Via Ferrata Adventure Solutions

Via Ferrata Adventure Solutions We are a team of Adventure Enthusiasts who came together to help the fellow adventurers to explore the world without any worries.

It's that time of the Year, Buddha Poornima, The Biggest Poornima of the Year is here.Celebrate the coming Season with P...
23/05/2024

It's that time of the Year, Buddha Poornima, The Biggest Poornima of the Year is here.

Celebrate the coming Season with PRAWASVEDE, as we launch our thrilling Monsoon Events!

Join us for weekend treks, exhilarating backpacking trips, and adrenaline-pumping activities.

Perfect for adventurers for all Age Groups, our meticulously crafted experiences offer unmatched value and excitement.

Don’t miss out on these unforgettable journeys — book your spot now and embrace the monsoon magic!

*PRAWASVEDE*
Where every journey is a new story!

8551 999 299

www.prawasvede.in

26/04/2024
आपण ज्या विश्वात राहतो. ज्या विश्वाचे आपण एक भाग आहोत. त्याचं वेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन घेणं हे नेहमीच सुखकारक असतं. ह...
14/04/2024

आपण ज्या विश्वात राहतो. ज्या विश्वाचे आपण एक भाग आहोत. त्याचं वेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन घेणं हे नेहमीच सुखकारक असतं.
हे सुख प्राप्त करायला मात्र रोजच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून एखाद्या निवांत जागी जाऊन रहावं लागतं.

एका सहस्त्रकाचा इतिहास लाभलेला, शिवछत्रपतींचा केवळ पदस्पर्श लाभलेला नव्हे, तर विस्तारीत हिंदवी स्वराज्याचे पहिले राज्याभ...
04/01/2024

एका सहस्त्रकाचा इतिहास लाभलेला, शिवछत्रपतींचा केवळ पदस्पर्श लाभलेला नव्हे, तर विस्तारीत हिंदवी स्वराज्याचे पहिले राज्याभिषिक्त छत्र साक्षात शिवरायांच्या शिरी धरण्याचे भाग्य लाभलेला, कोकणच्या भूमीतून चारही बाजूस खडे कातळकडे लेऊन उभा राहत, सह्याद्रीच्या मुख्य रांगेतल्या गिरीशिखरांवर लक्ष ठेवू पाहणारा, आपल्या सर्वांचा लाडका आणि तितकाच मनात आदर असलेला दुर्ग म्हणजे श्री दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगड..

या शिवतीर्थाची केवळ ओळख करुन न घेता तो व्यवस्थित पहावा, माहीत करुन घेता यावा... इतकंच काय तर केवळ दुर्ग माथ्यावरुन न पाहता याच्या कातळभिंती पाहत संपूर्ण दुर्गाला प्रदक्षिणा घालून या दुर्गाचे भव्य स्वरुप जवळून अनुभवता यावे या उद्देशाने आम्ही एक सशुल्क मोहीम आखली आहे.

रायगड प्रदक्षिणा आणि रायगड दर्शन...

येत्या २७-२८ जानेवारी २०२४ रोजी...

या मोहिमेसाठी आपण पुण्याहून २६ जानेवारी रोजी रात्री निघणार असून शनिवारी प्रदक्षिणा आणि रविवारी रायगड दर्शन करणार आहोत.

यातली प्रदक्षिणा ही अनुभवी भटक्यांसाठी आहे. कारण, प्रदक्षिणा मार्ग निबिड अरण्यातून जाणारा, खडी चढण, घसरडा उतार आणि काही भागात अगदी शून्य वारा तसेच दमट वातावरणाचा आहे.

ज्यांना ही जमणार नाही, त्यांच्यासाठी शनिवारी रात्री प्रवास करुन रविवारी रायगड दर्शन अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

यासोबतच ज्यांना फक्त प्रदक्षिणा करायची असेल त्यांच्या साठी शनिवारी रात्री घरी परतण्याची सोयही करण्यात येणार आहे.

चला तर मग.... रायगड प्रदक्षिणा आणि रायगड दर्शन साठी येताय ना??

शुल्क:
प्रदक्षिणा आणि दर्शन - २७७५/-
पुणे ते पुणे प्रवास, २ वेळा न्याहारी, ३ वेळा जेवण, मुक्काम इत्यादी खर्च समाविष्ट

फक्त प्रदक्षिणा किँवा दर्शन - १५७५/-
पुणे ते पुणे प्रवास, न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा

सदर मोहीम ही प्रशिक्षित आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनात होणार असून
आमची संस्था महाराष्ट्र पर्यटन संचालनालय अधिकृत साहसी पर्यटन संस्था आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: ८५५१ ९९९ २९९

-------------------

Imagine a place with a history as rich as a treasure chest—one not just blessed with the Presence of Shivaji Maharaj but holding a piece of his coronation canopy.

That's Raigad, standing proud with it's tall cliffs from all the sides, rising from the lows of Konkan region, guarding Konkan's beauty and overlooking some of the Shayadri Main Range peaks.

