Jungle trails, Pune

Jungle trails, Pune We organize various study tour programs in which one could explore & enjoy nature in wildlife sanctu

जंगल ट्रेल्स या संस्थेचा जन्म झाला २००४ मध्ये. अचानक सुचलेली ही कल्पना नव्हे. किंबहुना अगदी लहानपणापासून असलेली निसर्गाबद्दलची ओढ, ध्यासच म्हणा ना, आणि घेतलेले अनुभव, यातून नकळत या संकल्पनेची पाळंमुळं रुजली.

मित्र हो, मी सुधीर सावंत. आपण सगळे मला एक निसर्ग अभ्यासक आणि वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ओळखता. आणि ते खरेच आहे. मागील सुमारे सात वर्षांत मी असंख्य फोटो काढले. त्यासाठी लडाखपासून अंदमानपर्यं

त भटकंती केली. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून काम केले. विषारी साप, गवा, बिबळ्या यांच्या तावडीतून मरतामरता वाचलोय. तरीही आपले काम नेटाने चालू ठेवत, निसर्गातील अनेक घटक, अनेक पैलू, वेगवेगळ्या घटना, कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.

25/09/2022
26/06/2017

वर्षाविहार

मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचे आगमन झाले आहे. खरेतर पावसाळा हा ऋतुच मुळात सर्वांना हवाहवासा वाटणारा !! एप्रिल-मे मध्ये उकाडा असह्य झालेला असतो. गवत वाळून पिवळे पडलेले असते. झाडे पाने गाळून निस्तेज झालेली असतात. प्राणी पक्षी धापा टाकत असतात. कातळकडे तापून काहिली झालेले असतात. जिकडे पहाल तिकडे नजरेत भरतो तो केवळ रुक्षपणा, भगभगीतपणा. आणि अशातच क्षितिजावर कुठेतरी ढगांची नक्षी उमटायला लागते. उन्हाची रंगछटा हळूहळू सौम्य व्हायला लागते. पाहता पाहता हे ढग अवघे आकाश व्यापून टाकतात. हवेतील उकाडा जरा कमी झालेला असतो. आणि मग हळूच थंड वाऱ्याची एखादी झुळूक सुखद स्पर्श करुन जाते. लक्षात येते की कुठेतरी सुरवात झालीयं मेघ बरसायला..... हळूहळू पाउसही सर्व आसमंत व्यापून टाकतो. सर्व सृष्टीला कवेत घेतो जणू. रिमझिम थेंबापासून सुरु होउन मुसळधारपणे बरसू लागतो. ती सृष्टीही पर्जन्य मिठीत हरखून जाते. वातावरणात मातीचा दरवळ पसरतो. रस्त्यांवर, झाडांच्या पानांवर, ताशा वाजू लागतो. मधेच कुठेतरी दामिनी सळसळते. आणि सुरु होते झिम्माड.

हा पाउस येतो , तेच मुळी चराचराच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत.... सृष्टीतील सगळी मरगळ झटकणारा, चराचरात चैतन्य भरणारा, सगळीकडे आनंद, उत्साह भरणारा, असा हा पाउस सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

हा सगळा सोहळा अनुभवायचे उत्तम ठिकाण म्हणजे सह्याद्री..... जरा पाउस सुरु झाला की इथले रुपडे पालटते. उन्हाळ्यातील रुक्ष व निस्तेज वातावरण जादूची कांडी फिरावी तसे बदलून जाते. उन्हाळ्यात काळे-पिवळे दिसणारे कातळकडे अचानक हिरवे होउन जातात. डोंगरा-सुळक्यांचा ढगांशी लपंडावाचा खेळ सुरु होतो. ठिकठिकाणी छोटेमोठे धबधबे, ओढे सुरु होतात. कुठूनतरी मलबारी कस्तुराची अवीट शीळ कानी येते. घाटमाथ्यावर वाऱ्याच्या वेगाने झाडे " लागीर " झाल्यागत बेभानपणे डोलायला लागतात. ठिकठिकाणी बेडकांचे पार्श्वसंगीत चालू होते. मधेच कधीतरी अॉरेंज हेडेड थ्रश दर्शन देउन जातो. तर कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य मन मोहून टाकते. असा हा हवाहवासा वाटणारा पाउस अनुभवायलाच हवा. अर्थात हे सर्व अनुभवायचे तर आपल्याला आपला कंफर्ट झोन सोडून निसर्गाच्या समवेत एकरुप व्हायला हवे. तरच त्यातील मजा अनुभवता येईल.

