01/11/2018
केरळ टूर थ्री *** स्टार हॉटेल + विमानासहित रु.19500
थ्री *** स्टार हॉटेलमध्ये मुक्काम – ब्रेकफास्टसह व एसी कार/बसने प्रवास व स्थलदर्शन
हो बरोबर वाचले आपण. केरळला विमानाने जाऊन येऊन ही पाच दिवसांची टूर फक्त रु.१९५०० मध्ये आहे.
खाली संपूर्ण माहिती देत आहे. ती कृपया संपूर्ण वाचावी आणि नंतरच काही शंका किंवा अडचणी असतील तर मला फोन करावा किंवा व्हाट्सअप करावा ही नम्र विनंती. कृपया कॉमेंट्स/मेसेजमध्ये कोणतेही प्रश्न विचारू नयेत, ही नम्र विनंती. कॉमेंट्स-मेसेजेस ही वाचली जाणार नसल्याकारणाने त्यांना उत्तर देता येणे शक्य होणार नाही.
संपर्क:-
फोन/व्हाट्सअप :-
टोपाझ टूर, पुणे.
9 6 8 9 3 9 6 6 6 9
आपण पुण्यातून विमानाने कोचीनला जाणार आहोत. तेथे विमानतळावर आपल्याला न्यायला गाडी आलेली असेल. त्या गाडीने आपण तीन तासांनी मुन्नारला पोहोचणार आहोत. मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे. मुन्नारला पोचल्यानंतर हॉटेलमध्ये फ्रेश होऊन लंच करून आपण साईट सिईंगला निघणार आहोत. या दिवशी आपण हाफडे साईट-सीन करणार आहोत व दुसऱ्या दिवशी फुल डे साईट सिईंग करणार आहोत. या दोन्ही दिवशी मिळून आपण जी प्रेक्षणीय स्थळ बघणार आहोत ती :- (१) मेटूपट्टी डॅम. याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण धरणाच्या भिंतीवरून गाडीने जातो. धरणाच्या भिंतीवरूनच रस्ता आहे. त्याचप्रकारे यामध्ये स्पीड बोटिंगची सोय आहे. त्याचा जरूर अनुभव घ्यावा. तसेच येथून जवळच एक एको पॉईंट आहे. त्या ठिकाणी निसर्गरम्य दृश्य तर आहेच, शिवाय आपलाच एको आपल्याला परत ऐकू येतो. (३) यानंतर आपण टी म्युझियमला भेट देणार आहोत. या ठिकाणी मुन्नारमध्ये चहाची लागवड कधीपासून व कशाप्रकारे झाली आणि चहाचे मळे कसे उभे राहिले हे एका चित्रफितीद्वारे दाखवले जाते. तसेच त्या ठिकाणी चहा कशाप्रकारे बनवला जातो याचं प्रात्यक्षिक बघायला मिळते. येथेच चहाचे म्युझियम पण आहे. येथे चहाच्या मळ्यांमध्ये फोटो शूट करता येते व खेळतासुद्धा येते. (४) व्ह्यू पॉईंट:- येथून एका नजरेत सर्व चहाचे मळे बघायला मिळतात. अत्यंत रमणीय व निसर्गसौंदर्याने नटलेले हे दृश्य आहे. (५) एराविकुलम नॅशनल पार्क :- या नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतर पुढे तीन किलोमीटर वनखात्याच्या बसने जावे लागते. तेथे आपल्याला उभ्या खडकावर चढणारा बकऱ्याप्रमाणे दिसणारा निलगिरी थार हा प्राणी दिसतो. येथे शेकरू व इतरही प्राणी दिसतात. (६) संध्याकाळी कुचीपुडी नृत्य तसेच कलरीपट्टयू हा मल्याळम कराटे -दांडपट्टा-तलवारबाजीचा शो या ठिकाणी बघू शकतो. हे दोन्ही शो मनोरंजन तर करतातच शिवाय अवर्णनीय असे जागेवर खिळवून ठेवणारे शो आहेत.
तिसऱ्या दिवशी आपण सकाळी टेकडीला जाण्यास निघतो. टेकडी हे सुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे. मुन्नारची हद्द सोडेपर्यंत सर्वत्र निसर्गसौंदर्य भरपूर भरलेले आहे. टेकडीपर्यंत तीन तासाचा प्रवास आहे. तेथे हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर आपण फ्रेश होऊन हत्तीवरील राईड घेण्यासाठी जातो. इथेसुद्धा कलरीपट्टयू व कुचीपुडी नृत्य बघायला मिळेल. संध्याकाळी बाजारपेठेत फिरायला जातो. येथे आपल्याला सर्व मसाल्याचे पदार्थ ओरिजनल आणि अत्यंत स्वस्तामध्ये मिळतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आपण वनखात्याच्या बसने पेरियार या जंगलामध्ये जातो व तेथे पुढे बोटीने बारा किलोमीटरची एक मोठी राउंड मारतो. यामध्ये आपल्याला वेगवेगळे पक्षी, जसे हरीण, बगळे, मोर, गवे इत्यादी प्राणी दिसतात. पेरियार हे जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.
