पर्यटन

पर्यटन पर्यटन

जीवनात काही काळ बदल म्हणून पर्यटन करणे आवश्यक आहे.
कुठे जाल ,कसे जाल .तेथील स्थळांची माहिती देण्याच्या उद्देशाने हे पेज केले आहे
पेज ला नक्की व्हिजीट करा .आणि पर्यटनाला जायची पण तयारी करा .

ll चिन्मय गणाधीश llटोप- संभापूर , कोल्हापूर ..जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी हि मूर्ती ध्याननिलयम सह ८५ फुट उं...
23/08/2013

ll चिन्मय गणाधीश ll
टोप- संभापूर , कोल्हापूर ..

जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी हि मूर्ती ध्याननिलयम सह ८५ फुट उंच आहे.मूर्ती सिमेंट कॉक्रीट ची असून अंदाजे वजन ८०० टन आहे.चिन्मय मिशनशी संबंधीत असलेल्या कर्नाटकातील मूर्तीकारांनी पन्नास कामगारांच्या मदतीने अठरा महिन्यात हि मूर्ती तयार केली.कोणत्याही कंपनीच्या स्पोन्सरशीप शिवाय हि मूर्ती आम जनतेच्या उदार देण्यातून चिन्मय सेवा ट्रस्ट महाराष्ट्र द्वारा हे भव्य दिव्य कार्य संपन्न होऊन १८ नोव्हेंबर २००१ रोजी मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.
चिन्मय गणेशाची हि मूर्ती डाव्या सोंडेची आहे.पुढचा हात ‘वरदहस्त’ आहे मागील उजव्या हातात अंकुश ,डाव्या हातात पाश आहे.आणि पुढील उजव्या हातात मोदक आहे.
ही मूर्ती एकदा तरी जाउन पहावी अशी सुरेख मूर्ती आहे …. नक्की प्रयत्न करा …

ll ॐ चिन्मय गणाधीशाय नम: ll
ll ॐ गं गणपतये नम: ll

आज श्रावण सोमवारचे रामलिंग चे दर्शन घेऊ.परवाच १६ तारखेला ईश्वर कृपेने तेथे जाण्याचा योग आला आणि तेथील पुजाऱ्यांनी फोटो क...
19/08/2013

आज श्रावण सोमवारचे रामलिंग चे दर्शन घेऊ.
परवाच १६ तारखेला ईश्वर कृपेने तेथे जाण्याचा योग आला आणि तेथील पुजाऱ्यांनी फोटो काढण्याची परवानगी दिली तो फोटो तुमच्यासाठी पोस्ट करीत आहे.
सांगली कोल्हापूर मार्गावर ५ कि.मी आतील बाजूस हे निसर्गरम्य ठिकाण आहे.आतमध्ये गुहेत रामलिंग आहे. प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवासात असताना जो काही काळ दंडकारण्यात घालवला त्यावेळेला प्रभु रामचंद्रांनी १०८ शिवलिंगांची स्थापना केली त्यापैकी दोन शिवलिंग कोल्हापूरजवळ रामलिंग या नावाने प्रचलित आहेत. हे रामलिंग गुहेत असल्याकारणाने सभोवार निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते.
रामाने स्थापन केलेल्या दोन लिंगापैकी एक लिंग आत मध्ये गुप्त आहे. त्याचे दर्शन फक्त कलियुगात १९०५ साली सुरजन महाराज यांनी घेतले आणि तेव्हापासून त्या लिंगाचे दर्शन कोणाला झाले नाही असे सांगितले जाते. दुसरे लिंग बाहेरील बाजूस आहे. त्या लिंगाच्या बरोबर वरच्या बाजूस रामाने बाण मारून अभिषेकासाठी पाण्याच्या धारा सतत लिंगावर पडतील अशी व्यवस्था केली अशी कहाणी तेथील गुरव सांगतात.
मध्यंतरी दुष्काळ पडला होता, आजुबाजूच्या गावांना पाण्यासाठी वणवण भटकायला लागत होते तेव्हासुद्धा याठिकाणी मात्र सतत पाण्याच्या धारा वाहतच होत्या असे गुरव सांगतात. या गुहेत श्रीगणेश, माता पार्वती स्वयंभू आहेत असे मानले जाते. त्याचबरोबर त्याठिकाणी विठ्ठल-रखुमाई,वीरभद्र, काळभैरव, मारुती, सप्तऋषी यांच्या मूर्ती पण पाहावयास मिळतात.
श्रावणातील सोमवारी, कार्तिक पौर्णिमा, रामनवमी, सोनार यात्रा या दिवशी येथे उत्सव साजरे केले जातात. येथे १९०५ साली सुरजन महाराजांनी अखंड धुनी स्थापन केली आहे. सुरजन महाराजांनंतर येथे गोविंद महाराज होऊन गेले, सध्या येथे कल्याण महाराज आहेत, ते अखंड धुनीची व्यवस्था बघतात.
रामलिंगाच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे, जाताना वाटेत मोर पण पहावयास मिळतात. हे पर्यटन स्थळ नक्कीच मनाला भावेल असं आहे.

