Ignited Journey

Ignited Journey Fort..Historical and spectacular places..study tours..seashore..Adventure. Lets ignite your inner soul Passionately.

उपक्रमशील शिक्षिका, शिघ्र कवयित्री, लेखिका सोनाली (ताई) आरडले-गुडे यांचे ज्ञानोबारायांच्या पालखी सोबतचे पायी वारीचे प्रव...
04/01/2025

उपक्रमशील शिक्षिका, शिघ्र कवयित्री, लेखिका सोनाली (ताई) आरडले-गुडे यांचे ज्ञानोबारायांच्या पालखी सोबतचे पायी वारीचे प्रवास वर्णन असलेले *छोटा मी वारकरी* हे पुस्तक महाराष्ट्राच्या शासकीय ग्रंथालयासाठी *महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत निवडले गेले आहे*. त्याबद्दल ताईंचे पुनश्च खूप खूप अभिनंदन.🎉

प्रकाशनपूर्व हे पुस्तक मला चाळायला मिळालं
त्याबद्दल कृतकृत्य आहे. शालेय मुलांचा वयोगट लक्षात ठेवून मुलांना समजेल अशा भाषेत ताईंनी खूप छान पुस्तक लिहिलं आहे. *हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदांच्या शाळांपर्यंत शासनातर्फे पोचवलं जाणार आहे*. शालेय मुलांना वारी समजुन घेण्यासाठी पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल...

मित्रा, सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा🎉🥳✨🎊 नांदा सौख्भरे! विद्यासागर, लग्नाला येण्याच...
09/12/2024

मित्रा, सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा🎉🥳✨🎊 नांदा सौख्भरे! विद्यासागर, लग्नाला येण्याची मनापासुन खूप इच्छा होती रे पण येता आले नाही त्याबद्दल क्षमस्व! असो, लवकरच🤝भेटूया...

भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत तसेच सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वावर ज्यांचे समग्र जीवन आधारित होते अशा परम पूज्य बापूंना जय...
02/10/2024

भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत तसेच सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वावर ज्यांचे समग्र जीवन आधारित होते अशा परम पूज्य बापूंना जयंतीनिम्मित विनम्र अभिवादन🌸🙏🌸

प्रिय बापू, तुम्हाला माहित नसेल तूम्ही सांगितलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग आम्हाला खूप आवडतो मात्र तो केवळ लगे रहो मुन्नाभाई सारख्या चित्रपटात. तुमचा तो मार्ग आम्ही आवडीने बघतो त्याची चर्चा करतो थोड्या वेळासाठी का होईना प्रचंड प्रेरीत होतो आणि तो चित्रपट संपला की, दैनंदिन जीवनात हिंसेलाच खतपाणी घालतो, मनापासून आपलं मानतो. हल्ली काहीही झालं की, लगेच हमरीतुमरीला येणं हा आमच्या सवयीचा भाग झाला आहे. एखाद्याला मारायला अंगावर जाणं ह्यातच आमचा खरा पुरुषार्थ सामावला आहे असा आमचा समज झाला आहे.

एखाद्या घटनेमागचे सत्य जाणून घेवून काहीतरी बोलावं त्याआधारावर काहीतरी कृती करावी एवढा संयम आमच्यात राहिला नाही हो बापू. प्रथमदर्शनी ब्रेकिंग न्युज म्हणून व्हायरल झालेल्या बातम्या क्षणभरात आम्ही सर्वदूर पोचवतो मात्र नंतर त्याच बातम्या मागचं बाहेर आलेलं सत्य लोकांपर्यंत पोचवण्याऐवजी ते सत्य कसं सत्य नाही हे दाखवण्यासाठी आम्ही नाही तेवढा आटापिटा करतो, त्यासाठी कोणत्याही थराला जाणं आम्ही खूप प्रयत्नांती शिकलोय. आहो आम्हाला कशाची कसली भीती, नैतिकता, कसली तत्व, आमच्या व्यवहारात कसली पारदर्शकता, जिथं संधी भेटेल तिथं छापायचं, एखाद्याला ठगायचं हाच आमचा एककलमी कार्यक्रम. स्वतः प्यायचं, दुसऱ्यांना पाजायचं ह्यातून आम्हाला आनंद मिळतो. स्वतः जुगार खेळणार आणि इतरांना अडचणीत आणणार, ना आम्हाला ज्येष्ठ मंडळीबाबत आदर राहिला, ना गोरगरिबांबाबत आस्था, संविधान फक्त नावाला ते वाचण्यासाठी, समजुन घेण्यासाठी आम्हाला कुठं आहे वेळ.

