मावळ मुलुख

मावळ मुलुख चला करूया सफर निसर्गरम्य मावळ तालुक्?

नुसतंच सिमेंट मध्ये जाण असून उपयोग नाही, बांधणाऱ्याच्या काळजात इमानदारी असली पाहिजे...
18/07/2020

नुसतंच सिमेंट मध्ये जाण असून उपयोग नाही, बांधणाऱ्याच्या काळजात इमानदारी असली पाहिजे...

हिंदू संस्कृतीने विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी."योग एक शास्त्र आहे, शरीर, मन व आत्मा यांचे एकत्रितरित्या संतुलन घडवण्या...
21/06/2020

हिंदू संस्कृतीने विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी.
"योग एक शास्त्र आहे, शरीर, मन व आत्मा यांचे एकत्रितरित्या संतुलन घडवण्याचे, निरोगी व प्रसन्न ठेवण्याचे"
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सर्वाना शुभेच्छा.

आज जागतिक पर्यावरण दिवसचला सौंदर्य जपूयात वसुंधरेचे !झाडे करू नका नष्ट, श्वास  घेण्यास होईल  कष्ट. 🌱🌳
05/06/2020

आज जागतिक पर्यावरण दिवस
चला सौंदर्य जपूयात वसुंधरेचे !

झाडे करू नका नष्ट, श्वास घेण्यास होईल कष्ट. 🌱🌳

नाणे मावळातील नेसावे गावमधील पुरातन विहीर ही वापरात नसल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. तसेच विहिरीची बरी...
03/06/2020

नाणे मावळातील नेसावे गावमधील पुरातन विहीर ही वापरात नसल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. तसेच विहिरीची बरीच पडझड झाली होती.
दुर्लक्षितपणामुळे आपले एेतिहासिक वारसा व ठेवा नष्ट होत आहे.
हा एेतिहासिक ठेवा जपण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान व नेसावे ग्रामस्थानी पुढाकार घेवुन ह्या विहिरीचा संपुर्ण गाळ काढुन, तसेच पडझड झालेली भिंत बांधुन घेतली. व एेतिहासिक ठेवा संवर्धन पुनर्जिवीत केला.

03/06/2020
09/05/2020

हा आवाज आहे मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील औंढे गावाच्या शिवभक्त युवकाचा ज्याचं नाव आहे संदेश भोसले.

कसा आहे आवाज, नक्कीच सांगा.

जय शिवराय🚩

 #मावळ_अॅडव्हेंन्चर च्या वतीने ( दि.०३ नोव्हेंबर ) रोजी  #आंदर_मावळातील  #कुसुरघाट_पदभ्रमण_मोहिम ठेवण्यात आली आहे. ऐतिहा...
02/11/2019

#मावळ_अॅडव्हेंन्चर च्या वतीने ( दि.०३ नोव्हेंबर ) रोजी
#आंदर_मावळातील
#कुसुरघाट_पदभ्रमण_मोहिम ठेवण्यात आली आहे. ऐतिहासिक कुसूर घाटाची सर्वांना माहीती व्हावी, कुसूर घाटाचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी या घाटाचे पदभ्रमण मोहिम राबवण्यात आली आहे.