THANKSSSSSSSSSS DEAR ALLLLLLL JUST REACH TO 1000 LIKES So much Thankful to Each and Every Person Who Likes, Share and Su...
18/07/2013

THANKSSSSSSSSSS DEAR ALLLLLLL
JUST REACH TO 1000 LIKES

So much Thankful to Each and Every Person Who Likes, Share and Support For this Page…

THANK YOU VERY MUCH DEAR FRIENDS ……

नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे श्री क्षेत्र आदासा. पुराणात उल्लेख असलेल्या या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ‘अदोष क...
26/06/2013

नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे श्री क्षेत्र आदासा. पुराणात उल्लेख असलेल्या या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ‘अदोष क्षेत्र’. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आदासा गावाजवळ उंच पर्वतावर विघ्नहर्त्याचे प्राचीन मंदिर आहे. आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन काळातील आहे. या क्षेत्राचा महिमा वामन पुराणात आढळतो. येथील गणपतीची मूर्तीसुद्धा प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापन केल्याचा उल्लेख वामन पुराणात आहे. हा गणपती ‘शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे.
प्राचीन आख्यायिकेनुसार राजा बळीने इंद्रपद प्राप्त करण्यासाठी १०० यज्ञाचा संकल्प केला. या यज्ञासाठी बळी राजाने दानधर्म आणि अपार भक्ती केली. बळी राजाच्या इंद्रपद प्राप्त करण्यासाठी सुरु असलेल्या यज्ञाची माहिती जेव्हा देवलोकात पसरली तेव्हा सगळे देव चिंतीत झाले. राजा बळीच्या हा यज्ञ थांबवण्याकरिता भगवान विष्णूने वामन अवतार घेतला. वर प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतारात अदोष क्षेत्रात भगवान गणेशाची आराधना केली. याच भगवान गणेशाच्या कृपेने वामनाने राजा बळीचा विध्वंस केला.
भगवान गणेशाने दिलेल्या वरदानामुळे वामनाने राजा बळीचा संहार केला. तसेच नंतर या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापन केली. आज जी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते ती हीच मूर्ती. १२ फूट उंच आणि ७ फूट रुंद या मूर्तीचा आकार असून हे ठिकाण जागृत मानले जाते. शिवाय विदर्भाच्या अष्टविनायकामध्येसुद्धा हे पवित्र ठिकाण गणले जाते. गणपती चतुर्थीच्या दिवशी येथे भक्तांची गर्दी असते. कारण हा गणपती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो अशी धारणा आहे.

चला तर मग आपण सुद्धा या गणपतीचे दर्शन घेऊया …

|| ॐ गं गणपतये नम: ||

23/05/2013

Dear ALL
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography
LIKE > Smita's Photography

23/05/2013

संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी
चांद राती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होई बावरी

मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरुप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धूंद परिमळे, फुलत प्रीतीची फुले
प्रणयगीत हे असे, कानी ऐकू येतसे, गीती शब्द ना जरी

सांजरंगी रंगूनी, नकळताच दंगूनी, हृदयतार छेडूनी
युगुल गीत गाऊनी, एकरुप होऊनी, देऊ प्रीत दाऊनी
प्रणयचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे, कुंचला नसे जरी

छायाचित्र -
Smita's Photography Click at GOREGAON Mumbai
गीतकार : गंगाधर महांबरे
गायक : लता मंगेशकर - अरुण दाते
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

23/05/2013

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

नवे पंख पसरा, उंच उंच लहरा
भिरभिरणारे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रीतीने

नव्या संगीतातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरूप व्हावे संगसाथीने

गीत- जगदीश खेबूडकर
संगीत- जितेंद्र कुलकर्णी
स्वर- सोनू निगम
चित्रपट- नवरा माझा नवसाचा

छायाचित्र -- Smita's Photography@माथेरान

30/04/2013

मित्रांनो फोटोग्राफी चे एक नवीन पेज तयार केलेले आहे. बघा नक्कीच तुम्हाला आवडेल. या पेजला पण भरभरून प्रतिसाद द्या ....


https://www.facebook.com/SmitasPhotography?ref=ts&fref=ts

Welcome to Smita’s Photography.We are not professional photographers but trying to capture good quality photographs day by day.and We hope you would like our photography and Creation.
@[551114381576305:0]

महिषासुरमर्दिनी सप्तशृंगीदेवी महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोम...
16/10/2012

महिषासुरमर्दिनी सप्तशृंगीदेवी

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी

ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.

त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.

देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.

येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.

शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.

मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते.

चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.

गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.

गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.

मूर्ती:बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वा...
10/01/2012

मूर्ती:
बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.

तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.

इतिहास:
मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानन्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर ( तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतकऋयास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.


ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिराचा काळ किमान २००० वर्षे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथिल पहिली वेदी बांधली. तमिळ संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळा व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरु होती. प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानम विश्वस्त पाहतात.

तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात

ऊत्सव:
ब्राह्मोत्सवम हा येथिल मुख्य उत्सव आहे.

15/12/2011

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल....

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...


जय महाराष्ट्र
ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!

प्रत्येकाने share कराव अशी आमची इच्छा आहे...
जरूर share करा
जय शिवाजी
by kiran

रामटेकरामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी ...
14/11/2011

रामटेक

रामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी किंवा शेंदराचा डोंगर व तपोगिरी किंवा तपस्या करण्याचा डोंगर नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे.

शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिक रीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.

आख्यायिका
आख्यायिकेप्रमाणे हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जपजाप्य केले . वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शम्बुकाने केलेल्या गैर वापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शम्बुकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शम्बुकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर शूद्राची आठवण म्हणून बांधण्यात आले व त्याची पूजा रामाबरोबरीने होते.


देऊळवाडा
नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य वराह दरवाजा संबोधला जातो. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.


आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत द्रुग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यामुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.

मध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे.


यात्रा व जत्रा
रामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. पिवळा पीतांबर रामाच्या देवळावर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.

एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तूकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.

Address

Mumbai/20
Mumbai
400020

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पर्यटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category