आपल्या या मातृभूमीची आपल्या सर्व ऋषीमुनी, संत, द्रष्ट्यानी , मातृभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, पुण्यभूमी, देवभूमी, आणि मोक्षभूमी म्हणून पूजा केली. अतिप्राचीन काळापासून हि आमची वत्सल, पवित्र भारतमाता आहे. आपल्या समाजाचे चारित्र्य आणि संस्कृती यावर अनेक श्रेष्ठतम विभूतींचा कधीही न पुसला जाणारा ठसा उमटला आहे. या सर्व श्रेष्ठतम विभूतींनी जीवन कृतार्थ करणारे, जीवाला शाश्वत सुख प्रदान करणारे सर्वश्रेष्ठ दिव
्य तत्वज्ञान याच भारतभूमीत प्रगत केले. हे तेजस्वी तत्वज्ञान, शाश्वत जीवनमूल्ये, हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा आणि प्रेरणादायी इतिहास यांच्या अनुसारणाने प्रत्येकालाच मोक्ष मिळेल. असे या श्रेष्ठींनी वेळोवेळी उधृतही केले आहे. २१ व्या शतकात अत्यंत वेगवान जीवनशैलीत या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी वेळ कसा काढावा हा प्रत्येकापुढे प्रश्न आहे. या विचारांची आवश्यकता प्रत्येकालाच भासत आहे हे खरे ! २१ व्या शतकात विज्ञानाच्या माध्यमातून मानवाचे भौतिक विकसन झाले, परंतु हे मिळवीत असताना शांतता, समाधान आणि खऱ्या सुखापासून मात्र तो वंचित राहिला. वस्तूच्या अतिरिक्त हव्यासामुळे एकीकडे व्यसनाधीनता, त्यातून गुन्हेगारी वृत्ती वाढताना दिसत आहे. या सर्व समस्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला दिव्य तत्वाज्ञानाचाच अंगीकार करावा लागेल आणि त्या विचारांप्रमाणे साधन, तप करायला हवे. आजच्या धकाधकीच्या काळात साधनेसाठी वेळ, पोषक वातावरण मिळायलाही हवे. त्यासाठी “परिक्रमा टुरिझम” च्या माध्यमातून एक अभिनव प्रकल्प आपल्यासमोर आणत आहोत.
या प्रकल्पांतर्गत भारतातील विशिष्ट ठिकाणी जाऊन तेथे वरीलप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करणे, जवळपास असलेल्या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे आणि ७ दिवसाच्या प्रवासात मानवी जीवनाचा विलक्षण दृष्टीकोन आत्मसात करणे अशा गोष्टींचा अंतर्भाव असेल. प्रवासादरम्यान उत्तम नष्ट, भोजनाची उत्तम सोय, उत्तम निवास व्यवस्था, उत्तम बसेसची सोय असणार आहे. अनेक वर्षे पु. संजय गुरुजींच्या मार्गादाशानाखाली अभ्यास व साधना केलेले काही साधक या प्रवासात व्यवस्थापनासाठी तसेच सर्व ठिकाणाची माहिती देण्यासाठी, विभूतीमात्वांचा परिचय देण्यासाठी असतील. चल तर मग अशा प्रवासाच्या माध्यमातून मनाला शांतता, समाधान आणि आनंद देणारी साधनही करूयात....!!