26/07/2026
॥ श्रीराम समर्थ ॥
"श्रावण मास विशेष ज्ञानयात्रा"
"सज्जनगड व समर्थस्थापित अकरा मारुती दर्शन"
*दि. २९–३० ऑगस्ट २०२६ (शनिवार–रविवार) श्री प्रणव गोखले* Pranav Gokhale
*अकरा अकरा बहु अकरा।काय अकरा कळेचिना ।
गुप्त ते गुप्त जाणावे । आनंदवनभुवनी ॥
श्रावण मासाची पावन पर्वणी साधून समर्थ रामदासस्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा पावन क्षेत्रांची दोन दिवसांची विशेष यात्रा, ज्ञानयात्रा पुणे तर्फे आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेमध्ये समर्थ रामदासस्वामींनी स्थापिलेल्या अकरा मारुती मंदिरांचे तसेच त्यांच्या कर्मभूमी व समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावरील समाधिमंदिराचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मारुती मंदिरात समर्थ रामदासस्वामींनी रचलेल्या अकरा मारुती स्तोत्रांपैकी एकेका स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे. त्यामुळे ही एक सहल न राहता भक्ती, साधना, इतिहास आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचा अनुभव देणारी खर्या अर्थाने 'ज्ञानयात्रा' ठरणार आहे.
यात्रेदरम्यान समर्थ रामदासस्वामींचे जीवनकार्य, समर्थ संप्रदायाची परंपरा, अकरा मारुती स्थापनेमागील उद्देश आणि प्रत्येक क्षेत्राचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व यांविषयी मार्गदर्शन श्री. प्रणव गोखले करणार आहेत.
श्रावण महिन्यात समर्थभक्त, अभ्यासक आणि आध्यात्मिक साधक यांच्यासाठी ही एक अविस्मरणीय संधी आहे. आपण, आपल्या परिवारासह व मित्रपरिवारासह या ज्ञानयात्रेत सहभागी होऊन समर्थांच्या पावन स्मृतींना वंदन करूया.
*श्रावण मास विशेष* –
*सज्जनगड व समर्थस्थापित अकरा मारुती दर्शन यात्रा*
दिनांक: २९–३० ऑगस्ट २०२६
मार्गदर्शक: श्री. प्रणव गोखले
आयोजक - इंडिकल्ट ज्ञानयात्रा, पुणे
संपर्कासाठी दूरभाष क्रमांक -
सौ. उज्ज्वला खांडेकर - 9325692044/
95118 18405
GPAY 9156436996
₹3780/-
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
#मारुती
#मंदिर
#समर्थ
#स्वामी
#सज्जनगढ
#जयजयरघुवीरसमर्थ
#ज्ञान
#ज्ञानयात्रा