Trigun Tour & Travels

Trigun Tour & Travels Trigun Tour & Travels is one of the most reputed company in the area of travels and tourism

Trigun Tour & Travels !
06/10/2012

Trigun Tour & Travels !

06/10/2012

त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची तीर्थस्थळे आहेत. स्थानमहात्म्य असलेले अष्टविनायक व त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील तीर्थयात्रेची अपूर्व अशी संधी त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सने भाविकांना उपलब्ध करून दिली आहे.

संप्रदायांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात दत्तसंप्रदायातील थोर संत व दत्ताचे तिसरे ब्रह्मरूप पुर्णावतार श्री स्वामी समर्थ, श्री नृसिंहसरस्वती, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली तुळजाभवानी आणि विठोबा-रखुमाई या दैवतांशी नाळ जोडलेले भाविक आहेत. याचबरोबर अष्टविनायकाचीही महती सर्वज्ञात आहे. भाविकांच्या अडचण लक्षात घेऊन त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सने अष्टविनायक दर्शन त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे जेणेकरून भाविकांचा हेतू साध्य होईल. त्रिगुणतर्फे दर महिन्यास या तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही यात्रांसंदर्भात अधिक माहितीसाठी त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सला ९८३३९९२६९९/०२२-२८२२०३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

रांजणगावचा महागणपती - हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीचगणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र...
05/10/2012

रांजणगावचा महागणपती -

हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच
गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.

भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश हाच्रीच, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली
आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे .

स्थान : तालुका शिरूर, जिल्हा पुणे, हे स्थान पुणे- अहमदनगर राज्य मार्गावर आहे.
अंतर : रांजणगाव-पुणे ५० कि.मी., रांजणगाव-शिरूर १७ कि.मी., जवळच्या हायवेपासून पुणे- सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. आणि चौफुल्याहून थेउर, मोरगाव , व सिद्धटेकला जाता येते.

पुणे मार्गावरील प्रेक्षणीय ठिकाणे : वढू बुदृक - भीमा नदीवर श्री संभाजी महाराजांची समाधी, कोरेगाव पासून पाच कि.मी. आत.

तुळापुर : भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांचे संगम स्थान.
फुलगाव : श्रुतीसागर आश्रम.

अहमदनगर मार्गावरील ठिकाणे : शिरूर- प्राचीन श्री रामलिंग मंदिर.

निघोज : कुकडी नदीच्या पत्रात कुंडच्या आकाराचे नैसर्गिक खळगे. श्री मळगंगा देवीचे जागृत स्थान.

ओझरचा विघ्नेश्वर -सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धा...
05/10/2012

ओझरचा विघ्नेश्वर -

सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला. अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरु केला. ही वार्ता इंद्रास कळताच त्याने यज्ञात विघ्न आणण्याची विघ्नसुरास आज्ञा दिली. विघ्नसुर केवळ यज्ञाचा नाश करून थांबला नाही तर त्याने सर्वच देव व धर्माला आव्हान दिले. देवांनी संकट दूर करण्यासाठी गणेशाची आराधना केली. मग गणेशाने पराशर ऋषींचा परत्र म्हणून येथे अवतार घेतला व विघ्नेश्वराचा वध केला. माझे नाव धारण करून आपण येथेच राहावे ही विघ्नेश्वराची प्रार्थना गणेशाने स्वीकारली व ते येथे विघ्नेश्वर नावाने राहिले. चिमाजी आप्पांनी वसईच्या लढ्यात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ट्रस्ट कडून दरवर्षी नाममात्र दरात तीनशे सामुदायिक विवाह येथे लावले जातात. तसेच गजानन सागरात नौका विहाराची सोय करण्यात आलेली आहे. अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेश द्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे. देऊळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन
डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो .

स्थान : तालुका- जुन्नर, जिल्हा पुणे, पिन.को. ४१० ५०४
अंतर : पुणे - नाशिक राष्ट्रीय मार्ग क्र. ५० वरील नारायणगावच्या पश्चिमेस.

नारायणगाव - ओझर १२ कि.मी.

ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी.

