11/01/2026
आधी बेसिक शिक्षण म्हणून 12 वी केली नंतर NIIT मधून 3 वर्षाचे सॉफ्टवेअर इंजिनियरिंग पूर्ण केली C, C++, Javha, CORE JAVA, ADVANCE JAVA , .net, vb+, ASP.NET पूर्ण केले.
पण ह्याच्या नादात ग्रॅज्युएशन पूर्ण करायला 6 वर्ष गेले त्यामुळे प्रॅक्टीस करायला मागे पडलो आणि पदवी नंतर लग्न केले. लग्नानंतर LG मधील जॉब करत करत सर्वात आधी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोलापूर विद्यापीठातून 2 वर्षाची पत्रकारिता पण पूर्ण केली आणि त्यानंतर नोटबंदी झाली आणि तो पण जॉब गडगडला. परत एक वर्ष जॉब सोडून 10 वर्ष कमावलेला पैसा बाईकवर भारत फिरत राहिलो आणि नंतर पुण्याला शिफ्ट झालो 3 वर्षे ऑटोमोबाईल क्षेत्रात जॉब करून कामावर एक अपघात झाल्यामुळे पुन्हा 4 महिने ब्रेक घ्यावा लागला. नंतर त्या जॉब वाल्याने जबदारी न घेतल्याने तो जॉब सोडून जस्ट डायल मध्ये 9 महिने काम केले शेवटी तिथे पण वर्चस्ववाद झाल्यामुळे तो पण जॉब सोडला आणि 2019 च्या एंडिंगला बायकोला दुकान टाकून दिले.
त्यानंतर 2020 मधे पहिला लॉकडाऊन लागला आणि तेव्हापासून जो जॉब सोडून दिला आणि नंतर लोकडाऊन संपल्यावर मूळ आवड असलेला छंद व्यवसायामध्ये रूपांतरित केला आणि Born To Roam ट्रॅव्हल कंपनीचा उदय झाला. व्यवसायाला जोडधंदा म्हणून 2024 मधे कार रेंटल सर्व्हिस सुरू केली आणि हॉलिडे पॅकेज आणि कार रेंटल सर्व्हिस सोबत, हॉटेल बुकिंग आणि तिकिटी बुकिंग सेवा सुरू केली आणि ती सर्व सेवा आजतागायत सुरू आहे .
आता सर्वात जास्त फोकस हॉलिडे पॅकेज वर आहे... देवदर्शन यात्रा आणि गडकिल्ले भटकंती सेवा ह्याच्यावर आहे...त्याच्यामुळे भारतभर फिरणे झाले गेल्या वर्षभरात 80,000 किलोमीटर बाय रोड, 9 राज्य, 1 केंद्रशासित प्रदेश आणि बरेच काही ऐतिहासिक वर्ल्ड हेरिटेज साईटला भेटी देण्यात आल्या आणि हा सगळा प्रवास तुमच्या सर्वांच्या साथीने अविरत सुरू आहे आणि इथून पुढे अजूनही चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न असेल....
Born To Roam Holidays
9823416117