Trek Erants

Trek Erants Trek Erants is professional trekking and hikking group in Mumbai. We offer trekking, waterfall Rappelling and camping events near Mumbai, Pune, Nashik

Trek Erants organize different trekking events on forts in Maharashtra. We try to explore our history and glory of Maratha Empire. Forts visit or trekking is good option for out door and weekend. There are many spots near Mumbai,

JAWHAR TOUR..2020*(Historical & Nature Wonders)**Date : Saturday 28th, Nov. Night to Sunday 29th Nov. Evening, 2020.** #...
17/11/2020

JAWHAR TOUR..2020
*(Historical & Nature Wonders)*

*Date : Saturday 28th, Nov. Night to Sunday 29th Nov. Evening, 2020.*

* # Overview :
About the small information of Tour Places :

*01) Hanuman Point* : This temple is known as Katya Maruti mandir due surrounded dark forest of cactus.. The temple is surrounded by valleys on three sides.. The valley is nearly 500 feet deep..

*02) Jai Vilas Palace* : This neoclassical style palace was built by Raja Yashwant Rao Mukane.. The place is built in the Syenite stone,a master piece of architecture with blend of Western and Indian styles of architecture..

*03) Dabhosa Waterfall : This is one of the highest waterfalls situated near Mumbai.. This waterfalls is located over the Lendi River and cascades down from a height of 300 feet..

*04) Shirpacha Maal : Chhtrapati Shivaji Maharaj visited this place on his way to Surat.

*05) Sunset Point : The shape of the valley around the Sunset point is like Bow, therefore earlier it was known as Dhanukamal.. During sunset, one can see the mountain of Mahalaxmi near Dahanu, which is nearly 60 km from Jawhar..

*_ # Strictly follow the Guidelines with respect to Covid Pandemic as mentioned below :_*
below age 12 and senior citizens above age 60 are not allowed to participate in this event..
carry sanitizer..
member of the group (participants/leaders/ clients & staff) wears a protective mask while on interaction with each other.. Do carry few unused, disposable masks..
is strongly recommended to wear caps, full sleeves shirts, and full trousers and shoes for adventure activities.. It reduces exposure to your body parts..
should be ascertained from the participants that they are not residing/have not traveled in a containment zone and have not come in contact with any person who was tested positive in the last 14 days..
whether any participant has any symptoms of Influenza-like illness (ILI) like fever, dry cough, weakness, severe body ache, etc. at the time of the beginning of the activity. If it is so then he/she should be asked not to participate actively and be evacuated on medical grounds and should be asked to report to the local health authorities with his own expenses..
touching external surfaces and touching your face when outdoors..
the location of your adventure activity is too crowded then be prepared to leave or wait for the crowd to disperse/for your turn..

*Tour Cost - Rs.1450/- Only..*
(TourCost includes : by well sanitized private Non AC Bus..(To & From Andheri)
- Breakfast, Lunch.. (v/nv)
tickets as applicable..
- Guidance,Expertise and Basic first aid..

Any interested & Any information for related Tour plz call below number..

Thank you..
Swapnil Raoshinde.
9004202262.
Tour Leader..

* # Booking note :
Confirm your seat..
step : SMS, call or whatsapp msg your name & locality for leader Nos..
step : advance payment till tour 08 Days ago 700rs. Only..
your seat..🤟🏼

* # Schedule :
will leave from Andheri east (Siddhi Vinayak Temple) on Saturday, 28th Nov. 2020 by 12am in the morning.
(sunrise) Point Visit..
Vilas Palace..
at 8.30 enroute..
Dabhosa waterfall..
at 01 pm..
to Shirpacha Maal..
Sunset point enroute..
will return to Mumbai by 07pm. (depends on traffic)..

* # Things to Carry :
All items below are compulsory unless explicitly mentioned as optional..
with good grip..
, Extra Pair of clothes...
ready to eat and light food..
one Original Photo ID proof..
@2 Liter Water..
to pack your stuffs..
Medicines.. (Optional)

* # Important Notes :
Leaders reserves the right to change the format of the event.
not carry valuable, unnecessary things for tour..
not go to any risky place, you should follow rules set by organizers..
will not be responsible for any loss during tour..

Respect Nature, History, Local Culture And Enjoy the tour..

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा, २०२०..विवेक सुर्वे,डोंबिवली.शिर्षक:आणि मी राजा झालो....शिर्षक वाचुन तुम्ही म्हणाल ख...
22/06/2020

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा, २०२०..

विवेक सुर्वे,
डोंबिवली.

शिर्षक:आणि मी राजा झालो....

शिर्षक वाचुन तुम्ही म्हणाल खरंच राजा झाला की काय? तर तसे काही झाले नाही ...मग नक्की झाले तरी काय? तीच कथा इथे सांगायची आहे.... पण गमतीने का म्हणो माझे मित्र मला या घटनेनंतर राजा म्हणू लागले.... आणि त्याला कारणीभूत झाले ते माझे ट्रेक बद्दलचे प्रेम ..