तासनतास फालतू रिल्स बघत बसणं हा आमचा दिनक्रम झालाय, ह्यातून आम्हाला कुठं वेळ मिळतो, चांगली पुस्तकं वाचायला. असं वाचून कोणी किती झेंडे गाढलेत हाच आमचा आविर्भाव असतो. आहो आम्ही उत्तरोत्तर सहिष्णू, संवेदनशील होण्याऐवजी खूप निगरगट्ट होत चाललोय. बापू, तुम्हाला शिव्या घालण्यात, तुमची बदनामी करण्यात आम्ही कुठंच कधीच कमी पडत नाही कारण हेच आमचं कर्तव्य आहे. तुमच्याबद्दल वाचावं, जाणून घ्यावं ह्यात आम्हाला नाही इंटरेस्ट. व्हॉट्सअँप, फेसबुकवर तुमच्याबद्दल जे काही आम्हाला वाचायला भेटतं तेच कधी वाचता तर कधी न वाचता पुढं फॉरवर्ड केलं की झालं आमचं काम.

उतरोत्तर माणूस सत्यापासून दूर आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून हिंसक बनत चालला आहे. हिंसेचा मार्ग कधीच शाश्वत नव्हता आणि पुढेही नसणार. हे तथागत गौतम बुध्दांनी फार पूर्वी सांगुन ठेवले आहे.

मदतीची नितांत गरज असणारे उपक्रम आणिआस्थावान दानदाते यांचा अनोखा समन्वय म्हणजे....*देणे समाजाचे- एक सद्भावना महोत्सव*निवा...
29/09/2024

मदतीची नितांत गरज असणारे उपक्रम आणि
आस्थावान दानदाते यांचा अनोखा समन्वय म्हणजे....

*देणे समाजाचे- एक सद्भावना महोत्सव*

निवारा सभागृह, एस एम जोशी हॉल समोर,
नवी पेठ, पुणे दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२४

समाजातील आस्थावान दानशूरांना वेळोवेळी चांगल्या उपक्रमांना देणगी देवून त्या त्या कामास आपला हातभार लाववायची ईच्छा होत असते, पण असे चांगले उपक्रम कोणकोणते आहेत? नेमके कोणत्या ठिकाणी चालतात? आणि सर्वात महत्वाच म्हणजे दिलेले दान नक्कीच सत्पात्री पडेल काय? हे महत्वाचे प्रश्न दानदात्यांच्या मनामध्ये असतात.

पुणे येथील आर्टीस्ट्री या संस्थेने ही अडचण बऱ्यापैकी दूर केलेली आहे. दानशूर दानदाते आणि मदतीची नितांत गरज असणारे उपक्रम यांचा समन्वय घडऊन आणण्याचा उपक्रम "आर्टीस्ट्री" च्या माध्यमातून गेल्या २० वर्षापासून "देणे समाजाचे – एक सद्भावना महोत्सव" या नावाने सुरू आहे.

मी मच्छिंद्र काका गोजमे यांच्यासोबत आज या उपक्रमास भेट देणार आहे,
आपण पण आवर्जून या कार्यक्रमास भेट द्यावी आणि समाजाच्या वंचित घटकांसंदर्भात सुरू असलेल्या विविध उपक्रमाविषयी अधिक समजून घ्यावे, ही आग्रहाची विनंती!

