Sahyadri Motion Pictures

Sahyadri Motion Pictures As a traveler,we started our journey to explore Maharashtras Food, Culture, Historical Monuments, Fo

20/09/2021

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..

Location: Dapoli


27/08/2021
आतापर्यंतच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सह्याद्री मोशन पिक्चर्स आणि सहवास सह्याद्री ट्रेकर्स पुन्हा घेऊन येत आहेत Waterfal...
27/08/2021

आतापर्यंतच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सह्याद्री मोशन पिक्चर्स आणि सहवास सह्याद्री ट्रेकर्स पुन्हा घेऊन येत आहेत Waterfall rappelling 2021.

एकदा हा थरार नक्की अनुभव आमच्यासोबत ... येताय ना .. लवकर बुक्कीगसाठी संपर्क करा

तुमची सुरक्षा आणि आयुष्यातील थरारक अनुभव हेच आमचे ध्येय...

त्वरा करा .. संपर्क : वैभव वैती
9869182039
8369295906
9773132906

Inclusion:-
Lunch, breakfast and waterfall Rappeling Activity*

Advance :- 800/- per seat compulsory

With Transport Trek Cost :- 1500/-

Without Transport Trek cost :- 850/-

Itinerary:

*Meeting point:-*
*Dadar TT At 6am*.

*All will start travel together for Waterfall*

*On reaching base village, Jungle trek will start for the waterfall Rappeling point:-*

*Time 09am to 10am*

*Waterfall activity:- 10am to 1pm*

*Return to base village 1pm to 2pm*

*Lunch:- 2pm to 3pm*

*Return journey start to Mumbai 3pm to 6pm*

#

इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केल...
04/08/2021

इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केले होते.
अशाच काही शिवकालीन शस्त्रांची माहीती घेण्यासाठी नक्की पाहा व्हिडीओ आणि आवडल्यास Like करा , Share करा, Subscribe करायला विसरू नका.

अशा काही शस्त्रांची नावे-
* कट्यार
* कडाबिनी
* खंजीर
* खांड
* गदा
* गुरगुझ
* गोफण
* चाकू
* छडी
* जंबिया
* ढाल
* तलवार
* तिरकमठा(धनुष्यबाण)
* तोड्याची बंदूक
* तोफ
* दगडधोंडे
* निमचा
* दांडपट्टा
* पेषकब्ज
* फरीगदगा
* बरची
* बिचवा
* भाला
* वाघनखे
* विटा
* समशेर
* सुरा
* सोटा
भाला तलवार ढाल कुर्हाड गदा धनुष त्रिशूल चक्र वज्र

weapons us on facebook https://www.facebook.com/sahyadrimotionpicturesTalwar is an Indian...

कावनई किल्ला किल्ल्याचा दरवाजा आजही बर्याअपैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५...
19/04/2021

कावनई किल्ला
किल्ल्याचा दरवाजा आजही बर्याअपैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.




हरिश्चंद्रगडावरील पुष्करणी
17/04/2021

हरिश्चंद्रगडावरील पुष्करणी




हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. य...
16/04/2021

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.




देवबाग, संगम बीच येथील रमणीय संध्याकाळ देवबाग बीच हे कोकणातील सुंदर बीच आहे.तारकर्ली बीच पासून जवळच्या अंतरावर असलेलं हे...
15/04/2021

देवबाग, संगम बीच येथील रमणीय संध्याकाळ
देवबाग बीच हे कोकणातील सुंदर बीच आहे.तारकर्ली बीच पासून जवळच्या अंतरावर असलेलं हे देवबाग बीच. एक बाजूला कर्ली नदी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांना जोडलं गेलं आहे.म्हणजेच यांचा संगम पाहायला मिळतो.ज्यामुळे हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. म्हणून ह्या किनाऱ्याला "संगम बीच" असं ही म्हणतात.


🏖🏝

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्...
14/04/2021

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.




फिरस्तीची माळशेज घाटातून अनुभवलेली सुवर्ण सकाळ📸
13/04/2021

फिरस्तीची माळशेज घाटातून अनुभवलेली सुवर्ण सकाळ

📸





कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला...
12/04/2021

कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.

कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे, खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत.

महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात.



Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Motion Pictures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Motion Pictures:

Share