त्या घटनेआधी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो... मी २०११ पासून माझ्या एका मित्राच्या गृपसोबत लहान मोठे ट्रेक करू लागलो त्यापूर्वी २५ वर्षे मी माझे घर आणि गाव याव्यतिरिक्त कुठे फिरलो नव्हतो. आम्ही २०११ पासून नियमित ट्रेक, पिकनिक आणि लाँग टूर करू लागलो. २०१६ मध्ये ए एम के देखील करण्याचा योग आला. तो अनुभव ही छान होता. मात्र त्या ३ दिवसाच्या सर्वांगीण ट्रेक नंतर इतर ट्रेक इतके इंटरेस्टिंग राहिले नाहीत. प्रत्येक ट्रेकला आम्ही ए एम के सोबत तुलना करता नेहमी ए एम के वरचढ ठरायचा. अशातच आमच्यापैकी कोणीतरी सांगितले जर अजून काही चॅलेंज घ्यायचे तर हरिश्चंद्र गड करा.. पण तो एका दिवसात शक्य नाही. मग काय एकच ध्यास होता .. हरिश्चंद्र गड करायचा आणि तोही नळीच्या वाटेने...
ट्रेकर लोकांना माहीत असेलच हरिश्चंद्र गड चढन्यासाठी असलेली नळीची वाट किती आवाहन देणारी आहे
तर आम्ही जायचे तर ठरवले होते पण दिवस ठरला २८ जानेवारी २०१७. शनिवार होता आणि आम्ही वर राहायचे ठरवले होते. टेंट आणि इतर सर्व गोष्टींची पूर्वतयारी केली आणि वाट बघत होतो की केव्हा २८ जानेवारी येते. पण २६ जानेवारीला जे घडले त्यामुळे २८ ला ट्रेक जाता येईल का याची शाश्वती राहिली नाही. मी २६ जानेवारीला डोंबिवली वरून दिव्याला माझ्या मावशीकडे स्कूटर वरून गेलो होतो. येताना एक धान्याची पिशवी घेऊन येत होतो पण पुढील रिक्षाचा अंदाज न आल्याने आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बाजूच्या झाडीत घुसलो . पायाला जखम झाली तीही गुढग्यावर.. पँट जागेवरच फाटली मी स्वताला सावरून तसाच घरी आलो नि जखम लपवली . आणि जास्त लागले नाही असे बोलून अंगावर जखम काढली . कारण स्पष्ट होते की जर घरी कळले असते तर ट्रेक जाणे कॅन्सल झाले असते. दुसरा दिवस लपून हळद लावून काढला आणि तिसऱ्या दिवशी अगदी सकाळीच आम्ही खाजगी वाहने घेऊन निघालो.
आमच्या गाड्या सकाळी ६ वाजता बेस विलेज वल्हीवरे ला पोहचल्या. तिथून नाश्ता करून ६.३० ला आम्ही ट्रेक सुरु केला. सकाळ असल्याने उत्साह होता . नळीच्या वाटेने आम्ही दोन कठीण पॅच पार करून ६ तासात सपाटीवर पोहचलो.हा प्रवास अर्थात सोपा नव्हता . कारण माझा पाय खूप दुखत होता पण कोणाला सांगायचे नव्हते. पण जसे तंबू बांधलेल्या ठिकाणी पोहाचलो तसे वेदना असह्य झाल्या आणि सगळ्यांनी मला सुनावले. नंतर मी रात्र होईपर्यंत तंबुतच होतो. बाकी सर्व त्या वेळात शिव मंदिर बघून आले जे खूप पाहण्यालायक आहे.

बाजूला जवळपास ५०-६० तंबू होते. रात्री जेवून शेकोटी करून गप्पा मारत सगळे झोपलो. मस्त थंडीत छान डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी अर्धवट जाग आली तर आमची मंडळी कुठेतरी जात असल्याची चाहूल लागली म्हणून मीही लंगड्या पायाने बाहेर आलो. पाय काल पेक्षा ठीक आहे असा विचार करून पहाटेच्या अंधारात माझ्या ग्रुप मागे चालू लागलो. बाजूच्या झाडीत लांबवर काहीजण प्रात विधी आटपत होते. मी मात्र माझ्या लांब गेलेल्या मित्रां मागून हळूहळू जात होतो. ते जवळपास ६.४० ला वर पोहचले आणि मी कसेबसे ७ ला काही मिनिटे असताना पोहचलो. मला जाणवले की मी तारामती पॉइंट ला पोहचलो आहे आणि काही वेळात सूर्योदय अनुभवता येणार होता . खुपजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि तो क्षण आला.. सर्व आसमंत हळूहळू उजळला . तो क्षण लिखाणातून ही कधीच व्यक्त होणार नाही इतका गोंडस होता. मी माझ्या निर्णयावर खुश होतो. वेदनेचा लवलेश नव्हता आणि इतके सारे झाल्यावर माझी नजर उजेडतील चेहऱ्यावर पडू लागली.. एकहिजन ओळखीचा नव्हता. मी क्षणभर चरकलो. मी काही वेळ थांबून पुन्हा आलेल्या वाटेने परतू लागलो तेव्हा मला स्वतः वर अभिमान वाटू लागला कारण ज्या वाटेने मी अंधारातून गेलो होतो ती कठीण होती आणि तरीही लंगडत मी पार केली होती.परतताना मात्र मला भीती वाटत होती. तो भीतीदायक एक पॅच उतरलो नि निःश्वास सोडला. जेव्हा तंबुजवळ पोहचलो तेव्हा कळले की सकाळी सगळे प्रात विधीला गेले होते आणि ते परत आल्यावर मी कुठे दिसेनासा झालो म्हणून मला शोधत होते.
जेव्हा मी त्यांना माझी हकीकत सांगितली तेव्हा सगळ्यांनी मला नमस्कार केला आणि म्हणाले.. शेवटी फक्त राजा हरिश्चंद्रच राणी तारामती ला भेटून आले... आणि नंतर जो हास्यकल्लोळ झाला की विचारू नका..

येताना पुन्हा आम्हाला ७ तास लागले कारण पुन्हा आम्ही नळीच्या वाटेने उतरलो . खूप थकलो आम्ही सगळे. असे कधीच थकलो नव्हतो पण सगळे खुश होते कारण त्यांना चिडवायला एक किस्सा मिळाला होता पण मला मात्र खरंच विलोभनीय तारामती दर्शन , कोकणकडा दर्शन आणि वेगळाच आनंद मात्र मिळाला...

असा मी राजा झालो..

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा..२०२०.मनिषा नार्वेकर.विरार (पूर्व).८६०५४४५१६१         रत्नागिरी : अनपेक्षित प्रवास  ...
16/06/2020

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा..२०२०.

