Prindavan Agro Tourism

Prindavan Agro Tourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prindavan Agro Tourism, Sightseeing Tour Agency, Prindavan, Rajapur.

10/07/2023

प्रिंदावण 💚

देवगडकरांनो, समर्थकांच्या भुलथापांमध्ये अडकू नका.. ते सांगतील रिलायन्स ६०० एकर मध्ये १ लाख ३० हजार झाडांच्या आमराईतून ६०...
20/11/2022

देवगडकरांनो, समर्थकांच्या भुलथापांमध्ये अडकू नका..
ते सांगतील रिलायन्स ६०० एकर मध्ये १ लाख ३० हजार झाडांच्या आमराईतून ६०० टन आंबा पिकवतो..

तुम्ही त्यांच्याकडे आंब्याच्या बागांचे .. आणि आंबे लागलेल्या बागांचे व्हिडीओ मागा..
रिलायन्स हापूस आंबा पिकवत नाही.
६०० एकर मध्ये १ लाख ३० हजार झाडे गणित तपासून पहा.. फक्त ७ फुट त्रिज्येची झाडे बसतील
६०० एकर मध्ये ६०० टन म्हणजे, एका एकरात १ टन
एका आंब्याचे सरासरी वजन २५० ग्राम पकडले तरी फक्त झाडामागे १० पेटी आंबा.
पण वरील आकडे पण किती फुगवलेले असतील ते आपल्याला माहीत नाहीत.

उद्या रिफायनरी प्रदूषणाची आग ओकणार आहे.. सल्फर डाय ओक्साइड, कार्बन डाय ओक्साइड नायट्रोजनची अनेक ओक्साइडस हवेत सोडणार आहे. सोबत औष्णिक ऊर्जा प्रकल्प .. कोळशाचा आणि राखेचा धुरळा .. जमिनीचे क्षारीकरण

हवेची दिशा तुमच्या हातात नाही.
प्रस्तावित रिफायनरी हवाई अंतर लक्षात घ्या
विजयदुर्ग - सुमारे ५ किलोमीटर
गिर्ये - सुमारे ७ किलो मीटर
देवगड पट्टा - सुमारे २० किलोमीटर

अरब देशातील धुळीच्या वादळाचे लोट दिल्लीला येवून थडकतात, तुमच्या बागा तर अवढ्या २० किलो मीटर अंतरात रोजच प्रदूषणाचे डोस घेणार.

प्रदूषणाचा अधिक त्रास तुमच्या आंब्याच्या बागांवर होणार आहे.
रिफायनरी मुळे हवेत अॅसिड चे प्रमाण वाढणार, त्याचा प्रभाव आंबा काजू आणि नारळ उत्पादनावर होणार.. आजूबाजूची शेती प्रभावित होणार.

खाड्या प्रदूषित होणार समुद्रातील मासेमारी, माशांच्या प्रजोत्पादनाच्या जागा उद्ध्वस्त होणार ..

लक्षात आहे का? मोठी वादळे होतात तेव्हा गुजरात मधील बोटी देवगड किनाऱ्यावर आश्रयाला येतात.. कधी महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या बोटी गुजरात च्या आश्रयाला गेल्या कधी ऐकल्या का? का? कारण गुजरात चे किनारे रिफायनरीने उद्ध्वस्त झालेत. तिकडच्या बोटी खोल समुद्रात महाराष्ट्रात मच्छिमारीला येतात.

आणि लक्षात ठेवा, आलेली रिफायनरी उद्या तुमच्या कडेच केमिकल कंपन्या घेवून येणार आहेत.. कारण त्यांना पुन्हा जागा लागणार आणि तो पर्यन्त तुमच्या बागा बोडक्या व्हायला लागलेल्या असणार..

खालील चित्र उघडून पाहा, त्यातील पत्रक वाचून घ्या, इतरांना वाचायला द्या

िद्द_विनाशकारी_रिफायनरी_रद्द #विनाशकारी_रिफायनरी #देवगड #राजापूरकर #सिंधुदुर्ग

15/11/2022
17/09/2022

प्रिंदावण मधील गणपती मिरवणूक २०२२

श्री क्षेत्र भवानी शंकर मल्लिकार्जुन मंदिर - प्रिंदावण , ता. राजापूर, जि. रत्नागिरीधन्यवाद : Prathamesh Laghate  #शिवश्र...
15/08/2022

श्री क्षेत्र भवानी शंकर मल्लिकार्जुन मंदिर - प्रिंदावण , ता. राजापूर, जि. रत्नागिरी

धन्यवाद : Prathamesh Laghate

#शिवश्रावणी

Bhavanishankar Mallikarjun Temple, Prindavan Google Map Link 👇https://maps.app.goo.gl/AiGhbStPoB1TaeMP9नाम तुझे बरवे गा शंकराOriginal Credits:गायकअजित कडकडे...

28/07/2022

#भावय२०२२
#दिपअमावास्या

प्रिंदावण गावाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील अंगणात भावय उत्सव साजरा करण्यात आला.

भावय उत्सव प्रिंदावण राजापूरहा उत्सव गटारी म्हणजेच दिप अमावस्येला साजरा केला जातो... या उत्सवात अबाल‌वृध्द सहभागी होतात,...
28/07/2022

भावय उत्सव प्रिंदावण राजापूर

हा उत्सव गटारी म्हणजेच दिप अमावस्येला साजरा केला जातो... या उत्सवात अबाल‌वृध्द सहभागी होतात, ढोलाच्या तालावर शिमगोत्सव काळातील होळ्यांना मोकळं करतात, ग्रामदेवतेच्या अंगणातील रान काढतात, चिखलात खेळतात, वाघ पिटाळतात आणि सरतेशेवटी म्हॉव पळवून या उत्सवाची सांगता होते...

#कोकण #कोंकण,

Address

Prindavan
Rajapur
416702

Telephone

9870448857

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prindavan Agro Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prindavan Agro Tourism:

Shortcuts

Share