यानंतर आपण अॅलेप्पीकडे जायला निघतो. वाटेमध्ये चर्चसमोर व्ह्यू पॉईंट आहे. तो आपण पासिंग बघतो. साधारणतः तीन तासांचा प्रवास केल्यानंतर आपण अॅलेप्पीला हॉटेलमध्ये चेक-इन करतो. फ्रेश होऊन जेवण केल्यानंतर आपण हाऊसबोटीने तीन-चार तासांची एक छानशी राऊंड सनसेट पॉइंटपर्यंत घेतो व त्यानंतर परत हॉटेलमध्ये मुक्काम करतो.
दुसर्या दिवशी सकाळी लवकर समुद्रावर आपण मस्त फेरफटका मारून, खेळून परत हॉटेलमध्ये येऊन ब्रेकफास्ट करतो व कोचीनच्या दिशेने प्रवासाला निघतो.
कोचीनला पोचायला दोन तास लागतात. येथे आपण (१) वास्को-दि-गामाचे चर्च बघतो. येथून (२) फोर्ट कोची येथे आपण चायनीज फिशिंग नेट्स बघायला जातो. ही मासेमारी करण्याची अद्भुत पद्धत आहे. समुद्राला भरती असेल तर ही मासे पकडतानाची पद्धत बघता येते. येथून आपण (३) पॅलेस बघायला जातो व त्याच्या शेजारीच असलेले (४) जूंचे सिनेगॉग चर्च बघतो. येथून आपण (५) मरीन ड्राईव्हवर एक समुद्रामध्ये छानशी सफर घेऊन कोचीनचे डॉकयार्ड बघतो.
येथून परत आपण पुण्यासाठी कोचीनच्या विमानतळावर निघतो व रात्रीच्या विमानाने दोन तासात पुण्याला पोचतो व मनावर कायमच्या कोरलेल्या आनंदाच्या आठवणी घेऊन आपली टूर समाप्त होते.
या टूरमध्ये समाविष्ट खर्च:-
(१) पुणे ते कोचिन व कोचीन ते पुणे असा विमान प्रवासाचा खर्च.
(२) मुन्नार २ रात्री, टेकडी १ रात्र व अल्लेप्पी येथे १ रात्र थ्री स्टार हॉटेलमधील निवासाचा खर्च.
(३) यापैकी अलेप्पी येथे एसी होटेल असेल.
(४) चार वेळा कॉन्टिनेन्टल प्रकारचा अनलिमिटेड ब्रेकफास्ट
(५) प्रवास व स्थलदर्शन एसी कार किंवा बसने.
(६) एका रूममध्ये दोन/तीन जणांचा मुक्काम.
या टूरमध्ये समाविष्ट नसलेला खर्च:-
(१) लंच व डिनर
(२) प्रवेश फी, एन्ट्री फी व बोटिंग चार्जेस
(३) वर नमूद केलेल्या समाविष्ट असलेल्या खर्चांव्यतरिक्त सर्व खर्च
(४) वैयक्तिक खर्च
(५) नैमित्तिक खर्च, टीप इत्यादी.
अटी:-
(१) कमीतकमी 4 प्रवासी. दोन प्रवाशांचा दर हा वेगळा असेल.
(२) खाली स्टार केलेल्या तारखेचा दर हा रु.२०,००० आहे.
(३) सर्व दर हे सहा नोव्हेंबरपर्यंत बुकिंग केल्यासच लागू आहेत. त्यापुढे बुकिंग केल्यास वेगळे दर लागतील.
हॉटेल्स:-
मुन्नार- वुड्स रिसॉर्ट किंवा तत्सम
टेकडी- सॅंन्डरा पॅलेस किंवा तत्सम
एलेप्पी- अर्काडिया रेजन्सी किंवा तत्सम
टूरच्या तारखा:-
डिसेंबर :- १*, ६*, ७*
जानेवारी :- १७, १८*, २५*, २६*, २७*, २९*, ३०, ३१
फेब्रुवारी :- १, २, ३, ८, ९*, १०, ११, १२, १३, १४*, १५*, १६, १७, १८, १९, २०, २२, २३, २४, २५, २६, २७, २८
संपर्क:-
फोन/व्हाट्सअप :-
टोपाझ टूर, पुणे.
9 6 8 9 3 9 6 6 6 9