मनिषा नार्वेकर.
विरार (पूर्व).
८६०५४४५१६१

रत्नागिरी : अनपेक्षित प्रवास

सहलीला जाताना तिथे फिरताना आणि प्रवासात काही चांगले वा वाईट अनुभव आपल्याला येत असतात. अशाच एका अनपेक्षित प्रवासाचा अनुभव सर्वांसमोर मांडावा असे मला वाटते.
२०११ सालची गोष्ट. मी त्या वेळेस 'स्पेक्टरा मोटर्स' ह्या कंपनीत कामाला होते. तिथले काही सहकारी खूपच जवळचे मित्र झाले होते. एक दिवस काम कमी असल्याने असेच गप्पा मारता-मारता कुठेतरी फिरायला जायचं असा बेत आखला.कुठे जायचं असा विचार करताना रत्नागिरी इथे जायचं निश्चित करण्यात आले.माझा जन्म तसा विरार चा पण माझे मूळ गाव रत्नागिरी.मूळ गाव असल्याने बरेचदा फिरणे झाले होते पण मित्रांसोबत जाण्याचा आनंद वेगळाच म्हणून मी ही लगेच होकार दिला.आणि सर्वजण कुटुंबाच्या चांगले परिचयाचे असल्याने घरून ही काही विरोध झाला नाही.
१५ जानेवारी २०११ ही जायची तारीख निश्चित झाली.आम्ही सर्व एकत्र कामाला असल्याने शनिवारी रात्री जाऊन सोमवारी सकाळी परत मुंबई ला यायचं असा बेत आखला.सहलीचा दिवस येऊन ठेपला आम्ही सर्व १५ जानेवारीच्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाहेरचं जेवून दादर टिटी सर्कल ला लक्झरी पकडायला गेलो.नॉन सिझन असल्याने आम्ही जायचे-यायचे तिकीट आरक्षित केले नव्हते.जाताना मस्त खिडकी पकडून मी बसले.मी,रोहन,संजय,अजय, संतोष सर्व ऑफिस मधले आणि संतोष ची बायको सोनाली असे आम्ही सर्व होतो.रात्रीच्या अंधारात मुंबई मागे पडत होती. मजा मस्ती करत आणि थोडीशी पेंग घेत पहाटे बस रत्नागिरी जवळ आली ती बस पुढे जाणार असल्याने आम्ही रत्नागिरीतील हातखंब्याला उतरलो व तिथून एसटी पकडून साधारण सकाळी ७ वाजता रत्नागिरी शहरात आलो.माझे गाव तसे रत्नागिरीहून सहा-सात किलोमीटर वर आहे पण एका दिवसात फिरून परत निघायचे असल्याने आम्ही बाहेरच लॉंज वर उतरलो.लॉंज चे नाव आता आठवत नाही पण रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल च्या बरोबर मागच्या बाजूला हा लॉंज आहे.उत्तम राहायची सोय आणि स्वच्छ जागा आहे ही.तिथे बॅगा उतरवून अंघोळ चहा-नाश्ता उरकून आम्ही लगेच गणपतीपुळेला जायला निघालो.
एसटी डेपो मध्ये येऊन आणि गणपतीपुळे ची एसटी पकडून आम्ही दुपारी १२ वाजे पर्यंत गणपतीपुळे ला पोहोचलो.मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले,मंदिराला लागून असलेल्या समुद्राचा आनंद घेतला थोडे फोटो काढले व तिथल्या अथांग समुद्राला डोळ्यात टिपून तिथून निघालो.जवळच एक हॉटेल बघून तिथे दुपारचे जेवण केले.अजून बराच वेळ हातात असल्याने अजून कुठे तरी फिरावं असा विचार केला.गणपतीपुळे ला शिरतानांच एक मोठा फलक पाहिला होता 'प्राचीन कोकण'. गणपतीपुळे ला तुम्ही शिरता तेव्हाच तुमच्या नजरेस तो पडेल.तिथे जायचं असा निर्णय आम्ही घेतला व निघालो.
साधारण प्रत्येकी वीस-तीस रुपये प्रवेश फी असेल त्यावेळेस.तिथल्या बुकिंग काउंटर वर पैसे भरून आम्ही तिकीटं घेतली.त्यांची एक व्यक्ती(गाईड) आमच्या सोबत आली.कोकणाला समुद्राची देणगी असल्याने मासे प्रचंड प्रमाणात असतात हेच दर्शवण्यासाठी प्रवेशद्वारावरच माश्याची टोपली घेतलेल्या एका बाईची प्रतिकृती आढळून येते.तुम्ही जसे पुढे जाता तशी आजूबाजूला विविध फुलांची औषधी वनस्पतींची झाडे आढळून येतात.तिथे फिरताना थोड्या-थोड्या अंतरावर कोकणात राहणारी विविध व्यवसाय करणारी माणसे यांच्या प्रतिकृती आढळून येतात.जसे सोनारकाम,लोहारकाम,चांभारकाम.कोकणात साजरे होणारे विविध सण त्यांची माहिती व प्रतिकृती आढळून येते विशेषकरून गणेशोत्सव ,शिमगा आणि कोकणाचा लोकप्रिय प्रकार 'कौल लावणे'.तसेच कोकणातील कौलारू शेण-मातीची घर हि आढळून येतात.आणि विशेष म्हणजे आपले प्रेरणास्थान 'शिवाजी महाराज' आपल्या मावळ्यां समवेत नौकेत उभे असलेली प्रतिकृती ही आहे.थोडक्यात सांगायचे झाले तर कोकणात पहिल्यांदाच येणाऱ्या व्यक्तीला कोकणाचे उत्तम दर्शन घडेल .हे सर्व पाहून आम्ही परत निघालो शेवटच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला तांब्याच्या भांड्यातून थंडगार पाणी दिले त्यामुळे फिरून आलेला त्राण क्षणात निघून गेला.
आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती.आम्ही पुन्हा आमच्या लॉंज वर आलो येतानाच वाटेत थोडं जेवण केलं.आमच्या बॅगा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.आमच्या ग्रुपमधील संतोषने ठरवल्याप्रमाणे आम्ही हातखंब्यावरून लक्झरी पकडून मुंबई ला येणार होतो.आम्ही रिक्षा पकडून हातखांब्याला पोहोचलो साधारण रात्रीचे ८ वाजले असतील.आम्ही बसची वाट पाहत तिथे थांबलो होतो पण आम्हाला बस मिळत नव्हती.लक्झरी येत होत्या पण त्या पूर्ण भरलेल्या असल्याने न थांबताच निघून जात होत्या.आता मात्र काय करावे सुचत नव्हते.आमच्या सारखाच अजून एक चार-पाच मुलांचा ग्रुप तिथे हजर होता.त्यांची अवस्था हि आमच्यासारखीच होती.तेवढ्यात त्यांच्यातला एक मुलगा आमच्या जवळ आला व बोलला आम्हालाही मुंबई ला जायचे आहे आम्ही आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन ला जात आहोत ११ वाजताची कोकणकन्या मिळेल तुम्ही येणार का?अजून कोणता मार्ग ही नव्हता आम्ही लगेच होकार दिला.पण रेल्वेस्टेशन ला जायला काहीच वाहन नसल्याने त्या मुलांनीच ठरवलेल्या मिनी टेम्पोतून आम्ही निघालो.पहिल्यांदाच टेम्पोत बसून आम्ही स्टेशन ला पोहोचलो.ट्रेनचे तिकीट काढले आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वर आलो.ट्रेन ची वेळ झाली होती त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एकच गर्दी उसळली होती.ट्रेन आली पण आमच्यापैकी कोणालाच ट्रेन मध्ये चढायला मिळाले नाही आता मात्र आम्ही प्रचंड घाबरलो जर आम्हाला जायला मिळालेच नाही तर.पण शेवटचा आशेचा किरण म्हणजे रात्री १२.३० ची "मस्त्यगंधा एक्सप्रेस".आता आम्ही त्या ट्रेनची वाट पाहत राहिलो.ट्रेन दुरून येताना दिसली आमच्या सारखे राहिलेले अनेक आणि नवीन आलेले असे बरेच लोक जमा झाले.पुन्हा तीच झुंबड पण आता हत्तीचं बळ आल्यासारखं धक्काबुक्की करत आम्ही ट्रेनमध्ये चढलो.ट्रेन मंगलोर वरून आल्याने गच्च भरलेली होती.सीट मिळणं अशक्यच.आम्ही सीटवर बसलेल्या लोकांचे पाय बाजूला सारत खाली बसलो.ट्रेन निघाली.फिरुन दमल्यामुळे लगेच एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेलो ते उठलो पनवेल आल्यावरचं पनवेल गेल्यावर सीटवर बसायला जागा मिळाली.सकाळी ७ च्या सुमारास LTT स्टेशन ला उतरलो.मग टॅक्सी ने बांद्रा आणि बांद्रा वरून ट्रेन पकडून घरी गेलो.उशिरा का होईना पण त्या दिवशी (सोमवारी) सर्वजण ऑफिस ला हजर झालो सर्व त्राण झटकून.
खरं सांगायचं तर कोकणातल्या लोकांना ट्रेनचा असा प्रवास करणे म्हणजे काही नवीन नाही.कितीतरी लोक चक्क उभ्याने,दरवाज्यात बसून सुद्धा मुंबई वरून कोकणात आपल्या गावी जातात.पण माझ्या अनुभवातून मला असं सांगावस वाटते की कुठेही सहलीला,फिरायला जात असताना सर्व योजना आखून मगच बाहेर पडायला पाहिजे.आणि अशी धावपळीची सहल असेल तर विशेष काळजी घ्यावी.आणि जरी अशा संकटात सापडलो तरी न घाबरता त्यातून मार्ग काढायला पाहिजे.

