Pandharpursafari

Pandharpursafari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pandharpursafari, Tour Agency, new Street stand, Pandharpur.

01/03/2018

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*होळीच्या पवित्र अग्निमध्ये,*
*निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,*
*अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.*
*होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !*
💐💐💐💐💐💐💐💐
pandharsafari

नमस्कार मंडळी ,पंढरपूर म्हणजे उभ्या  महाराष्ट्रच माहेरघर ! परब्रम्ह पांडुरंगाच्या भेटीला येण्यासाठी  अवघा महाराष्ट्र आतु...
26/02/2018

नमस्कार मंडळी ,

पंढरपूर म्हणजे उभ्या महाराष्ट्रच माहेरघर ! परब्रम्ह पांडुरंगाच्या भेटीला येण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर असतो. युगे अत्ठ्ठावीस विटेवरी उभे राहून भक्त वत्सल भाविकांना पदस्पर्श दर्शन देणारा हा एकमेव देव . म्हणूनच पंढरपुरचे आकर्षण आणि भक्ती कैक पटीने वाढते . वारकरी संप्रदायाचे हे माहेर आता देशोदेशीच्या पर्यटकांनाही खुणावू लागलय . केवळ वारकरी नव्हे तर देशी - विदेशी पर्यटक , संशोधक , धार्मिक पर्यटन करणारे आजी - आजोबा ,संस्कृती समजून घेऊ इच्छिणारे नवयुवक आणि दर्शनासह पंचक्रोशीच्या कुशीत वसलेली निसर्गरम्य स्थळे , वाटर पार्क , ऐतिहासिक ठिकाणे बाल पर्यटकांनाही खुणावत आहेत . म्हणून आता पंढरपूर म्हणजे " केवळ विठ्ठल " असे न राहता पंढरपूर - अकलूज - तुळजापूर - अक्कलकोट - गोदवले - गाणगापूर आणि चादर व शेंगाचटनी साठी प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक सोलापूर शहर असे विस्तृत पर्यटन डोळ्यासमोर येते .
पंढरीस येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माहेरसुख देण्यासाठी आम्ही सेवाक्षेत्रातील एक महत्वाकांक्षी पाऊल पुढे टाकत आहोत ." अतिथी देवो भवं '' हि आपली संस्कृती आहे . येथे येणारा प्रत्येक पर्यटक , भाविक स्वच्छता , सोयीची वाहतूक व्यवस्था ,उत्तम आहार , उत्तम निवास व्यवस्था , सोयीस्कर प्रवास आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त स्थळदर्शन हि अपेक्षा ठेऊन आलेला असतो .त्यांची प्राथमिकता हि श्री विठ्ठलाचे सुकर दर्शन हि असतेच परतू त्यांना इतर सोई सुविधा देखील तत्परतेने मिळाल्यास त्यांचे पंढरपूर चे तीर्थाटन हे सुखद होऊ शकते . याच भावनेने आमच्या पवित्र नगरीत येणाऱ्या प्रत्येक अतिथीला सर्व सुविधा मिळाव्यात या साठी आम्ही हे पोर्टल सुरु करीत आहोत . या माध्यमातून आपल्याला सोयीचा प्रवास , निवास , खरेदीचे मार्गदर्शन , ऐतिहासिक स्थळांच्या भेटी ची ठिकाणे , जवळच्या पर्यटनाची माहिती तसेच पंचक्रोशीतील तुळजापूर - गाणगापूर आदी देवस्थानाकडे जाण्याच्या सुविधा , प्रवास व्यवस्था , निवास व्यवस्था … अगदी सर्वच्या सर्व . तुमचे पर्यटन सुखद होण्यासाठी जे जे आवशक आहे ते सर्व आम्ही पुरविण्याचा प्रयत्न करीत आहोत .
आपाल्याला यापुढे श्री विठ्ठलाच्या भेटीचा जितका आनंद मिळेल तितकाच आमच्या पाहुणचाराचा हि मिळेल . असा आम्हाला विश्वास वाटतो .
Pandharpursafari
9028896566
9657482356

Address

New Street Stand
Pandharpur
413304

Telephone

+91 98288 96566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pandharpursafari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category