Ultimate destinations

Ultimate destinations At Ultimate Destinations we curate holidays to match with the interest and likings of our guests. We can proudly say, we are offbeat specialist.

Pleasant hill stations or barren mountains or lively beaches or our ancient temples.

Mr Vinayak Sabale enjoyed his offbeat Himachal trip. He shared his views on the same.
21/05/2026

Mr Vinayak Sabale enjoyed his offbeat Himachal trip. He shared his views on the same.

    बर्फात आणि बर्फाळ हवेत उधळून झाल्यावर केबल कार चे तिन्ही टप्पे पार करून आमच्या हॉटेल मध्ये  आलो आणि  गरम पाण्याच्या ...
08/05/2026





बर्फात आणि बर्फाळ हवेत उधळून झाल्यावर केबल कार चे तिन्ही टप्पे पार करून आमच्या हॉटेल मध्ये आलो आणि गरम पाण्याच्या स्विमिंग पूल मध्ये उतरलो. उबदार पाण्यात डुंबत समोरचे बर्फाळ पर्वत बघण्याची मजा काही वेगळीच. आता भूकही लागली. कझाकस्तानात प्रामुख्याने मांसाहार मिळतो. देश NOMADIC CULTURE म्हणजे भटक्या संस्कृतीचा असल्याने लोक मुख्यतः मांसाहारी आहेत. समूह करून राहायचे आणि आपल्या पाळीव जनावरांना भरपूर पाणी, हिरवा चारा मिळेल तिथवर प्रवास करायचा ही पूर्वीची जीवन पद्धती असल्याने मेंढी चे मटण, विविध पक्ष्यांची अंडी, घोड्याचे मांस, घोड्याचे दूध, उंटाचे दूध हे पदार्थ यांच्या आहारात असतात. उंटाच्या दुधाचे ताक तर प्रसिद्ध आहे. चिकनही मिळते. कॉन्टिनेन्टल, इटालियन, कोरियन आणि भारतीय पदार्थ अल्माटी शहरात भरपूर मिळतात. स्थानिक शाकाहारी पदार्थ असतातच. वेगवेगळी सॅलड्स, सूप्स, ब्रेड्स, बीन्स म्हणजेच राजमा आणि ताजे मासेही इथे मिळत असल्याने माझे उदरभरण अगदी आनंदात झाले. इथली सॅलड्स मला विशेष आवडली. चवदार ताज्या भाज्या आणि काकडी, टोमॅटो आणि ताजी फळे घालून सुंदर सॅलड्स बनतात. फळांच्या चवीचे दही असतेच. इथले ताजे ब्रेड सुद्धा छान होते. एका रेस्टॉरंट मध्ये मला ब्रेकफास्ट साठी ताजा ब्रेड, बटर, त्यावर विविध फळांच्या फोडी घालून दिल्या. जोडीला हॉट चॉकलेट. बर्फाळ हवेत छान वाटलं हे कॉम्बिनेशन. एका ठिकाणी चक्क स्टीम्ड राईस आणि बीन्स इन टोमॅटो सॉस मिळाला. म्हणजे आपला राजमा चावल हो. जोडीला दही. मी खुश !! एकूण काय, तुम्ही शाकाहारी आहात म्हणून इथे काय खाऊ असा विचार करण्याची गरज नाहीये. नॉनव्हेज प्रेमींसाठी तर अख्खे मेन्यूकार्ड असतेच. विविध चविष्ट प्रकार असतात खाण्याचे.
तिथल्या बर्फाळ थंडीत चहाचे वेगवेगळे प्रकार पिऊन बघितले. पाण्यात छानशा फळांचा स्वाद,आणि जोडीला ताजे हर्ब्ज घालून गरमागरम पिऊन थंडी पळवून लावायचो आम्ही. सी बकथॉर्न टी विशेष आवडला आम्हाला. बऱ्याचदा जेवताना पाण्या ऐवजी गरम सी बकथॉर्न टी घेतला. फेब्रुवारी महिन्यात गंगोत्रीला सी बकथॉर्न ची फळं चाखून बघितली होती. अल्माटी मध्ये त्याचा चहा पीत होते !! चहा कसला, कढत पाण्यातल सरबतच !! चव मात्र एक नंबर !!

