Ratnagiri Darshan - रत्नागिरी दर्शन

Ratnagiri Darshan - रत्नागिरी दर्शन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ratnagiri Darshan - रत्नागिरी दर्शन, Sightseeing Tour Agency, Ratnagiri.

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा।नमस्कार माझा सद्गुरु रामदा...
05/03/2024

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥
कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा।
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा॥
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
आज दास नवमी!

गुहागर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ही . या फेरी बोट मुळे गुहागर ते मुंबई अंतर जवळपास 100 km ने कमी होणार आहे....
25/04/2023

गुहागर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ही . या फेरी बोट मुळे गुहागर ते मुंबई अंतर जवळपास 100 km ने कमी होणार आहे. तसेच वडद , परचुरी, पेवे , कारूळ , पांगरी , विसापूर, ही खाडी पट्या मधील गावे जलद गतीने दापोली आणि खेड तालुक्याशी जोडली जातील. येथील नैसर्गिक सौंदर्य , खारफूटीची जंगले यासाठी हा भाग agri tourism साठी खूप चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो.

Source : Social Media

कोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे! ❤️

येवा कोकण आपलोच असा!
🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

फोटो : Please dm for credit

#कोकण #मालवण

09/03/2023
🌸श्री क्षेत्र गणपतीपुळे 🌸🙏श्रींची आजची पूजा🙏दिनांक : 09 फेब्रुवारी 2023चंद्रोदय - रा. 9:35 मिनीटांनी🌺🥥🌺🥥🌺🥥🌺🥥येवा कोकण आप...
09/02/2023

🌸श्री क्षेत्र गणपतीपुळे 🌸
🙏श्रींची आजची पूजा🙏
दिनांक : 09 फेब्रुवारी 2023

चंद्रोदय - रा. 9:35 मिनीटांनी
🌺🥥🌺🥥🌺🥥🌺🥥

येवा कोकण आपलोच असा!

फोटो : Abhijit Ghanwatkar

🥭🥥🏠🌅🍍🫐🥭☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🍉🥭

#कोकण #मालवण

 #मार्लेश्वराच्या_लग्नाला_नवरी_गिरीजा_नटली #मकर  #संक्रांत    रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वताच्...
15/01/2023

#मार्लेश्वराच्या_लग्नाला_नवरी_गिरीजा_नटली

#मकर #संक्रांत

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या शिखरांमधे वसलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर हे उभ्या महाराष्ट्रातील शिवभक्तांचे आराध्य दैवत. गुहेतील मार्लेश्वर_मल्लिकार्जुन शिवपिंडी, धारेश्वर धबधबा , करंबेळीचा डोह आणि सरपटणाऱ्या जनावरांचा मुक्त संचार ही मार्लेश्वरची वैशिष्ट्य. दर वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी होणारा लग्न सोहळा - कल्याण विधी हे अजून एक आकर्षण. हिरवीगार वनराई , नीरव शांतता , गारवा यामुळे पर्यटक आणि गिरीप्रेमींना या ठिकाणाची भुरळ पडतेच.आज (१४किंवा)१५ जानेवारीला देवाच्या लग्नसोहळ्यासाठी अफाट जनसागर लोटतो.
मारळचा श्री देव मार्लेश्वर हा नवरदेव तर साखरप्याची गिरीजादेवी नवराई. भोगीच्या दिवशी आंगवली मठातून मार्लेश्वर गुहेकडे देवाची पालखी नेली जाते. याच दिवशी देवी गिरीजेची पालखीही दाखल होते. सोहळ्याचे यजमान असतात देवरुखचे श्री देव व्याडेश्वर. पंचक्रोशीतून देवदेवतांच्या पालख्या अनेकविध पध्दतीनी शिखरावर येतात.
अनेक विधी भोगीच्या दिवशी होतात. मुख्य कल्याणविधी संक्रांतीला साजरा होतो. संक्रांतीच्या दिवशी पहाटे मुलीचे घर पाहणे , मागणी घालणे , मुलाचे घर पाहणे , पसंती , ठरावनामा इ. विधी होऊन कल्याणविधी कालनिश्चिती होते. विवाहासाठी शेट्ये , उपशेट्ये , भोई , चर्मकार , सुतार , अबदागिर , ताशेवाले , चौरी , नाभिक , अणेराव इ. ३६० मानकऱ्यांना बोलावणं केलं जातं. यानंतर विडे मांडून विवाह सोहळा संपन्न होतो. लिंगायत पध्दतीने होणाऱ्या या सोहळ्यात पंचकलशांची मांडणी होते. करवलीचा मान गोठणे गावाचा असतो.
कल्याण विधीनंतर सर्वजण देवाला गा-हाणं घालतात आणि देवाचा निरोप घेतात. नंतर मार्लेश्वरच्या करंबेळी डोहात हळदीकुंकू , दिवा , बांगड्या , फुले इ. भरलेली परडी वाहिली जाते. यानंतर सोहळ्याची सांगता होते.
भक्तांनी देवाचं लग्न लावणे ही संकल्पनाच आगळीवेगळी आहे. मुंबईकर हे दोन दिवस राखून ठेऊन हमखास येतात. दशक्रोशीतील लोक आवर्जून येतातच शिवाय सख्खे शेजारी असलेल्या सातारा , सांगली , कोल्हापूर जिल्ह्यातून शिवभक्त लग्न सोहळ्याला हजेरी लावतात. हिमकन्या गिरीजा नी सह्यगिरीच्या शिवहराचा हा लग्नसोहळा एकदा तरी अनुभवायलाच हवा ...