ओझर ते सिद्धटेक १८० कि.मी.

ओझर ते पाली १७५ कि.मी.

ओझर ते मोरगाव१५० कि.मी.

ओझर ते रांजणगाव ११० कि.मी.

ओझर ते महाड १३५ कि.मी.

ओझर ते थेऊर १३२ कि.मी.

ओझर ते भीमाशंकर ७० कि.मी.

ओझर ते शानिशिंगणापूर १४५ कि.मी.

ओझर ते पुणे ८५ कि.मी.

ओझर ते कल्याण ११८ कि.मी.

कल्याण ते मुंबई ६४ कि.मी

जवळची ठिकाणे :
आळे : पैठण येथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले त्या रेड्याची समाधी.
आर्वी : उपग्रह केंद्र.
खोडद : आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण.

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक स्थान.

लेण्याद्रीचा गिरिजात्मज - या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त...
05/10/2012

लेण्याद्रीचा गिरिजात्मज -

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत १५ वर्षे गणेशाने येहते वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे. येथे एकूण २८ लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात. ६ व्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस जाण्यासाठी ३२१ पाय-या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परीसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात पुरा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.
जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्माजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पाय-या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे
आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

स्थान : पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा - पुणे, पिन.को. ४१० ५०२
अंतर : मुंबई - कल्याण - माळशेज घाट - मढ - लेण्याद्री १८० कि.मी.

पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १२० कि.मी.

जुन्नर- लेण्याद्री ७ कि.मी.

नाशिक - आळेफाटा - ओतूर -लेण्याद्री १४० कि.मी.

अहमदनगर - आळेफाटा - ओतूर - लेण्याद्री १०० कि.मी.

जवळची ठिकाणे : ओतूर- पुरातन कोपर्दीकेश्वर मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य स्वामी यांची संजीवन समाधी.

माळशेज घाट : थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य.

शिवनेरी किल्ला : शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.

कुकडेश्वर : कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर.

नाणेघाट : प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट.

‘त्रिगुण’तर्फे तीर्थयात्रेची अपूर्व संधीअष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची तीर्थस्थळे आहेत. स्थानमहात्...
04/10/2012

‘त्रिगुण’तर्फे तीर्थयात्रेची अपूर्व संधी

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची तीर्थस्थळे आहेत. स्थानमहात्म्य असलेले अष्टविनायक व त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील तीर्थयात्रेची अपूर्व अशी संधी त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सने भाविकांना उपलब्ध करून दिली आहे.
संप्रदायांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात दत्तसंप्रदायातील थोर संत व दत्ताचे तिसरे ब्रह्मरूप पुर्णावतार श्री स्वामी समर्थ, श्री नृसिंहसरस्वती, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली तुळजाभवानी आणि विठोबा-रखुमाई या दैवतांशी नाळ जोडलेले भाविक आहेत. याचबरोबर अष्टविनायकाचीही महती सर्वज्ञात आहे. या सर्व ठिकाणांना एकाच वेळी भेट घेऊन दर्शन घेण्याची सलग संधी मिळत नाही. भाविकांची हीच अडचण लक्षात घेऊन त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सने अष्टविनायक त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे जेणेकरून भाविकांचा हेतू साध्य होईल. त्रिगुणतर्फे दर महिन्यास या तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही यात्रांसंदर्भात अधिक माहितीसाठी त्रिगुण टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सला ९८३३९९२६९९/०२२-२८२२०३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

थेऊरचा चिंतामणी - येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. कपिल मुनींजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्य...
04/10/2012

थेऊरचा चिंतामणी -
येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. कपिल मुनींजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गणासूर त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंच पक्क्वन्नाचे जेवण दिले. हे पाहून गणसुर स्तंभित झाला. त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिल मुनींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गानासुराने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली. विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानासुराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात ते रत्न बांधले. तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले. गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही ऐकिवात आहे. या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रुपात त्यांना दर्शन दिले.

मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.

स्थान : तालुका - हवेली, जिल्हा- पुणे, पिन. को. ४१२ ११०
अंतर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून जवळ.

