिन dependent diabetic, high/low bp, एखादे operation झाले असल्यास, लीडर व बरोबर च्या मित्रांना सांगावे.

१८) ठरलेल्या ठिकाणी जातांना त्या भागाची शक्य तेवडी माहिती, नकाशे , पुस्तक, इंटरनेट ह्या मधून मिळवावी,

१९) शक्यतो natural कलर चे व वजनाला हलके कपडे 2-3 जोड घ्यावेत. पावसाळ्यात सर्व सामान प्लास्टिक च्या पिशवीत भरून , मुख्य बॅग पण मोठ्या प्लास्टिक पिशवीत ठेवावे.

२०) खाण्यासाठी घरगुती पदार्थ घ्यावेत बरोबर सुका मेवा व फळे घ्यावीत व 2-3 ltr पाणी घ्यावे.

२१) बरोबर खिशात पुरेसे पैसे, ओळख पत्र, महत्वाचे फोन क्र, mobile बॅलन्स ( पैसे व मेमरी), वही, पेन, टॉर्च, सेल घ्यावे.

२२) अनुकूल परिस्थिती होते ती सहल आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात.

*असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं तरच ट्रेक एंजॉय कराल.* अन्यथा निराशा पदरी पडेल आणि महत्वाचे, आपल्या कडे असलेल्या वस्तू वा जिन्नस, औषधें मिळून मिसळून वापरावे, ना जाणो आपल्या पेक्षा दुसऱ्याला त्याचा उपयोग किंवा गरज जास्त पडेल.

हिंदू नव वर्षाच्या आणिगुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!  🙏
18/03/2018

हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

21/07/2017

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trekkers:

Share

Category