Join us for a unique experience:

Raigad Pradakshina and Darshan on January 27-28, 2024.

For this adventure, we leave Pune on January 26, spend Saturday circumambulating Raigad, and explore the Fort on Sunday.

It's a bit challenging, with forest paths, steep slopes, and rocky trails. Hence, not a thing to be considered for newbies.

If you're not up for the full adventure, you can Join us for the Saturday night departure and explore Raigad on Sunday.

Or Join us for Friday Departure and Head back home to reach Pune by Saturday Night.

So, are you in for Raigad Pradakshina and Darshan?

Cost:
- For both: INR 2775/-
(Includes Pune travel, meals, tea, accommodation)
- For just one: INR 1575/-
-
(Includes Pune travel, breakfast, lunch, and evening tea)

This is led by experienced folks and is an adventure tourism organization approved by Maharashtra Tourism Department.

For more details, call: 8551999299.

Team Prawasvede
Via Ferrata Adventure Solutions

We ❤️ to See You Travel.

हरिश्चंद्रगड इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनिमित्त... मित्र जमतात, बेत ठरतो, सर्वजण आपापल्या व्यापातून वेळ काढतो आणि मग एक द...
05/08/2023

हरिश्चंद्रगड इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनिमित्त...

मित्र जमतात, बेत ठरतो, सर्वजण आपापल्या व्यापातून वेळ काढतो आणि मग एक दिवस ठरवून आपण प्रवासासाठी बाहेर पडतो.
धार्मिक पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे, शहराच्या आसपासची गावं इत्यादी जागा निवडून प्रवास करताना हे सर्व उत्तम असतं.
परंतु, गड दुर्ग, डोंगर रांगा, रस्ता, वस्तीपासून दूर असलेल्या जागा अश्या एखाद्या भटकंतीसाठी निवडताना पूर्णपणे वेगळा विचार करायचा असतो, हे कोणाच्याच का लक्षात येत नाही??
इथली दुर्गमता, इथल्या फसव्या वाटा, अगदी अनोळखी असणारी रचना, बऱ्याच ठिकाणी नसणारे नेटवर्क अश्या अनेक बाबी आहेत यात. या सर्वांबद्दल विस्तृत चर्चा इथे घडलेली आणि आणि घडत राहील. परंतु, आपण बाहेर पडताना जर दुर्गम जागी जाणार असू तर आपल्याला वेगळा विचार करायला हवा.

अगदी कुठेही जाताना आपण सर्वचजण आर्थिक बचत हा विचार करतो.. आपले पैसे कसे वाचतील हे पाहताना सर्वात आधी पैसे वाचवले जातात ते "आपलं आपण जाऊ" म्हणून.. नको वाटाड्या, नको कोणी आयोजक किंवा संयोजक, नको व्यावसायिक संस्था...

या सगळ्या गोष्टीत पैसे खर्च करणं हे कसं विनाकारण आहे आणि हे सर्वच लोक कसे लुटतात, हा विचार केला जातो.

बाकी सगळं येतं ... अगदी दुर्गम भागात ज्या गोष्टी घेऊन जाऊ नयेत अश्या व्यसनांना या यादीत स्थान असतं... परंतु, वाटाड्या, संस्था इत्यादींवर खर्च नको म्हणून आपण आपली सुरक्षितता आणि जीवाचे महत्त्वच बाजूला टाकलेले असते, हे कोणाच्याच ध्यानी येत नसावं का??

का घेतात पैसे हे लोक? वाटाड्या आपला दिवस मोडत असतो तुमच्यासाठी... व्यावसायिक संस्था, आयोजक हे प्रशिक्षित, नोंदणीकृत असतात, ते तुमच्या जीवाची, सुरक्षेची जबाबदारी घेत असतात... त्याच्या बदल्यात त्यांना होणारा नफा आपल्या सुरक्षेशी जोडून पाहा... किती असतो हा नफा?? आपल्या जिवापेक्षा तर खूपच कमी...

अहो, शासन एखाद्या अपघाती मृत्युसाठी नातेवाइकांना जी रक्कम देते ती असते २-५ लाख रुपये... ती रक्कम ध्यानी धरुन सांगा... ती सुद्धा आपल्या जीवासमोर खरं तर नगण्यच..

आणि आपण २००-५०० वाचवण्यासाठी संपूर्ण जीव धोक्यात घालतोय.

आपण जातोय ती जागा किती दुर्गम, योग्य वाटा कुठल्या, माघारी कुठं फिरायचे, कधी निघायचे, कधी यायचे... अमुक वेळच का? अमुक वाट, अमुक जागा, अमुक पद्धतीनेच का... या सर्वांसाठी वाटाडे, आयोजक यांची वर्षे गेलीत हो...
त्यासमोर तुमच्याकडून त्यांना मिळणारा नफा काहीच नसतो..

माझं म्हणणं असं अजिबात नाहीये की आयोजकांसोबत, वाटाड्या सोबत अपघात होणारच नाही. परंतु, त्यांच्या सोबत असताना ही शक्यता १ टक्क्यांहून कमी होते.

