18/11/2021
"भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची " पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
सुशील सुधीर दुधाणे लिखित व नावीन्य प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले "भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची " या पुस्तकाचे वीर बाजी पासलकर सभागुह , सिंहगड रोड, पुणे येथे दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशन झाले.
या पुस्तक प्रकाशन समारंभा च्या अध्यक्ष स्थानी मा.श्री.पांडुरंग बलकवडे सर, प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते मा श्री.दादासाहेब कोरेकर, तसेच प्रमुख उपस्थिती मा.श्री.रमेश परदेशी ( मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई ) यांच्या शुभ हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कु.हिमांक पराग ढवळे वय वर्ष अवघे सात , ज्याने सह्याद्री रांगेतील १०१ दुर्ग , ४ शिखरे, ६ टेकड्या/पठारे , २ घाट वाटा पादाक्रांत केल्या आहेत.कु.हिमांक याला "बाल दुर्ग भ्रमंतीकार" या सन्मानाने गौरविण्यात आले.तसेच कु.अयांश पराग ढवळे वय वर्ष अवघे अडीच, या वयात याने ६३ दुर्ग, २ टेकड्या/पठारे, १ घाट वाटा पादाक्रांत केल्या आहेत.कु.अयांश याला "बाल दुर्ग भ्रमंतिकार " या सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
तसेच श्रावण बाळ आश्रम,इंदापूर चे संस्थापक मा.श्री.राजीव करडे यांना ते करित असलेल्या सामाजिक कार्याबद्दल (१७ अनाथ मुलांचा सांभाळ करणारा अवलीया) "अनाथांचा कैवारी " या सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
तसेच या पुस्तकासाठी ज्यांचे अनमोल योगदान लाभले, असे पडद्या मागील डी. टी. पी. ( शुभांगी एंटरप्राइजेस ) चे श्री.संतोष कोंडेकर , मुद्रित शोधन सौ.मीनाक्षी मेमाणे, छफाई (एस.एस.प्रिंटर्स )श्री.लोखंडे साहेब, मुखपुष्ट व मलपुष्ट वरील मूळ प्रकाशचित्र श्री.सचिन मांढरे, मुखपुष्ट व मलपुष्ट वरील स्केच आणी डिझाईन आर्टिस्ट सौ.धनश्री परदेशी, मुखपुष्ट कलर छफाई श्री.ठोंबरे साहेब, ग्रंथ बांधणी श्री.कोठावळे साहेब, मुखपुष्टासाठी तांत्रिक सहाय्यक व मार्गदर्शन श्री.श्रीकृष्ण ढोरे, तसेच नावीन्य प्रकाशन च्या सौ.मनीषा खैरे यांना सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक कु.संजना सुशील दुधाणे हिने केले, सूत्रसंचालन श्री अमृत पाटील यांनी केले, तसेच आभार पदर्शन श्री.सुरेश शिंदे यांनी केले.
या सोहळ्याला अनेक भटकी मंडळीची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास श्री.अप्पा जगताप, डॉ.अजय इंगळे, श्री.गणेश पाष्टे, श्री.अभिषेक मुळे , श्री.राजेंद्र धुमाळ, श्री.तानाजी राजगुडे , अमोल गोरे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.