Siddhivinayak Tours And Travels

Siddhivinayak Tours And Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Siddhivinayak Tours And Travels, Tour Agency, Kurar Village Malad East, Mumbai.

15/08/2022

कै.विनायकराव मेटे यांच्या गाडीच्या अपघाताच्या अनुषंगाने...

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?
मी स्वतः मागच्या 15 दिवसाखाली या स्थितीतुन गेलो आहे, दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर-जालना मार्गावर हाच प्रत्येय आला
सिंदखेडराजा जवळ जेवण करून गाडी चालवत होतो ac फुल स्पीड वर चालू होती
समोरच्या स्कारपीओ च्या मागे चालत असतांना नकळत नजर शुन्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला
नशीब गाडीने line सोडली, पण पूर्णपणे रोड सोडला नाही, गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो..
काय घडलं हे कस झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतरच जे काही घडलं ते आठवण अत्यंत धूसर होतं
- रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते.
- रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
- रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
- रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.
- रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
- लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो.
- वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
- रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
- चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
- डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे.
- गाडी चालवता चावलता ब्ल्यांक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा.

तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जिवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू नका

23/10/2021

वाहतूक व्यवस्था ही मानवी आयुष्यातील दळणवळण साठी सर्वात महत्त्वाची व्यवस्था आहे. पण सद्यस्थितीत तेलाचे वाढलेले भाव , त्यामध्ये पेट्रोल , डिझेल याचे भाव गगनाला भिडले आहेत.
स्वतःची गाडी प्रवासाला घेऊन जायची तर 100 वेळा विचार करावा लागतो. रिक्षा , टॅक्सी , ओला , उबेर अनेक संघटना आहे.पण जे लोक प्रवासी कार ( ट्युरिस्ट) चालवितात. त्याना कोणी वाली नाही, अस म्हणावं लागेल.
एकतर या प्रवासी ( ट्युरिस्ट) गाड्या चालविणाऱ्या कार चालकांची कुठलीही संघटना नाही. प्रवास भाडे कसे घ्यावे याचा कोणताही नियम नाही. त्यात कोणी ओळखीचा असेल तर प्रतिकिलोमीटर रेट कमी लावला जातो. बाकी रेट एक म्हणावा म्हणून ठरलेला आहे.
आज अनेक प्रवासी ( ट्युरिस्ट) गाड्या घेतलेले युवक बेरोजगार झाले आहेत. याला अनेक कारण आहेत. मुख्य म्हणजे चार वर्षे झालेली खाजगी वाहने भाडे तत्वावर कंपनीला लावू शकत नाही. हा नियम कंपनीतील लोकांनी काढला आहे.
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.एखादी व्यक्ती 10 ते 12 लाखाचे कर्ज काढून स्वतःची गाडी घेतो.त्यामागे त्या व्यक्तीचा एवढा उद्देश असतो. आपण स्वतःहा गाडी चालवून काही कमाई करावी. सर्व साधारण व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःची गाडी घेते. बँक लोण घेतल्यानंतर कमीत कमी 4 वर्षे किंवा जास्तीत जास्त 5 वर्षे लोण चालू राहत. 10 ते 12 लाखाची गाडी घेतल्यावर, बँक लोण मोठया प्रमाणावर घ्यावे लागते. बँकेचा येणारा हप्ता , पेट्रोल , किंवा डिझेल , महिन्याकाठी गाडीचा मेंटेनन्स या सर्व गोष्टी पाहता बऱ्याच वेळा प्रवासी ( ट्युरिस्ट) कारचालकाच्या हाती काही शिल्लक राहत नाही.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी घेतलेल्या गाड्या विकून टाकल्या तर काही लोकांच्या गाड्या बँकेकडून जप्त करण्यात आल्या. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चार वर्षे धंदा करून 10 ते 12 लाख रुपये वसूल कसे होतील.
ज्या लोकांनी 5 ते 6 लाख रुपयांच्या गाड्या घेतल्या ते पण मेटाकुटीस आले.
प्रवासी ( ट्युरिस्ट) कार वाल्यांचे कोणतेही युनियन नसल्याने त्याना वाली कोणी नाही. गाड्याचे दरपत्रक निश्चित नाही. त्यामुळे काही ठिकाणी चांगले भाव मिळतात. तर काही ठिकाणी भाव तोडले जातात. याला कारणही प्रवासी (ट्युरिस्ट) वाहन चालक आहेत. घरी बसून राहण्यापेक्षा चार पैसे कमी मिळाले तरी चालतील या अपेक्षेप्रमाणे ते भाडी घेतात.मग त्या भाड्यामध्ये त्याना चार पैसे नाही सुटले तरी चालतील.पण महिन्याला येणारा बँकेचा हप्ता कसा भरावा हे त्यांच्यासाठी महत्वाचे असते.
आजच्या काळात घरकाम करण्याऱ्या महिला , रस्त्यावर गाडीचे पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीची संघटना आहे. पण प्रवासी ( ट्युरिस्ट)कार चालनाऱ्याची संघटना नाही.