दिसं येतील दिसं जातील...भोग सरंल "सुख" येईल....(सातत्याने चांगलं आणि चांगलंच वागत आलेल्या चांगुलपणाची कहाणी)आमचा बाळा - ...
27/08/2024

दिसं येतील दिसं जातील...भोग सरंल "सुख" येईल....

(सातत्याने चांगलं आणि चांगलंच वागत आलेल्या चांगुलपणाची कहाणी)

आमचा बाळा - चांगुलपणा याच्या रक्तात भिनलेला, आणि हो अंगी अधिक चांगुलपणा असला कि, लोकं त्याचा गैरफायदा घेणार म्हणजे घेणारच. कारण हे युगच कलयुग आहे. तसा याचाही अनेकांनी अनेक पद्धतीने वेळोवेळी गैरफायदा घेतला असे म्हंटले तर जास्त वावगे ठरणार नाही. 

तरीही हा खचला नाही, थांबला नाही, प्रत्येक वेळेला पुन्हा नव्याने उभारी घेत पुढे मार्गक्रमण करत राहिला. तसं तर आपल्या वागण्या, बोलण्यातून तो लहानपानापासून सगळ्यांच्या गाळत्यातला ताईत होता. गावात काहीही असलं की बाळा शिवाय काही हालायचं नाही. जसा-जसा याचा हा प्रवास पुढे जाऊ लागला, तसे-तसे आजूबाजूचे वातावरण बदलत गेले. पूर्ण मेहनत पणाला लावून याने पोलीस भरतीची तयारी केली. मात्र कधी १ तर कधी २ मार्काने याची अंतिम यादीतील निवड हुकली. म्हणतात ना, कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना थोडीशी का होईना नशीबाची साथ असावी लागते. ती साथ नौकरीच्या बाबतीत याला कधी मिळाल्याचे आजपर्यंत तरी दिसले नाही.

उमेदीची अनेक वर्ष पोलीस भरतीच्या तयारीत गेली. आयुष्यातील अनेक वर्ष अनेकांच्या मदतीला धावून जाणे हाच याचा एककलमी कार्यक्रम राहिला कारण त्याचा स्वभावच तसा आहे. त्याच्या चांगुलपणाची आठवण काहींनी ठेवली असेल तर तर काही सपशेल विसरून गेले. त्याने आयुष्यात चांगले मित्र जमवले, मैत्री जपली, माणसं जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मित्र सर्कल ही खूप ताकतीने जपलं. आज यांचं मैत्री सर्कल अनेकांसाठी मैत्री कशी असावी याचा सुंदर वस्तुपाठ घालून देणारं आहे.

एक वेळेला गरज म्हणून वसतिगृहातील प्रमुख म्हणून याने काम पाहिले, लहान मुलांना जीव लावणं हे याला आधीपासून आवडतं. त्यामुळं वसतीगृहातील मुलांवर याने जीव ओवाळून टाकला. त्यांना आयुष्याचे चांगले धडे दिले. आजही ती मुलं त्यांच्या वैयक्तिक जीवनात चांगलं मार्गक्रमण करत आहेत. हि मुलं आजही बाळाला खूप मानतात.

बाळा पुण्यात असताना याने अनेक प्रकारची कामं केली, कोणतंही काम छोटं मोठं असं काही न मानता कंपनीत काम केले, ऑटो चालवला, पुण्यात ज्या पद्धतीने इतरांना मदत करता येईल त्या पद्धतीने त्याने अनेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. कधी कुणाला आपल्यामुळे झळ पोचेल असे याचे कधीच वर्तन राहिले नाही. नेहमी खरं बोलणं, खरं राहणं, तरी लोकांनी याला द्यायचा तो त्रास दिलाच.

सर्वजण भेटायचं असं सुरू असतानामैत्री दिवसाचे औचित्य मिळाले...भरपुर दिवस नाही तर काहीवर्षांनी मित्रांची भेट झाली...मग काय...
04/08/2024

सर्वजण भेटायचं असं सुरू असताना
मैत्री दिवसाचे औचित्य मिळाले...
भरपुर दिवस नाही तर काही
वर्षांनी मित्रांची भेट झाली...