धन्यवाद..💐

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा..२०२०मी तुषार शिंदे,कल्याण.+91 95947 16909.तसा मला ट्रेकिंगचा अनुभव कमी आहे , पण जेव...
15/06/2020

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा..२०२०

मी तुषार शिंदे,
कल्याण.
+91 95947 16909.

तसा मला ट्रेकिंगचा अनुभव कमी आहे , पण जेवढ्या पण केल्या त्या अविस्मरणीय आहेत. त्यामधलीच एक ही माझी कलावंतीण दुर्गची ट्रेक आहे.

ह्या वर्ष्याची सुरवात रायगड सारख्या पवित्र गडा वर जाऊन केली, पण या नंतर कोणता गड पाहण्यास जावे हे सुचत नव्हते. यावेळी थोडं "Adventures" करायचं होत, म्हणून मी माझे गुरु माझ्या ऑफिसचे सर आणि मला लहान भावा सारखे वागवणारे राजेश सर याना विचारले, राजेश सर यांनी आता परंत खूप ट्रेक केल्या, त्यांचा सोबत मी आता परंत 2 ट्रेक केल्या त्या मध्ये पहिली ट्रेक ही नाणेघाटची होती आणि दुसरी ही विकटगड. दोन्ही ट्रॅक या अविस्मरणीय आहेत, म्हणून मी त्यांना पुढचा ट्रेक साठी खूप आग्रह केल्या पण काही वयक्तिक अडचणी मुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. पण त्यांनी मला मार्ग नक्की दाखवला पुढच्या ट्रेकचा, त्यांनी मला कलावंतीण दुर्ग ला ज्याण्यास सांगितले. आणि तितकेच अचूक मार्गदर्शन सुध्दा केले.

मी कलावंतीण दुर्ग ची काही विडिओ सुद्धा पाहिले YouTube वर, पाहताना अंगावर काटा येईल असा थरार होता, त्यामुळे तिकडे प्रत्येक्षात जाऊन अनुभव घ्याचं ठरवलं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाला सोबत घेऊन जायचं, मी माझा हा प्लॅन माझ्या मित्रांना सांगितला काही येण्यास तयार ही झाले तर काहींनी हात वर केले.

मी या मोहिमेची योजना आखाय सुरवात केली आणि एक तारीख निश्चित केली ती म्हणजे "1 मार्च 2020" रविवार होता म्हणजे सर्वांचा सुट्टी चा दिवस, जस जशी तारिक जवळ येत होती तस तशी उत्सुकता वाढत होती. आणि हळूहळू जे माझ्या सोबत मोहिमेला येणार होते यांनी पळ काडाय सुरुवात केली, पण माझ्या निर्णय ठाम होता आणि या मध्ये माझ्या भाऊ स्वप्नील यांनी ही निर्णय ठाम केला होता, ट्रेक वर माझे सोबती कमी झाल्या मुळे जाता येईल की नाही असच वाटत होत. मग मी पोर जमवायला पुन्हा सुरुवात केली आणि माझ्या पुतण्या म्हणजे सिध्दांत याला मी या प्लॅन बद्दल सांगितले, याने याला होकार दिला आणि सोबत त्याचा मित्राला सुद्धा यात शामिल करून घेतले,मग मी माझ्या ऑफिस चा मित्राला सांगितलं तो सुद्धा यायला तयार झाला , आणि माझ्या शेजारी राहणारा मित्र श्याम सुद्धा येण्यास तयार झाला.

मग अशें आम्ही सहा जण मी स्वप्नील, सिद्धू , रोहित ,श्याम आणि माझ्या मित्र विकास जणू मोहिमेला जातोय अस घरातून सकाळी 5.30 ला घरातून निघालो आमचं भेटायचं स्टेशन म्हणजे दिवा , आम्ही कोकणात जाणारी दिवा गाडीने पनवेल ला जाण ठरवलं. आम्ही सगळे दिवा स्टेशन ला भेटलो आणि ट्रेन लागली होती, पण काही कारणामुळे ट्रेन उशिरा सोडली गेली , आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही 1 तासाने पनवेल ला पोचलो. सर्वाना भूक लागली होती म्हणून आम्ही थोडं काही खाउन घेतलं. मग आम्ही ठरवले ऑटोने पुढचा प्रवास करायचा , आम्ही सगळ्यांनी एकच ऑटो केली, आणि ऑटो वाल्याशी गप्पा मारत आम्ही कलावंतीणचा पायथ्याशी आलो जिथून आमची मोहीम सुरू होणार होती.