आणि हो........ अशावेळी गरमागरम भजी व चहा यांची लज्जत काही औरच.

तर अशीच एक वर्षाविहाराची संधी, शनिवार दिनांक १जुलै १७ रोजी जंगल ट्रेल्स तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात आपण संपुर्ण पश्चिम घाटाला पूर्व-पश्चिम छेद देत पावसातून प्रवास करणार आहोत. या प्रवासात चहा भजी एंजॉय करत, पावसात, धबधब्यात मनसोक्त भिजत, गांधारपाले लेणी पहायला जाणार आहोत. सदर सहल एकदिवसीय आहे. तर येणार ना वर्षाविहाराला ?

अधिक माहितीसाठी संपर्क
९८२२८४६३२०
सुधीर सावंत
जंगल ट्रेल्स.

मित्रांनो, आपण सगळे जाणतोच की, आपल्या महाराष्ट्राला अतिशय निसर्गरम्य असा पश्चिम घाटांचा वारसा लाभलेला आहे. हा भूभाग केवळ...
08/06/2017

मित्रांनो, आपण सगळे जाणतोच की, आपल्या महाराष्ट्राला अतिशय निसर्गरम्य असा पश्चिम घाटांचा वारसा लाभलेला आहे. हा भूभाग केवळ निसर्गरम्यच नाही तर आश्चर्यकारक जैववैविध्याने नटलेला आहे. वनस्पती, किटक, सरीसृप, प्राणी-पक्षी, सौंदर्यस्थळे अशी अनेक आकर्षणे या भागात आहेत. यातील महत्वाचा भाग म्हणजे, येथील निसर्ग ऋतूमानानुसार वेगवेगळा साजश्रुंगार ल्यालेला असतो. कधी तो उन्हाळ्यात वाळलेल्या गवताचा पिवळाधमक अंगरखा परिधान करुन त्यावर काटेसावर, अमलतास यांची माणिक, पुष्कराजसमान आभूषणे मिरवतो तर कधी पावसाच्या एक दोन सरी पडून वातावरणतील तलखी कमी होताच, जूनी वस्त्रे, आभूषणे त्यागून हिरवाकंच शालू नेसून तयार होतो. हिरव्या शालूवर डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्यावर फडफडणारा पांढरा-करडा मेघशेला कधी पाहिलाय ? सांप्रतकाळातील आभूषणांची खुमारी तर काय वर्णावी. मखमली मृगकिडे, सुरेख किटकांची आभूषणे, रंगीबेरंगी नाजूक फुलांचा मुकुट ही शोभा ही शब्दातीत आहे. या आभूषणांचा दिमाख, झगमगाट दिवसातर दिसतोच, पण रात्रीही चमचमत असतो. या दिवसात अंधार पडताच, चमचमणाऱ्या काजव्यांनी आसमंत भरुन आणि भारुन जातो. निसर्गाचा laser show किंवा late night stage show म्हणा ना...... आणि मला खात्रीआहे की याची सर जस्टीन बीबर च्या कार्यक्रमाला सुद्धा येणार नाही. अर्थात या सगळया गोष्टींची खुमारी अनुभवाची असेल तर आपल्या शहरी जीवनातून थोडी उसंत काढायला हवी. रोजच्या धकाधकीतून थोडे निवांत होउन निसर्गाच्या कुशीत बागडायला हवे...... तरच हा निसर्ग सोहळा अनुभवता येईल, त्याचा आनंद घेता येईल.

