
29/12/2024
MD Tours चालू झाल्यापासून अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की एखादी तरी नवीन वर्षाचे स्वागत करणारी दुबई बॅच करावी आणि ह्यावर्षी सर्व योग जुळून आले आणि हा 32 लोकांचा ग्रुप सप्टेंबर मधेच फुल्ल झाला होता.
सर्वच पर्यटक खूप खूप उत्साहित आहेत की कसं आपल्याला नवीन वर्षाचे बुर्ज खलिफा वरचे लायटिंग आणि फायर शो पाहायला मिळेल याविषयी...!!!
आज तसं बघायला गेलं तर माझी वैयक्तिक 40 वी दुबई टूर आहे 2019 पासून जेव्हा मी दुबईच्या टूर्स चालू केल्या होत्या तेव्हापासून...!!!
आज मागे वळून पाहताना असे वाटते की एकाच प्रॉडक्ट ला आपण प्रत्येक वेळी नवनवीन पद्धतीने कसे पर्यटकांसमोर आणू शकलो याचेच आश्चर्य वाटते. जवळपास मागील 6 वर्षात 3000 हून अधिक पर्यटकांनी MD TOURS वर विश्वास ठेवून फक्त दुबई टूर केली आणि आपण त्यांच्या विश्वासास पात्र ठरलो याचा अभिमान वाटतो.
धन्यवाद 🙏 मायबाप पर्यटकांनो 🙏🧿😍