29/03/2013
खास डोंबिवलीकरांसाठी ‘कैलास मानससरोवर यात्रा’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन...
गुढीपाड्व्याच्या पार्श्वभूमीवर ‘कैलास मानससरोवर’ दर्शनाला विशेष महत्त्व आहे. शिव, शंभो,शंकर,त्रिनेत्र,निलकंठेश्वर अशी असंख्य नावे धारण केलेल्या शंकराचे वास्तव्याचे स्थान म्हणजे कैलास मानससरोवर होय. लाखो भाविक व श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान. पण हे तीर्थक्षेत्र पादाक्रांत करणे वाटते तितके सोप्पे नाही. खऱ्या अर्थाने मनुष्याचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक कस लागतो. समुद्रसपाटीपासून २०,००० फूट उंचीवर वसलेल्या कैलास मानससरोवरची यात्रा म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. विरळ होत जाणारी हवा, चढ चढताना होणारी दमछाक हे दिव्य जो पार पाडतो त्यास मग जगातली कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. या यात्रेला जाण्याचे व मानस सरोवरात स्नान करण्याचे प्रत्येक भाविकांचे स्वप्न साकार होतेच असे नाही. चुकीचे समज, पर्यटनाबद्धलचे अज्ञान, कौटुंबिक समस्या यांसारख्या अडचणींमुळे अनेकांची मानससरोवर यात्रा रखडते. पर्यटक भाविकांची ही समस्या जाणून कैलास मानससरोवरचा दांडगा अनुभव असलेले आकांक्षाचे संचालक महेश खातू स्वतः कैलास मानससरोवर यात्रेबाबत पर्यटकांस मार्गदर्शन करणार आहेत. येत्या ३० मार्च २०१३, शनिवारी सायंकाळी ५ वा. डोंबिवली पूर्व येथील बोडस सभागृह ,रामनर येथे खास पर्यटक व भाविकांसाठी मानससरोवरच्या १४ दिवसांच्या यात्रेबाबत विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा. इच्छुक याबद्दल अधिक माहिती आणि नोंदणी साठी महेश खातू, संचालक आकांक्षा टुरिझम यांना ०२२-२४२२९९६५/६६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. प्रवेश मुक्त आणि मोफत आहे.