दिवसेंदिवस वाढत जाणार इंधन यामुळे महागाई वाढत चालली आहे. नवनवीन कंपनीने स्वतःच्या गाड्या मार्केट मध्ये आणल्या आहेत. त्यामुळे प्रवासी ( ट्युरिस्ट) धंदा करणारे वाहक तोट्यात चालले आहेत. काही ठिकाणी कर्जाचा बोजा जास्त झाल्याने काही वाहक चालकांनी आत्महत्या केली आहे. याचा कधी कोणी विचार करत नाही.आज प्रवासी ( ट्युरिस्ट) वाहन चालकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सर्व प्रवासी ( ट्युरिस्ट) कार चालकांची एक संघटना बनवणं आवश्यक आहे. सर्वानी एकत्र येऊन एका छताखाली काम करणं आवश्यक आहे.
कंपनी नियमानुसार 4 वर्षे गाडी कंपनीला लावू शकतो. पण याच कंपनी वाल्याना हे माहीत नाही का? सरकार 8 वर्षे गाडीच परमिट देते.
चार वर्षे गाडी चालवली की ती जुनी झाली.पण गाडी कुठल्या कंडिशन मध्ये आहे हे तपासून बघणे गरजेचे आहे. या सर्वांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक गाड्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसतील. पण आपण घेतलेल्या गाड्या भंगारात विकायच्या का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नुतनीकरण आवश्यक आहे,काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गाड्या बाजारात आल्या आहेत. या गाड्या किती प्रमाणात चालू शकतात. यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन अजून पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत. त्याशिवाय या गाडी किती सुरक्षित आहेत. याचा कोणताही पाठ पुरावा नाही.
म्हणून सरकारने पेट्रोल , डिझेलवर चालणाऱ्या गाड्याचे प्रोडक्शन चालू ठेवावे की नको हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
सद्यस्थितीत चालणाऱ्या पेट्रोल , डिझेल , गॅसवर , चालणाऱ्या गाड्याना पर्यायी व्यवस्था करून द्यावी. चार वर्षे कंपनीला गाडी लावू शकतो , हा नियम शिथिल करावा. कमीत - कमी 8 वर्षे तरी गाडी कंपनीला लावण्यासाठी परवानगी दयावी.
खाजगी कंपनी म्हणजे ओला - उबेर सारख्या कंपनी आपल्या सोयीनुसार गाड्या चालवितात. त्यातून स्वतःचा भरमसाठ फायदा करून घेतात.पण खाजगी गाड्यांना मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे. यावर सरकारने जातीने लक्ष दयावा. यामध्ये ओला - उबेर सारख्या कंपन्या स्वतःहा जास्त प्रॉफिट कमवतात. याला कोणी विरोध करत नाही. गाड्या घेऊन घरी बसण्यापेक्षा काही तरी धंदा करून बँक लोण भरण्यासाठी आज ओला - उबेरला गाड्या लावत आहेत..
वाढती महागाई वाढणारे इंधनाचे दर यावर सरकारने अंकूश ठेवणे गरजेचे आहे. आज अनेक तरुण कामधंदा नसल्याने बेरोजगार आहेत. ज्यांनी खाजगी गाड्या घेऊन 5 ते 6 वर्षे झाली आहेत , त्या गाड्या धूळ खात पडल्या आहेत. सरकारने रिक्षा - टॅक्सी साठी भाडे धोरण आखून दिले आहे. त्याचप्रमाणे खाजगी गाड्या साठी दर निश्चित करून दयावे. त्यामुळे सगळीकडे प्रवास दर एकच राहील.
आज टॅक्सी साठी 24 रुपये मीटर आहे.पण प्रवासी ( ट्युरिस्ट) गाड्यासाठी 10 ते 15 रुपये मीटर भाडे मिळत नाही. कंपनी मध्ये लागनाऱ्या गाड्यांना खूप कमी प्रमाणात महिना पॅकेज दिल जात आहे.
प्रवासी (ट्युरिस्ट) गाडी घेताना , सरकारी नियमानुसार वाहतूक टॅक्स भरावा लागतो. पण हा टॅक्स पुढील 8 वर्षे भरावा लागतो. म्हणजे प्रवासी( ट्युरिस्ट) गाड्यांना हा टॅक्स भरमसाठ भरावा लागतो.
त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी प्रवासी ( ट्युरिस्ट) गाडी खाजगी करायची असेल तर त्याला गाडीच्या किमतीच्या 13% कर भरावा लागतो. याला आत्महत्या म्हणावी लागेल. प्रवासी गाडी घेऊन त्याला काही परवडत नसेल तर ती व्यक्ती गाडी स्वतःसाठी वापरते. पण त्यासाठी येणारा खर्च भरमसाठ आहे.