सुरवात एका फोटोसेशन ने झाली आणि आम्ही कलावंतीण दुर्ग चा दिशेला निघालो, अचानक समोरून काही माणसे एका माणसाला उचलून धावत होती हे बगत असताना अस वाटत होत की त्या माणसाचा मृत्यू झाला आहे, आम्ही सगळे थोडे घाबरलोच , कारण हा गड थोडा अवघडच होता आम्ही पुढे जायचा आधी तिथल्या लोकांना विचारले 'काय झालं या माणसाचं ? तेंव्हा कळलं की त्याला खवळलेल्या मधमाश्या ने चावले आणि तो जिवंत होता, तेव्हा जीवात जीव आला आणि आम्ही मोहिमेला सुरुवात केली, पण सस्पेन्स काही संपेना असच झालं होत पुढे जेव्हा आम्ही नोंदणी कराय ला गेलो तिथे त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगीतल कलावंतीण दुर्ग बंद करण्यात आला आहे कारण मधमाश्या खवल्या आहेत, सगळ्यांना खूपच धक्का बसला आणि विचार काराय लागले की एवढ्या लांब येऊन आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाता येणार नाही, मग सगळ्यांनी ठरवलं की कलावंतीण नाही झाला तरी त्याचा बाजूचा गड म्हणजे प्रबळगड हा करू , आणि आम्ही पुन्हा सुरवात केली ट्रॅकिंगला. बऱयापैकी रुंद समोरची डोंगररांग पूर्णपणे नजरेत येत होती.आता सर्व परिसर न्याहळत आम्ही पुढे चालत होतो.. मध्ये मध्ये फोटोसेशन चालू होतो..पाऊले आता पटापट टाकत निघालो सूर्य सुद्धा सकाळ सकाळी तापला होता .आजूबाजूचा परिसर म्हणजे फक्त अप्रतिम !!!
रोहित ला ट्रेक चा चांगलाच अनुभव होता मग तो आणि मी सगळ्यात पुढे चालू लागलो तो आपला अनुभव सांगत सांगत जात होता मी सुद्धा थापा खात ऐकत होतो. आणि मी त्याला माझा सुद्धा काही अनुभव सांगीतला, 30 मिनटं चालून झाल्यावर मात्र रोहित ला सोडून सर्वांचा घमटानिघाला होता थोडं पाण्याचं घोट पोटात टाकून पुढची चढाईचालू केली .
त्यात काही लोक गड उतार करत होते मग आम्ही त्यांना वरती काय हालचाल आहे विचारू लागलो , तेव्हा काही लोकांनी सांगीतल की कलावंतीण दुर्ग हा चालू ठेवला आहे आणि प्रबळगड बंद करण्यात आला आहे, हे ऐकून आम्ही सगळे खूप खुश झालो , आणि तितक्याच जोराने आम्ही चढाई चालू केली.

बराच वेळ पायपीट केल्यानंतर एका डोंगर माथ्यावर येऊनपोहचलो माथ्यावरून कलावंती आणि प्रभळगडाचे आकाशातजाणारे सुळके स्पष्ट पणे दिसत होते.आम्ही थोडा वेळ थांबून पुन्हा सुरवात केली या वेळी मात्र सगळे दमले होते , आणि फक्त चढाई करायचा विचारात होते.. मी आणि सिद्धू आम्ही काही क्षण कॅमेरा मध्ये कैद करू लागलो.. बाकीचे पण मागून फोटो काडत काडत येत होते..
बरेच वेळ चालल्यानंतर एक देऊळ लागलं देऊळम्हणता येणार नाही एका मोट्या कातळा मध्ये "श्री"ची आणि"अंजनी पुत्र" यांची मूर्ती कोरलेली आणि त्याला शेंदूर फासलेला सर्वजण थापा टाकत मूर्तींचा पायथ्यचि सावळी खाली बसलोसमोरच नजारा म्हणजे भारीच !!! "गणेशला आणि हनुमंतानं " नमस्कार करून पुढचा टप्पा चालू झाला...
आत्ता बराच वेळचालतच होतो ... निसरड्या वाटी.. सह्यन्द्रीचा कुशीतले भलेमोठे वृक्ष, पक्षी.. यांच्यातून वाटा काडत आम्ही कलावंतीणच्या पायथ्याशी वसलेल्या ठाकूरवाडी गावात येऊन पोहचलो...हा भाग म्हणजे पूर्णपणे पठार समोरच काही अंतरावर शाळेसारखी बांधणी असलेलं घर पुढे अंगणात सारवून जमीनकेलेली ... समोरचा भागात काही ट्रेकर्स ग्रुपने टेन्ट लावलेले होते..

आम्ही चालणे बंद नाही केलें आणि ठरकरेंचा वाडीतून निघालो, आणि पुढे आणखी एक घटना घडली, आम्ही फोटो काडायला आणलेली सेल्फी स्टीक मी रोहितला दिली आणि त्याने माझ्या मोबाईल लावताना तोडली, आता आम्हाला त्याचावर राग येऊ लागला पण न रागवता आम्ही सगळं मस्करी मध्ये घेतलं,आणि आमची पावले टाकत चालू लागलो.
आता पुढे कलावंतीण सुळका नजरेत दिसत असल्यानं सर्वानाच चालण्याचा हुरूप आला होता ... वाट थोडी उभीचढण असणारी आहे . १५ ते २० मिनटंनंतर आम्ही मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो. बरीच ट्रेककर्स मंडळी माची उतरत होते महिलांचा सहभागसुद्धा बऱयापैकी होता.

मी सर्वाना सांगितले की आत्ता एकादमात बुरुज पार करायचा. आणि हा थरार अनुभवायची वेळ आली होती , अंगावर असलेल्या या पायऱ्या आम्ही चढायला सुरवात केली, पायऱ्या या बुरुजाला कोरल्या होत्या, चडताना हवा खूप होती आणि खाली खोल दरी त्यामुळे शिरीराला स्थिर राहायला जमत नव्हतं, आणि थोडी भीती सुद्धा वाटत होती, तितक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा गोषणा लोकांनी चालू केल्या आणि आमचा आत्मविष्यास वाढू लागला , आणि आम्ही सगळे न थांबता पूर्ण बुरुज चढलो.