पुणे -हडपसर- लोणी- थेऊर फाटा २०, थेऊर फाटा ते थेऊर ५, पुणे २५.

थेऊर - केसनंद -वाघोली - पुणे ३०.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-रांजणगाव ४४.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-तळेगाव -खापोली-महाड व पाली ९९.

थेऊर-केसनंद-लोणीकंद-आळंदी-चाकण-नारायणगाव ते ओझर व लेण्याद्री १०९ कि.मी.

दौंड मार्गावरील दर्शनीय ठिकाणे:

उरुळीकांचन : म. गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र.

भुलेश्वर : पुरातन कलात्मक शिवमंदिर.
केडगाव बेट : नारायण महाराज यांचा आश्रम व दत्ता मंदिर.

लोणीकंद-आळंदी मार्गावरील दर्शनिय ठिकाणे:

फुलगाव : स्वामी स्वरूपानंद स्थापित भीमे वरील गुरुकुल पद्धतीचा श्रुतीसागर आश्रम व वेदांत रिसर्च सेंटर.

तुळापुर : भीमेकाठी पुरातन संगमेश्वर मंदिर. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक. नौका विहाराची सोय.

मरकळ : भीमेकाठी विपश्यना केंद्र व नौका विहार.

महडचा वरदविनायक - गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रश्त्ये व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्त...
04/10/2012

महडचा वरदविनायक -
गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रश्त्ये व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.
स्थान : तालुका खालापूर, जिल्हा रायगड, पिन.को. ४१० ०२०

अंतर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर खालापूर व खोपोलीदरम्यान हाळ या गावाजवळ.

खालापूर-हाळ १ कि.मी.

खोपोली-हाळ ३ कि.मी.

हाळ-महाड १ कि.मी.

पाली-४० कि.मी.

ओझर-लेण्यान्द्री १५० कि.मी.

पालीचा बल्लाळेश्वर - बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद्गुल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापा-याचा बल्लाळ हा सुपुत्र. बालप...
03/10/2012

पालीचा बल्लाळेश्वर -


बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद्गुल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापा-याचा बल्लाळ हा सुपुत्र. बालपणापासून त्याची विनायकावर श्रद्धा होती. त्याने गावातील इतर मुलांनाही भक्ती मार्गास प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष्य होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले. व बल्लाळाचे हाल करून त्यास झाडाला टांगून दिले. बल्लाळाने गणेशाची आराधना केली. गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छानुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले. व बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली हीच ती मूर्ती. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथील बल्लाळेश्वराची पूजा सकाळी ११.३० पर्यंत स्वहस्ते करता येते. माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.
रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभा-यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणा-या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभा-याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चव-या ढाळीत आहेत.

स्थान : तालुका सुधागड, जिल्हा रायगड, पिन.को.-४१० २०५

अंतर : पाली-खोपोली ३८ कि.मी., पुणे १११ कि.मी., मुंबई १२० कि.मी.

पुण्यास जाण्यासाठी आता दोन मार्ग आहेत. एक खोपोली मार्गे व दुसरा ताम्हाणे घाटातून मुलाशी मार्गे.

जवळची ठिकाणे : मंदिराजवळ सरसगड किल्ला.

सिद्धेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान (३ कि.मी.)

उन्हेरे : गरम पाण्याचे झरे

उद्धर : रामाने जातायुचा उद्धार केलेले स्थान (१० कि.मी)

रामेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान. येथील अस्थी कुंडात टाकलेल्या अस्थी पाण्यात विरघळतात.

सुधागड : किल्ला. भृगु ऋषीने स्थापन केलेले भोराई देवीचे मंदिर.

गोमाशी : भृगु ऋषीचे तपश्चर्येचे स्थान (१४ कि.मी.)

ठाणाळे : लेण्या.

उत्तर वरदायिनी : देवीने रामास वर दिला ते ठिकाण (१० कि.मी.)

जांभूळपडा : सिद्धलक्ष्मी मंदिर. दशभुजा व उजव्या सोंडेची जागृत गणेश मूर्ती. (खोपोली मार्गावर १५ कि.मी.)

पुई : एकवीस गणेश मंदिर.

