15/10/2025
क्षितिज परिवार @ काशी, अयोध्या सहल....
६ ते १४ ऑक्टोबर २०२५......
आत्ताच्या सहलीतील एक भावपूर्ण अभिप्राय..अजून काय पाहिजे😇😇
एका अव्यक्त जिद्दीचा मानसिक प्रवास
आज रामलल्लाचं दर्शन झालं. डोळ्यातले अश्रू थांबवू म्हणून थांबवेनात. आम्हा सगळ्याच मैत्रिणींची अशीच अवस्था झाली होती. मंदिरातून पाय निघता निघत नव्हता.
1989 मध्ये शिलान्यास, 1992 मध्ये ढाॅंचा गिरा दिया आणि ९ नोव्हेंबर 2019 सुप्रीम कोर्ट चा निर्णय. सारं काही डोळ्यांपुढे सरकत होतं. वडील,काका, सगळे भाऊ, सगळ्यांचा कारसेवेतला सहभाग आठवून मन अभिमानाने दाटून येत होतं.
खरंतर विचार केला तर व्यक्तिशः माझा यातला सहभाग तो काय? फक्त मानसिक पाठिंबा आणि असलंच काही आत्मिक बळ तर ते याच्यामागे लावायची इच्छा.
पण एक जिद्द निर्माण झाली होती मनात की मला रामाचं त्याच्या जन्मभूमीत जाऊन टेंटमध्ये दर्शन घ्यायचंच नाही. तंबूत ठेवलेल्या त्याला मला नाही पहायचं. अर्थातच त्यामुळे याजन्मासाठी तरी त्याचं दर्शन अशक्य अशीच मनाची समजूत झाली होती. फार क्वचित ही जिद्द मी कोणाकडे व्यक्त केली असेल . कारण ही सत्यात येणारी गोष्टच वाटतं नव्हती.
आणि मग अचानक अंदमान टूरवर असताना ९ नोव्हेंबर २०१९ ला कोर्टाचा निर्णय आला. आणि ती अव्यक्त जिद्द पूर्ण होऊ शकेल अशा स्वप्नात रुपांतरित झाली. मंदिराचं भूमीपूजन झालं. मंदीर प्रत्यक्षात आलं देखील. माझं मन म्हणालं माझ्या असणा-या, माझ्या वाटणा-या, माझ्या प्रधान मंत्र्यानी याच जन्मी माझी अव्यक्त जिद्द पूर्ण होऊ शकेल असं मोठं काम केलंय. आता माझी जिद्द पूर्ण करणं हे केवळ माझं स्वप्न न रहाता माझं पवित्र कर्तव्य ठरलं आणि आजच्या शुभदिनी मी त्याचं दर्शन घेतलं. अप्रतिम कलाकुसर असणा-या एका अप्रतिम सुंदर आणि भव्य मंदिरात.
टेंटवासाचा सल मनात असला तरी ते असह्य दृश्य मला पहावं लागलं नाही.
मंदिराची हृदयस्पर्शी भव्यता, वास्तुशिल्पाचं अपार सौंदर्य आणि रामलल्लाची आपल्याशी भावपूर्ण संवाद साधणारी अत्यंत मनमोहक मूर्ती .
ईश्वर आणि मोदी यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने मन पार भारावून गेलेलं आहे.
कोर्टाच्या निर्णय आणि अत्यंत संयमी सेलिब्रेशन वर्षाच्या क्षितिज बरोबर अंदमान ला असताना झालं
आणि याची देही याची डोळा भव्य आणि दिमाखदार मंदिरात त्याच्या दर्शनाचा लाभ घेता आला तोही वर्षा- श्रीपाद आणि क्षितिजबरोबरच. हा सुंदर योग आणून मनाचं क्षितीज संपूर्ण आनंदाने भरून आणि भारून टाकणा-या क्षणांची भेट देणा-या क्षितिज ट्रॅव्हलविषयी देखील अत्यंत कृतज्ञ आहे. त्यांच्यासाठी हा रूटीनचा भाग असेलही पण आमच्यासाठी ही great achievement आहे. धन्यवाद सगळ्याच सहसंवेदनशील सख्यांना, सहप्रवाशांना आणि टीम वर्षाला.🙏🏻
सौ. अर्चना चिंचणीकर
पुणे
१३.१०.२५