अल्माटी शहरात कॅफे खूप आहेत. रंगीबेरंगी फुलांजवळ आटोपशीर टेबल खुर्च्या मांडलेल्या असतात. संध्याकाळी काही कॅफे मध्ये संगीत सुद्धा असतं. काही समजत नाहीच पण वातावरण प्रसन्न असतं. तुमच्या आवडीचा चवदार पदार्थ घेऊन निवांत आस्वाद घेत बसा. कितीही वेळ बसा, कोणी तुमची शांतता भंग करायला येत नाही. स्वतः एका जागी बसून, धावणारे रस्ते बघायला मला आवडतं, त्या मुळे आम्ही बऱ्याचदा अशा सुंदर कॅफे मध्ये गेलो. कोलसाई लेक ला जाताना एका कॅफे मध्ये गेलो, तो चक्क उंच डोंगराच्या माथ्यावर होता. पायऱ्या चढून वर गेलो आणि काय, दाट जंगलानी व्यापलेले डोंगर. मध्येच बर्फ चमकतोय. आम्ही ओपन रेस्टॉरंट मध्ये जेवण्याच ठरवून आधी बसून घेतलं. लंच विथ व्हियू !!

मी गेले तेव्हा, फुलं उमलायची सुरुवात होती. प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक पार्क मध्ये विविध रंगी ट्युलिप फुलले होते. रंगांची उधळण बघून प्रसन्न वाटलं. एवढे ट्युलिप बघितले इथे की आपलं श्रीनगरच ट्युलिप गार्डन लहान वाटू लागलं. सफरचंद, चेरी आणि पीच फुले इथेही होती. दुसऱ्या एका पार्क मध्ये भलामोठा तलाव आपल्या स्वच्छ पाण्यात विविध मासे आणि राजहंसाची जोडी राखून होता. तलावाच्या एका कोपऱ्यात सुरेख गुलाबी फुलांनी चेरी ब्लॉसम साजरा करणारा वृक्ष होता. तो कोपरा नाजूक गुलाबी पाकळ्यांनी सजला होता. वाऱ्याची झुळुक झाडावरील गुलाबी पाकळ्या अलगद जमिनीवर आणत होती. प्रेमात पडले मी त्या गुलाबी कोपऱ्याच्या !!! काश्मीर मध्ये उगवणाऱ्या काही वनस्पती आणि फुले इथेही दिसली. साहजिक आहे, कझाकस्तान काश्मीर पासून अवघा दोन देश दूर आहे. माती पाणी उजेड वारा दोन्हीकडे सारखाच आहे. माझं आवडतं काश्मीर तिथेही भेटलंच मला.

इथले पार्क्स एवढे सुंदर आणि मोठे आहेत की चालायची आवड असेल तर तुम्ही ३-४ तास एकाच पार्क मध्ये सहज घालवाल. लोकं शांतपणे पुस्तकं वाचत बसतात इथे. प्रत्येक वयोगटातील लोकं इथे शांतता अनुभवत बसलेले दिसले मला. कुणी पुस्तक वाचतय, कुणी डोळे मिटून बसलय, कुणी फुलं निरखत चालतंय, अगदी छोट्या बाळाला आजी आजोबा घेऊन आलेत बागेत आणि ते मूल कोवळ्या उन्हात शांत झोपलय. जीवनाची किती सुंदर ओळख होतेय मुलांना. असेच शिकत असतील ते हिरवाई जपायला. पुन्हा जाईन तेव्हा मीही पुस्तक वाचत बसेन पॅनफिलाव पार्क मध्ये. किती मूलभूत गरज आहे ही. निसर्ग आणि आपण एकच आहोत. निसर्गापासून दूर होण्यात आपलं नुकसानच आहे. झाडाच्या थंड सावलीत बसण्यात आणि AC मध्ये बसण्यात फरक जाणवतो ना आपल्याला ? भरपूर वृक्षराजी, बसण्यासाठी स्वच्छ जागा, थंडगार हवा, सतत ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल, चालण्यासाठी आखीवरेखीव रस्ते, ते रस्ते स्वच्छ ठेवणारी लोकं आणि जोडीला प्रसन्न वातावरण. अजून काय लागतं एका भटक्याला..

      कझाकस्तान :एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, युद्धाच्या धामधुमीत मी कझाकस्तान मध्ये होते. ‘ ASTANA’  ही इथली राजधानी. म...
04/05/2026





कझाकस्तान :