जंगल ट्रेल्स आपल्याला अशीच एक संधी उपलब्ध करून देत आहे. निसर्गातील अमुल्य आभूषण, रंगीत पंखी गळ्याचा सरडा ( Fan Throated Lizard ) पहायला व कैमेराबद्ध करायला रविवार दिनांक 11/06/17 रोजी एकदिवसीय निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत, काजव्यांच्या दर्शनाचीही संधी उपलब्ध होउ शकते. तरी आपण या संधीचा जरुर लाभ घ्यावा ......अधिक माहिती साठी 9822846320 या मोबाईल वर संपर्क साधावा.

सुधीर सावंत,
जंगल ट्रेल्स,
9822846320.

03/06/2017

नमस्कार मंडळी.....

जंगल ट्रेल्स तर्फे, नुकतीच कान्हा नैशनल पार्क येथील सहल उत्साहात आणि मजेत संपन्न झाली. सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे सदर सहल अविस्मरणीय झाली. त्याबद्दल मी सर्व सहभागींचे, त्यांच्या कुटुंबीयांचे, हॉटेल मालक तसेच वेळोवेळी आमच्या आवडीनुसार विविध उत्तम पदार्थ बनवून देणारा hotel staff, जंगल ट्रेल्स चे विविध service providers या सर्वांचे आभार मानतो. या सहलीत आम्हाला अनेक छान अनुभव आले.अनेक प्राणी व पक्षी पहायला मिळाले. आम्ही जे काही वन्य जीवन पाहिले ते आपल्याबरोबर share करतो.

Mammals
------------------
Barking deer
Spotted deer
Sambar
Barasinga
Black Buck
Indian Gaur
Langur
Rhesus Macaque
Ruddy Mongoose
Wild Bore
Wild cat
Jackal
Wild dog
Tiger

Birds
---------------
Jungle Babbler
Indian Roller
Common Hawk Cuckoo
Rose Ringed Parakeet
Alexandrine Parakeet
Egret
Pond Heron
Green pigeon
Turtle Dove
Laughing Dove
Indian Cormorant
Rufous Treepie
Racket-tailed Drongo
Grey Hornbill
Golden Oriole
Black-hooded Oriole
Shikra
Bee eater
Tickell's Blue Flycatcher
Black-naped Monarch
Large Cuckooshrike
Red Junglefowl
Indian Peafowl
Woodpecker
Common Kingfisher
White-throated Kingfisher
Honey Buzzard
Lapwing
Greater Coucal
Orang-headed Thrush
Spurfowl
Black Ibis
White rumped Shama
Black Drongo
Brown Fish Owl
Stone Curlew
Sykes's Lark
Purple Sunbird
Paddyfield Pipit
White rumped Munia
Crested Treeswift
Cressted Serpent Eagle
Woolly-necked Stork
Black-Shouldered Kite
Asian Pied Starling
White rumped Vulture

Plants
------------------
Ficus ( Pimpal )
Ficus ( Banyan or Vad )
Crocodile bark
Bamboo
Ghost tree
Saal tree
Dikemali
Kusum
Umber
Amaltaas
Saalai
Kinai
Palas
Pangli
Orchid ( Vanda )
Lily
Broom Grass
Mahul vel
Ganoderma Fungus

Reptiles
----------------
Garden Calotes
Forest Calotes
Monitor Lizard
Checkered keelback
Buff Striped Keelback

Amphibians
-----------------------
Skittering Frog
Bull Frog

Insects
----------------
3 different types of Wasp
Ladybird Beetle
Horned Beetle
Many different Spiders
Caterpillars
Many different Butterflies

धन्यवाद,
सुधीर सावंत
जंगल ट्रेल्स.

Enjoy the New Year in the World of Jungle..Happy New Year
31/12/2016

Enjoy the New Year in the World of Jungle..

Happy New Year

Feel the adventure..!!
27/12/2016

Feel the adventure..!!

Merry Christmas ... !!!
25/12/2016

Merry Christmas ... !!!

Nature Bonding .. :)
23/12/2016

Nature Bonding .. :)

Winter safari stats from here..!!
21/12/2016

Winter safari stats from here..!!

Lets get together in the world of Jungle.!!
29/11/2016

Lets get together in the world of Jungle.!!

Address

Aruna Apartment, Near Girija Hotel, Sinhagad Road, Anand Nagar
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jungle trails, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jungle trails, Pune:

Share