आज प्रवासी ( ट्युरिस्ट) कार चालक बांधवांना कळकळीची विनंती आहे. एकत्र या , सर्वानी मिळून आपला विकास करूया.आपल्या हक्कासाठी लढूया.तरच या आधुनिक जगात आपला निभाव लागेल. जस एक काठी कोणीही तोडू शकतो , पण दहा काठ्या एकत्र केल्या की त्या तोडता येत नाही. हेच उदाहरण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

- Tejas Pokharankar

Tourist Vehicle Owner DriverAapla contact no./Kiva naav Comment box madhe taka.
08/08/2021

Tourist Vehicle Owner Driver
Aapla contact no./Kiva naav Comment box madhe taka.

16/06/2021

Due to Increase in Fuel Prices revised rates are below for 7 seater A/C return journey:
Mumbai - Pune City - 7000
Mumbai - Ekvira - 5000
Mumbai - Nashik -Shirdi- 10000
Mumbai - Raigad- Dapoli - 8500
Mumbai - Virar - 2500
Mumbai - Palghar - 5000
Mumbai - Boisar - 5500
Mumbai - Surat - 12000
Mumbai - Kalyan-Dombivali, Badlapur - 4000
Mumbai - Mahabaleshwar - 8500
Mumbai - Lonavala - 5500
Mumbai - Pandharpur - 16000
Mumbai - Kankavli Sawantwadi, Kasal Kudal - 20000 (Home Drop)
Mumbai - Ratnagiri - 18000
Mumbai - Goa - 24000

Existing customers, friends, relatives's referrals will get 10% discount on above rates.

Waiting charges will be extra Rs.1000 per day if applicable.

Thanks & regards

Siddhivinayak Tours and Travels
9967119947

16/06/2021

New Revised Rates

तू वो है जीसके साथ मंजिल से ज्यादा सफर खुबसुरत लगता है!❤️
04/02/2021

तू वो है जीसके साथ मंजिल से ज्यादा सफर खुबसुरत लगता है!❤️

HAPPY DIWALI
14/11/2020

HAPPY DIWALI

08/06/2020

CAR available on hire for Office Pickup Drop.

Location : Andheri To Virar
Call on 9967119947

One more beauty added to family.
25/05/2020

One more beauty added to family.

Tuv 300
02/06/2019

Tuv 300

Address

Kurar Village Malad East
Mumbai
400097

Telephone

+91 99671 19947

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category