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, युद्धाच्या धामधुमीत मी कझाकस्तान मध्ये होते. ‘ ASTANA’ ही इथली राजधानी. मध्य आशियात असलेला कझाकस्तान, जगातील ९ वा मोठा देश आहे. कझाकस्तान चा अर्थ आहे, Land of Wanderers/ Land of Nomads. ही भटक्या लोकांची भूमी आहे. पूर्वी इथले लोक अन्न पाण्याच्या शोधात आपल्या कुटुंब आणि पाळीव जनावरांसह, विस्तीर्ण पसरलेल्या ( steppes ) गवताळ प्रदेशात फिरत. कझाकस्तान हा देश रशिया, चीन, किरघिस्थान, उझबेकीस्थान, आणि तुर्कमेनिस्तान या देशांनी वेढलेला आहे. चीन वगळता इतर देश पूर्वी सोविएत युनियन मध्ये होते, १९९१ मध्ये हे सर्व देश स्वतंत्र झाले. आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांच्या सीमेवर असल्याने कझाकस्तानला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. भौगोलिक स्थानामुळे याला युरेशिया देखील म्हणतात. कझाकस्तान मध्ये, भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला विस्तीर्ण गवताळ प्रदेश ( steppes ), तिएन शान तसेच अल्ताई या अती उंच बर्फाच्छादित पर्वत रांगा, हिमनद्या , glacial lakes , विविध रंगांची उधळण करणारे वाळवंट तसेच cannyon देखील आहेत. जसे अमेरिकेत GRAND CANNYONS प्रसिद्ध आहेत तसेच कझाकस्तान मधले CHARRYN CANNYON प्रसिध्द आहे. Charryn नदीच्या प्रवाहाने वर्षानुवर्षे इथले पर्वत पोखरून त्यांना आलेले विविध आकार बघण्यासारखे आहेत. इथली माती विविध रंगांची आहे.

आपला प्राचीन Silk Route म्हणजे व्यापारी मार्ग या देशातून जातो. पूर्वापार रेशीम, मसाले, कापूस आणि दागदागिने याच रेशीम मार्गावरून भारतातून चीन मध्ये आणि पुढे मध्य आशियातून युरोपात जायचे. या देशाचे वातावरण, निसर्ग सौंदर्य युरोप सारखे आहे.बर्फाच्छादित हिमशिखरे, हिरवीगार pine forests, निळ्याशार पाण्याने चमकणारे मोठे लांबरुंद तलाव, सुंदर रस्ते आणि अत्याधुनिक शहरे. इथली उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच देशभर पसरलेले रेल्वे चे जाळे आपला प्रवास सुकर करते. तिकीट आधी आरक्षित करावे लागते. भारतातून इथे ४:३० तासात थेट विमानाने पोचता येते. सध्या भारतीय जनतेसाठी हा देश VISA- FREE आहे.

मुंबईहून थेट विमानाने मी Almaty एअरपोर्ट वर उतरले. उतरल्या वर लगेच बर्फाच्छादित हिमशिखरे दिसतात.त्याच्या मोहात न पडता Immigration साठी जायचं. नाही तर फार गर्दी होते. आम्ही गेलो तेव्हा युद्ध ऐन भरात असल्याने फारशी गर्दी नव्हती. Immigration clearance होऊन bags घेऊन बाहेर आले. एअरपोर्ट वर लोकल सिम कार्ड घेतले, थोडे डॉलर्स कझाकस्तानच्या Tenge म्हणजे local currency मध्ये बदलून घेतले. तो पर्यंत मी आधीच बुक केलेली टॅक्सी आली. गुळगुळीत रस्त्यावरून टॅक्सी धावताना रस्त्याकडेला लाल केशरी tulips दिसले. माझ्या इंग्लिश बोलणाऱ्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला विनंती केली. गाडी थांबवून तो म्हणाला तुला इथे खूप ट्युलिप दिसतील. इथे येताना काय बघायचे, कुठे राहायचे हे आधी ठरवले होते. त्यानुसार आम्ही निघालो सुप्रसिद्ध Shymbulak साठी. इथले गुलमर्ग आहे म्हणा ना. मात्र इथला पर्वतांचा विस्तार मोठा आहे. Almaty शहरापासून Shymbulak ३६ किलोमीटर वर Altau पर्वतरांगेत वसलेले आहे. जादुई जागा आहे ही. शहरातून जाताना घरांच्या आवारातली सफरचंद, जर्दाळूचा पांढरा गुलाबी फुलोरा आलेली झाडं दिसत होती. माझा चेहरा बघून ड्रायव्हर लगेच म्हणाला, " We can't stop here to check the flowers. I will take you to my village. You will see lots of Apples and Appricot flowers there" मी खुश होऊन ओके म्हटलं. मला पुन्हा एकदा, मी ट्रॅव्हल कन्सल्टंट असण्याचा आनंद झाला. सफरचंद, जर्दाळू, पीचेस, चेरी ची फुले पहायला मला फार आवडतात.