मग काय इकडच्या तिकडच्या भरपूर गप्पा..जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा..वर्तमानात सुरू असलेली सर्वांची धावपळ..आपला जॉब / व्यवसाय सांभाळून Passion follow करणं आणि शेवटी भविष्याचा वेध अशी गप्पांची मैफल जमने सहाजिकच...

काहीजण शहराच्या बाहेर तर काहीजण शहरात पावसाचे वातावरण असल्यामुळे सर्कल मधील आणखी बऱ्याच मित्रांना आज भेटायला यायला जमलं नाही, त्यांना आम्ही खूप Miss केलं.. Anyways लवकरच सर्वजण भेटूया...🤝👬👫🥳 त्या वेळी भेटीचे ठिकाण मात्र Ranade Premises असेल. त्याशिवाय मजा नाही😍🥳....

Occasions carve out the most cherished moments.. ❣️
05/07/2024

Occasions carve out the most cherished moments..

❣️

त्यागमुर्ती रमाई भीमराव आंबेडकरयांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!"The relationship between husband and wife should be one ...
27/05/2024

त्यागमुर्ती रमाई भीमराव आंबेडकर
यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

"The relationship between husband and wife should be one of closest friends."

पती-पत्नीचे नाते जवळच्या मित्रांसारखे असावे.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*"Ode to Trees"* poem by Sarojini NaiduWhat potent blood hath modest May,What fiery force the Earth renews,Where, trance...
25/05/2024

*"Ode to Trees"* poem by Sarojini Naidu

What potent blood hath modest May,
What fiery force the Earth renews,

Where, tranced in rich tranquillity,
The trees stand in their summer hues!

O brave and friendly trees, wherever
Your loyal branches bear the green,

The emerald trophies of the spring,
The banners of the springtide sheen!

गरुजुंचे आधारवड, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ज्यांना आयुष्यात फक्त देणं माहीत आहे. अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदती...
01/05/2024

गरुजुंचे आधारवड, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ज्यांना आयुष्यात फक्त देणं माहीत आहे. अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणं माहीत आहे. ज्यांच्या आयुष्याला त्यांनी स्पर्श केला त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहिलं नाही असे आम्हा सर्वांचे लाडके प्राचार्य, एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब जाधव सर होय!

सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरवग्रंथ "आधारवड" या बहुप्रतिक्षित ग्रंथाचा देखणा प्रकाशन सोहळा आज पुण्याच्या डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळाच्या ज्ञानेश्र्वर सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

व्यासपीठावर विशेष करून ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले साहित्यीक श्रीपाल सबनीस सर तसेच ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख सर, जाधव सर आणि त्यांच्या सहचारिणी डॉ. रंजना जाधव मॅडम तसेच ठाणे कौटुंबिक न्यालयाचे मुख्य न्यायाधीश श्री शाम रुकमे सर आवर्जून उपस्थित होते.

या गौरव ग्रंथात एका लेखाच्या माध्यमातून सरांचे ऋण व्यक्त करण्याची मला संपादकांनी (प्रा. सतीश येळकर) सरांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार...

सरांनी आम्हाला महाविद्यालयीन जीवनात खूप काही दिलं, आमचे परतीचे दोर कापले म्हणुनच आम्ही इथं पुण्यात स्थिरस्थावर होवू शकलो, उच्च शिक्षण घेवु शकलो. पुढील काळात सरांचा आदर्श घेवुन पुण्यात येणाऱ्या मूलांना योग्य मार्गदर्शन आणि शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करूत...

कायम प्रसन्न चेहरा.. असं चिरतरुण तारुण्य मोजक्याच लोकांच्या वाट्याला येतं...

Address

Pune

Telephone

+919021296777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ignited Journey posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ignited Journey:

Share

Category