आता उरला शेवटचा टप्पा जे की रसीने चडून टोकाला पोचायचं होत, या वेळी सर्वात आधी मी जाण्या चे ठरवले , हातात भगवा झेंडा घेतला आणि वर जाण्यास सुरवात केली माझ्या मागून बाकी सर्वे सुद्धा चडले.
वरती आल्यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांचा चेहऱयावर होता..
टोकावरून खूप सुंदर असे निसर्गाचे दृश्य दिसत होते सगळे तिथे आपलं भान हरवून गेले , मग आम्ही पुन्हा आमचं फोटो काढण्यास सुरवात केली. फक्त सकाळचा नास्ता करून आम्ही ही मोठी मोहीम फतेय केली होती, पण आता मात्र सगळ्यांचा पोटात कावळे ओरडू लागले ,आणि आम्ही गड उतार चालू केला, बुरुजाच्या थरारक असलेल्या पायऱ्या जिथे संपतात तिथे मी पाहिले एक छोटी गुफ्फा होती, एक माणूस वाकून जाऊ शकेल एवडीच अरुंद गुहेद्वारीच मारुतीरायची नक्षी काढलेली ... नंतर आतमध्येजायचं कीनाही अस चलबिचल चाली होती शेवटी ... सिद्धूआणि माझ्यातली खाज म्हणून आम्ही दोघे आत मोबाइल टॉर्चघेऊन आत गेलो, गुडग्यावर बसून दोघे आत गेलो तीन ते चार फुटानंतर परतउजवीकडे वळलो नंतर त्या पुढे जवळ पास ५ ते ६ जण सहज बसतील एव्हडी जागा आहे ..थोडाच वेळातटॉर्च बंद झाली मग तसच बाचकत आम्ही परत बाहेर आलो..बहुतेकती गुंफा शत्रू पासून वाचण्यासाठी किंवा दारू गोळा, अन्न धान्य ठेवण्यासाठी करण्यात येतअसावी ..

आता थोडा आराम करायचा म्हणून आम्ही एका झोपडीत बसलो तिथे स्वप्नीलने आणलेले sandwitch चे समान काढले आणि आम्ही सगळे थकलेच होतो तर श्याम आणि स्वप्नील ने sandwitch बनुन सगळ्यांना दिले तेवढं खाऊन , आम्ही न थांबता गड उतार झालो , आणि ठरवलेली ऑटो करून पनवेलला गेलो तीतून आम्ही सगळे बसने घरी जायचं ठरवलं आणि खूप कमी वेळात आम्ही ही अवघड मोहीम फतेय केली...

🚩 जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शुंभुराजे ...🚩

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा, २०२०प्रज्ञेश अनंत शिवगणजोगेश्वरी, मुंबई.सांधण व्हॅली... एक अविस्मरणीय अनुभव..२२,२३ ...
14/06/2020

सह्याद्रीतील गुजगोष्टी लेखन स्पर्धा, २०२०

प्रज्ञेश अनंत शिवगण
जोगेश्वरी, मुंबई.

सांधण व्हॅली... एक अविस्मरणीय अनुभव..
२२,२३ व २४ मार्च २०१९
भाग :१

सांधण व्हॅली ला जायची तयारी तारखेच्या एक महिन्यापासूनच सुरुवात झाली होती.याचे मुख्य नियोजन ओरिओल ऍडवेंचर्स ग्रुप ने केले होते.त्यांच्या नियोजनातला दुसराच ट्रेक होता.सांधण हे नाव मी २०१४ सालापासून ऐकत आलो होतो.माझे मित्र ही सांधण चं कौतुक काही कमी करत नव्हते.त्याचवेळीच सांधण करायचा असा मी वसा जणू मनातच घेतला होता.तो आता पूर्ण झाला याचंच मला माझंच कौतुक वाटतंय.सांधण करण्याआधी हा ट्रेक जमेल की नाही याचीच भीती वाटत होती कारण मी ऐकून होतो की ८० फुटावरून रॅपलिंग,हाईकिंग,फोटो मध्ये पाहिलेले मोठे-मोठे दगड पार कसे करायचे आणि मोठा प्रश्न म्हणजे स्वतःला त्यात कसे सांभाळायचे??त्यामुळे मी तिकडे न जाण्याचं ठरवलं.काही जवळच्या सहकार्यांनी धैर्य देत तू करू शकतोस असं कुठे आत्मविश्वास मिळवून दिला.पण तो तेवढ्यापुरताच राहिला.लगेच मी माझ्या जवळच्या साथीला वैशाली ला फोन करून कळवले की मी सुद्धा सांधण ला येतोय. ती खुश होऊन तिने माझं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं.अजून ही मनात चलबिचल पणा होताच.मी माझ्या निर्णयावर ठाम नव्हतो.पुन्हा वाटतं होत की निर्णय बदलू का?का कोण जाणे एवढी बिकट अवस्था माझी झाली नव्हती.ती तारीख होती २२ मार्च २०१९ .ट्रेक च्या शेवटच्या दिवसापर्यंत माझं काही ठरत नव्हतं.आता ठरवलं की जे होईल ते पुढे बघून घेऊ.
ऑफिस मधून सुटताच थोडी घाई करत घरी पोहचलो.बॅग पॅक करत आवर आवर करत वैशाली ला जोगेश्वरी स्टेशनला भेटलो.काही वेळानंतर एक नवीन ट्रेकर श्रेयस ही तिकडे आला.आमची पहिली ओळख तिकडेच झाली.आम्हाला दादर वरून कसारा ट्रेन पकडायची होती.त्या गडबडीत दादर ला पोहोचलो आणि तिकडे नवीन साथी ही भेटले.त्यांच्यासोबत ओळख झाली.तरीही सर्वजण आपापल्या मोबाइल मध्ये व्यस्त होते .शेवटी ट्रेन आली. बसायला जागा शोधली आणि आमचा तेथूनच प्रवास सुरू झाला.कसारा स्टेशन ला १:३० वाजता ट्रेन पोहचली.प्रवासात अनेक गप्पा टप्पा ,अनुभव चालू होते. त्यामुळे झोपेत येणारी स्वप्न माझ्या झोपेची जणू वाटच बघू लागले...