शहर संपून, डोंगर सुरू झाले आणि शुभ्र बर्फाचे दर्शन झाले. घुमावदार रस्ते, आणि सर्वदूर पसरलेले शुभ्र बर्फ. पायथ्यापासून अगदी शिखरावर घेऊन जाणाऱ्या केबल कार, पर्वतांचे सरळसोट उतार आणि त्या उतारा वर स्वतःला झोकून देणारे skiers. आपल्या गुलमर्ग पेक्षा बरीच मोठी वाटली ही जागा. इथला केबल कार चा प्रवास जवळ जवळ अर्ध्या तासाचा आहे. हॉटेल मध्ये पोचून सामान टाकले. लंच करून लगेच निघालो केबल कार साठी. गर्दी नसल्याने लगेच तिकीट मिळाले आणि आमची उत्सुकता वाढायला लागली. आम्ही आधी सर्वात वरच्या बाजुला जायचे ठरवले. वर पोचलो आणि भान हरपून गेलं की. चोहोबाजूंनी वर चढत जाणारी डोंगररांग, त्यावर प्रचंड बर्फ, जोरदार वारे.. आम्ही बर्फात बसणे, चालणे, बर्फ उडवणे, बर्फात झोपणे, पर्वतरांगा शांतपणे पहात राहणे, फोटो, व्हिडिओ काढणे सर्व काही केलं. तीन तास कसे गेले समजल नाही. बर्फाळ वाऱ्यांनी गारठा अधिकच वाढला होता.. अचानक ढग दाटून आले आणि आता पाऊस येतो की काय अशा विचारात आम्ही असताना snowfall सुरू झाला. आकाशात ढग, खोल दरीच्या पोटातून वर वर येणारे दाट शुभ्र धुके आणि snowfall !!! दिल खुश हो गया !

तनुजा दप्तरदार

27/04/2026

Sach Pass Expedition 2026!!

What is Sach Pass :
It's a high-altitude mountain pass located in the Pir Panjal range of the Himalayas, within the Chamba district of Himachal Pradesh, India.
​It sits at an elevation of approximately 4,420 meters (14,500 feet) and serves as the most direct link between the Chamba Valley and the remote Pangi Valley.

We plan to explore the mighty Sach Pass during 30 th May - 5 th June.

The expedition across the Saach Pass and into the Pangi Valley is a rare opportunity to witness landscapes that remain largely untouched by mainstream tourism.

Here are the defining highlights of this journey:

*The Great Snow Walls
Crossing the pass in the early season offers a surreal experience of driving between towering corridors of ice.

*Vertical Cliffs: In early summer, the road is carved through snow walls that can reach heights of 10-20 feet.

*Glacial Streams: The route is famous for its "waterfall crossings," where clear glacial melt flows directly over the road, creating a raw and adventurous driving environment.

The Pangi Valley Isolation
*Descending from the pass brings you into one of the most secluded inhabited areas in the Himalayas, where life moves at a different pace.

*Cultural Preservation: The Pangi Valley is home to the Pangwal people, whose unique traditions, architecture, and wooden temples have been preserved by the valley's geographical isolation.

*Ancient Deodars: The region is dense with thick forests of cedar and pine, offering a lush contrast to the stark, rocky peaks of the high pass.

Why choose us as your travel partner :

*Your safety is our priority. Our drivers are locals who know the region thoroughly.
* We have a strong local offline network to ensure smooth operations.
* Our planning process is a blend of precision and passion, ensuring that every detail is handled with the care it deserves.

We believe that the most profound journeys happen in silence, not in crowds. To truly experience the spirit of the frontier, we keep our expeditions intimate. That's the reason we keep our group size very small. At the same time it gives you benefits of shared costs.

PS : Check the video to see how BRO is working to open the Sach Pass for passionate travellers.

Contact us to know more about this expedition.

Lake Kolsai is known as 'the pearl of the Northern Tienshan 'This beautiful lake is situated  approx 350 km from Almaty....
22/04/2026

Lake Kolsai is known as 'the pearl of the Northern Tienshan '
This beautiful lake is situated approx 350 km from Almaty.
Kolsai Lake is a system of three alpine lakes in the high mountains. They are famous for their crystal clear waters and the dense Spruce forest surrounding them. I fell in love with the lake and surrounding forest the moment I saw it.

Buransh flowers announce that Spring has arrived in the Himalayas. As the winter takes backstage, the rugged valleys of ...
17/03/2026

Buransh flowers announce that Spring has arrived in the Himalayas. As the winter takes backstage, the rugged valleys of Uttarakhand Himalayas turn crimson. The vibrant colours of rhododendron not just blooms, they announce the return of spring across the high altitude wilderness.
It's a festival of spring. It's a festival of colours.
Contact us to know more about this place.

Highlights of Winter Gangotri Trip.We saw flowers, various shades of blue  and green waters of Bhagirathi river, and we ...
21/02/2026

Highlights of Winter Gangotri Trip.
We saw flowers, various shades of blue and green waters of Bhagirathi river, and we witnessed sunrise and sunsets in the mountains. Golden rays on snowy peaks leaves you mesmerized.
Icy winds and bone chilling cold is a thing to experience. Then only you appreciate the warmth of a hot cup of ginger tea.


Address

Mumbai
401107

Telephone

+919322417795

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ultimate destinations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ultimate destinations:

Share

Category