16/12/2018
खजुराहोच्या मंदिरांची कहाणी
आणि तिथली कोरीव शिल्प - सगळचं वेड लावणारं !!
अद्भुत - असं एका शब्दात सांगता येईल ते😍
चंदेला राजांचा पराक्रम ...
ज्यांनी इस्लामी आक्रमण नुस्ती परतून लावली नाहीत तर त्यांना हरवून पळवून लावलं; त्यानंतरचे त्यांचे विजयोत्सव त्यांच्या चारित्र्याची ,कर्तव्यदक्षतेची आणि पराक्रमाची साक्ष देतात.
भारतीय तत्वज्ञानात राजाने कसे असावे हे सांगितले आहे ,त्याचे वर्णन इथे साक्षात बघायला मिळते.
धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या हिंदू धर्माच्या चार पायऱ्या आणि त्या प्रत्येकाचे रोजच्या आयुष्यातले महत्त्व अक्षरशः इथे रेखाटले आहे.
आजच्या काळात स्वतःला #मॉडर्न म्हणवणाऱ्या #सिव्हीलाईज्ड समजणाऱ्या समाजाने हा काळ समजून घेतला तरी ,आज इथे निर्माण झालेले जातीयवाद, भेदाभेद आणि कथित पुरोगामीत्वाचे बुरखे गळून पडतील.
विज्ञान,गणित-भूमिती,दिशाज्ञान,स्थापत्य,भूगोल,इतिहास आणि धर्माचा अभिमान (दुराभिमान नव्हे) सोबतीने इतरांचा आदर ,सगळंच कसं समतोल !!!
भारतवर्षात फिरताना रामायण, महाभारत, दशावतार आणि इतर हिंदू पुराण कथा -
हा भरतवर्षाला जोडणारा धागा आहे.
इथे नंतर येणाऱ्या बौद्ध,जैन आणि इस्लामलाही जागा दिली गेली आहे ...
आणि हे सम्पूर्ण भारतवर्षात आढळून येते.
तेव्हा सहिष्णुता म्हणजे काय हे वेगळेपणाने सांगायची ,मांडायची गरज उरत नाही.
आणखी एक मुद्दा प्रामुख्याने लक्षात आला, इथे भावभावात सत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा नाही किंवा गद्दारी नाही.प्रजेत असंतोष नाही .
(चंदेल राजांच्या आजच्या पिढीबद्दल ही फार आदराने बोललं जातं😊)
मला वाटतं ,धर्माचा पाया इथे आहे.
धर्माचे मूळ हे आहे.
यांना खरा धर्म समजला होता/आहे.
चंदेल वंशाची जन्मकथा मोठी रोचक आहे.
मला वाटतं त्यांच्यात असणारा त्यांना किर्तीशिखरावर घेऊन गेला असावा.
जगणाऱ्याला धर्म पाळावा लागतो-
(विशिष्ठ न्याय्य बंधन).
जगणाऱ्याला अर्थ कमवावा लागतो- (पोटासाठी,कुटुंबासाठी).
निकोप जगण्यासाठी काम आवश्यक आहे-
(स्त्री-पुरुष दोघांसाठी)
आणि मोक्ष हे अंतिम निधान
(आत्म्यासाठी ,स्वतःसाठी)
इथे फिरताना वाटलं, धर्म म्हणजे काही नियम ,समाजाला बांधून ठेवण्यासाठीचे ,बाकी काही नाही.
काम अर्थात प्रेमभावना -
ना त्याचे उदात्तीकरण,
ना फाजील झाकाझाकी 💖
जे जसं आहे तसं ...
निकोप आणि स्वाभाविक !!
तिथेही भेद नाही ,
स्त्री-पुरुष दोघेही व्यक्त होणारे !!!
प्राण्यांसोबत सेक्स असेल किंवा आताचा 377 किंवा तांत्रिक फॅन्टसी सगळं मोकळढाकळ ...
मानवी गरजेला धर्मात दिलेलं स्थान तितक्याचं सहजतेने स्वीकारणारे चंदेला राजे आणि त्यांची जनता 🙏
परमेश्वराच्या चरणी लीन राहणारा राजा
(एक अंकुश या अर्थाने)
प्रजाप्रिय असतोचं☺️
मंदिरांच्या रचनेतसुद्धा धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष;
आकाश ,पातळ आणि धरती (आपण) यांचा विचार करणाऱ्या त्यांच्या विचारांना 🙏🙏
खजुराहो चारी बाजूनी पहाडी आहे,सगळीकडे दगडचं दगड ,मधेच शेतांची हिरवाई आणि दुपारच्या उन्हातही झोंबरी थंडी !! आणि भोवताली गर्द वनराई ,त्यात प्राण्यांची सभा 🐆🐒🐿️🐘🦏🦌
एक मस्त जंगल सफारी, या इतिहासाच्या बरोबरीने
आपल्या ट्रिपची खुमारी वाढवते 😊
एकुणात सुंदर बारकाईने रेखाटलेली,नटलेली शिल्प, त्यामागचा विचार ,त्याच्या निर्माणाचे कारण, आदर्श राजा, सुबत्ता आणि निसर्गाचा वरदहस्त अनुभवायला #खजुराहो पाहायला हवं !!
थोडं लांब आहे किंवा अडनिड्या जागी आहे पण आपला संपन्न वारसा जपणारे हे राज्य इथपर्यंत येणाऱ्याला समाधान देत ,यात शंका नाही. 😍
#खजुराहो
#रमा_टुरिझम
#अनुभव_हाचं_आनंद