सह्यगिरीतूनी वास जयाचा तोची मारळेश्वर
चला जाऊया , दर्शन घेण्या निघा हो सत्वर
हिमकन्या ती गिरीजा शोभे घेऊनी शुभ्र माला
शिवभक्तांनो चला साधूया कल्याणविधी वेला...

©( स्वानंद जोशी )
मकर संक्रांत
१५/०१/२०२३

Photo credit : Social Media (Please dm for credit)

🌸श्री क्षेत्र गणपतीपुळे 🌸🙏श्रींची आजची पूजा🙏दिनांक : 10 जानेवारी 2023चंद्रोदय - रा. 9:11 मिनीटांनी🌺🥥🌺🥥🌺🥥🌺🥥येवा कोकण आपलो...
10/01/2023

🌸श्री क्षेत्र गणपतीपुळे 🌸
🙏श्रींची आजची पूजा🙏
दिनांक : 10 जानेवारी 2023

चंद्रोदय - रा. 9:11 मिनीटांनी
🌺🥥🌺🥥🌺🥥🌺🥥

येवा कोकण आपलोच असा!

🥭🥥🏠🌅🍍🫐🥭☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🍉🥭

फोटो : Please dm for credit

#रत्नागिरी #रत्नागिरी_दर्शन #दापोली #खेड #चिपळूण #संगमेश्वर #राजापूर #लांजा #गुहागर #मंडणगड #हापुस #आंबा

आंब्याची सावली गं...दिवसाचे पावली गंसुखे सुखे अवघी सखये...घरट्याशी मावली गं ! 🤗आडाचे गोड पाणी, चान्या गातात गाणीप्राजक्त...
21/12/2022

आंब्याची सावली गं...दिवसाचे पावली गं
सुखे सुखे अवघी सखये...घरट्याशी मावली गं ! 🤗

आडाचे गोड पाणी, चान्या गातात गाणी
प्राजक्ताच्या झाडाशी वेचती कवडसे नाणी
केळीच्या पानांवरती भाताची रास नांदे
रानीच्या ताज्या ताज्या भाजीने भरले भांडे
सांदीपांदीतुन धावे कस्तुरी प्यालेला वारा
अधेमधे ऐकू येतो गडी घालती हाकारा
वेलीच्या देहावरती फूल तांबडे एखादे
रेजांमागे रुळणारे तलम तरी पडदे साधे
खळ्याशी पहुडली आहे कुण्या मांजरांची जोडी
जिथे ऊन्ह रांगोळी गं निगुतीने रोज काढी
ऐक ऐक दूरची ती सखये केकावली गं
सुखे सुखे अवघी सखये घरट्याशी मावली गं

परकर काठाचा लाल, पोलका हिरवा छान
नेसुनी उभे भवताली तरू डोलवीत मान
कौलांच्या पाठीवरती उतरला गं भारद्वाज
मैफीलीस करतो साथ झोपाळ्याचा आवाज
फणसाच्या खांद्यावरती भरली पक्ष्यांची शाळा
निवलेल्या काळोखाने दरवळतो आहे माळा
चिमणी भरवे बाळांना हळू हळू दाणा दाणा
घरटे ऐसे जणु वाटे नव्या सुनेचा उखाणा
अमृत नाही देवाने पदरासी घातले पण
आहे त्याला अमृत गं म्हणू समाधाने आपण
इथे जन्म मिळण्यासाठी पुण्याई लागली गं
सुखे सुखे अवघी सखये घरट्याशी मावली गं

आंब्याची सावली गं...दिवसाचे पावली गं
सुखे सुखे अवघी सखये...घरट्याशी मावली गं ! 🤗

#कौस्तुभअरुण (कौस्तुभ आठल्ये, रत्नागिरी)

Photo credits : Siddhesh Vaidya

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺🌸Artist : Unknown (Please dmfor the credit)येवा कोकण आप...
31/08/2022

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺🌸

Artist : Unknown (Please dmfor the credit)
येवा कोकण आपलोच असा!

🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

#कोकण #मालवण

 #भावपूर्ण  #श्रद्धांजली 🌸🌸🙏🙏मराठी चित्रपट सृष्टीतले अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे तरी त्यां...
09/08/2022

#भावपूर्ण #श्रद्धांजली 🌸🌸🙏🙏

मराठी चित्रपट सृष्टीतले अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

💐💐💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐💐💐

#प्रदिपपटवर्धन

Address

Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Darshan - रत्नागिरी दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share