
09/07/2025
साधनाताईंनी माणूसकी जपली ती शब्दांतून नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून.
त्यांचा हात पुढे सरसावला तो नेहमीच वंचितांना आधार देण्यासाठी; ना की इतरांना निर्देश देण्यासाठी.
साधनाताई म्हणजे सर्वांना एकत्र आणणारी मायेची ऊब आणि आश्वासक आवाज.
त्या केवळ बाबा आमटेंच्या “गृहिणी-सखी-सचिव” नव्हत्या; त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे “सेवेचा एक विलक्षण प्रवास” होता.
आज ९ जुलै रोजी, साधनाताईंच्या स्मृतिदिनी, त्यांची अपार करुणा आणि निःस्वार्थ सेवेची भावना जपतच संस्था भविष्यात वाटचाल करेल असे आम्ही आश्वस्त करू इच्छितो.
She taught humanity not with words but through actions.
Her hand was never raised to command; it was always extended to support.
Sadhanatai was the voice of calm and the warmth that brings people together.
She wasn’t just a companion in Baba Amte’s journey; she was a journey herself.
Today, on her Remembrance Day, we don’t just remember her; we carry forward her spirit of empathy and selfless dedication in all that we do.