Travellers Katta

Travellers Katta Travellers katta is group of people having common passion which challenges you, intrigues you and motivates you i.e. Traveling.

We are here to share our experiences with you. Just go where you feel alive, boost your confidence, expand your horizon.

ताडोबा जंगल सफारी    खरं तर आधी जंगल सफारी साठी मी फार उत्सुक नसे पण जिम कॉर्बेट ला जाऊन आल्यानंतर जंगल सफारी ची नशा अंग...
13/11/2022

ताडोबा जंगल सफारी

खरं तर आधी जंगल सफारी साठी मी फार उत्सुक नसे पण जिम कॉर्बेट ला जाऊन आल्यानंतर जंगल सफारी ची नशा अंगात भिनली. दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये गेल्यामुळे आणि मध्यंतरीच्या काळात travellers कट्टा च्या कार्यकर्त्यांची विकेट पडल्याने ( शुभमंगल सावधान झाल्याने ) पुढची सफारी कुठे आणि केव्हा हा प्रश्न होताच. माझं सासर यवतमाळ असल्याने दिवाळीच्या सुट्टीत ताडोबा सर करण्याचे ठरले. माझा नवरा आणि सासु- सासरे हे ही हाडाचे traveller असल्याने मस्त भट्टी जमून आली. ताडोबा जाण्यासाठी एक ते दीड महिना आधी बुकिंग करावी लागते. दिवाळी ची धामधूम आटोपल्यानंतर आमची स्वारी निघाली. वेळेच्या कमतरतेमुळे दोनच सफारी चे बुकिंग केले होते. जिम कॉर्बेट ला ५ सफारी करून सुद्धा वाघोबांनी हुलकावणी दिल्यामुळे आणि आता थंडीचा हंगाम असल्याने यावेळीही मन साशंक च होते.
मॉर्निंग सफारी असल्याने (सकाळी ६.३० ते १०.३०) आम्ही आदल्या दिवशीच दुपारी निघालो. नावेगाव - रामदेगी गेट जवळ खडसंगी गावात आमचा होम स्टे होता. पुण्याच्या इंच इंच लढवू ट्रॅफिक मधून गेलेलो आम्ही यवतमाळ - नागपूर सहा पदरी रिकाम्या राजमार्गाने निवांत गाडी हाकत संध्याकाळच्या सुमारास खडसंगी गावात पोहोचलो. तिथला होम स्टे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच सुखावह होता.
दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० लाच तयार होऊन ६ वाजता नावेगाव गेटवर धडकलो. प्रवेशाचे सगळे सोपस्कार आटपून अवजारांसह सज्ज होऊन ( कॅमेरा हो) एकदाचे जिप्सी त बसलो. ( इथे सफारीदरम्यान मोबाइल वापरास बंदी आहे. कॅमेरा शुल्क भरून नेण्यास परवानगी आहे.)
थंडीचा मौसम नुकताच सुरू झाल्याने हलकेच उजाडलं होते. बफर झोन ओलांडून आम्ही कोअर झोन मध्ये प्रवेश केला. जंगलात प्रवेश करणारी आमचीच पहिली जिप्सी असल्याने रानात अजून शांततेचा भंग झाला नव्हता. आत गेल्या गेल्याच माळढोक पक्षाने सलामी दिली. नील गाय , बायसन ( इंडियन गौर - रानगवा ) अजून सुस्तावलेली च होती. हरणं, भेकरं मस्त बागडत चरत होती. सांबर, चितळ, वानरं त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न होती. गुलाबी मोहक थंडीत आम्ही गर्द जंगलात विहरत होतो. पण एक नजर जंगलच्या राजाला शोधत होतीच. बलराम, माया, छोटी तारा, बबली, मधु यांपैकी कोणीतरी एक दर्शन देईल अशी आशा होती.
आमचा गाइड आणि ड्रायव्हर हे मुरलेले अनुभवी होते. इतर प्राण्यांचे अलर्ट कॉल्स ऐकत , पगमार्कस् ( पाऊलखुणा) चा मागोवा घेत घेत आम्ही वाटा धुंडाळत चाललो होतो. पाणवठ्यावर , गर्द झाडीत कुठे चाहूल लागतेय का ते बघत होतो. वाटेत ताडोबा देवाचे दर्शन देखील झाले. ताडोबा हा तिथल्या मूळ आदिवासींचे दैवत. तारू हा आदिवासींचा नायक वाघाशी लढता लढता धारातीर्थी पडला त्यावरून तारोबा व नंतर ताडोबा हे नाव रूढ झाले अशी आख्यायिका आहे.
बघता बघता ९.३० वाजले. ही सफारी वाया जाते की काय असे वाटत असतानाच परतीच्या वाटेवर लांबूनच पांढरपौनी कडे २-३ जिप्सी आणि १ कँटर उभा असलेला दिसला. ड्रायव्हर ने तत्परतेने गाडी तिकडे वळवली… आणि साक्षात् ताडोबाची सेलिब्रिटी वाघीण माया तिच्या बछड्या ला साद देत टेचात उभी होती. याचसाठी केला होता अट्टाहास असं क्षणभर वाटून गेलं.
पटापट तिने दिलेल्या पोझेस कॅमेरात कैद करत , तिचं ते राजेशाही रूप डोळ्यात साठवत सफारीच्या वेळमर्यादेमुळे माघारी वळलो. अक्षरशः १० मिनिटांचं तिचं ते दर्शन रोमांचित करून गेलं. परतताना वाटेत पुन्हा हरणं डोळे मिचकावत पसार झाली, जंगल च्या राणी च दर्शन होऊनही मन भरलं नव्हतं, अजून हवं अशी मनाची हाव होतीच. मानवी स्वभावच शेवटी. दुपारची सफारी २ वाजता सुरू होणार होती. दुपारचे जेवण आटोपून थोडासा आराम करून पावणे दोन वाजता पुन्हा गेट वर दाखल झालो.
आताचे गाइड व ड्रायव्हर बदलले होते. दोघंही थोडे नवखे होते. पण आम्ही अनुभवी झालो होतो. आता बऱ्यापैकी ऊन जाणवत होतं. सकाळच्या अपुऱ्या दर्शनामुळे अतृप्त मनाने ड्रायव्हर ला गाडी पुन्हा पांढरपौनीकडे च घ्यायला लावली. खरं तर ३ तासांच्या वर उलटून गेले होते. माया तिथे असण्याची बिलकुल शाश्वती नव्हती पण तरीही नशीब आजमवण्याचे ठरवले. जंगलाची भाषा, तिथले नियम , वातावरण हळूहळू समजत होते, पांढरपौनी जवळ येताच १-२ जिप्सी तिथे उभ्या दिसल्यामुळे थोड्या आशा पल्लवित झाल्या. का कोण जाणे त्या दिवशी आमच्या कुंडलीत व्याघ्रयोग बलवत्तर होता. आमची गाडी थोडी पुढे जाताच माया तिच्या बछड्याला तोंडात धरून समोरून चालत येताना दिसली. आम्ही गाडी थांबवली. आमच्या मागे आलेल्या अजून ४-५ गाड्याही थांबल्या. कुणाचीही पर्वा न करता आमच्याकडे तिरकस नजर टाकत बाईसाहेब ऐटीत गाडीशेजारून चालत गेल्या. तिची ऐट, बेदरकार चाल पाहून ती ताडोबाची सेलिब्रिटी वाघीण का आहे ते चांगलेच कळाले. आमच्या जिप्सी समोरच ती त्या बछड्याला घेऊन झाडीत शिरली, कुठल्याही फोटोग्राफर ला हेवा वाटेल असा ॲंगल आम्हाला मिळाला. मनसोक्त फोटोग्राफी करत , तिची प्रत्येक हालचाल डोळ्यात साठवत , तिच्या बछड्याच्या बाललीला पहात पाऊण एक तास कसा गेला कळालंच नाही. सफारीच्या नियमांनुसार जंगलात एकाच जागी जास्त वेळ थांबता येत नाही, आमचेही मन तृप्त झाल्याने आम्ही पुढे निघालो. मोर- लांडोर यांचा लाडिकपणा, हरणांच्या पाडसांचा दंगा, मस्तीखोर वानरं , धनेश, टिटवी, पाषाणगोजा, सुतारपक्षी, खंड्या ( किंगफिशर) , वेडा राघु, खाटिक , रेड व्हेंटेड बुलबुल यांची उड्डाणं , विस्तीर्ण तलावात तरंगणारी मगर यांची छबी टिपत टिपत परतीची वाट पकडली. जिम कॉर्बेट वरून परततानाची हुरहुर आता नव्हती. समाधानी मनाने मावळत्या दिनकराच्या संध्याछायेत आपापल्या घरट्यात परतणाऱ्या त्या जीवांना निरोप देत आम्हीही आमच्या घरट्याकडे निघालो.