सांधण व्हॅली...
एक अविस्मरणीय अनुभव.. २२,२३ व २४ मार्च २०१९
भाग-२

कसारा स्टेशन ला १:३० वाजता ट्रेन पोहचली.अजून येणारे काही साथी कसारा स्टेशन ला भेटले.आता आम्ही एकूण दहा जण होतो.कसारा वरून सांधण ला जायला एक गाडी ठरवली होती.सर्व जण त्या गाडीत बसले आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला.सांधण ला जायला अजून १०० जणांचा ग्रुप आला होता.तिकडच्या गावच्या काही वादामुळे गाडी तिथे काही वेळेसाठी थांबवली गेली.आता पुन्हा आमची गाडी पळू लागली..रात्रभर जागरण असल्यामुळे थोडा झोपायचा प्रयत्न केला पण गाडी जास्तच हलत असल्यामुळे व जास्त वेगामुळे झोपेचा काही पत्ताच नव्हता.जस-जसं गाडी पुढे जात होती तस-तसं पठार ही दिसू लागलं होतं.त्या लख्ख काळोखात चंद्र माझा मागोवा घेतोय असं जणू वाटत होतं.ओठांवर रात्र सुंदर, चंद्र सुंदर असं संदीप खरेंचं गाणं रेंगाळत होतं.माझ्या प्रत्येक कविता ओठांतून बाहेर निघत होत्या.अशा प्रकारे ४:०० वाजता आम्ही सांधणच्या बेस कॅम्पला म्हणजेच साम्रद गावी पोहोचलो.आम्ही एका घरात लवंडलो.सहा वाजता उठून सात वाजता ट्रेक सुरू करू असा अतुल दा ने सांगितलं.आता दोन तासाची झोप ही खूप महत्वाची ठरणार होती.शरीराची झीज होणार हे मला ठावं होते.सहा वाजता उठल्यानंतर खूप उत्साही वाटतं होतं.दिवस उजडायला लागला होता.बाहेर आल्यावर माझं लक्ष रतनगड व त्या बाजूला असलेला आजोबागडा वर गेलं.आता फ्रेश होतं आम्ही कांदेपोहे व चहाचा आस्वाद घेत निसर्गाकडे न्याहाळून बघत होतो.
आता ट्रेक ला सुरुवात करायची होती.सर्वजण सज्ज झाले होते.आता आमची खरी तोंडओळख झाली आणि ट्रेक करण्यास सुरवात केली.अतुलदा ,प्रणवदा,वैशाली हे ट्रेक लीडर होते.सांधण चालू केल्यापासून १५ मिनिटे झाली होती.वाटेत मोठं-मोठे कातळातले दगड लागत होते.आता मध्येच पाणी लागले .त्याचे फोटो मी या आधी गूगल वर पाहिला होता.पाणी कंबरेएवढं होतं पण पाण्यात उतरताच शरीर एकदम गोठले होते.पाण्यातून उतरताच प्रत्येक जण स्वतःला सुकवत होता.यापुढे अजून ३ तासांचा ट्रेक करावा लागणार होता.ट्रेकिंग करताना स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे.सांधण मध्ये सूर्यप्रकाश आता कमी झाला होता.मोबाइल आता फोटो काढण्या पुरतीच कामाला होता .कुठलं नेटवर्क सुद्धा नव्हतं. १:३० तास मोठे- मोठे दगड उतरत पायपीट केल्यानंतर पहिलं रॅपलिंग करण्याचं ठिकाण आलं.आता नवा जोश भरला होता . पहिला प्रणवदाने रॅपलिंग केली त्यानंतर मी रॅपलिंग केली.हा माझा पहिला वहिला अनुभव.आता मनात भीती मेलीच होती.नकळत असा प्रश्न पडायचा की जर मी या भीतीने आलो नसतो तर?या गोष्टीच हसू ही येत होतं.सर्वांनी चांगल्या पद्धतीने रॅपलिंग केली होती.अजून खूप बाकी होतं.
पुढे गेल्यावर काही वेळातच एक रॉकप्याच होता.हातावर जोर देत पायाच्या साहाय्याने उतरायचा होता.तो ही खूप चांगल्या पद्धतीने झाला.सांधण ला जरी बघितलं तरी राकट,कणखर असा.दरवर्षी आपली वाट बदलणारा.आम्ही आता थोडी एका सावलीत बसून न्हयारी केली.आणि थोडा अर्धा-तासभर लवंडलो.आता शेवटचा रॅपलिंग चा टप्पा होता.आपले हात सोडून सरळ झोकून खाली उतरायचं.हहहहह ...काय भारी होत ते?असं वाटत होत की पुन्हा पुन्हा करावं..आता सांधण संपायला आलं होतं. त्याची निमुळती बाजू दिसू लागली होती.आम्ही आमच्या बेस कॅम्प ला जाऊ लागलो. तेवढ्यातच एक छोटं पाण्याचं तळं दिसलं, पण त्यात पाणी खूप होतं. अगदी कॅम्प च्या जवळ होतं.सर्वांची इचछा होती पण पोहायचं धाडस कोणी केलं नव्हतं तेवढ्यातच ?????