इतिहासाचा अभ्यास करताना घाट मार्गाचा उल्लेख येतोच. युद्ध मोहिमांच्या हालचाली, समुद्र मार्गाने आलेल्या मालाची ने-आण, विविध व्यापार्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, धर्म प्रसार यांकरीता घाटांचा वापर प्राचीन काळापासुन मोठ्या प्रमाणात केला जात असे. या घाट मार्गांचा वापर करून तत्कालीन राज्यकर्ते राज्याकरीता जकातीच्या स्वरूपात संपत्ती जमा करत असत. घाट मार्गावरून होत असलेल्या व्यापाऱ्यांची व मालाची वाटमारी होवु लागल्याने त्यांच्या सुरक्षिततेकरीता व लक्ष ठेवण्याकरीता या ऐतिहासिक घाट वाटांवर गडकिल्ल्यांची निर्माती करण्यात आली. तत्पूर्वी लेण्यांची निर्माती झाली होती. अशा या घाट वाटांचा वापर कमी होत गेल्या नंतर त्या अता विस्मरणात जावू लागल्या आहेत. या ऐतिहासिक घाटवाटांपैकी एक म्हणजे कुसुर घाट हा घाट जिवंत राहवा म्हणुन मावळ अँडव्हेन्चर संस्थेच्या वतीने गेले अनेक वर्षापासुन कुसूर घाट पूनुरूज्जिवनाचे काम करत येत आहे. या घाटाची सर्वांना माहिती व्हावी, त्याचा इतिहास सर्वांना कळावा म्हणुन ऐतिहासिक कुसूर घाट पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत कुसूर घाटा बद्दल ऐतिहासिक नोंदींचा उल्लेख असलेल्या कागदपत्रांची माहिती, पदभ्रमण करते वेळी घाटात लावलेले मैलाचे दगड, घाट वाटाचा माहिती, घाटातुन जाणाऱ्या वाटसरूस पाण्याचे पाण्याची सोय म्हणुन कातळातील टाक्यांची माहिती, अष्टकोणी पाण्याचे टाके, तसेच घाट पूनुरूज्जिवन अनुभव अशी माहिती देण्यात येणार आहे
तसेच सदर वेळी "सह्याद्रीतील घाटवाटा व दुर्ग" या विषयावर इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान होणार आहे.
सदर मोहिमेस ( दि.०३ ) रोजी सकाळी साडे आठ वाजता आंदर मावळमधील कुसुर गावातून प्रारंभ होईल अशी माहिती मावळ अँडव्हेन्चरचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ जावळीकर यांनी दिली.

- मावळ टाईम्स

गोंद्या आला रे आला..२२ जून , आजच्याच दिवशी क्रांतिवीर चापेकर बंधूनी पुण्यामध्ये रँड चा वध केला, संपूर्ण जगात केवळ एकच अश...
22/06/2019

गोंद्या आला रे आला..

२२ जून , आजच्याच दिवशी क्रांतिवीर चापेकर बंधूनी पुण्यामध्ये रँड चा वध केला, संपूर्ण जगात केवळ एकच अशी घटना असेल जिथे एकाच घरातील ३ सक्खे भावंड फासावर गेले. क्रांती हे कोण्या येड्या गबाळ्याच काम नाही हे या तिघांनाही माहित होतं, आणि ह्या कृत्यानंतर आपले काय हाल होणार हे माहित असतानादेखील ह्यातील २ भावंडाना बायका पोर असताना देखील त्यांनी हे साहस केले कोणासाठी ??
स्वतःसाठी ??
नाही नाही ह्या स्वातंत्र्य देवतेसाठी, ह्या भारत माते साठी त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली.

अशा ह्या तीनही वीरांना शतशः नमन 🙏

- मावळ मुलुख

आंतरराष्ट्रीय योग दिवसहिंदू संस्कृतीने विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी..- मावळ मुलुख
21/06/2019

आंतरराष्ट्रीय योग दिवस

हिंदू संस्कृतीने विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी..

- मावळ मुलुख

सावरकर म्हणजे तेज,सावरकर म्हणजे त्याग,सावरकर म्हणजे तप,सावरकर म्हणजे तत्व.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक लखलखते सोनेरी प...
28/05/2019

सावरकर म्हणजे तेज,
सावरकर म्हणजे त्याग,
सावरकर म्हणजे तप,
सावरकर म्हणजे तत्व.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक लखलखते सोनेरी पान, एक धगधगते अग्निकुंड, कोट्यावधी युवकांना क्रांतिकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देणारे अदभूत व्यक्तिमत्व क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन...!

- मावळ मुलुख

Address

Shop No 04, Alankar Residency, Mhaskarnes Colony 02, Talegoan Dabhade
Pune
410507

Alerts

Be the first to know and let us send you an email when मावळ मुलुख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मावळ मुलुख:

Share

Category