23/09/2024
https://forms.gle/6j4VjhTV53FHHXYH9
नीलेश नीलकंठ ओक हे एक लेखक, मूलभूत संशोधनात रमणारे संशोधक,TEDx वक्ता, UAA-ICT चे नावाजलेले माजी विद्यार्थी आणि उत्तम Keynote भाषण देणारे वक्ता म्हणून लोकप्रिय आहेत,त्यासाठी अनेक संस्था त्यांना निमंत्रित करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी मध्ये बी. एस.आणि एम. एस. केले आणि नंतर एक्झिक्युटिव्ह एमबीए (Executive MBA)ही केले.
त्याची तीन क्रांतिकारक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
१. When did the Mahabharat a War Happen?
२.The Historic Rama
३.Bhishma Nirwana.
त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत.
संपूर्ण जगभर भरपूर प्रवास करीत,विश्वविद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत असतात आणि तसाच संवाद मुख्य धारेतील श्रोत्यांशीही साधतात. त्यांच्या कामाने कादंबऱ्या, कादंबरिका माहितीपट आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे. त्यांचा अनेक विषयांचा आणि जागतिक संस्कृतींचा गाढा अभ्यास आहे.
ते वाचकांना/श्रोत्यांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या पुरातनतेचे भान आणून देऊ इच्छितात. त्यामुळे लोकांना आपल्या संस्कृतीचे खरे आणि पूर्ण भान येईल आणि ते इतर इंडिक (Indic) संशोधक ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीला लोकांसमोर सादर करतात त्यांच्या बनावट सादरीकरणासमोर आपल्या संस्कृतीच्या खर्या,संपन्न आणि सम्रुद्ध रुपाचे समर्थन करू शकतील. नीलेश ओक आपला युक्तिवाद शास्त्रीय कुशाग्र बुद्धी, वस्तुनिष्ठ पुरावा आणि तार्किक कारणमीमांसेतून उभा करतात.
ते इन्स्टिटयूट ऑफ ऍडवान्सड सायन्सेस या डार्टमाऊथ , मॅसाच्युसेट्स येथील अमेरिकन संस्थेत संशोधक आणि अधिवक्ता प्राध्यापक या नात्याने निगडित आहेत.