सांधण व्हॅली...
एक अविस्मरणीय अनुभव.. २२,२३ व २४ मार्च २०१९ भाग-३

तळ्यात सर्वांची इचछा होती पोहायची पण पण पोहोयचं धाडस कोण करत नव्हतं. तेवढ्यातचं प्रणव दा ने पाण्यात उडी मारली आणि एकच सूर मारला. पाणी चांगलं आहे असं ओरडला.सर्वजण त्या तळ्यावर पोहण्यासाठी आले.त्यात आमचा थकवा दूर झाला.तासभर आम्ही पाण्यात खेळत होतो.नंतर उन्हात उभे राहून स्वतःलाच सुकवत होतो.आता आम्हाला मुक्काम सांदण व्हॅलीत डोहाजवळील कातळावर करावा लागणार होता.थकवा जणू नाहीसा झाला होता.टेंट बांधून आमच्या बॅगा टेंट मध्ये ठेवल्या .पुन्हा चोहोबाजूने निसर्ग न्याहाळू लागलो.निसर्ग एवढा सुदंर होता की एका नजरेत काही सामावू शकत नव्हतो.
आता सांज ढळायला आली होती .मी लिहलेली "सांज कातरवेळ" ही कविता नुकतीच ओठात येऊ लागली होती.आता प्रश्न पाण्याचा होता?आम्ही पाणी शोधण्यास निघालो.पिण्यासाठी योग्य असं पाणी कुठेच नव्हतं.आमचे साथी राजेंद्र सरांनी पाणी शोधून काढलं आणि आम्ही त्या पाण्यावर संपूर्ण १ दिवस होतो.आता मोबाइल ला काही नेटवर्क नव्हतं.मोबाइल बॅगेत ठेवून नुकताच फेरफटका मारण्यासाठी थोडा बाहेर आलो.
अंधार झाला होता.आता रातकिड्यांचा आवाज सुरू झाला होता.आज प्रदूषण आणि गर्दी यातून मुक्त होतो.गप्पा गोष्टीं चालू होत्या.प्रत्येकजण आपापले सांधण चे अनुभव सांगत होता.तिकडच्याच डोहाजवळ गाववाल्यांनी जेवणाची सोय केली होती. जोरात भूक ही लागली होती.जेवणावर ताव मारत स्वादिष्ट जेवण आम्ही कधी फस्त केलं हे कळलंच नाही.
नुकत्याच कातळावर आम्ही पडून होतो.चंद्र-तारे मोजत होतो.गावाकडच्या गोष्टी करत होतो.मला माझ्या बालपणाच्या गावची आठवण जागं करू पाहत होतं.वारा ही शांत झाला होता आणि सर्व कातळावरच झोपून गेलो.
सकाळी सहा वाजले होते. डोळे आपोआपच उघडले.दिवस हळू हळू उजडायला लागला होता.आमच्या शरीरातला थकवा कमी झाला होता.सकाळचा चहा आणि नाश्त्या केला.आम्हाला आज परतीचा प्रवास करावा लागणार होता.त्या साठी थोडी लगबग होतीच.जेवढं लवकरात लवकर तेथून निघू तेवढं उन्ह ही कमी भेटेल .मी निसर्गाचे काही विडिओ बनवले ते ही लवकरच तुमच्या भेटीला येतील.आम्ही आवरतं घेतलं.
सांधण हुन "देहणे" गावात पोहचायला १:३० तास लागतो .तशी आम्ही पायपीट ही केली.मार्ग आता सुखसोईचा होता.त्यामुळे वाटेत जाताना खूप फोटो काढले.मागे फिरून सांधण ला निरोप दिला.उन्हाचा प्रखर ही खूप जाणवत होता.अखेर "देहणे" गावात पोचलो.आम्ही ठरलेल्या एका घरात जेवलो.जेवणाची चव सुद्धा खुप रुचकर होती.सरतेशेवटी आम्ही आशियातील दुसऱ्या नंबर वर असलेल्या सांधण व्हॅली चं दर्शन घेतलं.ते ही सह्याद्रीचं एक प्रतीकच आहे.तेथून हरिच्छंद्रगड,आजोबागड,रतनगड अजून खूप गड सांधणच्या उंचीवरून नक्कीच पाहता येतात.
मला सांधण ने आत्मविश्वास शिकवला.निर्भीडपणा शिकवला.ट्रेकिंग चे सोपे तंत्र अतुलदा कडून शिकलो.पाण्याचे महत्व शिकलो.मुळात माणूस म्हणून राहायला शिकलो.आमची ट्रेकिंग खूप शिस्तबद्ध झाली.व्यवस्थापन ही खूप चांगलं होतं. कोण नवीन असं वाटलंच नाही. सर्व समरूप झालो , एक झालो. यात विशेष कौतुक अतुल दा ,वैशाली आणि बाकी सर्व सहकारी.
आता आमचा खरा निघायचा आणि निरोपाचा प्रवास सुरू झाला.आता गाडी थेट आसनगाव स्टेशन ला जाणार होती.गाडीत बसलो ,मागे पाहताच डोंगराळ माळ दिसू लागला.पुन्हा संदीप खरेंची कविता आठवली "गाडी सुटली रुमाल हलले" आणि खरंच डोळ्यात टचकन पाणी आले.

लेख: © प्रज्ञेश शिवगण.

13/06/2020

नमस्कार सह्याद्री मित्रांनो..,
TrekErants या आपल्या भटक्यांच्या परिवारा तर्फे "सह्याद्रीतील गुजगोष्टी" ही लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.. अशी लेखन स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच घेत आहोत.. ही स्पर्धा घेण्यामागचा आमचा उद्देश हाच होता की सह्याद्रीत भटकंती करत तुम्ही तुमची लेखन कला देखील जपली पाहिजे.. आणि म्हणूनच तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आमचा उद्देश सफल झाला असे आम्ही समजतो.. व त्यातच आमचे समाधान आहे..
या स्पर्धेच्या निमित्ताने सह्याद्रीतील गुजगोष्टी आपल्याला अनुभवता आल्या.. वाचता आल्या..
खरतर आलेले लेख पाहता योग्य निकाल लावणे परीक्षक सुविधा लोखंडे यांनाही एक आव्हानच होते.. TrekErants संघ सुविधा लोखंडे यांचेही खूप खूप ऋणी आहे.. त्यांनी वेळात वेळ काढून परीक्षण करण्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ कोणतेही मानधन न घेता आम्हांला दिला.. कारण लिखाणात सर्व स्पर्धकांनी घेतलेली मेहनत त्यांना स्पष्ट समजत होती.. म्हणून या स्पर्धेचा निकाल हा लिखाणाची शैली आणि लिखाणातून मिळणाऱ्या माहितीवर आधारित करण्यात आली आहे..

आपण फक्त एकच विजेता निवडणार होतो, पण तुम्हां सर्वांचे लिखाण पाहता आपण दोन विजेते निवडले आहेत..
"सह्याद्रीतील गुजगोष्टी, लेखन स्पर्धा..२०२०" चे विजेते खालीलप्रमाणे :
प्रथम : प्रीती गोळे, कोपरखैरणे.
द्वितीय : प्रथमेश धुरी, कोपरखैरणे.

विजयी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सह्याद्री मित्रांचे आभार, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली होती.. पण नाराज होण्याचं कारण नाही सहयमित्रांनो.. ही सुरुवात आहे असे समजून या पुढेही आपल्या गोष्टी आपणच लिहूया आणि त्या जगासमोर आणूयात..
पुढील वाटचालीस सर्वांना सह्याद्री एवढ्या शुभेच्छा..

धन्यवाद..
TrekErants परिवार..

Address

JVLR Road, Jogeshwari East
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trek Erants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trek Erants:

Share

Category