पाच्चापूर-भोराई : भोराई किल्ला व देवीचे मंदिर.

सिद्धटेकचा सिद्धिविनायक - भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणू...
03/10/2012

सिद्धटेकचा सिद्धिविनायक -
भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणा-या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभा-यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभा-यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.

स्थान : तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

अंतर : अहमदनगर-पारगाव फाटा-श्रीगोंदा-सिद्धटेक ८२ कि.मी.

अहमदनगर-रुइछत्तिसि-श्रीगोंदा-सिद्धटेक ८९ कि.मी.

अहमदनगर-कर्जत-राशीन-सिद्धटेक १०७ कि.मी.

पुणे-भिगवण-राशीन-सिद्धटेक १४२ कि.मी.

पुणे-दौंड-पेडगाव-सिद्धटेक ११४ कि.मी.

पुणे-दौंड-शिरापूर ९९ कि.मी. पुढे एक किलोमीटर पायी रस्ता व भीमा नदीतून नावेने सिद्धटेक. मात्र जिल्हा बदल असल्यामुळे नावेची वाहतूक एकेरी आहे.

जवळची ठिकाणे : पेडगाव : किल्ला व भीमेकाठाची प्राचीन मंदिरे

श्रीगोंदा : ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार महान संत शेख महम्मद महाराज यांची समाधी

राशीन : देवाचे मंदिर व झुलती दीपमाळ

रेहेकुरी : अभयारण्य

भीगवण : पक्षी अभयारण्य

मोरेश्वर : श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांप...
03/10/2012

मोरेश्वर :
श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांपैकी हे आद्यपी. या स्थानाचे महात्म्य मुद्गुल पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरून ब्रम्हा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पिठाची स्थापना केली. या स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू व कमलासुर दैत्याचा संहार केला. या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते. त्यावरून येथील गणेशास मयुरेश्वर वा मोरेश्वर असे म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्म स्थान. येथे क-हा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे. वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून येथे येते. चारशे वर्ष पूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना २२८ वर्षाचे आयुष्य लाभले. येथील त्यांची समाधी व ध्यान मंदिर दर्शनीय आहे. मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी ’सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती उत्स्फुर्तपणे रचली. येथील विजया दशमीचा उत्सव रात्रभर चालतो. उत्सवात गणेशास तोफांची सलामी दिली जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

पुरंदर तालुक्यात क-हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पाय-या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पाय-या चढून गेल्यावर एका दगडी चौथर्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात य बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत.

स्थान : तालुका बारामती, जिल्हा पुणे, पिन.- ४१२ ३०४

अंतर : पुणे-सासवड-मोरगाव ६४, पुणे-चौफुला-मोरगाव ७७, मुंबई २२५ कि.मी.

जवळची ठिकाणे : जेजुरी-खंडोबाचे देवस्थान,

लावथालेश्वर : येथील शिवमंदिरात समर्थ रामदासांनी शंकराची आरती रचली. हे ठिकाण जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.

साकुर्डे : पुरातन मंदिर,

सासवड : सोपानदेवांची समाधी, पुरातन मंदिरे, आचार्य अत्रे स्मारक

बोपगाव : कानिफनाथाचे मंदिर

नारायणपूर : नारायण महाराज आश्रम व दत्तमंदिर

पुरंदर किल्ला

भुलेश्वर : प्राचीन शिवमंदिर

बेत केडगाव : श्री नारायण महाराज माठ व दत्तमंदिर

कारंजे : सोमनाथ मंदिर

03/10/2012

‘त्रिगुण’तर्फे दर महिन्याला आयोजित तिर्थ यात्रा अष्टविनायक :
महाराष्ट्रातील आठही मंदिरे अंतराच्या दृष्टीने जवळपास आहेत. केवळ आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, व लेण्याद्री येथे पाच गणपती
आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे दोन गणपती असून अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे एक गणपती आहे.

Address

21/E, Bhaidas Bhutta Compound, Near New Apollo Ind. Estate, Nagardas Cross Road, Mogra Pada, Andheri (E)
Mumbai
400069

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trigun Tour & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category