म्हणूनच आयोजक सुद्धा निवडून पहावे लागतात..त्यांची नोंदणी झाली आहे का? प्रशिक्षित आहेत का? कधीपासून काम करतात? आपण जिथे जातोय, तिथं ते किती वेळा गेले आहेत? सोबतीला किती जण येणार आहेत. आवश्यक सुरक्षा उपकरणे आहेत का? अश्या अनेक गोष्टी येतात त्यात सुद्धा ... त्यावर सविस्तर बोलता येईल..

परंतु, एक विनंती...

आपापले जाऊन TTMM करु वगैरे म्हणत स्वतःच्या सुरक्षेशी किती खेळायचे याचा विचार करा.. कारण, असे अपघात झाल्यावर त्याला जबाबदार नसलेल्या आयोजकांवर सर्वात जास्त परिणाम होतो.. अनेक ठिकाणं बंद झाल्यामुळे आयोजक, जे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांचे प्रचंड नुकसान होते.

(याला याच्या धंद्याचे पडले आहे असे वाटणारे लोकही इथं येतील कमेंट करायला.. करा... परंतु, आयोजकांची गरज काय? ते सांगण्याचा हा एक प्रयत्न... बाकी देशात लोकशाही आहेच.. )

Prawasvede invites you to ⛰️*Devkund Waterfall Trek*_Easy for All One Day Trek_🗓  *2nd July 2023* (_Departure on 1st Nig...
28/06/2023

Prawasvede invites you to

⛰️*Devkund Waterfall Trek*
_Easy for All One Day Trek_

🗓 *2nd July 2023* (_Departure on 1st Night_)

🏁 Starting Point : Prawasvede Office,Sadashiv Peth, Pune

🛫 DEP : 10:30 p.m. | Saturday
🛬 ARV : 08:30 p.m.| Sunday

💰 _*Fees :*_

*₹1275/- (Pune - Pune with Transport)*

✅ *Inclusions :*

🚌 Travel in a Private Vehicle (non-AC)
🍴 Breakfast, Lunch, Evening Tea
🍊 Energy Perks for the Trek
🏵️ Travel with *MahaTourism Approved Adventure Tourism Operator*
🧗🏻‍♂️ Certified & Experienced Trek Leads
💊 First aid kit Available

🔖 _For More details & Registrations:_
📞 *Call us: 8551999299*
www.prawasvede.in

Two Interesting Things to do on the Weekend
23/06/2023

Two Interesting Things to do on the Weekend

20/06/2023

प्रवासवेडे / Prawasvede
Upcoming Events

24th June: Pune Heritage Walk
25th June: Tamhini Jungle Trek by Prawasvede

30th June: Ghangad Fort Trek
1st July: Devkund Waterfall Trek

8-9 July: Panhala - Pawankhind - Vishalgad Trek
9th July: Aadrai Jungle Trek
9th July: Malshej Ghat Trek with Kalu Waterfall

More Information: 8551999299
www.prawasvede.in

Prawasvede is Happy to announceour First *Heritage Walk in Pune*. 📅 10th June 2023 | 07:00 a.m. Let's Discover the timel...
05/06/2023

Prawasvede is Happy to announce
our First *Heritage Walk in Pune*.

📅 10th June 2023 | 07:00 a.m.

Let's Discover the timeless charm of Pune's Old City on a captivating Heritage Walk.

Unearth fascinating stories of Kasba Ganapti Temple, Mujumdar Wada, Nana Wada, and more.

Join us for an hour of enchantment, unraveling the rich history and hidden treasures of our beloved city.

Don't miss this chance to deepen your connection with Pune!

Fees: INR 250/- (Including a Tasty Breakfast & a lot of Information about our beloved city)

Contact for Details: 8551 999 299
www.prawasvede.in

🏕️ Fireflies Special Camping....📍 54Km from Pune.🏕️ Perfect outing for FamilyBooking Started📆  4th-5th June 2022 (Few Se...
31/05/2023

🏕️ Fireflies Special Camping....

📍 54Km from Pune.
🏕️ Perfect outing for Family

Booking Started
📆 4th-5th June 2022 (Few Seats Left)
DM or Call us to book your seat 8551999299
Other places are also active

🌻 Flowers Special October Events1.  Raireshwar Plateau Trek : 2nd October 2022Grade : EASY2. Ratangad Trek : 9th October...
28/09/2022

🌻 Flowers Special October Events

1. Raireshwar Plateau Trek : 2nd October 2022
Grade : EASY

2. Ratangad Trek : 9th October 2022
Grade : Easy-Mediun

3. RAJGAD STUDY TOUR : 16th October 2022
Grade : Easy-Medium

📞 Please connect for More Details : 8551999299

75 years of Independence
15/08/2022

75 years of Independence

Address

1420, First Floor, Joshi Wada, Sadashiv Peth, Pune/
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm

Telephone

+918551999299

Alerts

Be the first to know and let us send you an email when Via Ferrata Adventure Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Via Ferrata Adventure Solutions:

Share