डॉ. वर्षा मुंढे-अढाव

तळटीप- ताडोबा बुकिंग्ज, विविध झोन बद्दल ची माहिती, तसेच आम्ही अनुभवलेली सफारी ट्रॅव्हल व्लॉग च्या माध्यमातून लवकरच आमच्या Travellers कट्टा च्या YouTube channel वर……….

03/11/2022

ताडोबा जंगल सफारी

Travel vlog and blog are coming soon…..
follow us for updates…..

01/05/2021

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
सह्याद्रीच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देशा !

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !

Photography is the story I fail to put into words!Happy world photography day!!!                                        ...
19/08/2020

Photography is the story I fail to put into words!
Happy world photography day!!!
❤️📷 📷

31/07/2020

🏕️"Spiti Valley Road Trip" EP3
Link 👇 https://youtu.be/jI8o4AL6OmI

Kaza market 🛒
World highest Chicham bridge 🌉
World highest post office 📬
Mysterious chandrtal lake 🦢
And many more Full HD Video link in insta Bio also 😍

🏕️"Spiti Valley Road Trip" EP1🎥 link Full HD Video👇🏼
22/05/2020

🏕️"Spiti Valley Road Trip" EP1

🎥 link Full HD Video👇🏼

Travellers Katta Presents ⛰️ "Spiti Valley Road Trip 🏕️ - Land of Lamas🧘‍♂️"

All I need is Mountain 🏞️breeze & Tall trees 🌲
09/05/2020

All I need is Mountain 🏞️breeze & Tall trees 🌲

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travellers Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Travellers Katta:

Shortcuts

Share