18/11/2022
प्रवासाचा शेवटचा टप्पा.. कधीही न यावा वाटणारा... कातर.. करणारा
आशियातील एकमेव बहुतेक सुंदर घळ.. देवघळबीच, ,
निर्मळ, नितळ,निर्मनुष्य, सुंदर, समुद्र..
रंगांची उधळण करणारा सूर्यास्त..
सूर्योदयाचे साक्षीदार, हजारो सीगल्स.. त्यांच्यासमोर.. ते ही, गर्दी, शोबाजीपासून, शटरबॅग्जपासून दूर समुद्रकिनारी..
हे सहज बघायला जाताना समोर, झाडावर…. पानावर,फुलांवर,घरांवर,हॉर्नबील्स,ससाणा,बूलबूल,ब्राऊन हिरवी कबूतर,,
फुलं किती ती विविध रंगांची..जास्वंदीचीच ६-७वेगळे रंग..
सुपारी पोफळी नारळ..हे ते ते..सगळ
कातळआर्ट,२०००ते १०,०००वर्ष पूर्वीची..
कुठे?
काकांच्या घरी...
माहेर...
सुहास गुर्जर काकांचा होम स्टे.अाडीवरे...सिंपल बट स्वीट..
दीपाली पुरंदरे